Two points - 14 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं भाग १४

भाग १४


आश्रमात आली तर चांगलाच बाहेर अंधार पडला होता. पोरी जेवण करून वर टेरेसवर अंथरूण घालून तिथेच गप्पा मारत बसल्या होत्या. विशाखा घरात आली त्यावेळी तिला कोणच दिसलं नाही फक्त काका तेवढं किचन आवरत होता. ती सावकाश पावलं टाकत त्याच्या मागे जाऊन थांबली.

" आज खुप दिवसांनी दर्शन दिलं. कसं काय या पामरावर आपली कृपा झाली ?? " त्याच काम करता करताच त्याने विशाखाला विचारलं.

" तुला असं कळलं मी आले ते ??? मी तर एकदम हळु हळु आले, ते पण आवाज न करता. "

" गाडीचा भोंगा मग काय मी वाजवला होता. "

" ओह 😁😁. तरीच म्हणलं तुला कसं कळालं. "

" जेवायचं की ते पण बाहेर ठोसुन आलीयेस. "

" हो जेवणार ना. जाम भुक लागलीये राव. वाढ पटकन. येते मी फ्रेश होऊन. "

" पण ते तर संपलय "

" काय 🙄. "

" तुला जाम भुक लागलीये पण ते संपलय 🤭 "

" इइइइइइइइइ. खुप खुप खुप भंगार जोक होता 😪 "
जेवण करून बाहेर विशाखा फिरत होती. तेवढ्यात काका पण तीच्या सोबतीला आला.

" झोपल्या का सगळ्या " विशाखा ने काकाला बघुन विचारलं.

" हो. झोपत नव्हत्या पण जबरदस्तीने झोपवलं. परत उद्या उशीरा उठतात "

" ह्मममम. "

" इथे बस खाली. डोक्याला मस्त तेल लावून चंपी करून देतो. "

" हां चालेल. " विशाखा काकांच्या समोर येऊन बसली. काका तेल हातावर घेऊन ते तीच्या डोक्यावर ओतुन मस्त चंपी करून देत होता.

" वाह वाह !!!! काय मस्त चंपी करतोस रे. तुझी बायको किती लकी ना 😜 "

" माझं लग्न झालंय का 😒 "

" झालं नाहीये पण होईल ना आता 😁 "

" आता 🙄. ह्या वयात 😳. माझं नाही तुझ लग्न व्हायची वेळ आली आहे 😏. "

" तेच ना. आता माझं लग्न होणार. मग हळुहळू सगळ्यांची लग्न झाली की तु एकटाच राहणार का ?? "

" तोपर्यंत मी म्हातारा होणार 😂. काठी टेकवत, बोळक्या तोंडाने बोहल्यावर उभा राहु काय 😂 "

" ए असं काही नाहीये. तु कशाला म्हातारा होशील............. " पुढच काकाने तीला बोलुच दिलं नाही.

" बर माझं जाऊदे. तुझ सांग "

" माझं काय मध्येच. बघ मी तुला आधी पण सांगितलंय की मला एवढ्या लवकर......"

" शुउउउउउ. बावळट मैना मी तुला सायली बद्दल विचारतोय‌. "

" तीच एवढ्या लवकर लग्न कसं करणार. लहान आहे ती अजून. काही पण विचारतोस काका. "

" सायलीच आणि तुझं भांडण झालय का ?? हे विचारायचय मला " तीच्या डोक्यात टपली देत काका म्हणाला.

" आह.... मारू नको ना. "

" मग नीट सांग नेमकं कशावरून वाजलय तुमचं "

" भांडण व्हायला आधी बोलणं तर व्हाव लागत ना. "

" म्हणजे 🙁 "

" म्हणजे आमचं बोलणच होता नाहीये ‌आधीसारख. असं एक डिस्टन्स आल्यासारखं वाटतंय आमच्यात "

" का होत नाहीये बोलणं. आणि होतं नसेल तर तु कर ना कॉल. मेसेज करत जा. "

" मी करते कॉल पण ती उचलत नाही एकतर. आणि उचललं तर ती बिझी असते, कामात असते किंवा कॉलेजमध्ये मैत्रींणीसोबत असते. "

" अरे मग खरच बिझी असेल ना. म्हणून उचलत नसेल त्यात काय एवढं. "

" तसं नाही पण ती तीच्या मैत्रींणीसोबत असते ना मग मी डिस्टर्ब कशाला करू 😔 "

" अगं वेडपट. ती तीच्या त्या मैत्रीणीना पण वेळ देणारच ना..... "

" पण इतका 🤨🤨. आधी आम्ही जसं बोलायचो तस बोलत बसते ती त्यांना. "

" बापरे. जळल्याचा वास येतोय का कुठुन 🤭 "

" मी काहि जळत बिळत नाहीये 😏 "

" मग इतकी इनसिक्युरीटी तरी कसली नेमकी..... बघ आहे ना ती तुझीच मैत्रीण मग दुसऱ्यांसोबत बोलली तर काय होतं एवढं. "

" मला कसतरी वाटत. ती माझी मैत्रीण आहे ना मग तीने असं सगळ्यांशी का बोलावं. "

" अरे तिची पण काहितरी लाइफ आहे की नाही. तो तिचा पर्सनल इश्यु नाहीये का ??? आणि राहता राहिला प्रश्न कोणाला बोलायचा तर त्या मुली तीच्या classmates आहेत म्हणल्यावर ती तुझ्यापेक्षा जास्ती त्यांच्यासोबत राहते . मग दिवसभर जर एकाच ठिकाणी आपण जास्ती असु तर साहजिक आहे ना लक्ष पण जास्ती तिकडेच जातं. "

" पण मग म्हणून माझ्याकडे कमी लक्ष द्यायचं का ??? आता मी पण दिवसभर हॉस्पिटलमध्ये असते पण तीने बोलावलं की एका कॉलवर जाते मी. ती जिकडे म्हणेल तिकडे हुंदडत फिरते. मग म्हणून काय मी हॉस्पिटलला जास्ती प्रायोरीटाइझ केलय का ?? "

" बघ. तु करतेस मान्य आहे मला. पण केलेलं असं बोलुन दाखवल तर काय राहिलं त्याच. "

" बर बोलुन नाही दाखवत. पण मग त्या नवीन येणाऱ्या मैत्रींणींसाठी मला का फाट्यावर मारायचं ??? "

" कारण तीचा हक्क आहे तुझ्यावर. हक्क असलेल्या माणसालाच आपण हक्काने थांबायला लावु शकतो कारण आपल्याला माहिती असतं की समोरचा आपल्याला समजुन घेईल. "

" मग मी समजुन घेऊ का नेहमी ?? "

" नेहमी 🤨🤨. हे जरा अतीच होतय. कधी समजून घेतलयस गं तु ?? "

" कधी घेतलं नाही ते सांग... "

" कधी घेतलंय ते सांग. नेहमी तर चिडचिड करत असतेस अकडु कुठली. "

" एएएए मी अकडु नाहीये काय. तु पण काय मला अकडु म्हणायला लागला. "

" मी पण म्हणजे 🙄. अजून कोण अकडु म्हणत मग? "

" कोण नाही. बर मग आता मी काय करू..... "

" बघ. समोरासमोर असं बोललं तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाहीतर मग अवघड आहे. "

" मग बोलतेच आता समोरासमोर. "

" हो बोल ते नंतर पण आधी हे सांग अजून कोण अकडु म्हणत तुला 🤨 "

" मी लगेच जाते तीच्या घरी "

" अगं मॉडेल. ११ वाजलेत. झोपली असेल आता ती. "

" असुदे. मी चालले बाय. "
काका हाका मारत होता पण ही एक्सप्रेस पळाल्या सारखी निघुन गेली सायलीच्या घरी. आणि इकडे काकाच चालुच होत,

" अवघड आहे हीच. एक ऐकत नाही. आता सायलीच्या घरी तीचे वडील असतील. दोघांत वाजलं नाही म्हणजे मिळवलं.......... "