Sparsh - 14 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 14 )

एक शौक सी बन गयी हु
हर किसीं के लिये
लोग हमीको इस्तमाल करके
हमारीही औकात पूछते है

नित्या दारावर पोहोचली ..बहुतेक सर्वच तिची आतुरतेने वाट पाहत होते ..तिने घरात पाऊल टाकले तेव्हाच बाबा तिच्यावर ओरडत म्हणाले , " काय ऐकतोय हे नित्या ? इतक्या छोट्या भांडणावरुन कुणी घर सोडून येत का ? मुळात ते तुझंच घर आहे त्यामुळे सोडून येण्याच्या प्रश्नच येत नाही ..बोलला असेल दोन शब्द रागात त्याने काय होत बाईच्या जातीने दोन शब्द एकूण घेतले तर बिघडलं कुठे . याने थांबविल नाही म्हणून आलीस परत उलट तो काहीही बोलला तरी तू थांबायला हवं होतं..त्याचा राग शांत झाला असता तर सर्व काही निपटल असत ..कोणत्या नवरा बायकोमध्ये वाद होत नाहीत आणि तू आलीच लगेच निघून ..हाही विचार केलास नाही लोक काय म्हणतील , समाज काय म्हणेल ..तू आम्हाला जिवंतपणी तरी सुखाने जगू देणार आहेस की नाही .."

नित्याची अवस्था अधिकच खराब होती रात्रभर पुरेशी झोप न झाल्याने तिचे डोळे लाल झालं होते..ती रात्रभर कुठे होती , ती कशी आहे हे विचारपूरस करण्यापेक्षा त्यांनी तिला आरोपी ठरवल्यामुळे नित्याला आणखीच राग आला ..कधी नव्हे ती आज बाबांवर ओरडत म्हणाली , " मी सोडून आले नाही त्यानेच मला घरातून काढलं ..तेही इतक्या रात्री ..तू रात्रभर कुठे होतीस ..कशी आहेस हे विचारन सोडून तुम्ही मला स्वतःच आरोपी ठरवत आहात आणि तुम्ही म्हणत आहात तेव्हढीही छोटी गोष्ट नाही ..त्याने माझ्या चारित्र्यावर प्रश्न केला आहे आणि तुम्हाला फक्त एवढी छोटी गोष्ट वाटते ..तुम्हाला लोक काय म्हणतील , समाज काय म्हणेल याची चिंता आहे पण आपल्या मुलीला किती त्रास होतोय याची चिंता नाहीच तशीही कधी होती म्हणावं ..आणि बर का त्या घराचं माहिती नाही पण मला वाटत ह्या घरात मी परत आले हे तुम्हाला बहुतेक आवडलं नाही ..पण तुम्ही विसरला बाबा हेही घर माझंच आहे तेव्हा मी कुठेही जाणार नाही आणि त्या घरी जाण्याचा तर प्रश्नच येत नाही ..मग तुम्ही मला या घरातच मारून फेकून द्या पण तिथे जाण्याचा आता प्रश्नच येत नाही .."

नित्या सर्व काही आत्मविश्वासाने बोलली होती..तिचे शब्द वडिलांच्या जिव्हारी लागले त्यामुळे ते टिफिन न घेताच कामावर निघून गेले तर नित्याची आईने तिची साधी विचारपूस पण केली नाही ..नित्याला या घरात अशीच वागणूक मिळेल याची शंका होती पण आपलेच वडील इतके कठोर वागतील असा विचार तिने कधीच केला नव्हता ..

तिची अवस्था खराब झाली होती म्हणून येताच तिने अंघोळ करून घेतली ..रात्रभर जागल्याने डोळे सुजायला आले होते त्यामुळे गरम गरम चहा तिने ओठी लावला आणि तिला थोडं फ्रेश वाटू लागलं...ती घरात वावरत होती पण तिच्या आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नदेखिल केला नव्हता त्यामुळे नित्याने जेवण करणं देखील टाळलं होत ..घरात आई व्यतिरिक्त फक्त लहान भाऊ होता ..तो तिच्याकडे नजर लावून बघत होता पण नित्या त्याच्याशीही बोलली नव्हती ..ती फ्रेश होऊन खिडकीजवळ बसली ..साधारणतः तेव्हा 11 वाजले असतील ..खिडकीतून गार वारा येत होता ।...तिने खिडकीला मान टेकवली आणि ती पुन्हा विचारात हरवली .." मृन्मय का अस केलंस तू ? किती आणि काय नाही दिलं तुला ? ..अगदी सर्वस्व अर्पण केल..तुला राग येतो म्हणून प्रत्येक वेळी तुला हवं तसच वागले .. रात्र दिवस तुला आनंद मिळतो म्हणून माझं शरीर तुला दिलं ..तुझं घर आपलं घर म्हणून स्वीकारलं ..पण तू मला समजूनच घेतलं नाहीस .मागच्या दोन वर्षात मी खूप काही सहन केलं , तुझी आई खूप काही बोलली पण पण तिलाही उलटून उत्तर दिलं नाही एवढंच काय तू माझ्या बाजूने कधी शब्द बोलला नाहीस तरीही तुला शब्दाने बोलले नाही ..तुझी बायको , घरच्यांची सून , संध्याची आई म्हणून सर्व जबाबदाऱ्या मनाने पार पाळत आले पण तू काय दिलंस मला ..अपमान ..एवढ्या रात्री घरातून बाहेर काढून दिलंस .तेही मागचं पुढचं काहीही विचार न करता ..मला काही झालं असत याचासुद्धा विचार केला नाहीस ..सदैव फक्त माझ्याकडूनच अपेक्षा करायच्या पण तू सांग एक बायको म्हणून तू काय दिलंस मला ..फक्त एक गोष्ट हवी होती तुझ्याकडून निस्वार्थ प्रेम पण तेही तुला फक्त शरीरातच मिळत ..सांग ना काय दिलंस तू मला आणि मलाच घरातून बाहेर फेकून दिलंस जस मी त्या घरात कधी नव्हतेच ..इतके दिवस तुझ्या सोबत होते ..इतकंच ओळखलंस तू मला .."

नित्याच्या डोक्यात विचार येत होते आणि डोळ्यात अश्रू ..तिला सतत आठवत होता तो माणूस ज्याने तिला देह विक्रीसाठी विचारलं होत ..एखाद्या स्त्री साठी अशी वेळ म्हणजे तिच्या स्वाभिमानाचा अपमान ...आणि तिचा स्वाभिमानच दुखावला असल्याने ती सुद्धा जिवंत नव्हती ..जिवंत होत ते शरीर कारण मन तर प्रत्येक क्षणी कुठला ना कुठला पुरुष मारतच होता मग ते बाबा असो की नवरा ...विचार करून करून डोकं दुखू लागलं होतं तर इकडे झोप न झाल्याने तिचे डोळे सुजून आले होते ..झोप न झाल्याने डोळे बंद होऊ लागले आणि काही क्षणातच ती गार वाऱ्याचे स्पर्शाने झोपी गेली ...

घरात कुणीतरी ओरडत असल्याने नित्याला जाग आली होती .तिने घड्याळात पाहिले तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते ..आई कुणाशी तरी भांडत होती ..तिने आईकडे लक्ष न देता चेहऱ्यावर पाणी घेतले .टॉवेल हातात घेऊन आरशात पाहू लागली ..तिचा चेहरा फारच कोमेजला होता .. डोळेही आत गेले होते ..डोळ्यात जणू रक्त साठल्याचा तिला भासं होऊ लागला आणि स्वतःलाच घाबरून ती आरशापासून दूर पळाली ..आईच भांडण मिटल होत पण ती आताही घरात येऊन ओरडत होती..तिला हा आईचा कर्कश आवाज नकोसा होऊ लागला म्हणून समोर बाल्कनीत येऊन बसली ..त्यांच्या घरासमोर काही मुलं नेहमीच मुलीना पाहत असत ..परंतु नित्याच्या नादाला कुणी लागलं नव्हतं ..आजही ती जिन्याच्या बाजूला कोपऱ्यात जाऊन बसली होती ..काही वेळ एकटीच विचारात हरवली ..आज बाजूला तिच्याशी कुणी बोलत आहेत याच सुद्धा तिला भान नव्हतं ..तिचा बाजूला राहणारा मित्र तिला आवाज देत होता पण तीच त्यांच्याकडेही लक्ष नव्हतं ..काहीच क्षण झाले असतील की नित्याची नजर समोर गेली ..तिला जाणवलं की काही मुलं आपल्याकडे पाहत आहे ..तशी जुनी नित्या असती तर त्यांना शिव्या दिल्या असत्या पण आज ती स्वतःच उठून घरात गेली ..पुन्हा एक कोपरा घेऊन बसली ..आज दिवसभरात तिला फक्त मृन्मयचे शब्द आठवत होते .. " किती नीच आहेस तू !! "
शब्द आठवताच तिचे डोळे पुन्हा ओले होऊ लागायचे पण पुसणारही कुणीच नसल्याने ती स्वतःच डोळे पुसून शांत बसायची ।।

सायंकाळची वेळ होती ..सकाळपासून नित्याशी कुणीच बोललं नव्हतं .. भूक फार लागून होती पण तिला जेवायची इच्छा नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा चहा घेऊन ती रूममध्ये येऊन बसली ..बाबाही कामावरून परतले होते पण तेही तिच्याशी काहीच बोलले नव्हते ..दोघांचीही नजरानजर झाली ..तिला त्यांचं ते घृणास्पद पाहन नको होतं म्हणून ती उठून आतमधल्या रूममध्ये जाऊन एकटीच बसली ..काहीच वेळ झाला असेल ..नित्या जिथे बसून होती तिथे तिचे बाबा आले आणि तिला बाहेर येण्यास सांगू लागले ..तिने मला बाहेर यायचं नाही म्हणून बाबाना स्पष्ट नकार दिला ..तर बाबा थोडे नम्र होत म्हणाले , " नित्या मृन्मय तुझी केव्हाची वाट पाहतोय बाहेर चल .आधी एकूण तर घे तो काय म्हणतोय ते .."

नित्याने सर्व एकल तरीही ती बाहेर गेली नाही ..बाबा परत मृन्मयकडे आले आणि ती भेटण्यास मनाई करत असल्याचे सांगितले ..शेवटी मृन्मयच तिच्याकडे आला ..बाहेर तमाशा नको म्हणून त्यांनी आतमधून दार लावून घेतले आणि नित्याजवळ येत मृदू आवाजात म्हणाला , " चल निघू आपल्या घरी ..नाही तर उशीर होईल .."

नित्या त्याच्या बोलण्याची वाटच पाहत होती ..काल त्याने तिला एक शब्द पण बोलू दिला नव्हता पण आज तिला स्वतःच मनातलं बाहेर काढायचं होत ..त्यामुळे त्याच्याजवळ जाऊन डोळ्यात डोळे टाकत म्हणाली , " बाप रे मृन्मय सर आपण !! तू रस्ता तर विसरला नाहीस ना ? , काल तर मोठ्या नाकाने घरातून नको ते आरोप लावून बाहेर काढलंस मग आज अचानक काय झालं की सरळ घरी न्यायला आला आहेस ..( ती विचार करत ) ..वेट हा आता समजलं..म्हणजे तू अनुला फोन करून पाहिला असशील किंवा कॉल चेक केले असतील आणि माझ्या मित्राच खरच लग्न आहे की नाही हे चेक करून पाहल असशील म्हणून आज न्यायला आला आहेस ..शेवटी संशयी स्वभाव आपला ..त्यांच्याकडून विचारपूस केली नसेल हे शक्यच नाही .."

तीच बोलणं अगदी खरं होत म्हणून आपली नजर खाली करत तो पुन्हा म्हणाला , " नित्या ईथे काही तमाशा नको ..तू घरी चल तिथे निवांत बोलू ..,"

तो बोललाच होता की नित्या त्याच्यावर खेकसत म्हणाली , " तमाशा करू नको !! तू म्हणतोस तस ते माझंच घर होत तर मग तू मला त्या घरातून बाहेर कस काढलं .. काल सर्वांसमोर माझ्या इज्जतीचे धिंडवडे काढलेस ते काय होत ..आणि होतोय तर होऊ दे तमाशा .मी काय भिते कुणाला ? तशीही तू आज माझी इज्जत काढलीच मग कळू दे ह्यांनाही तू नक्की काय आहेस ते ..काल दारू पिऊन माझ्यावर इतका घाणेरडा आरोप करताना तुझी जीभ झडली तरी कशी नाही रे !! दारू पिऊन होतास म्हणून तुला वाटेल ते बोलशील का ? ..कोण समजतोस तू मला स्वतःची संपत्ती की घराची मोलकरीण ?..की जेव्हा वाटलं तेव्हा तिला हात लावायच आणि वाटलं तर दूर करायचं ..जेव्हा वाटलं तेव्हा तिला नीच ठरवून घराबाहेर काढायचं आणि दुसर्याच दिवशी तिला घरी घेऊन जायचं आणि माझ्याच घरच्यांना तू मला नमत घेऊन नेत आहेस हे उपकार केल्यासारखं दाखवत आहेस ..एवढ्या रात्री मला घराबाहेर काढताना तुला काहीच कस नाही वाटलं आणि आता आला आहेस तोंड वर करून मला घरी यायला ..जा मृन्मय आजपासून तुझं नि माझा संबंध नाही ..आणि मी तुझ्याकडे येणार नाही ..तुला जे वाटत ते कर ..पण यानंतर मी तुझ्याकडे येणार नाही ..तुला वाटत असेल ना की ही सर्व सहन करून परत येईल तर तू चुकीचा आहेस ..मलाही स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानसमोर जगातले कुठलेही नात तुच्छ समजते मी ..चल निघ पुन्हा दिसलास ना तर याद राख "

मृन्मयला तिचा खूप राग आला होता पण त्या सर्वांसमोर तो तिला काहीच करु शकणार नव्हता ..तो काही पाऊले समोर गेला आणि पलटत म्हणाला , " कमीत कमी मुलीचा विचार करून तरी परत ये .."

तो जाणारच तेवढ्यात त्याचा हात पकडत ती म्हणाली , " वा !! किती हा निर्लज्जपणा !! सर्व काही कामी आलं नाही म्हणून तू अस बोलून माझं मन वळवशील ..थु आहे तुझ्यावर ..मुलीची इतकी काळजी होती तर काल रात्री तिला आणत होते तेव्हा का दिलं नाहीस ..चल मुलीच म्हणत आहेस ना मी तिला ठेवते ..मी इथेच राहीन आणि दोघांनाही सांभाळनार ..आहे तुझ्यात हिम्मत की तिला सोपवशील ...शक्यच नाही इज्जत जाईल तुमची..मृन्मय अस समजू नको की मुलीच नाव घेतल्याने मी कमजोर पडेल नि तुझ्याकडे येईल ..तू असा विचार करत असेल तर चुकीचा आहेस ..मी आपला अपमान विसरून त्या घरात परत येणार नाही ..जा निघ लवकर ..काही क्षण जर इथे थांबलास ना तर मी काय करेल माझंच मला माहिती नाही ..दूर हो माझ्या नजरेच्या आणि पून्हा कधी परत नको येऊ या नीच मुलीच्या आयुष्यात "

नित्याचे शब्द त्याच्या जिव्हारी लागले आणि आपले दात ओठ खात तो कुणाशीही न बोलता सरळ घराकडे निघून गेला ..तर नित्या आपल्या रागाला शांत करत होती ..

बराच वेळ झाला तरी नित्या आपल्या रूममधून बाहेर आली नव्हती आणि तिला काहीही विचारण्याची हिम्मत कुणात नव्हती ..नित्या जरी रागावली होती तरी तीच मन शांत झाल होत कारण त्याने केलेल्या अपमानाच उत्तर तिने त्याला त्याच्याच भाषेत दिलं होतं ..पण आपल्या मुलीपासून दुरावली याच वाईट नक्कीच वाटत होतं ..नित्याने त्या रात्री जेवण देखील केलं नव्हतं ..आपली मुलगी कशी असेल , काय करत असेल या विचाराने ती संपूर्ण रात्र जागली होती..तिला वाटत होत की तो आपल्या मुलीला आपल्याकडे आणून देईल पण ही केवळ आशा होती ..त्याचा स्वभाव पाहता ते शक्य नव्हतं .. आणि आज जर काही बोलले त्यावरून तो आपल्या मुलीला आयुष्यभर देणार नाही हेही तिने जाणलं होत ..पण काहिका असेना जगणे भाग होते फक्त प्रश्न एकच होता पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या समाजात तिला एकटीने प्रवास करण कितपत सोपं होतं की इतर स्त्रियांप्रमाणे तिला स्वतःची चूक नसतानाही पुन्हा मृन्मयकडेच परत जावं लागणार होतं आणि फक्त मुलीसाठी ती परत गेली असती तर तिच्यावर किती अत्याचार झाले असते ..शरीरावर तर होणारच होते पण आता मनावरही हजारदा आघात केले असते ..आई म्हणून संध्या की एक स्त्री म्हणून स्वाभिमान जपायचा आता हा विचार तिला करायचा होता..कारण मुलीला निवडल तर आई हरणार होती आणि केवळ मुलीसाठी त्याला निवडल तर एक स्त्री हरणार होती ..आणि एका स्त्रीच हरण म्हणजे ?

क्रमशा ..