Two points - 20 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग २०

भाग २०


आकाश विशाखाला सोडुन घरी आला. आईने बघितलं तर गाणं गुणगुणत हातात चावी फिरवत हसत हसत येत होता. आईला बघुन ब्रेक मारल्यासारखा थांबला. तीला बघुन हसला तरीही आई त्याच्याकडेच बघत होती.

" काय झालं ?? असं का‌ बघतीये 😁 " चेहऱ्यावर कशीबशी स्माईल ठेवत त्याने विचारल पण मनात धाकधूक ही होती की ही अशी काय बघतीये 😑.

" काही नाही. बघतीये की आजकाल जरा जास्तच खुश आहेस नाही का 🤨 "

" कोण मी ?? "

" नाही तो शेजारचा पिंट्या. "

" सॉरी मला विचारलं म्हणजे मीच असणार ना 😁"

" इतकं कळतंय तर कशाला विचारावं 😒 "

" अरे मी तर नेहमी हॅप्पी असतो, माहिती आहे ना तुला " पाणी पित पित तो म्हणाला.

" पोरगी पटवली का काय कुठली 🤨 " आईने त्याला असं विचाराताच त्याला जोरात ठसका लागला.

" अरे हळु पी की. ठसका लागला म्हणजे नक्की काहीतरी झोल है..... है ना 🤭 "

" हे.... असं काही नाहीये. कोण पोरगी, कुठली पोरगी. काहितरी बोलायच म्हणून उगाच बोलायचं ना. असलं काहिही नाहीये. आणि मी का पोरगी पटवु. मला काम नाहीयेत का दुसरे. 😒 "

" इतकं स्पष्टीकरण 😁😁🤭. म्हणजे पक्का झोल आहे. " त्याला हाताला चिमटा काढत आईने विचारलं.

" आई काही पण काय गं. खरंच असं नाहीये. मी फ्रेश होऊन येतो. "

" ते तर मी शोधुन काढते रे. तु जा फ्रेश होऊन ये. " आईने सांगितल्यावर तो पटकन रूममध्ये आला आणि आधी दार लावलं.

घाम फुटला होता त्याला आईच्या प्रश्नांनी. कपडे चेंज करता करता स्वतःशीच बोलत होता,
ह्या आई लोकांना देवानी कसली पॉवर दिलीये काय माहिती ?? लेकराचे नुसते थोबाड बघुन कसं काय ओळखतात राव ह्या. श्या.... आता जपुन रहावं लागणार आकाश तुला. आज वाचलास उद्या वाचशील कशावरून ?? कधी ना कधी पकडला जाणार. त्याच्या आधी तीच कन्फर्मेशन घ्यावं लागेल म्हणजे मग लगेच वधु पक्षाला वर पक्षाच्या मंडळींची भेट घडवुन आणता येईल 🤩.
पण खरच आजचा दिवस कसला भारी गेला ना. कसली मस्त दिसत होती ती. ना कसला मेकअप, ना कसला तामझाम. एकदम सिंपल अण्ड सोबर. आणि केस तर कशे उडत होते वा-यासोबत 🤭.
आणि आकाश परत तीच्या आठवणीत रमुन गेला.

इकडे विशाखा आधी थोडा वेळ क्लिनिक मध्ये बसली पण जसं जसं वेळ जायला लागला तसं तसं तीच डोकं जास्तच दुखायला लागलं. मग सगळंच पंडितला हँडल करायला सांगुन ती घरी आली.
घरी आली त्यावेळी साडेसात वाजले होते. आल्या आल्या पर्स सोडल्यावर टाकली. आणि आत बेडरूममध्ये निघून गेली.

सगळ्या पोरी जेवायला बसल्या होत्या. तीला तसं गेलेली बघुन परी म्हणाली ( ती पिरीयड वाली मुलगी. तुम्ही विसरला असाल ना म्हणून सांगितलं 🤭🤭😁😁 ) ,
" हिच काही बिघडलंय का ?? अशी काहिही न बोलता कसं काय गेली ही ? "

" काय माहिती ?? तुम्ही जेवा सगळे बघतो मी. " म्हणत काका उठुन आतमध्ये गेला. तीथे जाऊन बघितलं तर आत पुर्ण अंधार होता.ती लाईट न लावताच तशीच झोपली होती बेडवर. काकाने जवळ जावून कपाळाला हात लावून बघितलं तर डोकं तर थंड होत. तीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हाक मारली,
" विशु.... "

" ह्मममम "

" काय झालं ?? बरं वाटतं नाहीये का ?? "

" ह्मममम "

" काय होतंय ?? डोकं दुखतंय का "

" ह्मममम. "

" त्रास होतोय का खुप बाळा "

" ह्मममम "

" फ्रेश होते का तु ?? "

" अंहं "

" आवाजाचा पण त्रास होतोय का ?? "

" ह्मममम "

" बरं झोप. नाही त्रास देत मी. तुला जेव्हा वाटेल तेव्हा जेव. ह्मम "

" ह्मममम "

काका तीला नीट झोपवुन बाहेर आला तसं त्या छोटीनी जोरात ओरडुन विचारलं,
" काय झालं काका. दिदी का नाही आली जेवायला ?? "

" शुशुशुशुशु. आवाज न करता जेवा सगळे. आणि आज लवकर झोपा. दिदिच डोकं दुखतंय मग आपण तीला गोंधळ घालून त्रास द्यायचा का ?? नाही ना म्हणून पटापट आवरा. "

विशाखाच डोकं दुखतं होतं म्हणून काकाने सगळ्या पोरींना जेवायला घालून लवकर झोपवुन पण दिल.
थोड्या वेळाने आत जाऊन बघितलं तर ती नुसती लोळत होती पण तीला झोप काही लागतच नव्हती
म्हणून मग कापुस दुधात बुडवला आणि आणुन तीच्या डोळ्यांवर ठेवला. जसं ते ठेवलं तसं तीचे डोळे थंड पडले आणि ती शांत पणे पडली.

काका कितीतरी वेळ तसाच जागी होता की रात्री १० वाजता सायलीचा फोन आला,
" काका, विशाखा कुठे आहे ?? "

" आग झोपलीये ती. का गं काय झालं ?? काही काम होत का ?? "

" नाही. काम नाही. पण ती रोज गुड नाईट चार मेसेज करती ना मग आज नाही केला म्हणून कॉल केला. "

" हो पण ती आल्या आल्याच झोपली आहे. "

" काय 😲. एवढ्या लवकर झोपली ती ?? असं काय ?? बरी आहे ना ती की ताप वैगेरे काही आहे. ?? "

" नाही असं काही नाही. फक्त डोकं दुखतंय बाकी काही नाही. आणि आता झोपलीये ना मग उठल्यावर बरं वाटेल तीला. "

" बरं मी येऊ का ?? "

" आत्ता ?? नको नको. तुझे पप्पा ओरडतील तुला परत. आणि मी आहे ना इथे. राहुदे. असंही आत्ताच मी तीच्या डोळ्यांवर कापुस ठेवलाय मग छान झोप लागेल तीला "

" कापुस का ?? "

" अगं तीला डोकं दुखायला लागलं की काहीच सहन होत नाही. आवाज, उजेड काहीच नाही. डोळ्यांचि आग आग होते ना मग डोळ्यांना तेवढंच थंड वाटाव म्हणून मी कापसाचा बोळा ठेवलाय डोळ्यावर. "

" बरं. पण नक्की ना. खरंच माझी गरज नाहीये ना "

" नाही रे. मी आहे की इथं . झोप तु जा. गुड नाईट "

" बरं. मग गरज‌ लागली तर सांग. कधी हि कॉल कर काय. मी येईल "

" हो रे बाळा नक्की पण त्याची गरज नाही वाटणार कारण आता मी डायरेक्ट सकाळीच उठेल बघ. "

" बरं पण नक्की सांग काय . "

" हो नक्की. झोप तु आता. "

फोन ठेवला तसं फोनकडे बघत काका विचार परत होता,
किती काळजी करती ना वेडी. नुसतं डोकं दुखतंय तर लगेच येऊ का म्हणे ..... खरंच किती छान मैत्रीण मिळाली विशाखाला. हे दोघं नेहमी असंच रहावेत म्हणजे बरं. आधीच वयाच अंतर परत त्यात स्वभावही वेगळे पण घेतील जमवुन.
आणि तसाच विचार करता करता काका झोपुन गेला.

पहाटेचे चार वाजले होते. बाहेर किर्रर्रर्र अंधार होता. रस्त्यावर पाखरू नव्हतं मग माणुस तर लांबचच. तेवढ्यात दाराला चावी लागल्याचा आवाज आला. आणि एकदम हळु कुणीतरी चावी फिरवली आणि आत पाऊल ठेवलं तसा आवाज आला कर्र. हळुच पायातली चप्पल काढुन ठेवली आणि त्या व्यक्तीची पावलं सावकाश रूम कडे वळाली.
ती रूम जशी त्या व्यक्तीने उघडली तसं आत वाकुन पाहिल की .......