Vankhot Prem books and stories free download online pdf in Marathi

वांझोट प्रेम

#@वांझोट प्रेम@#
@ सौ.वनिता स.भोगील@

पल..पल..दिल...... के पास , तुम रहेती हो
जी व न..मीठी प्यास...ए कहेती हो.
असच काहीतरी.
त्याच अन तीच नात होत.
तो( आपण त्याना "तो आणी ती"च म्हणुया कारण त्याना एक नाव सध्या तरी नाही)
हा काय म्हणत होते मी, तर...
तो गावाकड राहिलेला,त्याच जवळजवळ सगळ शिक्षण गावीच झाल,तो अगदी शिक्षण पूर्ण झाल तरी आईच कुकुल बाळ आणी बापाचा लाडका, हे सगळ म्हणयापेक्षा दोघांचा प्राण च होता.
आणी त्याच्यासाठी आई आणी बाप अगदी स्वर्ग,कैलास आणी वैकुंठ... म्हणजे कलियुगातला श्रावण बाळ म्हंटल तरी चालेल.
आता आई वडिलांनी कष्ट करून त्याच शिक्षण तर पूर्ण केल पण त्याच स्वप्न होत शहरात जाऊन उच्च पदाची नोकरी करायची.
आता गोष्ट आई वडिलांना सांगितली, मग काय दोघे लगेच तयार झाले,
म्हणजे काय तयार न व्हायला काही कारणच नव्हत की ओ, आज्ञाधारक होता तो, दोघांचा शब्द म्हणजे त्यासाठी आशीर्वाद च असायचा.
असा तो नोकरी निमित्त शहरात निघाला,
तो निघाला तसा आईचा पदर आन बापाच पगोट ओलचिंब झाल,
त्यानही भरल्या डोळ्यांनी दोघाचा निरोप घेतला.
तो दिसेनास होईपर्यंत दोघांची नजर त्याला शोधत होती.
गाडी पकडली अण शहराकडे निघाला,गाव गेली, नवीन रस्ते उंच इमारती दिसू लागल्या तस त्याच शहराकड़च आकर्षण वाढू लागल.
एकदाचा येऊन पोहचला, स्टेण्ड वर राहण्याची सोय होते का कुठे चौकशी केली, एक टपरिवाला म्हणाला आहे जागा पण छोटीच आहे,तो चालेल म्हणाला, नोकरीची सोय होईपर्यंत करु एडजस्ट म्हणून निघाला.
रोड पासून दोन गल्ल्या सोडून टपरी वाल्याण घर दाखवल,
गल्ली म्हणजे अगदीच बोळ एकच मानुस सरळ जाऊ शकतो अशी, मग टपरी वाल्याण बाजूला जाऊन चावी आणली घर उघडल तस कुमट वास घुमला,
दादा बऱ्याच दिवस बंद आहे न म्हणून वास येतोय उघड़ दार ठेवल की जाईल वास.
बघ आवडते का आत जाऊन, तस टपरिवाल्याच्या माग घरात गेला, घर तस ठीक होत पण गावच्या मानान बापान केलेल्या शेळया च शेड च जणू,
आता साठी ठीक आहे म्हणाला तो, टपरिवाल्यांन चावी हातात दिली आणी संध्याकाळी डिपोझिटचे पाच हजार दे म्हणून निघुन गेला.
यान बैग टेकवली, बाजूला जूना झाड़ू पडला होता त्याने थोड झाडून घेतल, हातपाय धुतले, तोवर बाजुचा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा येऊन म्हणाला..
दादा तुम्ही नवीन आहात का? तो म्हणाला हो, का रे?
काही नाही दादा माझी आई जेवन खुप छान बनवते तुला पण पाहिजे असेल तर सांग पैसेपण कमीच घेते.
त्याच्या लक्षात आल बहुतेक ख़ानावळ असावी तो म्हणाला नक्की सांगेन हं.
बैगतुन आईनी दिलेला लाडुचा डबा काढला भाजी पोळी काढली, जेवून घ्यावे मग बघू म्हणून जेवायला बसला.
आईने दिलेल्या पोळयाच्या पेपर वर लक्ष गेल.त्याच्यावर नोकरीची जाहिरात होती, पेपर नीट करून वाचला पत्ता लिहून घेतला, त्यावर भेटण्याची वेळ सकाळी दहा ते चार होती. घड्याळात टाइम बघितला साडेतीन वाजुन गेलेले,आता पत्ता शोधन्यातच अर्धा तास निघुन जायचा, शेवटची तारीख बघितली अजून दोन दिवस होते,
मनाशीच म्हणाला चला ठीक आहे आज पत्ता शोधून ठेवतो म्हणजे उदया डायरेक्ट जाता येईल.
जेवन उरकल.
तसा घराला कुलुप घालून बाहेर पडला, शिक्षित होता म्हणून कुठेच अडत नव्हता,
रिक्शावाल्याला विचारुन पत्त्यावर पोहचला, ऑफिस बघितल आणी तोच रिक्षा परत फिरवला,
खोलीवर येइपर्यंत सहा वाजले, घर उघडले तसा मोबाइल हातात घेतला, गावी मामुच्या दुकानावर फोन लावला, गावात मामुच दुकान यांच्या शेताच्या वाटेवर होत, लाडका शिकत होता म्हणून आईने मोबाइल ला पैसे दिले होते पण त्याना मोबाइल वापरायच पण माहित नव्हते. आत्या, मामाचा फोन पन मामुच्या दुकानावरच यायचा,
सहा वाजता शेतातून घरी येतात हे याला माहित होत.
यान मामूला फोन लावला मामू आईला बोलवा न जरा ' रुक रुक चालू रख मैं अभी बुलाको लाताय'
आई फोन वर बोलायला लागली तस याचा जीव खालीवर होत होता पोहचलो, उदया नोकरी बघायला जाणार हे सगळ सांगुन झाल, मग बापान फोन घेतला परत रिपीट झाल सगळ,
काळजी घे वगैरेवगैरे इकडून तिकडूंन सांगून झाल. फोन कट केला म्हणजे ठेवला.
आता उदयाच काय होईल याच विचारात पेपर बघत होता तेवढ्यात परत बाजुचा मुलगा आला आणू का दादा जेवन,
नको रे भूक नाही मला.
अहो दादा माझी आई चांगल जेवन बनवते बघातरी तुम्ही,
हो का? अरे पण मि ही माझ्या आईन दिलेलच जेवलो म्हणूनतर भूक नाही.
मुलगा तोंड पाडुन गेला.
संध्याकाळी टपरिवाल्याला पैसे देऊन यावेत म्हणून रोड वर गेला तस टापरिवाला वाला म्हणाला..
बर झाल तूच आलास मी आता येणारच होतो सांगायला.
काय सांगायला?
अरे खोलिवाला भाडयाने दयायची नाही म्हणतोय विकायची त्याला..
मग मी आता रात्रि कुठ जाऊ?
मी बोलोय त्याच्या सोबत उदयाचा दिवस ठेवतो म्हणाला बघू सकाळ तू झोप जाऊन.
बर ठीक आहे.
खोलीत आला तस खुप टेंशन आल, उदया नोकरी साठी जायचे की घर बघू, जाउदे बघू उदयाच उदया. म्हणून झोपला म्हणजे झोप कसली पडून राहिला पहाटे ला थोडी झोप लागली.
सकाळी सहा वाजताच बाजुच्या घरातून कुकरच्या शिट्टी चा आवाज आला तस धडपडून जाग आली.
उठून घड्याळ बघितल सहा वाजलेले,
उठून फ्रेश झाला, थोडा विचार करून बैग घेऊनच खोली बाहेर पडला.
बघू दुसरीकडे विचारता येईल, अगोदर नोकरीच काय होतय ते बघू.
रोड वर टपरिवाल्याला चावी दिली आणी रिक्षा ने थेट कालच शोधलेल ऑफिस गाठल.
साडेनऊ होत आलेल्या, बाहेरच वॉचमेन होता चौकशी केली तर त्याने आत जाऊन बसायला सांगतले, साहेब येतीलच एवढ्यात.
आत जाऊन बसला ऑफिस तस बरच मोठ होत.
याच्या अगोदर आठ दहा जण येऊन बसले होते, त्याना बघून याला खूपच टेंशन आल,
शहरातली मूल ही यांच्या पुढे माझ काय?
लगेच बापाचे शब्द आठवले, "प्रयत्नाअंति परमेश्वर नक्कीच असतो"
आणी तेवढ्यात मोठे साहेब आले, सगळे उठून उभे राहिले, सीटडाउन सीटडाउन...
म्हणतच साहेब इन्टरव्हिव केबिन मधे गेले.
दहा मिनिटाने शिपाई येऊन एक एकास बोलवु लागला, आतून येणार प्रत्येक चेहरा पडलेलाच होता.
आता याचा नंबर आला , मी आय कमींग सर? यस यस कमींग..
साहेबांसमोर जाताच आई बाप आठवु लागले.
साहेबांनी विचारलेले सगळे नकळत बरोबर उत्तर देत गेला,
आणी काय साहेब शेवटी म्हणाले... आज पासुनच ऑफिस जॉइन कर.
साहेबांनी हात पुढे केला काँग्रेचुलेशन याने पण हात मिळवला, पण सर मला आज जॉइन नाही होता येणार,
का?
माझ्या राहायची व्यवस्था नाही कुठे अजुन.
अरे एवढंच ना.. आपला शिपाई आहे न.
म्हणजे? अरे त्याला सगळ माहित असत, मी बोलवतो त्याला.
शिपायाला साहेबांनी आत बोलावल, याची राहायची व्यवस्था करायची जिम्मेदारी तुझी. नक्कीच साहेब करतो की लगेच.
म्हणून दोघेपण केबिन बाहेर पडले.
शिपाई लगेच याला ऑफिस च्या समोर चा रोड क्रॉस करून थोड पुढे घेऊन गेला.
तिकडे रूम दाखवली चावी शिपाया कडेच होती बहुतेक तो एजंट च पण काम करायचा, रूम ग्राउंड लाच होती, दार उघडले तस आतून अगदी सगळी सोय व्यवस्थित होती.ए सी, टीव्ही, सर्व काही.
हा तयार झाला, बैग ठेऊन शिपायाला एडवांस दिल व्यवहार ठरला.
परत ऑफिस ला आला, याला सेप्रेट केबिन होत, पगार ही पाच आकडी होता, सगळ कस स्वप्नात असल्यासारख झाल होत.
अहो का नाही होणार, हा आई बापाचा श्रावण बाळ होता त्यांचा आशीर्वाद होता म्हणून तर सगळ कस छान झाल होत.आता त्या दिवसापासुनच याच रूटीन चालू झाल.
शिपायाने याची मेस ची व्यवस्था पण जवळच्या मावशिकडे करून दिली.
दोन दिवस आड़ करून गावी फोन न चुकता व्हायचा.
शनिवार आला ऑफिस ला सुट्टी असायची,
सुट्टी म्हणून साहेब उशिरा उठले ब्रश करत करत च खिड़की जवळ आला तस बाहेर समोरच्या रूममधे केस झटकत तरुणी उभी होती.. याने बघितली तस तोंड धुवायच सोडून दार उघडून बाहेर गेला.
कारणच तस होत, 'ती' होती च तशी.
इंद्राच्या दरबारातील अप्सराच जणू.अप्सरा कसली मोहिनीच!
कमरेपर्यंत मोकळे केस झटकुन मागे टाकले,
आणी हा तिच्याकड बघतच राहिला.
गोरिपान जणू चाफ्याची कळी,घारे डोळे जसा अथांग सागर ज्यात तो पूर्ण बुडाला, ओठ तर जणू गुलाबाच्या पाकळयाच साधारण साडेपाच फुट ऊंची... शरीर बांधा तर जशी चवळीची शेंग...... अती सुंदर...
तो बघतच राहिला, एवढ सुंदर रूप असत का? त्याचा विश्वास बसेना.
तीच लक्ष पण नव्हत, ती परत फिरली तरी हा मात्र तिच्या पाठमोऱ्या ...... बघतच होता.
तेवढ्यात पेपरवाला आला आणी याची स्वारी भानावर आली.
मग काय हा आत गेला, आंघोळ करताना तीच दिसयला लागली, बाहेर आला तरी तसच, सारखच बाहेर लक्ष लागल पण तिचा दरवाजा उघडला नाही.
हा त्या दिवशी दिवसभर तिच्या दरवाजाकड डोळे लावून बसला.
जेवनाच भान नाही भूक पण लागली नाही, शेवटी संध्याकाळ झाली आणी तीने दरवाजा उघडला तसा हा स्वतःच्या दारात जाऊन उभा राहिला.
तीने फिकट पीवळया रंगाची साड़ी घातलेली केस मोकळे , हातात कसलतरी ताट होत बहुतेक पुजेच असाव.
ती दार लावून निघाली, तस त्यानं शुद्ध हरपल्यासारख सरळ तिच्या समोर जाऊन हाय केल, तस तीन फक्त स्मित हास्य करून बाजूने निघुन गेली.
याला काहीच समजल नाही, मी ओळख नसताना हाय केल हे तिला आवडल नसाव बहुतेक पण आवडल नसत तर तीने स्माइल दिली नसती, आणी एटीट्यूड ची तर अजिबात वाटत नाही मग माझ्या बोलण्याला प्रतिसाद का दिला नसेल?
या च विचारात तो स्वतःच्या दारात येऊन थांबला, समोरून त्याच सोसायटितले काका जात होते त्याना आवाज दिला.
काका ओ काका !
बोल न काय रे काही काम आहे का?
नाही एक विचारायच होत.
हा विचार न मग..
ती समोर मुलगी राहते ती कोण आहे काही माहिती आहे का?
अच्छा ती होय बिच्यारी....
का हो काय झाल तिला..?
काय सांगायचं तीच लग्न झाल आणी दोन दिवसात नवरा मेला एक्सीडेंट मधे, घरच्यानी अपशकुनी म्हणून हाकलुन दिली, माहेरच्यानी पण आधार दिला नाही.
मग आली पोटा पाण्याच्या शोधात इकडे, एकटी मुलगी कुणी घर देताना हजार चौकशी करायचे, मग विचारत एक दिवस आपल्या सोसायटित आली सगळ्यानी तिला आधार दिला, खुप गुणी मुलगी आहे. कुणाशी बोलत नाही,बिच्च्यारी एकटीच असते.
एवढ सगळ एका दमात बोलून काका निघुन गेले.
हा आपला तीथच उभा होता, तेवढ्यात ती परत आली, तिला बघून याला जणू मनात अत्यानंद झाल्यासारख झाल.
तो बघत होता तेवढ्यात तीच त्याच्या समोर आली " हं प्रसाद घ्या" तिच्या डोळ्यात बघत याने हात पुढे केला, तीने हातावर प्रसाद ठेवला अन म्हणाली मघाशी तुम्ही माझ्याशी बोललात आणी मी तशीच निघुन गेले माफ करा. पण मी देवळात जाताना कुनाशी बोलत नाही.
तो फक्त तिच्या ओठांकडे बघत होता तिच्यात काहीतरी जादू आहे अस त्याला वाटत होत.
अन ती तेवढ बोलून निघुन गेली.
हा स्वप्नात तीथच उभा होता, तीन जाऊन तीच दार लावल मग हा जागा झाला स्वप्नातून.
हातातल्या प्रसादकडे बघत स्वतः शिच बडबडत होता हे स्वप्न होत की खर होत.
आतमधे येऊन ती बोललेल, तिच्या डोळ्याच्या पापण्याची उघड़झाप, तिच्या ओठांची हालचाल सार समोर दिसत होत.
प्रसाद तोंडात टाकला अन काका बोललेल आठवल की ती विधवा आहे आणी याच्या काळजाच पाणी झाल, एवढ्या कमी वयात हे नाशिबी कस, मनातल्या मनात खुप दुःखी झाला.
आपन हिची काही मदत केली तर, शेवटी आई बापाचे संस्कार अडल्या नडल्या ना मदत करावी.आपले संस्कार तसे नाहीत पण मैत्री तर करु शकतो न?
उदया पण सुट्टीच आहे बघू बोलते का..
तिच्या विचारातच रात्र झाली, बेड च्या एवजी सोफ्यावरच डोळा लागला.
सकाळी सहा वाजताच जाग आली डोळे उघडले तशी तीची आठवण आली, पटकन उठून खिडकीतून पाहिल , तिच्या दाराला कुलुप होत.
कुठे गेली असेल एवढ्या सकाळीच?
तेवढ्यात ती गेट मधून आत येताना दिसली रात्रिचीच साडी अंगावर होती, कुठे गेली असेल, देवळात म्हणावे तर साडी कालचिच म्हणजे अजून आंघोळ झाली नाही, बघू ओळख तर झाली आहे बोलता येईलच की नंतर.
ती कुलुप उघडून आत गेली दार बंद झाल, तस हापण परत येऊन सोफ्यावर पडला.
आज हिच्याशी काहीतरी कारण काढून बोलायच किती दुःखात असेल ती कुणी दुःख एकनार सुद्धा नाही हिला.
फ्रेश झाला तस तीन पण दार उघडल, तीची याची नजर भेट झाली. तस हा काही बोलायच्या अगोदर तिनच हात दाखवला, ये म्हणून.
क्या बात है!!!
हा जरा संकोचित पणेच तिच्या दारात गेला तस ती हसुन म्हणाली या न आत, घरात सोफा होता तीन सोफ्याकड़े हात दाखवत बसन्याचा इशारा केला.
हा जाऊन बसणार तेवढ्यात ती म्हणाली चहा की कॉफी घेणार? नाही काहीच नको.
अस कस एवढे आपण समोर राहतो पण ओळख नव्हती आता झाली तर चहा तर घ्यावाच लागेल.
आणी तीने चहा टाकला, तस त्याने लगेच विचारल सकाळी पण देवळात गेलेलात का तुम्ही?
नाही मी सकाळी आले बाहेरुन..
म्हणजे? मी समजलो नाही.
आधार कुणाचा नाही म्हणून नोकरी करायच ठरवलं पण सगळीकडे फायदा घेणारेच खुप भेटले म्हणून मग मी ठरवले नोकरी नकोच..
जवळच एक आश्रम आहे मला थोडीफार गायनाची आवड़ आहे म्हणजे लग्ना अगोदर क्लास घ्यायचे मी, मग ठरवल आश्रमातल्या मुलाना शिकवायला जायच पण मूल संध्याकाळी फ्री असतात मग मी संध्याकाळी जाते, रात्रि उशिरा नको यायला म्हणून आश्रमाच्या मॅडम ने माझी झोपण्याची व्यवस्था तिथेच केली आहे, सकाळी येते घरी मग.
थोडेफ़ार पैसे ही मिळतात आणी कुणाला काही दिल्याचा आनंद पण.
बोलत बोलत चहा तिने दिला आणि याने संपवला पण.
तीने त्याच्या बददल विचारले याने खुप जुनी ओळख असल्यासारखे सर्व सांगितले,
आणी हे पण बोलून गेला की मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल त्याला तिनेही समति दिली...... मग काय स्वारी हवेतच घरात आली तर मोबाइल वाजतच होता,, पाहिल तर मामुचा नंबर होता लगेच उचला. हेलो " क्या मिया कबसे फोन लगा रिहा हु तुमकू उठानिको नही हुता क्या, इधर तुम्हारे अम्मा अब्बू की जान जानेकी येळ आयी" गावची मुसलमानी बोलून मामुने फोन आईला दिला, बोल आई....
अरे लेकरा सनवारी तुला सुट्टी आसति तरी त्वा फोन केला नाहीस. कसा हायस?
मी मजेत आहे, मग आईच बोलून झाल्यावर बाप बोलून तेच तेच रिपीट व्हायच.
मग लक्षात आल तिच्या विच्यारात गावी फोन करायची आठवण च राहिली नाही.
आज श्रावण बाळ कुठतरी चुकला अस त्याच त्यालाच वाटू लागल.पण तिच्या दुःखा पुढे हे अगदीच मामुली वाटत होत.
याचा ऑफिस ला जाताना चहा तिच्याच घरी होऊ लागला. सुट्टीच्या दिवशी ती पण त्याच्याघरी कधीतरी येऊ लागली.
पुढे थोड्या दिवसात त्याने गाड़ी घेतली, मग तिला कधी आश्रमाच्या गेट वर सोड कधी देवळात घेऊन जा अस वाढतच चाल होत.
आता सोसायटितले लोक कुजबुजु लागले हे दोघानाही जानवल.
एक दिवस तो बोलताना म्हणाला माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे लग्न करशील माझ्याशी?
तस तीने सांगीतल माझ्या मनाची तयारी नाही तशी अजून पण विचार केरेन.
कारण तो तीची इतकी काळजी घ्यायचा की जणू सात जन्माचे सोबतिच.
तिला ही तो आवडत होता, तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट जानवायच त्याला. आयुष्यात अपघात झाला तिच्या म्हणून ती वेळ मागत असेल .
पण आता शेजारी पाजारी तोंडावरच बोलू लागले.
तस त्याने सगळ्यांना सांगून टाकल आम्ही लग्न करणार आहोत म्हणून.
पण त्याला आई बापाच लक्षातच नाही की विधवेशी लग्ना ला होकार मिळेल की नकार. तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता.शेजारी आनंदी झाले एवढा चांगला तरुण विधवेशी लग्न करणार बिच्यारिच नशीब उजाळल.
आता ती पण खुश असायची. आता काय खुलेआम दोघे सुट्टी दिवशी लोंगड्राइव तर कधी हॉटेल मधे जेवण कधी शॉपिंग तर कधी सिनेमा.
एवढ्या तुन पण त्याने कधीच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही.
तो फक्त तिच्यावर प्रेम करायचा म्हणजे अगदी जीव ओवाळून टाकायचा.
त्याने घरी सांगीतल माझ एका मुलीवर प्रेम आहे पण ती विधवा आहे.
तस आई बापाचा पारा चढला, असली अपशकुनी आम्हाला नकोय घरात म्हणून सांगीतल, तो पण प्रेमात अंता पर्यंत बुडालेला त्यानं स्पष्ट सांगीतल मला तिच्याशिच लग्न करायच आहे तुमची समति नसेल तर मी आजपासून तुमच्यासाठी मेलो.
एका क्षणात श्रावण बाळाचा राक्षस झाला, तिच्या प्रेमापोटी तो काय करतोय हे ही त्याला समजत नव्हत.
कधी बाहेर गेल्यावर तीच त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची, पण तो म्हणायचा सगळ लग्नानंतर करु.
चांगला पाच आकडी पगार होता मनसोक्त तिच्यावर खर्च करायचा.
ती नेहमीच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची आणी तो विचार करायचा की हिने खुप दुःख भोगलेत म्हणून जास्त इमोशनल होत असेल.
त्याच इतक प्रेम जडल होत की त्याला तिच्याशिवाय काही काही दिसत नव्हत.एक दिवस असच त्याला वाटल की आता मी असताना हीला आश्रमात कशाला जावू दयायची तिला जिथ कमी तिथ मी आहेच की.
त्या दिवशी त्याला ऑफिस च्या कामतुन घरी यायला उशीर झाला.
त्याच्या लक्षात आल की उशिरा घरी एकटिला यायला जमत नाही तर आज आपणच जाताना घेऊन जाऊ.
तिला सरप्राइस पण देऊ, त्यानं गाड़ी आश्रमाच्या गेट वर थांबवली.
गेट बंद होता, त्यानं वाचमैन ला आवाज दिला. तस वाचमैन छोट्या गेटमधुन बाहेर आला.
काय झाल साहेब? मुलाना गान शिकवायला येते न तिला बोलाव न बाहेर मी आलोय म्हणून सांग.
कोण साहेब? इकड तर कुणीच येत नाही गान शिकवायला.
काय?
होतर.
अरे तू नवीन आहेस का इथ?
नाही साहेब खुप वर्षापासून नोकरी करतो इथच,
अरे मग मी स्वता तिला गाडीने गेट वर किती वेळा सोडून गेलो नाही बघितलस का?
हो... बघितल की साहेब, पण तुम्ही सोडून जायचा त्या मॅडम आश्रमात येतच नव्हत्या.
अरे काय बोलतोस.....
हो साहेब .. तुम्ही सोडून गेल की एक गाड़ी यायची त्या मॅडम त्या गाडीत बसून निघुन जायच्या.कस शक्य आहे हे, ती कुठे जात असेल, का जात असेल हजार विचार त्याच्या मनात येऊ लागले.
हो पण तिचा राग नाही आला, कारण तो प्रेमच तेवढ करत होता, अगदी अंतकरना पासून.
ति कुठे असेल, तिला काही झाले तर नसेल न?
काही काही समजेना काय करावे.
वाचमैन म्हणाला साहेब खुप उशीर झालाय, घरी जा तुम्हीपन.
'ओके' म्हणून गाडीत बसला.
अंगात त्राण न च नव्हता..
गाडी काढली...
तिथून निघाला, तिचा चेहरा समोर दिसत होता.
तिच्या आठवणीने तो कासाविस म्हणजे व्याकुळ झाला.
पुढे येऊन रस्त्याच्या कड़ेला गाड़ी लावली तीथच गाडीत बसून विचार करू लागला.
रात्र बरीच उलटुन गेली होती.
तहान भुकेच भान नव्हत.
त्याला फक्त तिच्या प्रेमाची भूक होती.
काय करु,कुठे शोधू म्हणून गाडितुन बाहेर आला.
सगळ कस शांत होत, त्याच मन सोडून.
त्याच्या मनात तिच्या आठवणी च वादळ चालू होत.
जवळ पास कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. वळून बघितल तर जवळच दूसरी गाड़ी उभी होती.
असतील कुणीतरी म्हणून याने दुर्लक्ष केल पण आवाज ओळखीचा वाटला. तस आवाज ऐकून छातीत धड़धडायल लागल.
आवाज तिचाच होता.
सेकंदाचा विलंब न लावता तो त्या गाड़ीजवळ गेला,
जे समोर दिसत होत ते पाहुन त्याच्या काळजाचा ठोका चुकला.
समोर ती होती, तो तिला म्हणाला तू इथ आणी ते पण अशी?
तीने उत्तर दिल हो, का? तुला काही प्रॉब्लम आहे?
त्याच्या 'ते पण अशी' विचारण्या मागे कारण होत.काल पर्यंत साडीत दिसनारी ती आता एकदम शॉट्स मध्ये होती.
मांड्या दिसतील एवढेच कपडे, केस विखुरलेले,तोंडावर मेकअप चढावलेला, ओठांवर गडद रंगाची लिपस्टिक. तोकडया टू पीस मधे होती.
त्याला ही तीच का? हे समजत नव्हत.
तेवढ्यात तीच म्हणाली तू कसा इकड?
आग अस काय विचारतेस तुला घ्यायला आश्रमात गेलो होतो, तिथ सांगीतल तू तिथ नसतेच. म्हणून तुझ्या काळजीत जीव जायची वेळ आली.
चल आपण घरी जाऊन बोलू.
मी नाही येऊ शकत.
त्याच मन विचार करत होत जवळ कुणी नव्हत हिच्या दुःखा वेळी म्हणून
अस वागत असेल कधी.
प्रेम किती आंधळ नसाव?
ती चूकीची असेल असा विचारसुधा करायला त्याच मन तयार नव्हत.
तेवढ्यात सोबतची व्यक्ति म्हणाली, कौन है ये?
ती ' अरे मेरा पुराणा कस्ट्मर है' म्हणून विचित्र हसली.
तो म्हणाला आम्ही लग्न करणार आहेत,
तेवढ्यात ती म्हणाली 'लग्न आणी तुझ्याशी' वेडा कुठला.
तू अशी का बोलतेस?चल आपण घरी जाऊ. तू अशी का वागतेस?
त्यावर ती हसुन म्हणाली मी अशीच आहे.
माझ खर रूप हेच आहे.
मग ती विधवा?
ती फक्त दिवसभरासाठी..
पण हे सगळ का?
अरे जान हे सगळ प्रोफेशन आहे माझ.
मग तू विधवा म्हणून का राहात होतीस?
चांगल्याच्या (इज्जतदारांच्या) वस्तित आम्हाला ( वारांगनेला)जागा नसते म्हणून असच राहव लागत.
त्याच मन अजूनही मानायला तयार नव्हत,तो तिला समजवत होता चल तू मी तुला काही काही कमी पडू दयायचो नाही.
ती.. अरे आहे काय तुझ्याकड सगळ तर लुटवलस माझ्यावर.
माझ्या शरीराला स्पर्श करायची तुझी हिम्मत नाही म्हणे कमी पडू देणार नाही.
आग पण आपल प्रेम?
ति... कसल प्रेम मी रोज किती जणाची प्रेमिका होते तुला अंदाज पण नाही.
त्याला काय बोलाव काही सूचत नव्हत.
दूसरी व्यक्ति म्हणाली चल अभी मेरा टाइम वेस्ट हो रहा है.
ती दुसऱ्या सोबत कमरेत हात घालून निघुन गेली.
हा मात्र तीथच तिच्या पाठमोऱ्या आकृतिकड बघत उभा राहिला...
तो आता तीची सकाळ संध्याकाळ वाट बघत असतो. सगळ करतो तीच्यासाठी.
तिच्या मार्गातले काटे काढून रोज गुलाबाची फूल अंथरतो, आणी ती रोजच त्याने आंथरलेली फूले पायदळी तुडवून नव्या प्रेमाच्या शोधात निघते.... ......
आणी क्षणक्षण त्याच वांझोट प्रेम तिच्या वाटेकड डोळे लावून बसलेले असत........अजुनही......