Aajaranch Fashion - 9 books and stories free download online pdf in Marathi

आजारांचं फॅशन - 9

अनिल जायला निघाला तेवढ्यात डॉक्टरने अनिलला आवाज देऊन कागदावर एक गोळी लिहली आणि ही गोळी जरा दहा दिवस झोपताना खा जरा डोकं शांत राहायला मदत होईल असे सांगितले.

अनिलने बाहेरजाऊन औषधiच्या दुकानातून गोळी घेतली आणि थोडे पाणी मागून अडवाणी डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांचा पहिला डोस तिथेच घेतला आणि गाडीला किक मारून गॅरेजकडे जाण्यास निघाला.

नॉर्मल इ सी जि आणि अडवाणी डॉक्टरच्या बोलण्यामुळे अनिल कालपेक्षा आज खूपच चांगल्या मनःस्थितीत होता, रस्त्यातून जाताना चहाच्या टपरीवर नजर मारली तर शार्दूल आणि निखिल बहिरे उभे होते, निखिलने अनिलला आवाज दिला,

“ओ गोरे साहेब”

अनिल असाही थांबणारच होता आणि थांबला देखील, बाईक साईड स्टॅण्डवर उभी करून तो त्यांच्या जवळ गेला तोच शार्दुलने थोड्या वाकड्या स्वरात विचारलं

“काय रे आन्या उगाच का तापत होता फोन वर”

“मग तापू नको तर काय तुला उरावर घेऊन नाचू? तब्येत ठीक नई हे बोलतोय तर हसतोस अन मस्करी करतोस, तुझ्या अंगावर येईल तेव्हा समजल तुला”

अनिल चहा वाल्याला हाताने कटिंग चा इशारा करत शार्दुलला बोलला.

“आम्हाला नई होत काय, आपण कस खाऊन पिऊन फिट, तू लई विचार करतो राव, अरे डोकं दुखलं का बाम लावायचं, डोक्याला काम नई लावायचं”

शार्दुलने हसत हसत उत्तर दिल

“ते सोडा यार बाकी गोरे काम धंदा काय म्हणतोय?

निखिल बहिरेने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अनिलला विचारलं

“एकदम मस्त चालू आहे भाई, बर झालं कामाचा विषय काढला, आज एक स्कोडा येणार हे यार, चल निघतो मी”

अनिल बाईक वर बसता बसता बोलला.

“ठीक आहे चल संध्याकाळी भेटू”

शार्दूल परत एक स्मित हास्य देत बोलला,

अनिलने बाईकची किक मारली, गियर टाकला, क्लच सोडला आणि जाता जाता बोलला

“काही भेटू नका रात्री डायरेक्ट घरी जाणार आपण”

अनिल आज आनंदात दिसत होता, छोटूने देखील गॅरेजवर अनिलला

“शेट आज भारी खुश दिसताय” काय खास आहे का म्हणून विचारलं.

अनिलला सगळ्यात खुशीचा दिवस म्हणजे जेव्हा त्याचा कुठल्याही प्रकारचा मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येतो तो, त्याला तात्पुरतं का होईना पण आपण नॉर्मल आहोत हा आनंद होतो आणि तो आनंद आणि आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावरून ठळक जाणवतो.

अनिल संध्याकाळी काम संपवून घरी लवकर परत आला, येताना हातात मुलांसाठी खाऊ आणि आईस्क्रिम घेऊन आला, सविता त्याला बघून जाम खुश झाली, तिच्यासाठी नवरा लवकर आणि न पिता घरी आला कि खूप खुशीचा दिवस, तसा अनिल देखील काही रोज रोज पिणारा दारुडा वैगेरे नव्हता पण काही ठराविक दिवशी घरी काही मास मच्छी असली, किंवा काही फंक्शन किंवा आजाराची भीती किंवा कधी मित्रांचा आग्रह असे काही खास दिवस सोडले कि तो ठीक ठाकच घरी यायचा, पण प्रॉब्लेम असा होता कि घरी हफ्त्यातून तीन वेळा मास मच्छी, एखादा प्रोग्रॅम, एखाद्या दिवशी मित्र नाहीतर भीती असायचीच म्हणून हफ्त्यातून चार पाच वेळा दारू आणि भांडण हे ठरलेलंच.

पण आज सगळं ठीक होत, अनिलच्या मनात थोडी फार भीती होतीच पण काल परवा पेक्षा खूप कमी,

सगळे सोबत गप्पा मारत जेवले, नंतर आईस्क्रिम खाल्ली, अनिलने औषध घेतले आणि सगळे लवकर झोपी गेले.

अनिलला औषध घेतले कि आता मला काही होणार नाही याची जणू खात्री होयची आणि मगच तो झोपायचा, आणि असेपण आज अडवाणी डॉक्टरांनी त्याला डोकं शांत होण्याची गोळी दिल्या मुळे त्याला आज शांत झोप लागली होती.

सकाळी अनिल शिंकत आणि खोकत उठला, रात्रीच्या आईस्क्रिम मुळे कदाचित पण अनिल साठी साधा खोखला किंवा शिंक देखील खूप मोठा चिंतेचा विषय असायचा.