Prem mhanje prem ast..-6 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत- ६

प्रेम म्हणजे प्रेम असत- ६

प्रेम म्हणजे प्रेम असत- ६

जय च्या प्रयत्नांना यश आलं होतं. जय चे रितू वर मनापसून प्रेम होते. त्याला बाकी काहीच नको होतं. त्याला हवी होती ती फक्त रितू ची साथ. शेवटी रितू हो म्हणली आणि जय च्या आनंदाला पारावर राहिला नाही. दोघे त्यच्या आवडीच्या हॉटेल मध्ये गेले. आणि जय ने रितू ला आवडते त्याची ऑर्डर दिली. आणि मग शांतपणे जय ने रितू चा हात हातात घेतला आणि तो बोलायला लागला,

"नो वॉट रितू?"

"काय?" ..रीतुने जय ला प्रश्न केला आणि ती गोड हसली..

"तुझा होकार येण्यासाठी मला किती वाट पाहायला लावलीस ग.. पण आता तुम मेरी हो!! आणि हक से.. ओके ना?"

"हो हो... आणि तू पण फक्त माझा आणि माझाच आहेस!! कित्ती वेळ लावला न मी तुला होकार द्यायला.....तू एक उत्तम माणूस आहेस!! तुझ्यासाठी नाती किती महत्वाची आहेत हे तू मला प्रत्येक टप्प्याला समजून सांगितलस.. आणि तू खूप पेशंस ने मला पटवून दिलस.. पण माझ्यामुळे तुला त्रास नाही न रे होणार?"

"नो नो नो रितू नॉट अगेन!! मी तुला सांगितलेलं ना मगाशी.. तुझ्यामुळे मला त्रास नाही होत.. पण तू आस पास नसशील तर खूप त्रास होईल.. आणि आता खूप ऐकल तुझ...ह्या ह्या पुढे परत कधी ही बडबड केलीस तर मात्र तुला शिक्षा देणार.." चेष्टेच्या स्वरात जय बोलला खरा पण ही गोष्ट रितू ला मात्र लागली...

"शिक्षा? म्हणजे काय करणार तू जय? आणि चुकणार मी १०० वेळा.. मग तू सहन नाही ना करू शकणार?? महिती होतं मला.." रितू उदास होऊन बोलली..पण जय मात्र त्याच्याच मूड मध्ये होता.. त्याला ही गोष्ट रितू ला लागतीये ही गोष्ट जाणवलीच नाही..आणि रितू चे बोलणे ऐकून जय हा हसूच आले.

"घाबरलीस ना..."

"हो..माझ्या आस पास च्या लोकांनी खूप दुखावले आहे. तू पण असं बोलायला लागलास तर काय होईल माझ? कशाला पाडलं भरीस तूं हो म्हणायला?" रडवेली होऊन रितू बोलली आणि खरंच तिच्या डोळ्यातून २ थेंब अश्रू गालावर आले.. आपण चुकीच बोललो हे जाणवून जय पुढे सरसावला.. त्याने आधी रितू चे डोळे पुसले..

"हे रितू.. मजा करत होतो ग.. मी गम्मत केली तुझी!! प्लीज रडू नकोस ग.. इतक्या कष्टाने तुला मनवलं..पण अक्कल कुठे गहाण टाकली आणि काय बोललो तुला..सॉरी! तुझ्यासाठीच तर करतोय इतक सगळ.. आणि तुला शिक्षा देणारा मी कोण? मी जास्ती कणखर नाहीच..आणि फिसिकली आहे म्हणून शक्तीचा गैरवापर करेन का? नो नो.. खर तर तूच माझ्यापेक्षा तूच खंबीर आहेस रितू! आणि माझ्या आयुष्य आता तुझ्या स्वाधीन..आपण दोघे आपलं आयुष्य मस्त फुलवू.."

"लव्ह यु जय!! आणि डन जय!! तुझ्यामुळे मला नेहमीच सकारात्मकता मिळते. आणि आय होप, नेहमीच मिळत राहील.."

"बी शुअर अबाउट इट रितू!! पण एक सांगतो ग.. यु नो अबाउट माय वर्क.. मी तुला नेहमीच वेळ देऊ शकेन ह्याची खाती देता येणार नाही.. पण बाकी मी नेहमीच तुझ्या बरोबर आणि तुझ्या जवळ आहेच.."

"येस येस.. माहिती आहे! तुम्हा डॉक्टर च काम असतंच कौतुकास्पद.. खर सांगयचं तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी लग्न करायला तयार होईन आणि माझा लाईफ पार्टनर एक डॉक्टर असेल.." रितू हसत बोलली. जय ने तिचा हात हातात घेतला..

"ठीके ग.. मी फार कोणी भारी नाही.. प्रत्येकाने जे आवडेल ते काम कराव... मी सुद्धा तेच केल. मला जे आवडत ते करतो.. डॉक्टर झाल्यापासून माझ्या आयुष्यात एक प्रकारचे समाधान आले आहे. पण कधी कधी अंदाज चुकतो, आपल्याकडून काही चुका होतात सो त्यामुळे त्रास होतो कधी.."

"तू कधी चुकणारच नाहीस जय.. तू खूप मनापासून तुझ काम करतोस आणि त्यामुळे चुका व्हायचा प्रश्न नाहीच..."

"चुकतंय बाईसाहेब.. शेवटी मी काय देव नाही.. आपलं माणूस वाचल की देवची उपमा मिळते पण कधी..... " जय चा आवाज एकदम बदलला, "मी माणूसच आहे! कधी होतात चुका...आणि मनस्ताप होतो.. मुद्दाम नाही पण चूक तर झालेली असते ना.. " जय एकदम कुठल्यातरी आठवणीत हरवून गेला.. त्याचा आवाज एकदम खोल गेला. ते रितू ने हेरले.. तिला काय झाले ह्याचा अंदाज आला नाही पण तिला आजच्या दिवशी जय चा मूड जाऊन द्यायचा नव्हता,

"ते सोड.. आधी सांग!! आपण लग्न कधी करायचं आहे?" विषयांतर व्हावे म्हणून रितू ने लग्नाचा विषय काढला..तिला खात्री होई लग्नाचा विषय काढला की जय चा मूड नक्की बदलेल. आणि अगदी तसेच झाले.. जय चा मूड बदलला,

"हो की..मी पण का बोलत बसलो.. कधी कधी असाच भरकटत जातो.."

"तू सांगू शकतोस तुझ्या मनातल सगळ.. आणि मी सुद्धा माझी सगळी सिक्रेट्स फक्त तुला सांगणारे आता.."

"ओह.. म्हणजे रितू कडे सिक्रेट्स आहेत तर.."

"आहेतच.. सगळ्यांचीच सिक्रेट्स असतात ना?"

"मला ऐकायची आहेत तुझी सिक्रेट्स... म्हणजे मला पण कळेल काय काय दडवून ठेवल आहेस तू तुझ्या मनाच्या कोपऱ्यात!!" जय हसू आवरत बोलला.. आणि रितू सुद्धा त्याच्या हसण्यात सामील झाली. पण तिला अंदाज आला होता की जय च्या आयुष्यात काहीतरी वादळ आले होते.. पण ते जाणून घ्यायची तिला अजिबात घाई नव्हती. तिला आत्ताच खास वेळ फक्त आणि फक्त जय बरोबर घालवायचा होता. भूतकाळा मागे ठेऊन तिला आत्ताच क्षण आणि भविष्य काळ खुणावत होता.

"नो नो.. इतक्यात नाही सांगणार जय..माझ्या पण आयुष्यात खूप काय काय झालंय..."

"ओके.. अजून किती वाट पाहवी लागेल ते तर सांग!!"

"अजून थोडे दिवस... लग्न झालं के हळू हळू समजून घे मला.."

"चालेल.. पण नो सॅड मेमोरीज... ओके न? आता भूतकाळ आठवून अजिबात दुःखी व्हायचं तू.. तू नेहमीच आनंदी पाहिजेस मला..आणि भूतकाळ गेलाय सो त्याचा विचार नाहीच.. "

"हो रे.. तू जवळ असलास की दुःख मला टच सुद्धा करू शकणार नाही.. आणि तू सुद्धा तुझी सगळी सिक्रेट्स सांगायची बर का मला... आता तुझ्या सिक्रेट्स वर जास्त अधिकार माझा असेल... ओके?"

"हो हो.. आता माझी लाईफ पार्टनर होणार तू..मग तुझा हक्कच असेल तो.. आणि आता मेन मुद्दा, तू सांग!! कधी करूयात लग्न?"

"आत्ता लगेच?" डोळे मिचकावत रितू बोलली..

"अरे वा..काही वेळा पूर्वी लग्न पासून लांब पळणारी तू... आत्ता लग्न करू म्हणती आहेस? वॉव!!"

"मग... कधीतरी पेक्षा व्हाय नॉट टुडे?" इतक बोलून रितू तिच्याजागेवरून उठली आणि तिने जय ला एक टाईट हग दिली..

"अरे वा... हे कश्याबद्दल?"

"असच.. मला वाटल म्हणून.."

"बर बर.. तुला असच सदैव वाटत राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना?" चेष्टेच्या सुरात जय बोलला.. आणि त्याने एक फ्लाईंग किस रितू ला दिली...

दोघहि खुश होते!! जय नी खूप महत्वाचा मुद्दा रितू ला पटवून दिला होता म्हणून तो खुश झाला आणि चांगला जोडीदार मिळाला म्हणून रितू खुश होती!!! अनपेक्षितपणे रितू चे आयुष्य बदलाच्या वाटेवर होते. रितू आयुष्य एकटीनी काढू असा विचार करत असतांना जय तिच्या आयुष्यात आला आणि तिला तिच्या बेरंग आयुष्यात रंग दिसायला लागले! आता तिला खात्री होती की तिच आयुष्य वेगवेगळ्या रंगांनी फुलून जाणार आहे.

क्रमशः

Rate & Review

AAditya Puranik

AAditya Puranik 3 years ago

Shobha Patil

Shobha Patil 3 years ago

Rani

Rani 3 years ago

Anjali bagal

Anjali bagal 3 years ago

Sujata

Sujata 3 years ago