Prem mhanje prem ast..5 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत- ५

प्रेम म्हणजे प्रेम असत- ५

प्रेम म्हणजे प्रेम असत- ५

जय ने त्याला भविष्यकाळात काय होईल ते दिसत असं रितू ला सांगितलं तेव्हा रितू चा त्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागला.. तिला हसू सुद्धा आले.. आणि ती बोलली,

“हाहा.. तुला भविष्यकाळ दिसतो.. खर का मला चांगल वाटावं म्हणून सांगतो आहेस? आणि यु आर राइट...आयुष्य कसं जगतो हे महत्वाच!!! पण... ” रितू हे बोलली पण आता मात्र जय ने डोक्याला हात मारून घेतला.. इतका वेळ आपण किती काय काय समजून सांगितलं रितू ला तरी तिचे 'पण' काही संपत नव्हते.

“परत पण? माय गॉड! तू वेडी आहेस का ग रितू? आता काय पण?? आज तू खात्री करून घेच... बोल आता हे पण का होत? मला कधी कधी वाटत मीच वेडा आहे का काय की तुझ्या सगळ्या पण ची उत्तरे देतोय...तोंडावर पट्टी बांधून डायरेक्ट उचलून लग्न करायला नेल पाहिजे..”

“ओह माय... आणि इतक्यातच वैतागलास ना?" रितू थोडी खट्टू होऊन बोलली..पण जय मात्र हसला.

"चेष्टा केली ग.... नी मी वेडा आहेस! तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो म्हणून तर तुला इतक समजून सांगतोय...डोंट वरी! बोल जे वाटेल ते.." जय ने रितू च्या खांद्यावर हात ठेवला आणि तो बोलला.. त्याच्या वॉर्म वागण्याने रितू नॉर्मल झाली..

"थँक्यू जय!! तू खरोखर खूप चांगला आहेस.. ह.. आता ऐक, हे पण कारण मला समाजाची भीती वाटते.."

"ओह आय सी.. तुझे प्रोब्लेम्स सुटले तर आता लोकांची भीती आणलीस! किती किती पळणार ग.."

"मला माझ्याबद्दल काही नाही वाटत ..पण आहेच मला तुझ्या स्टेटस ची काळजी..माझ्यामुळे तुझं नाव नको व्हायला खराब..इतकंच वाटते रे जय.... लोक काय म्हणतील? तू इतका हुशार..शिकलेला..आणि माझ्याशी लग्न केलस? आणि आपण समाजात राहतो.. आपण ह्याच समाजाचा एक भाग आहोत सो...” रितू ने परत काहीतरी प्रश्न पुढे करून जय चे डोके फिरवलेच.. तरी त्याने शांत राहायचे ठरवले आणि त्याने रितू ला शांतपणे उत्तर दिले.

"करेक्ट.. मी हुशार आहेच! त्यात काही शंका आहे?" तो रितू ला भेटल्यापासून त्याच्या मनात तिने घर केले होते आणि त्याला आपले घर तिच्या बरोबर बांधायचे होते. तो खूप खंबीर पणे बोलला, "तुझ्या सगळ्या शंका रास्त आहेत.. मी आहे एक फेमस डॉक्टर!! मी लोकांसाठी सतत आहेच पण मला माझं सुद्धा आयुष्य आहेच ग...माझ्यासाठी तू आणि फक्त तूच महत्वाची आहेस.. मी सगळ्यांचे उपचार करेन.. पण काम संपवून मला माझ्या घरी जाऊन तिथे तुला पहायचं आहे.. घरी आल्यावर मी लोकांचा विचार करून का जगू? माझ्या पर्सनल आयुष्यावर बोलणारे कोण आहेत हे लोकं? माझं आयुष्य मी हव तस जगायला मोकळा आहे...मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये! माझ्या निर्णयात कोणाची लुडबुड मी खपवून घेणार नाही!! तोंडावर बोलायची कोणाची हिम्मत असेल असं मला नाही वाटत...कळलं?" जय न थांबता बोलला आणि मग मात्र तो जरा शांत झाला.. आता त्याचे पूर्ण लक्ष रितू कडे होते...

"ह.. बरोबर सांगितलं तू.. आणि बरोबर होती ना माझी शंका?"

"हो.. पण मी सांगितलं आहे सगळ.." जय ने त्याची नजर रितू वर नजर रोखली..

"येस..."

"अरे वा.. झाल तुझ शंका निरसन? आणि आता अजून एखादा पण राहिलंय का? जे काही असेल ते आत्ताच बोल...नंतर इतका वेळ ह्या विषयासाठी माझ्याकडे नसेल.. तुला हव तेव्हा मी वेळ काढेनच पण हा विषय काढलास तर मात्र मी तुला उत्तर न देता तिथून निघून जाईन हे लक्षात ठेव.. तुला इग्नोर केलं असं वाटेल पण मी तेच करेन, मुद्दाम करेन सो माझ्याकडून सहानुभूती ची अपेक्षा मात्र ठेऊ नकोस!!” जय खंबीरपणे बोलला...आणि मग मात्र हसला... त्याला उगाच रितू ला सिरिअस करायचे नव्हते.

“नो नो...आता पण नाही! माझ्या सगळ्या पण ची तू सगळी उत्तरे दिलीस.. आता हा विषय कधीच काढणार नाही!! आणि मला माहित न्हवत तुझ हृदय इतक मोठ आहे! तुला सगळ खर माहितीये तरीही तू माझ्यावर प्रेम करतोस आणि ते मला पटवून दिलस... थॅंक्यू माझी आयुष्यात आलास!! मी स्वत:ला भाग्यशाली समजते... की माझ्या आयुष्यात तू आलास!!”

“सुटलो मी... हाहा! मी कोणी ग्रेट नाहीये! मला तू आवडलीस आणि ते सांगायला मी घाबरत नाही... मी आधी कोणाशीच लग्न करणारच नव्हतो.. मी बरा आणि माझं काम बर ह्या विचारात मी होतो. ..पण तुला पाहिलं आणि तुझ्यात मी माझी बायको पाहायला लागलो... पण मी हे लगेचच सांगण टाळल होत कारण आधी मला तुझ मन जाणून घ्यायचं होत... म्हणून आधी मी तुझ्याशी मैत्री केली... तू मैत्री करायला देखील तयार नव्हतीस पण आपण मित्र झालो आणि मग मी तुला सांगितलं माझ तुझ्यावर किती प्रेम आहे.. कळल? तू माझ्या मनातून जातच नाहीस.. सारखा तुझाच विचार येत असतो... आय लव यु वेरी मच!!! विश्वास ठेव की खरच प्रेम आहे...मला जितक आयुष्य आहे ते तुझ्याबरोबर घालवायच आहे. आणि आता तुझा थॅन्क्सगिविंग करायचंय का?"

येस.. आधी आय नीड अ टाइट हग.. लेट मी फिल यु.." रितू च्या अनपेक्षित बोलण्यामुळे जय जरा चकित झाला. तो मनोमन खुश झाला..

"वा वा.. माझे अहो भाग्य! जे मला आत्ता हवे होते ते तूच मागितलेस.." हे बोलून जय ने रितू ला आपल्या मिठीत घेतले..आणि त्याने मिठी घट्ट केली. त्याच्या मिठीत रितू ला सेफ वाटत होते.. आणि जय ला सुद्धा ही हग खूप गरजेची होती. जरा वेळ दोघे एकमेकात मिसळून गेले होते. ही मिठी आयुष्य भर अशीच राहो हाच विचार दोघांच्या मनात आला.. पण काही वेळातच दोघांना भुकेची जाणीव झाली. आणि जय बोलायला लागला,

"हे रितू.. तुला आत्ताच थॅन्क्सगिविंग करायचे आहे ना? मग चल आत्ता लगेच हॉटेल मध्ये जाऊन करू..." इतक बोलून जय दिलखुलास हसला! "मला भूक लागलीये ग प्रचंड... तुला समजून सांगता सांगता दमून गेलो.... पण फायनली तुला सगळ पटल आणि तुझा होकार आला.. आता जरा खाऊन घेऊ! आणि आता परत तो विषय काढू नकोस!! आता परत सगळ ह्याच विषयावर बोलायला मला वेळ नाही मिळणार इतका! आज कसातरी वेळ काढलाय..फक्त तुझ्यासाठी! मी तुला परत एकदा सांगतो,सगळ्यात महत्वाच आहे ते..तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस..कधीही स्वतःला एकट समजू नकोस.. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आणि ते तू कधी विसरू नकोस!!!”

“ओके..आता परत तो विषय नाही! आणि इतक्यातच दमलास का रे? मग पूर्ण आयुष्य कस काढणार माझ्याबरोबर? मी अशीच आहे..मला खूप शंका येतात आणि मी ते बोलूनही दाखवते! बघ...अजूनही विचार कर! तुझा लग्नाचा विचार बदलला तर सांग!”

“हाहा... नक्की सांगेन माझा विचार बदलला की... हॉटेल मध्ये खायला घाल आधी मग पुढच पुढे बघू...सध्या तरी माझा निर्णय बदलणार नाहीये..आणि मला जाम भूक लागली आहे.” जय हसत बोलला

“ओह... आत्ता तरी.. म्हणजे तुझा निर्णय तू बदलू शकतोस?" रितू थोडी खट्टू होऊन बोलली

"नो नो ग.. मजा करतोय.. मला निर्णय बदलायचं असता किंवा मी शेकी असतो माझ्या निर्णयाबद्दल तर मी तुल इतक मनवलं असत का ग... तू म्हणजे ना.." जय ने डोक्याला हात मारला आणि तो बोलला.. रितू ने जरा वेळ विचार केला आणि ती बोलायला लागली

"हो की... मी म्हणजे ना वेडी आहे!! बर,आत्ता तो विषय राहूदे...ते बघू नंतर,आता कोणत हॉटेल...तू सांग!”

“हाहा...कोणताही चालेल....तुला आवडत तिथे जाऊ!!”

“ओके”

दोघ हॉटेल मध्ये जाऊन मस्त जेवणार होते... शेवटी रितू हो म्हणली.. दोघहि खुश होते!! जय नी खूप महत्वाचा मुद्दा रितू ला पटवून दिला होता म्हणून तो खुश झाला आणि चांगला जोडीदार मिळाला म्हणून रितू खुश होती!!! रितू आयुष्य एकटीनी काढू असा विचार करत असतांना जय तिच्या आयुष्यात आला आणि तिला तिच्या बेरंग आयुष्यात रंग दिसायला लागले! तीच आयुष्य जय च्या येण्यानी रंगीबेरंगी झालं...


क्रमशः

Rate & Review

Manali Sawant

Manali Sawant 3 years ago

AAditya Puranik

AAditya Puranik 3 years ago

Shobha Patil

Shobha Patil 3 years ago

vijay g

vijay g 3 years ago

R K

R K 3 years ago