Prem mhanje prem ast..7 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत- ७

प्रेम म्हणजे प्रेम असत- ७

प्रेम म्हणजे प्रेम असत- ७

रितू आणि जय एकमेकांबरोबर खूप खुश होते. आता दोघे लवकरच लग्न सुद्धा करणार होते. पण त्या आधी दोघे एकदा भेटून गप्पा मारणार होते.. लग्न अगदी साधे पद्धतीने करायचे ठरले होते. जास्ती खर्च नाही आणि जासी शो ऑफ सुद्धा नाही.. दोघांना एकदम साधे लग्न करायचे होते. जय तर रजिस्टर लग्न करायला सुद्धा तयार होता. त्याच्या साठी रितू बरोबर राहणे महत्वाचे होते.

जय वेळे आधीच हॉटेल मध्ये येऊन बसला होता. तो त्याचा मोबाईल पाहत बसला होता.. तितक्यात समोरून एक बाई त्याच्या समोर आली आणि जय ला शिव्या घालायला लागली.. ती बाई एकदम समोर येण आरडा ओरडा करतीये ही गोष्ट जरा विचित्र होती.. पण ती बाई जय ला पाहून जोरजोरात बडबडायला लागली,

"काय रे नराधमा.. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या नाजूक पोरीला मारलं आणि इथे मजा करत बसलाय?"

त्या बाई च्या एकदम जय समोर येण्यामुळे जय एक मिनिटे भांबावून गेला.. त्याला अस काही होईल ह्याची कल्पनाच नव्हती.. पण ती बाई आता अजिबात शांत बसणार नाही ह्याचा अंदाज जय ला आलाच होता. त्या बाईंना पाहून त्याची समोर त्याचा भूतकाळ उभा ठाकला आणि त्याच्या अंगावर काटाच आला..

"तुम्ही इथे बसा आणि शांत व्हा. पाणी घ्या आणि आपण शांतपणे बोलूयात."

"मी शांत होऊ?" ते बाई खेकसली.. "तुम्ही हवं तस वागणार आणि आम्ही शांत बसायचं? माझ्या मुलीला मारलं नराधमा... "

"तुम्ही शांत व्हा... आम्ही तुमच्या मुलीला मारलं नाहीये.. आम्ही तर आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता.."

जय त्या बाईंना समजायचा खूप प्रयत्न करत होता पण त्या बाई शांत होत नव्हत्या.. तितक्यात रितू समोरून आली. तिने समोर चालू असलेला प्रकार पाहिला आणि ती एकदम घाबरून गेली.. त्या बाई चा आवेश पाहून रितू ला काय चालूये हे समजेना.. रितू जरा घाबरून गेली.. तिने आजूबाजूला पाहले.. बघ्यांची गर्दी झाली होती.. तिला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती.. तिने बघ्यांना हाकलवून लवल आणि ती जरा वेळ शांत उभी राहिली.. त्याच वेळी तिला जय ने सांगितलेलं आठवलं. जय तिला बोलला होता, "बऱ्याच वेळा चूक होते किंवा चूक होत नाही पण त्या नंतर होणारे परिणाम मात्र मन हेलावून सोडतात.."

रितू ला जय चे शब्द आठवले आणि ती भानावर आली. तिला जाणवलं हे समोर जे होतंय ते जय बोलून गेलेल्या प्रकाराबद्दल असेल... मग रितू ने मन खंबीर केले.. आणि ती जय आणि त्या बाई समोर आली. तिने जय शी नजरेतून संवाद साधला. मग तिने त्या बाईंकडे पाहिजे आणि बोलायला लागली,

"काकू.. तुम्ही शांत व्हा.." एक अनोळखी मुलगी येऊन आपल्याला टोकून जातेय ही गोष्ट त्या बाई ला आवडली नाही... आणि ती बाई रितू वर सुद्धा खेकसायला लागली. जय हे संभाषण ऐकत होता.. पण रितू ने त्याला बोलू नको असे सांगितल्या मुळे तो काही बोलत नव्हता.. पण तो शांतपणे रितू आणि त्या बाईंच संभाषण ऐकत होता..

"तू कोण ग मला शांत व्हायला सांगणारी? तुझा काय संबध आहे इथे? मला ह्या माणसाशी बोलायचं आहे.. माझी एकुलती एक मुलगी.." त्या बाईंच्या डोळ्यात अश्रू आले..

"काकू.. मी डॉक्टरांची होणारी बायको आहे.. आणि मला हक्क आहेच माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या बाजूने बोलायला. आणि मी समजू शकते... पण डॉक्टर काय बोलतात ते ऐकून तरी घ्या..आणि कोणी मुद्दाम तुमच्या मुलीला का मारेल? त्यात जय चा काय फायदा होईल?"

रितू चे हे बोलणे ऐकून त्या बाई जरा शांत झाल्या.. मग रितू ने त्या बाईंना बसायला सांगितले.. आणि त्यांना पाणी दिले.. मग त्या बाई जरा नॉर्मल झाल्या..

"तुम्हाला ज्यूस हवाय का?"

"नको.." त्या बाई बोलाल्या आणि त्यांचा बांध एकदम फुटला..

"थांबा.. तुमच्यासाठी ज्यूस मागवते.." रितू इतक बोलली आणि तिने वेटर ला ऑर्डर दिली.. मग रितू पुन्हा त्या बाईंशी बोलायला लागली,

"आता शांतपणे सांगा.. डॉक्टर इथेच आहेत आणि मी सुद्धा ऐकती आहे.." इतक्यात ज्यूस सुद्धा आला.. रितू ने त्या बाईंना ज्यूस घेण्याचा आग्रह केला.. मग त्या बाईंनी ज्यूस पिला..आणि मग त्या बाई बोलायला लागल्या,

"माझी एकुलती एक पोर गेली हो.. आज डॉक्टरांना पाहिलं आणि संताप उफाळून आला.."

"पण काय झालं होत ते तर सांगा.."

"गंगा माझी लेक... तिच्या डोक्यात काय तो ट्युमर फिमर झाला होता.. डॉक्टर म्हणाले होते मला आमची गंगी वाचेल.. पण नाही हो वाचली माझी पोर.. आता मी आणि माझा नवरा.. नवरा फक्त दारू पीत असतो.. मला गंगी चा आधार होता.. पण ती सुद्धा नाही आता माझ्याबरोबर!! घर खायला उठतं एकटीला.. नवऱ्या समोर काही बोलता येत नाही.. घुसमट होतीये आता माझी.."

"ओह.. सॉरी! पण ह्यात डॉक्टर ची काय चूक... आपल्या शरीरात काय होत असत कळत नाही... डॉक्टर देव नसतो.. आणि जय ने काहीच प्रयत्न केले नाहीत ह्यावर माझा विश्वास नाही.. माझा जय कसा आहे ते मला चांगलाच माहिती आहे.. सगळ्यात आधी त्याच्या साठी माणस आणि त्यांचा जीव महत्वाचा आहे. किती लोकांना बर करतात डॉक्टर..जय ने सुद्धा प्रयत्न नक्कीच केले असतील पण नशिबाचा भाग असतोच ना.." रितू एकदम शांतपणे त्या बाईंना समजून सांगत होती..

"तुम्हाला काही माहिती नसत.. लोकं तोंडाला येईल ते बोलत सुटतात.. मला पोरगी आहे म्हणून मी तिला गिळल... मनाला येईल ते बोलतात... माझी पोर इतकी लाडाची होती..पण तिच्या अचानक जाण्याने मला धक्का बसला.... तुम्हाला काय कळणार हो.. तुम्ही बडे लोकं.." त्या बाईंना रितू शी बोलतांना एकदम हलक वाटत होत... रितू ने त्यांच बोलण ऐकल आणि ती क्षणाचाही वेळ न दवडता बोलायला लागली,

"लोकं बोलतच असतात.. त्याचा विचार सोडा काकू!! आणि तुम्ही आधी हे मनातून काढून टाका की डॉक्टरांच्या चुकीमुळे तुमची मुलगी गेली.. तुम्हाला काहीही मदत हवी असेल तर मला कधीही फोन करा." रितू ने तिचा नंबर त्या बाईंन दिला... रितू च्या एकट्या आपुलकीने बोलल्यामुळे त्या बाईंना स्वतःची चूक कळली होती.. आणि त्या आपसुकच शांत झाल्या.

"पोरी.. तू खूप गुणाची आहेस.. आमच्या सारख्या लोकांशी कोणीच नीट बोलत नाही.. आणि हो, डॉक्टरांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले होते.. माझ्याकडे पैसे नव्हते तर ते सुद्धा देण्याची तयारी दाखवली होती...सॉरी डॉक्टर.. पण ज्याचा माणूस जातो त्यालाच दुःख होत ना.." त्या बाई बोलल्या आणि त्यांनी पदराने डोळे पुसले..आपण उगाच इथे येऊन तमाशे केली ही गोष्ट त्या बाईंना जाणवली. आता मात्र जय काहीतरी बोलणार हे रितू ने हेरले आणि तिने शांत राहायचा निर्णय घेतला..मग बराच वेळ शांत असलेला जय आता बोलायला लागला,

"काकू.. खर आम्ही खूप प्रयत्न केले होते.. पण तुम्ही गंगा ला उशिरा ऍड्मिट केलात.. मग आमच्या हातात काहीच नव्हत.. मी तुम्हाला तेव्हा पण बोललो होतो आणि आत्ता पण सांगतो, काहीही मदत हवी असेल तर निसंकोच सांगा.. आणि मला वाटल होत गंगा वाचेल पण मी तिला वाचवू शकलो नाही ह्याच दुःख मला सुद्धा झालं होत.. आणि आम्ही सुद्धा माणूसच आहोत ना.." जय बोलला..त्या बाईंन जाणवलं होत, गंगा गेली त्यात डॉक्टर ची काही चूक न्हवती.. आणि मग त्या बाई काहीच न बोलता तिथून जायला निघाल्या... पण जाता जाता त्या बाईंनी जय आणि रितू च्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या बोलल्या..

"सुखाने संसार करा..." इतक बोलून त्या बाई तिथे थांबल्या नाहीत.. मग जय आणि रितू ने एकमेकांकडे पाहिले.. दोघे बराच वेळ शांत बसून होते..

क्रमशः..

Rate & Review

AAditya Puranik

AAditya Puranik 3 years ago

Anupriya

Anupriya 3 years ago

Eva

Eva 3 years ago

SAMRUDDHI KESARKAR
Sujata

Sujata 3 years ago