Rang he nave nave - 13 books and stories free download online pdf in Marathi

रंग हे नवे नवे - भाग-13

आता ही मला का फोन करत आहे! विहान अजूनही चिडलेला होता. 'because still Care's for you!' दुष्यंत म्हणाला! 'तू इथे काय करतोय?' विहान त्याला म्हणाला. 'आलो असच मला माझ्या अंतरआत्म्याने ने सांगितलं की माझा भाऊ दुःखात आहे आणि हे बघ मी आलो!' दुष्यंत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर विहान हसला. 'अरे फोन उचल किती फोन करतीये ती बिचारी!' दुष्यंत म्हणाला.'हे बघ मी उचलनार नाही',' आणि ती बिचारी तर अजिबात नाही आहे!' विहान म्हणाला. 'काय झालं विहान इतका का रागावला ?'परत भांडण? दुष्यंत ने विचारलं. 'नाही आता संपल सगळं'. विहान म्हणाला.' म्हणजे?' मग विहान ने सगळी हकीकत कथन केली. 'अच्छा तर अस आहे सगळं'. मग ठीक केलस तू ! बर झालं, मी काय म्हणतो 'सोड तुला आता तिचा असाही राग येतोच आहे,' आणि तुला काय हजारो मुली मिळतील हीचा काय एवढा विचार करायचा! 'आणि असही परवा जायचंच आहे मग कसला आला एवढा विचार!' 'दे ते सगळे विचार सोडून आणि एक दिवस मस्त फॅमिली सोबत enjoy कर !' दुष्यंत ने त्याला सल्ला दिला. 'अरे काय enjoy कर माझा मूड नाही आहे मी नाही विसरू शकत तिला!' विहान म्हणाला . 'का ?'का नाही विसरू शकत? दुष्यंत म्हणाला. 'अरे प्रेम आहे माझं तिच्यावर' ! 'हेच हेच सांगायचा प्रयत्न करतोय मी तुला की तू खरच प्रेम करायला लागला मैथिली वर! आणि तरीही तिच्याशी अस वागला?'ठीक आहे विहान ती चुकली असेल rather ती चुकलीच म्हणून आता पर्यंत तिने तुझ्यासाठी काय केलं ते तू सगळं विसरलास ? 'तुझ्या एका हाकेवर धावून येणारी,' 'तुझा राग काढणारी',' तुझ्या प्रत्येक रंगात रंगून जाणारी मैथिली!' तिच्या शी तू इतक वाईट वागला ठीक आहे तिला कळाल नाही आपण चुकीचं वागतोय पण तू समजून घ्यायला नको. अरे राजा तू 'so called well setteled' आहेस पण तिचं स्वप्न पूर्ण व्हायचं बाकी आहे अजून, त्यात घरचे बाहेरचे सगळे लग्नासाठी मागे लागतात म्हणजे किती प्रेशर असेल तिच्यावर विचार कर साहजिक आहे आणि त्यातही तू तिला नेमकं लग्नाचं च विचारलं चिडणार आणि तिला नेमक्या कुठल्या भावना व्यक्त कराव्या कळल्या नसणार बोलली ती काही चुकीचं तर तू नको का समजून घ्यायला? मुळात विहान मैथिली स्वतःच confuse आहे त्यात तिला नाही व्यक्त होता आलं, तर काय बिघडलं? म्हणून तिच्या सोबत तू अस वागावं? दुष्यंत बोलला. आता विहानलाही त्याची चुकी कळाली 'मी फारच rude वागलो रे तिच्याशी!' 'खूप दुखावली गेली असणार ती!' 'दुष्यंत, मी माझ्या अश्या वागण्यामुळे गमावलं माझ्या मैथिलीला'.'अरे असा काय बोलतो तिने स्वतःहून फोन केला तुला'.'तू बघ कॉल बॅक करून!' दुष्यंत म्हणाला.'नाही माझ्यात हिम्मत नाही आता तिला फेस करायची'. 'तू बोलतो का?' विहान म्हणाला. 'काय डोक्यावर पडला का रे !' म्हणे 'तू बोलतो का?' दुष्यंत म्हणाला. 'अरे हा, मी पण काय वेड्या सारख बोलतोय तू कसा बोलणार मलाच बोलावं लागणार'. त्याने मैथिली ला फोन लावला.
'त्याचाच कॉल आला', मैथिली म्हणाली.'अग उचल ना मग' आदिती म्हणाली. हा बोल विहान, 'मैथिली मला भेटायचं आहे आता please नाही म्हणू नको!'विहान म्हणला. 'ठीक आहे मी सांगते तिथे ये' 'ओके आलोच' अस म्हणून त्याने ठेवला. त्याने लगेच आनंदाने दुष्यंत ला मिठीच मारली 'भेटायला बोलावलं तिने', विहान म्हणाला. 'चल मग दुष्यंत म्हणाला'. 'ऐ चल काय चल, तिने मला बोलावलं तुला नाही तुझं काय काम?'' उगाच माझ्या मागे येऊ नको ह!' विहान म्हणाला. 'ऐ ,मला काही हौस नाही आहे तुमच्या मधात येण्याची' 'for your kind information माझी बायको मैथिली सोबत आहे', तिला घ्यायचं आहे मला. दुष्यंत म्हणाला.'ओके अस सांग ना मग चल विहान आणि दुष्यंत निघाले'. ते ठरलेल्या ठिकाणी पोहचलेही. 'चल आदिती आपला रोल संपला आता दुष्यंत तिला म्हणाला'. 'नाही दुष्यंत तू चुकतो आहेस, एक महत्त्वाच काम बाकी आहे'. आदिती म्हणाली . 'आता काय?' दुष्यंत म्हणाला. अरे विहान च्या घरच्यांना आणि मैथिली च्या घरच्यांना मी आपल्या घरी बोलवलं आहे ह्यांनी आधी जो काही घोळ घातला तो कोण निस्तारणार ते आपल्याच करावं लागणार ना दोघांच्या ही घरच्यांना समजून सांगावं लागेल की दोघेही खरच चांगले आहे. चल घरी एव्हाना सगळे आलेही असतील आदिती म्हणाली. 'thank you आदिती' तूच खरी हितचिंतक आहे आमची' नाहीतर हा दुष्यंत काही कामाचा नाही! विहान म्हणाला. 'तुला बघतो मी नंतर आता मैथिली समोर काही बोलत नाही भेट तू मला फक्त' चल आदिती' 'आणि हो घरी या आमच्या तुमचे घरचे असतील च तिथे आणि भांडून येऊ नका म्हणजे झालं'. 'चलो बाय' अस म्हणून ते दोघेही निघाले.
आता विहान आणि मैथिली दोघच तिथे होते. 'sorry विहान!' मैथिली म्हणाली 'अग ऐ सॉरी का म्हणतिये, माझंच चुकलं खूप हर्ट केलं मी तुला' विहान म्हणाला. 'विहान आवडेल मला तुझ्या आयुष्यात आयुष्यात रंग भरायला'. 'तुझ्या प्रत्येक रंगात रंगून जायला आणि तुझा प्रत्येक रंग साठवून घ्यायला'. आणि तिने विहान ला मिठीच मारली. कितीतरी वेळ दोघेही तसेच होते. 'मैथिली जायचं घरी घरचे वाट बघत असतील'.विहान म्हणाला 'खर सांगू तर मला इथून कुठेही जावं वाटत नाही आहे'.'पण जावं लागेल ना ?' विहान म्हणाला. 'हम्म, 'चल' आणि ते घरी जाण्यासाठी निघाले.'विहान मला घरी जायचं खूप टेन्शन आलंय रे!' 'कस सांगायचं घरी'. मैथिली त्याला म्हणाली. 'अग कस काय सरळ सांगायचं आमचं प्रेम आहे एकमेकांवर विषय संपला',विहान म्हणाला. 'अरे इतका सोपं असत का ते?' 'दुसरा कुणी असता तर मला जड गेलं नसत पण नेमका तू आहेस!' मैथिली म्हणाली. 'म्हणजे मी काही वाईट आहे का?''आणि असलो तरी आता तूच निवडलं आहे' आणि तो हसला . 'तुला टेन्शन मधेही अस कस सुचत रे बोलायचं'. इथे मला घरी काय परिस्थिती असेल त्याचा विचार करून कसतरी होतंय. मैथिली म्हणाली. 'अरे हो relax ते काही खाणार नाही आपल्याला'. तो मैथिली ला अस बोलत तर होता पण त्याला ही मनातून टेन्शन आलंच होत. दोघेघी घरी पोहचले आणि त्यांना वाटलं आपलं काही खर नाही पण घरी एकदम वेगळीच परिस्थिती होती. त्यांचं तर एकदम जल्लोषात स्वागत केलं.'आदीती हे आपल्याच घरचे आहेत ना नेमके नाही हा चमत्कार कसा झाला?' मैथिली ने अदितीला विचारलं. 'ऐ बाई झालं ना आता सगळं नीट आता कशाला शंका काढतेय'. 'चला finally मला माझा हक्काचा जावई मिळाला धोंड्याच वाण द्यायला!' मैथिली ची आई म्हणाली. 'आई तुला ह्या साठी जावई पाहिजे होता?' काहीही असत तुझं तर. 'एखादी म्हणाली असती माझ्या मुलीला तिचा जोडीदार मिळाला पण तुला धोंड्याच्या वणाच पडलं कठीण आहे'. सगळे दोघींच्या ह्या बोलण्यावर हसायला लागले.' हो आणि मलाही माझ्या साठी वटसावीत्रीची पूजा ठेवणारी बायको मिळाली'. विहान मिश्कील पणे म्हणाला. आणि मैथिली चक्क लाजली 'ऐ तू पण काय आई सारख बोलतोय!' अग खर आहे,हो की नाही काकू! तो म्हणाला, अगदी खरंय! तिची आई म्हणाली. हा आता मैथिली आणि विहान तुमच्या साठी अजून एक सरप्राईज दुष्यंत म्हणाला. 'आता काय?' ते दोघेही सोबत म्हणाले.'आता तुमची engagement Scotland मध्ये!''पण लग्न भारतात च ह आणि ते ही मैथिली ची PHD पूर्ण झाल्यावरच ₹' दुष्यंत पुढे म्हणाला.'काय हे कधी ठरलं' मैथिली म्हणाली. काय आहे मैथिली तुझं एक लेटर आलेल होत घरी मी तुला 2-3 दिवसांपासून बघ बघ म्हणतोय पण तुला विहान पासून वेळ मिळाला तर तू बघशील ना!' मैथिली चे बाबा बोलले . 'काय हो बाबा, आता तुम्ही पण, विसरले मी बघायच' 'पण त्याचं आता काय ते बघू ना घरी गेल्यावर'. मैथिली म्हणाली. 'अग तेच तर मेन आहे' म्हणजे ते लेटर कसल आहे माहिती आहे का?तिचे बाबा म्हणाले असेल कुठल्यातरी परीक्षेच वगैरे ते सोडा ना आता मैथिली म्हणाली. 'अग परीक्षेच नाही तुझी स्कॉटलंड ला जाण्यासाठी निवड झाली आहे तुला पुढच्या आठवड्यात निघयच आहे तेही 3 महिन्यांसाठी'. तिचे बाबा म्हणाले. आता तर दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. 'बापरे!आज तर धक्क्यांवर धक्के मिळत आहेत',विहान म्हणाला. मैथिली म्हणजे तू सोबत असणार wow किती छान !तो पुढे म्हणाला. 'मला तर अजूनही स्वप्नात असल्यासारखच वाटतय, विहान चिमटा काढ मैथिली म्हणाली'. आणि त्याने खरच चिमटा काढला. 'ऐ मी सहज म्हणाले होते' ती म्हणाली. 'चला मग विहान ला जाऊ द्या पुढे आपण जाऊ सगळे next week मध्ये स्कॉटलंड ला'.दुष्यंत म्हणाला. 'बघ मैथिली मी म्हणालो होतो ना तुझा होकार घेतल्याशिवाय माझं विमान उडणार नाही'. विहान म्हणाला.आणि मैथिली परत लाजली. 'जा तू पुढे मी येणारच आहे आता', ती म्हणाली.
ठरल्या प्रमाणे विहान आधी गेला आणि नंतर घरचे सगळे गेले. अखेर त्यांचा साखरपुड्याचा दिवस उगवला. 'विहान, मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की माझी इंगजमेंट अशी सातासमुद्रापार होईल'. मैथिली म्हणाली. 'नाही मला तर रोजच वाटायचं की इथेच होईन पण तुझ्या सोबत होईल हे नव्हतं वाटलं'. विहान तिला चिडवत म्हणाला. 'हो का मग केली का नाही इथलीच एखादी'. मैथिली लटक्या रागात म्हणाली. 'कारण माझी मैथिली नाही मिळाली ना!' खूप शोधली,पण ती तर तिकडे होती भारतात. 'विहान.... तू ना!' मैथिली म्हणाली. 'काय मी,' 'काही नाही'. ती म्हणाली. अरे आता रिंग घालणार की गप्पाच मारत बसणार आदिती म्हणाली.आणि अखेर त्यांनी एकमेकांना रिंग घातली दोघेही रेशिमबंधनात अडकले.
--------------समाप्त--------------------------