I am a maid - 7 in Marathi Social Stories by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | मी एक मोलकरीण - 7

मी एक मोलकरीण - 7

( भाग 7 )

शहरामध्ये सहा महिने राहिले पण कधी ईतक एकट एकट नाहि वाटलं, आता सर कधीच सोबत नसणार, मला गरज असेल तरीही, मी अडचणी मध्ये असले तरीही ते नसणार. मला या कल्पनेने भरून येत होतं. मी सरांच्या फोटोकडे बघत होते त्यामधून मला फक्त त्यांचे स्वप्न, माझे स्वप्न, कोणत्याही संकटाला कसे सामोरे जायचे, कधीच हार नाहि मानायची असे वाक्य कानावर येत होते. जे त्यांना आवडत नाहि ते मी कधीच केल नव्हतं आणि आतापासून ही फक्त तेच करणार जे त्यांनी सांगितले होतं. मी पहिल्या दिवशी कामावर गेले पण सतत सर समोर येत होते म्हणून काही कामावर जास्त लक्ष नाहि देता आले. पण आता असं करून चालणार नाहि, सरांना असं आवडणार नाहि म्हणून ऊद्यापासून एक चांगली आय.पी.एस. ऑफीसर म्हणून काम करायचे आज ठरवले होते.

मी आज अलार्म वाजायच्या हि आधीच उठले होते. फ्रेश झाले आणि पोलिस स्टेशन मध्ये पोहचले. मी जे काल बघितलं नव्हतं ते आज दिसत होतं. आपण सर्वांपेक्षा वर आलो याचा गर्व नव्हता, पण आपण केलेले कष्टाचे फळ मिळाले म्हणून आनंद होत होता . सर्व मला आदराने बोलत होते. पण मी सर्वांसोबत आपुलकीने वागायचे . आज मी एक कामाची सुरवात म्हणून आधीचा रेकॉर्ड बघत होते, तपासत होते. काही केसेस समजत नव्हत्या, गुंतागुंतीच्या वाटत होत्या पण मला तेथील जुन्या स्टाफ ने बरीच माहिती दिली, मदत केली आणि समजून सांगितले. मला आता जबाबदारी आल्यासारखे वाटत होते आणि आता जबाबदार व्हायला ही लागेल हे ही कळत होतं. माझ्या आयुष्यातील प्रवासामध्ये आता नवीन प्रवास सुरू झाला होता, जो माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठीच नाहितर सर्वच कुटुंबासाठी महत्वाचा होता.

आता मी एक जबाबदार ऑफीसर म्हणून कामाला सुरूवात केली. आई आणि मदनला पण शहरामध्येच बोलवून घेतले. त्याचं उरलेले शिक्षण त्यांने ईकडेच पुर्ण करावे असे मला वाटले. ते सोबत राहणार म्हणून एक चांगल घर घेतलं. छोट होत पण हक्काच होतं, आईला पण आवडलं. आईला आता कामाला पाठवायला मी तयार नव्हते पण ती म्हणाली, " तु कामावर जाणार, मदन कॉलेजमध्ये जाणार मग मला घरी करमणार नाहि म्हणून फक्त एक घरी तरी कामाला जाईल ". आता ती एक गरज म्हणून नाही तर आवड म्हणून करणार होती म्हणून मी पण परवानगी दिली. अशा प्रकारे आम्ही तिघेही शहरामध्ये आपआपल्या कामामध्ये व्यस्त झालो. माझे काम पण व्यवस्थित चालु होतं, काही छोट्या मोठ्या केसेस चालु असायच्या पण आता सवय झाली होती. माझं वय आता ब-यापैकी झालं होतं, कितीही नाहि म्हटलं तरी आई म्हणून तिला माझ्या लग्नाची चिंता होती. पण ती मला बोलत नसे. एकदा मी कामावरून आले,बरेच थकले होते. तिने नेहमीसारखं पाणी दिलं पण माझी काही विचारपूस नाही केली जी रोज करायची. मला वाटलं हिला बरं नसेल थोड्या वेळाने बोलेल. आता आम्ही जेवणासाठी बसलो, मी आणि मदन मस्ती करत जेवत होतो पण आई शांत होती. आता मला राहवलं नाहि. मी तिला विचारलं, "आई काय झालं ? बरं नाहि का ? डॉक्टरकडे जाऊया का ? " ती एक हि प्रश्नाचं उत्तर न देता बोलली, तुझ काही प्रेमप्रकरण आहे का ? मी तर पुर्ण थक्क होऊन तिला बघत होते, तितक्यात तिने पुन्हा तेच विचारले. मी आता हसायला लागले आणि म्हणाले,'माझं आणि प्रेमप्रकरण ?' आणि मी करायचं ठरवलं तरी ते शक्य नाहि कारण मला सर्व घाबरतात प्रेम कोण करेल!' आई पुढे बोलली मग आता लग्नासाठी मुल बघुया ! मला कळत नव्हतं हे अचानक कसं ? पण तिच पुढे बोलली ' मी जिथे काम करते त्यांनी एक स्थळ सुचवलं आहे, बघुया आपण !' तिची इच्छा होती म्हणून हो बोलून झोपायला गेली पण ती खुश होती, बरं वाटलं. ती पुढे चौकशी करून मला सांगाणार होती.

आई जिथे काम करत होती त्या मालकाने तिला एका मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सर्व माहिती दिली. आईला सर्व आवडलेलं होत म्हणून तिने त्यांना लगेच दुस-या दिवशी मला बघायला बोलवलं. मी घरी आल्याबरोबर लगेच आईने मला हे सर्व सांगितले, मी बोलेल दिवसभर तर नाहि जमणार त्यांना संध्याकाल नंतर बोलव. तिने हि ऐकलं आणि तसं त्यांना सांगितलं. आज मी पण सर्व लवकर संपवून घरी आले पण मला मध्येच काही अडथळा नको म्हणून पोलिस स्टेशन मध्ये सर्वांना व्यवस्थित सर्व सांगितले. मी घरी आले तर आईने सर्व तयारी करून ठेवली होती त्यामध्ये मी कसे कपडे घालायचे हे पण होतं.तिने एक छान साडी माझ्यासाठी काढून ठेवली होती. मी तिला काही बोलले नाहि सर्व तिला हवं तसं करत होते. माझी तयारी हि तिनेच केली. त्यांच्या समोर पोलिस म्हणून नाहि तर एक मुलगी म्हणून जायचयं हे लक्षात ठेव अस सतत सांगत होती. माझ्या तयारी नंतर तब्बल एक तासाने पाहुणे आले. तोपर्यंत आईची माझी सराव परीक्षा घेवून झाली होती आणि आता मुख्य परीक्षा सुरू होणार होती. पाहुणे आले, त्यांना व्यवस्थित मान देऊन आतमध्ये आईने बोलवलं. मी बाहेर आले तर समोर मुलगा आणि त्याचे आई बाबा होते.मी सर्वांना कांदेपोहे दिले. मी जेव्हा हे कांदेपोहे, पाणी, चहा देत घेत होते तेव्हा तिघेही मी गुन्हेगाराला ज्या नजरेने बघते तशाच नजरेने बघत होते आणि मला ते बिलकुल सहन होत नव्हतं. असं कोणीतरी आपल्याला सौंदर्य बघून एक सून आणि बायको म्हणून स्विकारणार मला मान्य नव्हतं पण आईला बघून शांत होते. नंतर मला समोर बसण्यासाठी सांगितले, मी बसले. मला तर शिक्षण, नोकरी, पगार सर्वच विचारलं. त्यांच्या मुलाबद्दल तर काहीच बोलले नाहि. माझ्याबद्दल ऐकलं आणि लगेच पुढे बोलले नंतर तुला काम सोडून द्याव लागेल आता हे ऐकून मी शांत बसू शकत नव्हते. पण मी काही बोलण्याआधीच आई बोलली 'ती तिच काम नाहि सोडणार, बघा तुमचा निर्णय जो काही असेल तो मान्य असेल '. मी मध्ये बोलले मला मुलाबद्दल माहिती मिळेल का? मग तो स्वतः सांगू लागला," मी एक इंजिनीयर आहे, एका कंपनीमध्ये जॉब करत आहे." नंतर लगेच त्याचे 'वडिल बोलले आमचं नाव ऐकलं नाहि का ? आम्ही राजकारणामध्ये चांगल्या आघाडीवर आहोत !" मला मुलगा ठीक वाटला पण परीवार थोडा नाटकी वाटत होता. तितक्यात ते निघाले, आईच्या सांगण्यावरून त्यांचा आशीर्वाद ही घेतला.

आई मला बोलली, "भले मी लग्न कर असं सांगते याचा अर्थ अस नाही की तुला सर्वच ऐकाव लागेल, तु तुझं काम कधीच सोडायचं नाहि, ते ही कोणाच्याच सांगण्यावरून ! " मी आईला प्रेमाने मिठीच मारली. रात्री आमचं जेवण झालं आणि गप्पा चालु होत्या. तितक्यात आईला त्या मालकाचा फोन आला, तो बोलला त्या पाहुण्यांना तुमची मुलगी आवडली आहे आणि प्रमुख म्हणजे तिला तिचं काम करून द्यायला तयार आहेत. मग आई खुपच खुश झाली, तिने काहीच न विचार करता होकार दिला. तिचा तो आनंद मला हवासा वाटत होता म्हणून मी तिला हो बोलले, ते ही एक आय.पी.एस. ऑफीसर असून काहीच चौकशी न करता ! नंतर त्यांचा पुन्हा फोन आला ते साखरपुडा करून घेऊ, आई बोलली ईतकी लगेच तयारी कसं होणार पण ते बोलले सर्व खर्च आम्ही करणार ! मगं काय होणार ? आई तयार लगेच ! मी सर्व बघत होते, मला संशयास्पद वाटत होत पण आई काही ऐकणार नव्हती म्हणून बोलून काही होणार नव्हतं. लगेच त्याच आठवड्यामध्येच साखरपुडा झाला. माझं त्या मुलासोबत थोड थोड बोलण होत होतं म्हणून संशय थोडा कमी होत गेला. माझं कामावरचं लक्ष कमी नव्हतं होवून द्यायचं पण यांनी लगेच एक महिन्यामध्ये लग्न ठरवलं. मी सर्वांसाठी आय.पी.एस.ऑफीसर होते पण एक आई समोर मुलगी होते म्हणून सर्व ऐकत गेले आणि एक महिन्यासाठी रजा घेतली. सर्व घाईमध्ये चाललं होतं पण आई खुश होती म्हणून सर्व आनंदाने सहन करत होते. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला आणि सर्वांच्या मनासारखं झालं आणि माझं पुर्णपणे जग बदलून गेलं.

Rate & Review

Nanda Madhave

Nanda Madhave 2 years ago

Rajan Bhagat

Rajan Bhagat 2 years ago

shraddha

shraddha 2 years ago

Rajani

Rajani 2 years ago

Tejashri Sanadi

Tejashri Sanadi 2 years ago