Prem - 14 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भाग -14

निषाचा चेहरा खूप रड्का जाहला होता .ह्या मुलीच्या नशिबात सुख लिहिलय की नाही, काय माहीत? असा प्रश्न तिच्या बाबांना पडला ? पण, प्रतेक वेळी देव हिच्याबरोबर असं नाही करू शकत . निशा च्या बरोबर काय झालय .हे त्याना काहीच माहीत नव्हते .त्याबद्दल ती विचारून सुध्दा काय बोलत नव्हती . पण, आता तिच्या सोबत काही वाईट होऊ द्याच नाही ,एवढं मात्र त्यानी मनोमन ठरवलं होत . त्यानी तिला न सांगता, लगेच मुंबईला जायचे ठरवले . त्यानी सामान बांधले, एक गाडी बुक केली .गाडी आल्यावर त्यानी गाडीत सामान टाकले . निशाला खोटे सांगितले, की आपल्याला काही कामानिमित नाशिक ला जायचय .आणि तीच सामान घेऊन ते निघाले. निशा नी बाबाना खूप विचारले . पण, बाबानी तिला सांगायचं टाळलं.बाबा आपल्या पासून काहीतरी टाळतात हे तिला जाणवलं, पण असं काय आहे, जे बाबा आपल्याला सांगत नाही . तिच्या मनात अनेक विचार येत होते . पण खरं त्या जागेवर गेल्या शिवाय नाही कळणार.
ईकडे सोहम मात्र खूप टेन्शन मधे आला. त्या मुला बदल काय कळेना? त्याचा शोध कसा लावावा? ते कळेना . त्याचा शोध लागला पाहिजे .शिवाय लग्ना पर्यंत अर्जुन चा शोध लागला पाहिजे . नाहीतर त्याला अंजलिशि लग्न करावे लागेल . त्याने फोन काढला .अर्जुन चा शोध कुठं पर्यंत आला यासाठी त्याने फोन केला होता .त्याने सगळ्याच्या नकळत अर्जुन चा शोध लावायला एक डिटेक्टिव्ह टीम आयोजित केली होती . त्याने त्या टीम ला फोन केला . तर, त्याला समजले, की अर्जुन आणि त्याच्या आणि अंजलीच्या सख्र्पुड्या ला आलेला तो मुलगा दोघे एकच आहेत . सोहम च्या लक्षात आले . म्हणजे त्या दिवशी सख्र्पुड्या ला जो मुलगा आल्ता, तो दुसरा कोण्ही नाही, अर्जुन च आहे .पण, त्याला कसं कळलं की, अंजलिचा साखरपुडा आहे . आणि तो एथे काय करत होता?
सोहम ला अनेक प्रश्न पडत होते .आणि त्या प्रश्नाची उत्तरे फक्त एकच व्यक्ती देऊ शकत होती .ती, म्हणजे अर्जुन . सोहम लगेच अर्जुन जिथे राहतो, तिथे निघाला . त्याला तो पत्ता त्या डेतेक्तिव ने दिला होता . त्याने लगेच निघायचं ठरवलं . तो बाहेर आला, आणि त्याने गाडी काढली . तो गाडीत बसून निघाला . तो त्या डेतेक्तिव नी दिलेल्या पत्ता वर आला खरा पण, तिथल्या घराला कुलूप होत . त्याने आजूबाजूला चौकशी केली .तर, तिथे खूप वर्षां पासून कोणीच राहत नाही . असं, कळलं .सोहम खूपच वैतागला . हा गुंता वाढत च चालला होता, जेवढा तो उल्गड्न्या चा प्रयत्न तो करत होता ,तेवढाच तो गुंता वाढात चालला होता . सोहमला आता वेगळीच शंका यायला लागली होती .हे कोणीतरी जाणून बुजून करतय. कोणीतरी मला अर्जुन ला न भेटू देण्याचा प्रयत्न करतंय. पण, असं कोण का करतंय? कोणाचा फायदा होईल .असं केल्यावर. ऐत्क्यात, कसला तरी आवाज जाहाला . सोहम ने ई कडे तिकडे पाहिले . अरे, हा आवाज तर ....घरातून च येतोय .अरे ह्याच समोर च्या घरतून च येतोय . म्हणजे .....बाहेरून जरी कुलुपबंद असले, तरी आत कोणीतरी आहे, ....हो नक्कीच कोणीतरी आहे . सोहम लगेच पुढे सरसावला. त्याने दाराला कान लावला . आत मधून येणारा आवाज बंद झाला. सोहम ने लगेच ईकडे तिकडे पाहिले कोण, कुठूनतरी आत जायला रस्ता दिसतोय. का ते पाहिलं . त्याला कुठून च रस्ता दिसेना .पण, आत मधे ? जे कोणीतरी असेल ते कधीं न कधी बाहेर येयील ना? मग काळे ल च .
सोहम तिथेच बाहेर कोणाला दिसणार नाही, अशा जागी लपून बसला . खूप वेळ झाला, तरी कोणीच ना त्या घरातून बाहेर आले, ना कोणी आत गेले . मध्यरात्र जाहाली, आता कोणीच येणार नाही .असं सोहम ला वाटले . त्याला झौप यायला लागली . त्याने बाजूला कोणाला ही न दिसणाऱ्या लावलेल्या गाडीत च झौपयचे ठरवले . त्याने गाडी चे दार उघडले . तो आत गेला .सीट वर बसला .त्याने गाडीचे दार लावले .तो झौप्नार ऐत्क्यात त्याला अर्जुनच्या घराच्या मागून कोणीतरी जाताना दिसले . अंधारामुळे स्पष्ट असे काही दिसत नव्हते . पण ती व्यक्ती नक्कीच अर्जुनच्या घराच्या मागे निघाली होती . सोहमने वेळ न घालवता, लगेच त्या माणसाच्या मागे जायचे ठरवले . सोहम लपत छापत त्या माणसाचा पाठलाग करत होता . त्या माणसाने अंगावर चादर घेतल्या मुळे त्या चा चेहरा काही दिसत नव्हता . तो माणूस मागच्या दाराचे कुलूप उघडून त्या घरामध्ये शिरला . घरात शिरताच त्या व्यक्तीने ते दार आतून लावून घेतले . त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे? आणि आत काय चाललाय? सोहम ला काहीच कळेना. रात्र फार झल्या मुळे अंधार पण खूप होता . सोहम बाहेर उभा राहून त्या व्यक्तीची बाहेर येण्याची वाट पाहत होता .पण चार तास जाहाले .तरी, पण कोणीच बाहेर येयीना . आता तर पहाट होत आली होती . थोडं थोडं उजेडात पण होत . सोहम ला आता चांगलाच पेंग यायला लागला होता . त्याला जांभया येऊ लागल्या . आता सोहमला चांगलाच डुल्का लागला होता . रात्र भर जग्ल्या मुळे आजूबाजूचा आवाज ही त्याला ऐकू येत नव्हता .
थोड्यावेळाने पक्ष्यांची किलबिल त्याला ऐकू येऊ लागली .सूर्याचा तीव्र प्रकाश त्याच्या डोळ्यावर येऊ लागला होता . तो उजेड त्याला त्रास देत होता . शरीर ही त्याला तप्ल्या सारखं वाटू लागलं होत . कोणीतरी त्याला गदागदा हल्वत्य, असं त्याला वाटू लागले होते . अचानक ते हलवणे त्याला असह्य होऊ लागले .आणि त्यानी डोळे उघडले . समोर माणसाचा घोळका, पाहून सोहम जरा गड्बड लाच, त्याला काय चाललय, काहीच कळेना .समोरची ती माणसे, त्याच्या प्रश्नाचा भडिमार, डोळ्या वरची न जाणारी झौप . सोहम ला तर काहीच सुचेना . अचानक त्याला रात्रीचा सगळा प्रकार आठवला .तो रात्रीचा माणूस, त्याची वाट बघत बसलेला तो, मधेच त्याला अचानक झौप आली .आणि पुढे तो माणूस, कुठे गेला? काय जाहले पुढे? त्या घरात कोण आहे? आणि ती व्यक्ती रात्रीची का आली होती? आणि त्या घरात काय आहे? असे अनेक प्रश्न त्याला पडत होते . पण त्या समोरच्या माणसाचा घोळका पाहून, तिथे थांबणे योग्य नाही .हे सोहम ने ओळखलं .आणि तिथून काढता पाय घेतला . तो घरी आला .आज आपण अर्जुन ला भेटायची एक चांगली संधी घालवली .ह्याच दुख त्याच्या मनाला काही केल्या चैन पडू देयीना . घरातल्या नी जास्त प्रश्न विचारू नये, म्हणून त्यानी घरात येताच बेडरूम गाठली. बेडरूम मधे येताच त्यानी आंघोळ करून फ्रेश झाला. आणि खाली वेळेवर नाश्ता करण्या साठी आला, जसं काहीच जाहले नाही, तो रात्र भर एथे च होता घरी ...सगळे नाश्ता करण्यासाठी जमले .नोकराने येऊन टेबल वर नाश्ता मांडला . सगळ्या च्या गप्पागोष्टी करत, नाश्ता करण्या स सुरवात जाहली .पण सोहम मात्र जांभया देत नाश्ता करत होता . त्याचे डोळे लाल दिसत होते . आणि तच्या सारखी अवस्था आणखी कोणाची तरी जाहली होती .