dark night-3 books and stories free download online pdf in Marathi

मंतरलेली काळरात्र (भाग-३)

( मंतरलेली काळरात्र भाग-३)
मी आता गावाच्या दिशेने भर भर पाय उचलत निघालो होतो. आता गावाच्या खूप जवळ पोहोचलो होतो परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळ्याकुट्ट अंधारात गाव हरवले होते मला गाव दिसेनासे झाले होते, मी आता तसाच त्या अंधारात गाव शोधू लागलो , गावाच्या खूप जवळ आलोय हे माझ्या लक्षात आले कारण गावातील मोकाट कुत्रे मला भुंकायला लागली ,

त्यावरून मला अंदाज आला , मी माझा दुकानदार मित्र रघू कडे जाण्याचे ठरवले होते , त्याच्या घरासमोर येऊन पोहोचलो होतो आता कुठे पावसाचा जोर कमी झाला ,परंतु रिमझिम अजूनही चालू होती,

मी रघुच्या घरासमोर उभा होतो तसे रघुचे घर आणि दुकान एकत्रच होते आधी किराणा दुकान आणि मागे तो रहात असे , रघुचे गावातील सर्वात जुने दुकान होते,
मी आता त्याच्या घराच्या दाराची कडी वाजवू लागलो.
मी जस जसा दाराची कडी वाजवू लागलो त्याच आवेशाने कुत्रे मला आता जोर जोरात भुंकू लागली.

इतर घरांच्या आडोश्याला ही कुत्री उभी राहून भुंकत होती मला हे सर्व आता मनात विचार करू लागलो जर ह्या कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला चढवला तर माझ्या शरीरात ताकत नव्हती कारण पहिलाच मी जखमी होतो आणि त्यात इतका रक्तस्राव झाला होता की मी अशक्त बनलो होतो.

मी आता पुष्कळदा दाराची कडी वाजवली ,पण आतून मला कसलाच आवाज येत नव्हता, मी पूर्वी पेक्षा जोर जोरात कडी वाजवू लागलो , पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मित्राला आवाज जाणे शक्य होते , आणि मला त्याचवेळेस आतून आवाज आला कोण आहे..? बस....! ! (मी माझ्या मनात म्हटलो) त्याचा आवाज येताच माझा चेहरा मात्र आता खुलून आला होता जणू मी त्या क्षणी मला झालेल्या जखमांच्या वेदना मी विसरून गेलो होतो कारण मला आता त्याच वेळेस समजून आले की आता मला हवं ते भेटणार आहे व माझ्या बायकोचा आणि मुलाचा हसरे चेहरे मला समोरच दिसू लागले.

‌हा माझा मित्र रघुचाच आवाज आहे हे माझ्या लक्षात आले होते मी त्याला बाहेरूनच आवाज देत म्हटलो आरे.. मी रामा आहे दार उघड लवकर, त्याने दाराजवळची खिडकी उघडत नेमक एवढ्या रात्री कोण आले असेल यासाठी खात्री पट्ण्यासाठी खितकीतून पाहू लागला, माझा चेहरा त्याला दिसत नसावा म्हणून त्याने पुन्हा माझ्या दिशेने आवाज दिला. तसा त्याला मी पुन्हा दार उघडण्यासाठी विन्नती केली, त्याने माझा आवाज ओळखला , त्याला मी आहे हे त्याच्या लक्षात येताच मित्राने धावतच दुकानाचे दार उघडले.

मला आतमध्ये घेतले त्याने माझी अवस्था बघून आवकच..! झाला त्याला रडू आवरेना कारण रघु माझा बालपणी पासूनचा मित्र होता. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न चिन्ह मी स्वतः वाचून त्याने काही विचारायच्या आताच मी त्याला घडलेली घटना सांगू लागलो, तसे त्याच्या घरातील सर्व कुटुंम्ब आमच्या दोघांच्या आवाजाने जागे झाले व माझा सर्व प्रसंग आता त्या सर्वांच्या लक्षात आला होता.
रघुच्या आई ने माझ्यावर आपुलकीने आणि तातडीने हळद लावले व छातीला आणि पाठीला कापडाने गुंडाळले आता कुठे तरी माझा रक्तस्राव आटोक्यात आला होता .

मी पुन्हा घरी जाऊ शकतो,असा माझ्यात विश्वास निर्माण झाला, घरी पुन्हा परतण्याची आशेची किनार दिसली मला त्यांनी सकाळी जाण्यासाठी सल्ला दिला. परंतु त्यांना घरातील सत्य परिस्तिथी त्यांच्या समोर जशीच्या तशी मांडली, आणि सांगितले आता पर्यंत छापरामध्ये खूप पाणी साचले असेल,जो पर्यंत माझा मुलगा आमचा दोघांचा चेहरा पाहनार नाही तो पर्यंत तो रडत राहिल, ह्या सर्व गोष्टी आता त्यांच्या सर्वांच्या लक्षात आल्या होत्या मला रघुने एका पिशवी दिली आणि सांगितलं ह्या मध्ये रॉकेल आहे,आणि थोडं गरजेचं समान आहे.
जेणेकरन मित्रा तुला कसलीच अडचण येणार नाही ,घरातून रघुची आई आली त्यांच्या हातात एक लोखंडी भाला दिसत होता. त्यांनी माझ्या हातात दिला आणि त्या म्हटल्या असू दे सोबत तुझं संरक्षणासाठी मी एका हातात पिशवी घेतली आणि दुसऱ्या हातात भाला , ह्या परिस्तिथी मधील मला मिळालेला आधार आता पुन्हा माझ्या परतीच्या प्रवासाला मनाला मोठी उभारी देणारा ठरला.

रघु म्हणाला मित्रा जपून जा तुला आज सुखरूप घरी पोहचणे गरजेचं आहे, मी पण येतो सोबत...!
मी त्याला म्हटले मित्रा तू मला ह्या क्षणाला मदत केलीस , ती खूप महत्त्वाची होती. तू येतो म्हटलास पण तू फक्त एवढे बोलास ना खूप छान वाटले. खरं तर, मित्रा ही माझी अडचण आहे. मलाच ती सोडवावी असे मला वाटते , मी सोडवू शकतो ,कारण मला माझ्या समोर माझ्या बायकोचा आणि मुलाचा मी येताना विजांच्या प्रकाशात त्यांचा चेहरा पाहिलेला अजूनही आठवत आहे .आणि तोच चेहरा समोर ठेवून मी आतापर्यंतची लढाई जिंकली आहे आणि या पुढील ही जिंकेल..!!
("जीवनात अनेकदा व्यक्तीला कसोटीला सामोरे जावे लागते " मग ही कसोटी मानसिक शक्ती जोखणारी असो, किंवा शारिरीक व्याधींची असेल.)
त्याला माहित होते, मी खूप स्वाभिमान जपणारा आहे. आता त्याच्याही डोळ्यात पाणी भरून आले होते.

मित्रा तू काळजी करू नको मी आता जात आहे असे म्हणत मी तेथून निघालो तेव्हा रघुने मला पुन्हा मागून आवाज दिला ,म्हटला मित्रा थांम्ब त्याच्या आवाजाने मी जागीच थांम्बलो त्याने मला त्याची "चप्पल" घालण्यासाठी दिली, म्हटला आता नाय म्हणू नको, आणि हो संभाळून जा, मी त्याच्याकडे एकवार पाहिले व माझा आता परतीचा प्रवास सुरु झाला. पाऊस पूर्ण पणे थांम्बला होता, तसेच आकाशामध्ये काळ्याकुट्ट ढगांच्या आडोश्यातून चंद्राची अर्धी कोर दिसत होती. पण चंद्र जरा जास्तच ढगांच्या आडोश्याला जाऊन लपंडाव खेळत होता.

ढगांच्या आड गेला की पुन्हा काळोख पसरत असे, थोड्या प्रमाणात प्रकाशामुळे आता रस्ता मला दिसू लागला , मी थोडा पुढे आल्यावर आता थोडे मागे वळून पाहिले तर गाव त्या काळोख्यात समाविष्ट होऊन नाहीसे झाल्यासारखे वाटत होता.

हवा थंड होती ती सळसळ करत वहात होती झाडांच्या पानांची थोडी जरी हालचाल झाली तरी तो कानावर आवाज सहज येत होता, मला मनात आज थोडं कुतूहल वाटत होते आता मध्यरात्र झाली असेल मग रातकीड्यांचा आवाज का येत नाही , मनात आता पुन्हा विचारांनी थैमान घातले होते , माझ्या पायातील चपलेचा कररं.. करर... असा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता भयाण शांतता आणि माझाच मला चालतानाचा आवाज इतकेच चालू होते तेवढ्यात माझ्या गालाला गरम हवा स्पर्श करून गेली.

मी आहे त्या जागी थांम्बलो, माझ्या उजव्या हातातील भाला मुठीत घट्ट पकडला , पुन्हा चालायला सुरुवात केली मी जसा चालण्यास सुरुवात केली तसा रातकिड्यांचा आवाज किर्र -किर्र असा सुरू झाला मनात मी समजून घेतले मायावी शक्ती आत्ता पुन्हा माझा पाठलाग करत आहे.
मी तसा सावध पवित्रा घेतला , समोर दोन डोळे चमताना दिसली मी जसे पुढे जात असे तसे ते डोळेही माझ्यापासून दूर पुढे जात होती, खर तर माझ्यात आज वेगळीच ताकत निर्माण झाली होती.

मी आता माझा चालण्याचा वेग वाढवला, कुठल्याही परिस्तिथी समोर दोन हात करण्याची माझी तयारी होती कारण माझी बायको आणि मुलगा अंधारात घराच्या दरवाजाकडे माझी आस लावून वाट बघत असतील , कदाचित ह्याच गोष्टी मुळे माझ्यात आज जास्त बळ आले असावे.

बघता बघता नजरेसमोर चमकणारे डोळे नाहिशे झाले,
आणि त्याचक्षणी माझ्या दोन्ही पायांच्या मधून स्पर्श करून काहीतरी गेल्याचे मला जाणवले हा स्पर्श खूप भयानक होता, मी नकळत थांम्बलो मी चालण्याचा प्रयत्न करत होतो. तरी चालता येत नव्हते माझे पाय जाग्यावरून मला उचलत नव्हतें, मला आता कोणीतरी पूर्णपणे नियंत्रित केले होते मी तसाच जाग्यावर उभा होतो.
माझ्या इच्छे विरूद्ध, आता रातकिड्यांचा आवाज जरा जास्तच वाढला होता, अचानक माझ्या डोक्यावरून कोणी तरी हात फिरवल्याचे जाणवले,
काही क्षणासाठी मी भयभीत झालो , जरी आज शरीराची लढण्याची तयारी होती तरी सुद्धा ह्या मायावी शक्तीपूढे मी नक्कीच घाबरलो होतो .
मला ह्या थंड वातावरणात पुरता घाम फुटला होता,माझे पाय थोडे सईल झाले तसा मी आता पुन्हा चालण्यास सुरुवात केली, चंद्र आकाशात अजूनही लपंडाव खेळत होता .
त्याचा प्रकाश पडला की मनाला खूप बरे वाटत असे, अधून मधून त्याचे दर्शन होत होते, हातातील पिशवी कोणीतरी मागे ओढत असल्याचे मला जाणवत होते पण माझी मागे बघण्याची हिम्मत होत नव्हती, अस वाटत होतं त्या मायावी शक्तीने माझी हिम्मत नाहीशी केली होती, पिशवी आता जरा जास्तच जोरात ओढत असल्याचे जाणवत होते मी मागे बघत नव्हतो, पिशवी ओढण्याचे थांम्बले तसा माझ्या चालण्याचा आता वेग वाढला,
भसकन..!! माझ्या समोर हडळ प्रकट झाली. माझा श्वास काही क्षणासाठी बंद झाला असे वाटले,
पूर्ण घाबरून गेलो,मी तसाच तिला ढकलून सरळ धावू लागलो, पण ती पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली ,मला कळून चुकले होते की मी आता हिला हारवु शकत नाही म्हणून मी जिवाच्या आकांताने तिला विन्नती करू लागलो ,मला जाऊ दे म्हणून त्या विराण जागी इतक्या भयानक रात्री आम्ही दोघेच माझा जीव तिने घेतला तरी कोणाला कळणार नाही, की मला कोणी वाचवण्यासाठी पण येणार नाही.

ति मला म्हटली तुला आता कोणी वाचवू शकत नाही, मी तुझा बळी इथे नाही घेणार माझ्या घरी घेऊन जाणार त्या चिंचेच्या झाडावर आणि मग तुझ्या नरडीचा घोट घेऊन मन शांत करणार मला आता माझ्या आयुष्यातील हे काही शेवटचे क्षण आहेत हे समजून आले होते , पण मला जाणवलं की माझ्या हातात भाला आहे त्याने तिला रोखण्याचा प्रयत्न करावा माझे एक मन म्हणत होते त्याने तिला काही फरक नाही पडणार ,
तर दुसरं मन म्हणत होते शेवटचा प्रयत्न करावा.

आपल्या कुटुंबासाठी म्हणून मी आता माझी मुठीने भाला घट्ट पकडला आणि तिच्या दिशेने पुढे केला...!!
आश्चर्य त्या भाल्याला पाहून हडळ माघे झाली , मी जस जसा तिच्या पुढे जात होतो ती मागे मागे होत एक कर्कश...!आवाज करत पळून चिंचेच्या झाडावर गेली आणि मोठं मोठ्याने म्हणत होती , पुढच्या वेळेस तुला सोडणार नाही आज तू वाचलास,
मी आता भानावर येत काय प्रकार आहे काय मला समजेना फक्त भाला पाहून हडळ कशी जाऊ शकते विचार येत होते पण जे घडले ते चांगले घडले होते.
भर भर मी कर-करर...आवाज करत सुसाट चाललो होतो.
माझ्या चेहऱ्यावरून आता आनंद ओसंडून वाहत होता . मला आता पुन्हा समोर झुडपात काहीतरी हालचाल झालेली जाणवली पण लक्षात आले आपण ठेवलेले हे तर बकरीचे पिल्लू आहे.
पुढील भागात( भाग-४)
उद्या.