I am a maid - 6 books and stories free download online pdf in Marathi

मी एक मोलकरीण - 6

( भाग 6 )

मी एक आय. पी.एस. झाले, माझं सर्वात मोठ ध्येय आज पूर्ण झालं पण ते परिपूर्ण तेव्हाच होणार होतं जेव्हा मी माझ्या पदाचा, हक्काचा योग्य वापर करणार होते. मग आता माझा पुढचा ध्येय गुन्हेगारांना शिक्षा करणे हे होतं. मला पुढच्या ट्रेनिंगसाठी शहरामध्ये जावं लागणार होतं तसं मला पत्र आलं होतं. मदनचे शिक्षण अजून चालू होतं म्हणून आई आणि मदन माझ्या बरोबर शहरामध्ये नव्हते येऊ शकत. माझा जाण्याआधी गावामध्ये सत्कार ठेवला होता. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सन्मानीय गोष्ट होती. मी माझ्या सोबत आई, मदन, आणि सर यांना ही घेवून गेले होते. माझं सत्कार झाल्यानंतर, मी एक छोटसं भाषण दिले. त्यामधून मी एक मोलकरीण, एक मोलकरीणीची मुलगी पासून आय. पी. एस. म्हणून कसा प्रवास केला ते सांगितले. तसेच आई आणि सरांची माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण जागा सर्वांना सांगितली. खरतरं मला हे सर्व सांगण्यासाठी मला संधी हवी होती आणि आता ती मिळाली होती . म्हणून मी त्याचा वापर करून सर्व व्यक्त केले. आई,सर आणि मदन यांच्यावर असलेल्या आनंदाची आणि अभिमानाची मला जाणीव झाली होती. त्यानंतर सरांनी एक थोडक्यात भाषण दिले अर्थात ते माझ्या आयुष्यावरच होतं, पण प्रेरणादायी होतं. शेवटी कार्यक्रम संपला अस जाहिर झालं आणि आम्ही निघालो, उद्या मला शहराकडे निघायचं होतं. थोड्याच वेळात घरी पोहचलो. आई माझ्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टीची बांधाबांध करत होती आणि सर ईकडे माझ्या मनाची, विचारांची बांधाबांध करत होते . त्यांनी मला खुप उदाहरण दिली, सर्व संकटाची आधीच सुचना दिली आणि त्यातून कसं सावरायचं याची हि सुचना दिली. हा पूर्ण दिवस रात्र यामध्येच गेला. दुसरा दिवस उजाडला. सर, मदन आणि आई यांच्यासोबत गावतील काही माणसे मला स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते. मला ट्रेनमध्ये बसवून दिलं आणि काहि वेळातच ट्रेन निघाली.

मी पहिल्यांदा अस एकटी राहण्यासाठी जाणार होते. एकटी कॉलेजमध्ये जायचे पण पुन्हा घरी यायचे, आता मी पूर्णपणे एकटी असणार होते. आता चार तासांचा प्रवास होता मग मी शहरात पोहचणार होते. तोपर्यंत मी वाचन करत होते, मला वाचनाची आवड होती. ते करत असताना माझं लक्ष फक्त त्यामध्येच असायचं पण यावेळेस मला मध्येच आवाज येत होता, कधी हसण्याचा तर कधी रडण्याचा होता. मी लक्ष न देण्याच ठरवलं होत पण आवाज रडण्याचा उठाव होत होता. मला राहवलं नाही, मी उठले आणि ईकडे तिकडे बघू लागले. पण काहि संशयास्पद असं काही वाटल नाहि. मी पुन्हा जाग्यावर बसायला जाणार तितक्यात मला वाटलं आता उठलेच आहे तर थोड फ्रेश व्हावं. म्हणून मी वॉशरूमच्या दिशेने निघाले. तिथे जाताना मला दोन सीट दिसले, एका सीट वर एक मुलगी होती आणि समोरच्या सीटवर तीन मुले होती. जसं मी येण्याची चाहुल लागताच तिथे शांतता पसरली होती, सर्व थोड संशयास्पद वाटत होतं पण मी सरळ वॉशरूम मध्ये गेले.

मी मुद्दाम हून नळ चालू केला मला फक्त अंदाज होता आणि आता मला खात्री करून घ्यायची होती. आता पुन्हा सुरूवात झाली त्या आवाजाची ! आता आवाजाबरोबर माझ्या समोर हालचाली येत होत्या. मुलांचा हसण्याचा, चिडवण्याचा आवाज होता आणि त्यानंतर येणारा मुलीचा आवाज रडण्याचा होता. आता मला सर्व खात्री झाली. मी बाहेर येताना मला काहीच माहित नसल्यासारखं दाखवलं. मला त्या मुलीसोबत बोलायचं होत, कदाचित तिला मदतीची गरज होती. पुन्हा सर्व होत तसं शांत झालं. मी बाहेर निघताच सरळ त्या मुलीकडे गेले आणि बोलले, ' थोडी मदत हवी आहे करशील का ? तु करू शकतेस ? म्हणून विचारते. ती काहीच न बोलता रडायला लागली. ती समोरची तीनही मुल तिला डोळ्यांनी ईशारे करत गप्प करत होते. ती ही गप्प राहण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला म्हटलं, बाजुला येतेस का ? असं सांगता नाहि येणार, तिची इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती. तितक्यात त्या तिघांमधील एकाने माझ्या जवळ येऊन काय मदत हवी विचारलं ? मी रागात मुलीलाच सांगू शकते अस बोलले. तिला कळलं होत मी कशाबद्दल बोलते ते ! ती बॅगमध्ये हात घालत होती तितक्यात एकाने तिची बॅग ओढून घेतली आणि मला म्हणाला काही मिळणार नाहि तू निघ ! माझी तळपायाची आग मस्तकामध्ये गेली, मी त्याच्या एक कानाखाली लावून दिली. ते तिला पकडायला लागले. मला थोडी भिती वाटत होती पण सरांनी घरी दिलेली ट्रेनिंग आता वापरायची वेळ आली होती. मी एकाला बाजू करून चांगलीच ठेवून दिली, आता ते तिघे तिला सोडून माझ्याकडे आले. तितक्यात मी तिला माझ्या जीन्सच्या मागच्या खिश्यामध्ये मोबाईल असल्याचे खुणावले, तिने ते व्यवस्थित ओळखले आणि मोबाईल घेतला. त्या तिघांचे ही लक्ष फक्त माझ्याकडे होते पण त्यांना अजूनही मी कोण होते समजलं नव्हतं. मी एका एकाला चांगलाच चोप देण्यात मग्न असतानाच तिथे पोलिस आले, मला शाबासकी ही दिली आणि कौतुक हि केले. त्यांनी मला ट्रेनिंगच्या ठिकाणी पोहचण्याची सोय करून दिली आणि तिघांना ही घेवून गेले. ती मुलगी माझ्यावर भयंकर खुश होती, तिने मला मिठी मारली आणि ताई तु आज मला वाचवलसं अस बोलली. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होतचं पण माझ्या ही डोळ्यात पाणी होतं. मला आज सुमाची आठवण आली, तिला ही अशी गरज असेल पण कोणीच मदतीला गेलं नसेल. मी त्या मुलीला ईतकचं बोलले,' असं कधी रडायचं नाहि, एकतर स्वतः सावध रहायचं, नाहितर पोलिसांना बोलवायचं !' तितक्यात आम्ही दोघी शहरामध्ये पोहचलो, ती तिच्या मार्गाला आणि मी माझ्या!

पोलिसांच्या एका कर्मचा-याने मला माझ्या पत्त्यावर सोडवलं. प्रवास थोडाच होता पण झालेल्या प्रकरणामुळे मी बरीच थकले होते. यामध्ये घरी फोन करायच विसरून गेले. तसेच झोपले. सकाळी सकाळी माझा फोन वाजला बघते तर आईचा फोन होता. आई विचारत होती मला तु ठिक आहेस ना ? काही लागलं नाहि ना ! माझी हे ऐकल्यावर झोप उडाली. मी तिला विचारलं 'तुला हे कसं कळलं' तर ती बोलली पेपरमध्ये अशी बातमी आली आहे की, " आय.पी.एस.ऑफीसरच्या ट्रेनिंगला जात असतानाच बजावली मोलाची कामगिरी " बरं वाटलं वाचून पण नंतर तुझी काळजी वाटली म्हणून फोन केला. मला हि खुप बरं वाटलं पण आईला समजवलं की आता हे अस होणारचं तु काळजी नको करूस ! मला ट्रेनिंगला जायचं होत म्हणून लवकर फोन ठेवून फ्रेश झाले. आज माझा पहिला दिवस होता. पेपरमध्ये आलेल्या बातमीने मी आधीच ओळखीचे झाले होते.मला थोड महान असल्यासारखं वाटलं. पण तेथील सरांनी मला लगेच ओरडून जमिनीवर आणले ! ते बोलले असं छोट्या मोठ्या बातम्या येतच असतात, म्हणून काय लगेच स्वतःला महान नाहि समजायचं ! मग मला लाज वाटली आणि खाली मान घालून मी पुढे रांगेमध्ये उभे राहिले. असा माझा पहिला दिवस गेला.

मी ट्रेनिंग खुपच आवडीने करत होते. कठीण तर होत सर्व पण आवड जास्त होती म्हणून काही कठीण नव्हत. असेच सहा महिने कसे गेले कळलचं नाहि. आज ट्रेनिंग संपणार होती आणि आम्हाला आमची ड्यूटी सुरू करावी लागणार होती तितक्यात मला आईचा फोन आला, मी उचलला नाहि. नंतर पुन्हा आईचा फोन आला, मला वाटतं होत हि नेहमीसारखं विचारपूस करण्यासाठी करते म्हणून मी पुन्हा कट केला. आईचे सतत फोन येत होते, मला सरांची परवानगी घेवून बाहेर यावं लागलं. मी बाहेर येताच आईला फोन केला, आई रडत होती. मला आवाज ऐकूनच रडू आले. तिला मला सांगायला हिम्मत होत नव्हती अस वाटत होतं. शेवटी ती बोलली आणि माझ्या काळजामध्ये धस्स ! झालं. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाची आणि वाईट बातमी होती. माझ्या वडिलांच्या आणि सुमाच्या जाण्याने जे दुःख झाले होते तेव्हा त्यातून मला सावरणारा माझा आधारच आज मला सोडून गेला होता, माझ्या प्रत्येक कठीण काळात सोबत असणारे, माझ्या वडिलांपेक्षा जास्त जीव लावणारे माझे सर मला सोडून गेले होते ! त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. सर्वात जास्त वाईट गोष्ट म्हणजे मला त्यांचं शेवटचं दर्शन सुद्धा नाहि घेता येणार. माझा कामावर आज महत्वाचा दिवस होता आणि आजच मला गावाकडे जायचं शक्यचं नव्हतं. डोक काम करत नव्हतं तितक्यात आईचा फोन आला आणि तिने मला समजावून सांगितले की "आज तुझा तिकडे महत्वाचा दिवस आहे, ईकडे नाहि आलीस तरी चालेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरांना ही नसते आवडलं असं तुझ कर्तव्य सोडून ईथे येणे. सरांचे आशीर्वाद तर नेहमीच तुझ्यावर असणार, तु खुप मोठी हो आणि त्यांचे स्वप्न पूर्ण कर ! हिच शेवटची इच्छा होती त्यांची !" मी आईचे ऐकले आणि सरांचे दुःख मनात लपवून त्यांचे स्वप्न पुर्ण करायला सज्ज झाले.