Tujhi Majhi yaari - 1 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 1

दारा वरची बेल वाजली आणि अंजली थोड बडबड करतच दरवाजा उघडायला गेली ..

इतक्या सकाळी कोण आलं असेल ? एक तर आधीच उशीर झाला आहे ..हे शनिवारी च का बरं सकाळी स्कूल असत ? कोणी काढला हा नियम काय माहीत ..अंजली ने बोलत बोलतच दरवाजा उघडला ..दरवाज्यात हातात फुले व कार्ड घेऊन एक मुलगी उभी होती.

अंजली : अरे सरु ? ..ये ना आत..

सरु ने पटकन अंजली ला मिठी मारली ..

सरु : wish you many many happy returns of the day Anjali..

अंजली : तुझ्या लक्षात होत ?

सरु ने हातातलं कार्ड व फुले अंजली ला दिली .. व आत येत बोलली..

सरु : हो मग मी कसं विसरेन ..माझ्या बेस्ट फ्रेन्ड चा बर्थ डे...

अंजली : हो हो बर ..चल लवकर स्कूल ला जाऊ नाही तर ते चव्हाण सर माहित आहेत ना ? किती डोक खातात..

अंजली ची मम्मी अंजली घाईत निघालेली बघून बोलते..

अंजली ची मम्मी : अग अंजली थांब आज वाढदिवस आहे तुझा ओवाळू तर दे..

अंजली : मम्मी . ... बडे साजरा करणं तर पप्पा ना आजिबात आवडत नाही ..आणि मला तर आठवत ही नाही कधी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केल्याचा..मग हे ओवाळण तरी कशाला ?

अंजली ची मम्मी : असू दे ग..वाढदिवस करत नाहीत म्हणून काय ओवाळायच ही नाही का ? थांब दोन च मिनिट ..फक्त मी आरती च ताट घेऊन येते..

अंजली : मम्मी लवकर कर ..तुला नाही माहीत ते चव्हाण सर ..लेट गेलं की सर्वांन समोर अपमान करतात आणि आता आम्ही दाहविचे स्टूडेंट असून ही छडी ने मारतात..सकाळी सकाळी त्यांचा मार नाही खायचा आणि माझ्या बडे दिवशी तर अजिबात च नाही..

अंजली ची मम्मी : हो ग किती चीड चीड करतेस..कधी तरी शांत राहत जा ना..ती सरु बघ कशी शांत असते बिचारी..

अंजली : मम्मी शांत राहायचं डिपार्टमेंट सरु ला दिलं आहे ग म्हणून ..

सरु शांत राहून त्या दोघी च बोलणं ऐकत असते व गालात हसत असते ..अंजली ची मम्मी तिला ओवाळतात व माथ्या ला कुमकुम चा टीका लावतात ..त्यामुळे अंजली चा गोरा चेहरा अजून च आकर्षक दिसू लागतो ..अंजली पटकन वाकून मम्मी च्या पाया पडते व सरु चा हात धरून तिला ओढतच घेऊन जाते..
अंजली ची मम्मी मागून आवाज देते ..

अंजली ची मम्मी : अग त्या सरु ला चहा तरी पिवू द्यायचं ना अंजली ..

अंजली ही बाहेरून च ओरडून बोलते ..

अंजली : मम्मी तुझ्या हातचा चहा पिण्या साठी सरु नंतर येईल .. बाय मम्मी ..

अंजली ची मम्मी : बाय..आणि हो हळू जा ..किती ती गडबड..वेंधळी आहे नुसता..

अंजली आणि सरु चालत स्कूल ला निघतात..अंजली ने सरु ने दिलेलं कार्ड हातातच धरल होत .. व फुल बॅग मध्ये ठेऊन दिलं होत अजून तिने कार्ड पाहिलं नव्हत त्यामुळे ..जाता जाता रस्त्यात पाहू अस तिने ठरवल होत ..अंजली ने कार्ड ओपन केलं ..त्यावर पिवळ्या रंगाची अस्टर ची फुलांचा बुके ची प्रिंट होती ..मोठ्या अक्षरात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकूर लिहला होता..अंजली ने कार्ड च आतलं पान उघडलं ..त्यावरचा मजकूर वाचून अंजली च्या चेहऱ्यावर हास्य उमटले
..दानशूर कर्णचा दुसरा अवतार म्हणजे साक्षात तू

अंजली ने वळून सरु कडे पाहिले ..आणि तिने ते वाक्य थोड मोठ्याने वाचलं ..

अंजली : दानशूर कर्ण चा दुसरा अवतार म्हणजे साक्षात तू..सरु तुला नाही वाटत ..हे जरा जास्तच होतंय ?

अंजली ने हसून सरु ला विचारल ..तस्स सरु ही ठाम पणे बोलली..

सरु : अजिबात नाही ..अंजली तुला खरच माहित नाही ..तू किती चांगली आहेस..तुझ्या सारखं कोणीच नाही ..माझ्या साठी तर तू सर्व काही आहेस..माझी बेस्ट फ्रेन्ड,माझी गाईड,माझी सपोर्ट सिस्टीम .. you are everything for me..

अंजली : सरु सरु ..बस यार चने के पेड पे चढाओगी क्या बच्ची को ? तुला माहित आहे ना मी कशी आहे ते मग बास ह..आणि थँक्यु सरु या कार्ड आणि फुलांन साठी ..पणं मला तू जे लास्ट ला तुझ्या अक्षरात शुभेच्या लिहल्या आहेत त्या फार आवडल्या..तुला माहितीये..सरु लेफ्ट हँन्डेड व्यक्ती खूप हुशार असतात अस म्हटल जात..आणि ११ पर्सेन्ट लोक ही लेफ्ट हँन्डेड असतात..आणि त्यात तुझा ही नो लागतो ..u are so lucky हा..

सरु : अंजली तुला माहीत आहे ना माझं डोक जास्त नाही चालत अभ्यासात तरी ही प्रयत्न तर करतेय ना ?

अंजली : हो आणि थोड लक्ष देऊन केलास ना स्टडी सगळं जमत तुला ..उगाच डोक चालत नाही बोलू नकोस हा ?

सरु : हो आणि तू आहेस तो पर्यंत तर मी टेन्शन घेत नाही..

अंजली व सरु हि हसत आप आपल्या क्लास रूम कडे वळतात..बोलता बोलता त्या दोघी ही स्कूल मध्ये येऊन पोहचल्या होत्या..दोघी १० वी ला च होत्या पणं दाहवि ला अ व ब डिविजन असल्यामुळे दोघी एकाच वर्गात मात्र नसतात ..अंजली अ मध्ये तर सरु ब मध्ये असते ..
अंजली वर्गात जाऊन आपल्या बेंच वर बसते ..तिच्या वर्गातील इतर मैत्रिणी ही तिला वाढदिवसाच्या शुभेच्या देतात..अंजली ही त्यांना हसून थँक्यु बोलते व तिने आणलेली चॉकलेट ही सर्वांना देते ..काही जणी तिला गिफ्ट देतात..एक चॉकलेट काढून ती वर्गा बाहेर जाऊ लागते..तेवढ्यात तिची बेंच पार्टनर निशा तिला विचारते ..

निशा : अंजली काय झालं ? तास सुरू होईल ना आता ..

अंजली : हो ग आले लगेच सरु ला चॉकलेट द्यायचं च राहून गेलं ..

अंजली चॉकलेट घेऊन सरु च्या वर्गा जवळ जाते व तिला खिडकीतून च चॉकलेट देते व पटकन आपल्या वर्गात निघून जाते .

अंजली आणि सरिता दोघी बेस्ट फ्रेंड्स अंजली च्या घरची परिस्थिती थोडी बरी होती पणं सरिता चे वडील ती लहान होती तेव्हा च वारले होते ..आई व तिचा मोठा भाऊ पंकज अस तीन जणांच कुटुंब ..पंजक ने बारावी पर्यंत च शिक्षण घेतलं होत त्या नंतर त्याने एका कंपनी मध्ये नोकरी मिळवली होती .. व त्यावरच त्याचं कुटुंब चालायचं ..सरिता सावळी होती पणं नाकी डोळी छान ..एकदम साधा भोळा स्वभाव .. अभ्यासत ही ठीक ठाक होती पणं म्हणावं तितकं हुशार नव्हती त्यामुळे आपल्याशी कोणी मैत्री करेल अस तिला वाटत नसे..तीन वर्षां पूर्वी अंजली व तिची ओळख झाली होती आणि त्या नंतर दोघी बेस्ट फ्रेन्डस झाल्या होत्या..अंजली दिसायला फार सुंदर ...पाहतच क्षणी कोणाला ही आवडेल अशी..गोरी पान ,लांब नाक ,फिकट गुलाबी ओठ.. केस फार लांब नव्हते पणं जितके होते तेवढे तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे होते आणि या सर्वां न बरोबर च ती अतिशय हुशार होती.. त्यामळे स्कूल मधील शिक्षकानं मध्ये ही अंजली प्रिय होती..beauty with brain च उत्तम उदाहरण होती अंजली ..तिचे मम्मी पप्पा व ती अस तिघेंच त्याचं ही कुटूंब सरु सारखं त्रिकोणी च होत ..
अंजली ला नेहमी वाटायचं प्रत्येक वर्गात नेहमी वर्गाचे तीन गट असतात ..एक त्यांचा जे खूप हुशार असतात...दुसरा जे मध्यम असतात आणि तिसरा ते ज्यांना शिक्षक काय शिकवत आहेत हे कळतच नसत ..हुशार वाले आपल्याच नादात आम्हाला सर्व काही येत याच आविर्भावात असायचे ...मध्यम वाले अजून थोड काही समजत का या साठी धडपडत असतात..आणि लास्ट बेंच वाले ..कळू दे नाही तर राहू यायचं स्कूल ला आणि परत जायचं इतकंच काम करणारे..वर्गातील हुशार मुली नेहमी ..इतर दोन्ही गटा पासून थोड्या लांब च असायच्या ..पणं अंजली एकटीच अशी होती वर्गात जी या तिन्ही गटातील मुलीनं सोबत बोलायची ..हुशार मुलीनं पेक्षा तिला ज्यांना काही येत नाही त्या जास्त चांगल्या वाटायच्या ..कारण त्यांच्या वागण्यात दिखावा , गर्व नसायचा ..अंजली सोबत त्या मनमोकळे पणाने बोलायच्या..अंजली त्या मुलींना स्टडी त कायम मदत करायची त्यांना समजावून सांगायची ... कधी ही आपल्या हुशार कीचा ती ढोल बडवत नसे त्यांच्या जवळ..ती ही त्यांच्यातली च एक आहे अस ती त्यांच्या सोबत वागायची त्यामुळे त्या मुली ना ही अंजली फार आवडायची ..पणं हुशार गट वाल्या मात्र अंजली च्या अशा वागण्याने तिच्या सोबत थोड फटकळ पने च वागायच्या पणं तरी ही अंजली त्यांचा कधी च राग करायची नाही...अंजली आणि सरिता ची मैत्री मात्र सर्वांना माहीत होती ..वर्गात सोबत नसल्या तरी इतर वेळी मात्र त्याची कायम जोडी असायची ....अंजली सरिता ला सरु बोलायची ..पणं सरु कधीच अंजली ला अंजु बोलत नसे कारण तिला तिचं पूर्ण नाव च खूप छान वाटायचं ..

अंजली आणि सरु ची मैत्री कशी झाली होती ?पुढे काय होत पाहू next part madhe..

क्रमशः