Prem mhanje prem ast..9 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असत- ९

प्रेम म्हणजे प्रेम असत- ९

जय ने रितू चे मन न मोडता त्या प्रसंगाला एकदम वेगळीच कलाटणी दिली. रितू ने परत भूतकाळ काढायला सुरवात केली पण जय ने तिने काढलेला हा विषय शिताफीने बदलला आणि दोघांमधला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता..रितू एकदम रीलाक्स झाली आणि एकदम दोघे जोरजोरात हसायला लागले.. इतके की आजूबाजूचे लोकं त्याच्याकडे पाहायला लागले..

रितू जरा ऑकवर्ड झाली..पण जय मात्र त्याच्याच मूड मध्ये होता. "सांग सांग, पुढे काय काय हवाय तुला?" जय ने रितू ला प्रश्न केला..

"मला काय हवंय?" रितू विचार करायला लागली.

"सांग.. जे माझ आहे ते आता तुझं झाल आहे.. सो तू फक्त फर्माईश सांगायची... आणि ते बंदा हाझीर हे..तुला जे जे हवय ते तुला मिळेल.. आता माझ मन एम तुला खुश ठेवण.." जय ने रितू चा हात हातात घेतला.. आणि जय चे बोलणे ऐकून रितू च्या डोळ्यात नकळत पाणी आले.. जय त्यावर काहीच बोलला नाही.. कधी कधी भावनांचा निचरा होणे महत्वाचे असते हे जय जाणून होता.. त्यामुळे काही काळ त्याने शांततेत जाऊन दिला. जरा वेळात रितू नॉर्मल झाली. आणि ती बोलायला लागली.

"जय..तुला माहिती नाहीये तुझ्या माझ्या आयुष्यात येण्याने माझ आयुष्य किती सुंदर रित्या बदलतंय.. माझा तर अजून विश्वास बसत नाहीये.. एक पिंच प्लीज!! माझ्या आयुष्यात असं काही होईल ह्यावर माझा विश्वास नव्हता पण आता विश्वास बसतोय... मी खूप काहीतरी चांगली कामं केलीयेत अनिच त्याचंच फळ मिळतंय मला.. आणि इतक सुंदर फळ.."

"कधू का पिंच? खर? नंतर ओरडायच नाही.."

"हाऊ मीन.. मी असंच म्हणाले होते रे.." रितू हसत बोलली..

"येस.. येस.. रितू! सेम हिअर!! मी तरी तुला कुठे खरा चिमटा काढणार होतो... ए, पण ना,आपण एकमेकांसाठी बनलो आहोत.. आय थिंक मागच्या जन्मी पन आपण एकत्र होतोच.. त्यामुळे आय कांट stop loving you.."

"हाहाहा.. हे मागचा जन्म कुठून काढलं जय.. पण असेल असच.. नाहीतर माझे लग्न बिग्न करायचे काही प्लान नव्हतेच.. पण काहीतरी कॅनेक्शन आहे... सो मी तुझ्या कडे ओढले गेले... आणि येस.. मला तुझ्याकडून खूप काही हवंय.. माझा होकार मिळाला म्हणजे तू सुटलास असं काही समजू नकोस ह जय!!" रितू जरा चेष्टेन बोलली..

"तू सांग ग रितू... तुझ्यासाठी कायपण..."

"कायपण? बघ ह... मी काहीही मागू शकते.."

"माझ्या शब्दावर विश्वास नाही का?"

"आहे आहे.. ह गुड.. बघ ह.. मोठी यादी आहे"

"ओह.. सांग सांग तू सांग फक्त! फक्त चंद्र तारे इत्यादी इत्यादी नको ह मागू..ते मी काही देऊ शकणार नाही..आणि ते मी मान्य करतो... बाकी जे मला शक्य आहे ते सगळ देईन तुला..मी खूप प्रॅक्टीकल आहे यु सी.. " जय हसत बोलला आणि रितू कडे पाहायला लागला.. रितू ला त्याच्या खरेपणा पाहून छान वाटत.

"नो नो जय... मी इतकीही स्वप्नांच्या दुनियेत रमत नाही रे... "

"मला माहिती नाही असं वाटतंय का रितू.. पण तू पहिल्यांदी माझ्याकडे काही मागायचीस आणि मी नाही म्हणायचं... मला ते आवडणार नाही.. सो सांगितलं.. तसही तुम्हाला मुलींना चंद्र तारे फार आवडतात.. ते तुमच्या जास्ती जवळ असतात.. हो की नाही रितू?" जय बोलून शांत झाला आणि रितू मात्र जोरजोरात हसायला लागली.. "काय झालं ग रितू.. इतक का हसू येतंय? तुला नाही आवडत चंद्र तारे? मी काही चुकीच बोललो?"

जय चे बोलणे ऐकून रितू एकदम शांत झाली..

"नो रे.. मला आवडतात चंद्र तारे. पण ते नाही मागणार.. आणि हसले कारण तू किती गोड दिसत होतास जेव्हा म्हणालास तु काहीतरी मागायचीस आणि मी ते देऊ शकलो नाही तर... तू खरच खूप मस्त आहेस जय!! माझाही पेक्षा कैक पटीने एक उत्तम व्यक्ती आहेस.."

"वा वा.. कान तृप्त होतायत.. तू बोलत राहा बोलत राहा.. माझं कौतुक करत राहा.. छान वाटत स्वतःच कौतुक ऐकतांना.. आणि आपल्या आवडत्या व्यक्ती कडून असं कौतुक ऐकल तर अजूनच छान वाटत.. सो तू करत राहा माझं कौतुक.. मी काही बास नाही म्हणणार.." डोळे मिचकवत जय बोलला..

"हो हो.. माझा लाडका, प्रेमळ, एकदम गुणाचा आणि हो.. एक उत्तर डॉक्टर, एक उत्तम व्यक्ती.. काही दिवसातच माझा हक्कचा होणार..."

"हाहा.. नेहमीच बोलत राहा हे.. बाय द वे, सांग ना.. काय हवाय तुला? काही स्पेशल मागायचं तर मागू शकतेस... मोठ्या हिऱ्याची अंगठी देऊ?" जय भरभरून बोलत होता.. आणि रितू ने जय चे बोलणे ऐकले आणि ती क्षणाचाही वेळ न दवडता बोलायला लागली,

"माझ्याकडे खूप मोठा हिरा आहे जय साहेब.. तो अजून कोणाकडे नाही... कोहिनूर सारखा हिरा यु सी! आणि तो हिरा खुप अनमोल आहे.."

"हो..?? तू कधी बोलली नाहीस रितू... सहीये..पण खर हिरा आहे कि अमेरिकन डायमंड??"

"शट अप जय!! अमेरिकन डायमंड.. नो नो!! थांब.. मी फोटो काढलाय.. मोबाईल मध्ये आहे.. दाखवते तुला..तुझे डोळे विस्फारतील बघ.." रितू चे डोळे बोलतांना लकाकले.. रितू ने पटकन पर्स मधून मोबाईल काढला.. जय रितू कडे कोणता हिरा आहे हे पाहायला उत्सुक होता.. तिच्याकडे आहे त्यापेक्षा भारी हिरा देण्याचा तो विचार करायला लागला होता. तो त्याच्या विचारात तल्लीन झाला होता.. तितक्यात रितू बोलायला लागली,

"कुठे हरवलास राजा?"

"ह.. काही नाही.. तू तुझ्याकडे कोणता हिरा आहे दाखव.." जय भानावर येऊन बोलला..

"हो.. मिळाला फोटो.. ऐक न.. हा हिरा असला लकीली मिळाला.. म्हणजे मला नव्हत वाटल पण ते झालं.."

"दाखव ग पटकन.. मग.. "

"काय मग?" रितू ला प्रश्न पडला..

"काही नाही.. तू दाखव फोटो पटकन.."

"ह.." रितू इतक बोलली आणि तिने मोबाईल जय समोर ठेवला.. तो फोटो पाहून जय जर अचंबित झाला.. एक मिनिट तो शांतच झाला.

"रितू.. अशी कशी ग तू!"

"का काय झाल? नाही आवडला माझा हिरा." रितू भुवया उंचावत बोलली.

"आय लव्ह यु.. आय लव्ह यु सो मच रितू.. तू माझाच फोटो मला दाखवलास... आणि तुझा हिरा म्हणून.. तुझ्यासाठी मी इतका महत्वाचा आहे? तुझ्यासाठी मी हिऱ्या प्रमाणे आहे?" काहीच न कळून जय बोलला..

"म्हणजे काय जय...तू हिऱ्यापेक्षा जास्ती मौल्यवान आहेस माझ्यासाठी.. तू आणि तूच! बाकी आता काहीही नको.. हिरा तुझ्यासमोर काहीच नाही." रितू ने हग घेण्यासाठी दोन्ही हात पुढे केले.. जय सुद्धा जागेवरून उठला आणि त्याने रितू ला हग केले... आता त्या दोघांसाठी आजूबाजूला कोणीच नव्हते..

"ओक म्हणजे तुझ्याकडे खर हिरा नाहीये.. चल मग तुला हवी ती अंगठी घेऊ.. आणि बाकी काही हवे असले तर ते पण घेऊ.."

"नकोय रे मला काही.. माझ्या आयुष्यात तू आहेस हेच माझ्यासाठी पुरेस आहे जय.. मी वस्तुत रमणारी नाही.. मला लोकं जास्ती महत्वाची वाटतात.. आणि तू आहेस आता माझ्या आयुष्यात सो अजून काहीच नको..."

"नो नो रितू.. मला द्यायचं आहे.. फक्त मी पुरेसा नाही ग.. सो मला काही माहिती नाही.. पण आत्ता तुला अंगठी घ्यायला जातोय.. मला द्यायची आहे आणि तू घेतलीच पाहिजेस.. आपण जातोय म्हणजे जातोय.. मला नाही ऐकयल आवडत नाही.." जय ने त्याचा आवाज थोडा चढवला..

"ओरडू नकोस रे जय असा.. बर जाऊ चल.. तुझ्यासाठी फक्त... नाहीतर मला नाही हिऱ्यात वैगरे रस.. आणि महत्वाच ऐक, मी मला वाटेल तेव्हा तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे.. तेव्हा तू पण नाही म्हणायचं नाही.."

"हो ग... मी नाही म्हणायचं प्रश्न नाही.. तू काही मागितलं तर ते तुला मिळणार.. खात्री ठेव..."

क्रमशः..