Tujhi Majhi yaari - 5 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 5

अंजली चा प्रसाद मिळाल्या पासून नसीर आता चुकून ही अंजलीच्या वाट्याला जात नव्हता...सरु ने अंजलीची कराम त आपल्या इतर सर्व मैत्रिणी ना सांगितली होती ..त्या सगळ्याच नसीर वर हसू लागल्या होत्या आणि त्याला तसचं हवं म्हणून खुश झाल्या होत्या

.चव्हाण सरांनी इतिहास ची टेस्ट शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक एक हाता च अंतर ठेऊन सर्व मुलांना बसवून घेतली होती...अंजली ला तर छान च गेली टेस्ट ..हा मग हुशार च होती ती ना..अपेक्षे प्रमाणे तिला आउट ऑफ आउट मार्कस मिळणार याची तिला खात्री होती... सरू ला थोडी ठीक ठाक च गेली होती टेस्ट.

स्वातंत्र्य दिवस जवळ येत होता ..म्हणजे च १५ ऑगस्ट ला आता स्टेज वर जाऊन भाषण करायचं म्हणून सगळ्यांची तयारी चालू होती..मराठी च्या पाटील मॅडम नी अंजली ला न विचारताच तीच नाव घेतलं होत...जेव्हा तिने लिस्ट वाचली तेव्हा तिला कळलं की मॅडम नी तीच नाव घेतलं आहे ..मग काय आता भाषण करावं च लागणार..संध्याकाळी तिने बरीच पुस्तक चाळून भाषण लिहून काढलं .

दुसऱ्या दिवशी शाळेत सरु ,निशा ,रेखा अजून इतर मैत्रिणी ही अंजली सोबत जेवायला बसल्या होत्या..तेव्हा त्या त्याचं बोलण चालू होत.

निशा : अंजली झालं का भाषण लिहून ?

अंजली : हो ग बास आता पाठ तेवढ झालं म्हणजे झालं... पाटील मॅडम पणं ना .. न विचारता च नाव दिलं माझं ..मी नव्हते घेणार भाषण .

रेखा : का नव्हती घेणार अंजली ?

अंजली : रेखा ? विसरली स का? पुढचा आठवड्यात लगेच युनिट टेस्ट आहेत ..भाषणात वेळ घालवत बसण्या पेक्षा अभ्यास केला असता ना तेवढाच जास्त .

सरु : अरे हो ..कालच वेळापत्रक आलेलं परीक्षे च ..mi विसरले च होते..

अंजली : सरु पेपर दिवशी लक्षात नाही आलं म्हणून बर की आज पेपर आहे ते..
अंजली बोलते तसे सगळेच हसू लागतात.

अंजली : निशा ती हो भाषण घेतलं आहेस ना ?

निशा : हो..पणं तू कोणत्या नेत्या बद्दल करणार आहेस भाषण ?

रेखा : ये निशा तुला नाही का माहित ? तिचे सर्वात फेवरेट ..

सरु : भगत सिंग..

निशाच्या ही लक्षात येत की अंजली ला भगत सिंग आवड ता त..मग ती त्याच्या विषयी च घेणार ना भाषण .

अंजली : हो मग ते होतेच तसे..त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य च भारत मातेच्या सेवेसाठी अर्पित केलं होत ..माझे आदर्श आहेत ते मग ..त्यांच्या बद्दल का घेऊ नये ?

निशा : हो हो कळल्या हा तुझ्या भावना ..आता चिडू नको बाई...मी महात्मा गांधी बद्दल घेतलं आहे .

अंजली : अग नाही चिडत आणि मी विचारल होत इतरांना ही त्यात कोणी भगत सिंग बद्दल नव्हत घेतलं म्हणून मी घेतलं.

रेखा : पणं पाठ झालं का ?

निशा : ये एका रात्रीत कस पाठ होईल ..दोन दिवस तर लागतील च की ..

जेवणं आवरून अंजली व सर्व मैत्रिणी वर्गात जातात..संध्याकाळी घरी जात असताना सरु अंजली ला सांगते की या रविवारी अंजली ने तिच्या घरी यायचं .

अंजली : ठीक आहे सरु मी येते ,तू माझं भाषण ही पाठ करून घे ..

रविवारी दुपारी अंजली मम्मी ला सांगून सरूच्या घरी जाते..सरु तिची वाट पाहत असते.

अंजली : सरु हे काय घरात कोणीच नाही ?

सरु : अग हो आई मम्मी गेलीय ..शेतात कामाला आणि दादा ही त्यांच्या कामावर ..

अंजली : पंकज दादा ला रविवारी सुट्टी नसते का ग ?

सरु : नाही त्याला मंगळवारी सुट्टी असते ..बस ना तू मी सरबत बनवते.

अंजली : सरु कशाला मी काय पाहुनी आहे का ? चल आधी तू माझं पाठांतर घे आजचा च दिवस आहे फक्त उद्या तर बोलायचं आहे स्टेज वर ..सरबत नंतर कर..

सरु : ठीक आहे बर ..आणि तू कशाला इतकं काळजी करते नेहमी प्रमाणे छान च होईल तुझं भाषण ..

अंजली मग तिने सोबत आणलेली सरु कडे नेते व त्यात लिहलेले भाषणं चे पान कडून सरु ला त्यात बघायला सांगते.

अंजली : अध्यक्ष महाशय ..पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल मित्रानो ..मी तुम्हाला आज भगत सिंगान बद्दल जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत पने ऐकुन घ्यावे ही माझी नम्र विनंती ..अंजली बोलत असते आणि सरु हसायला चालू करते..

अंजली थोडी डोळे मोठे करून तिला पाहत ओरडते..

अंजली : सरु...मी इथे सिर्यसली बोलत आहे आणि तू हस्ते का?

सरु : अंजली तू अशी भाषण म्हणणार आहेस का ?

अंजली : अशी म्हणजे कशी ?

सरु : तू काय फैशन शो करणार आहेस का ? तिथे ?

अंजली : ये सरु काय बोलते तू ?

सरु: अग मग तुझं काय चाललं आहे ? एका ठिकाणी उभी राहा ना ..बोलत बोलत अंजली दरवाजा पर्यंत जात होती आणि तिथून परत मागे फिरत पुन्हा सरु जवळ येत होतो..म्हणजे ती येरझाऱ्या घालत भाषण म्हणत होती त्यात दोन्ही हाताची बोटे एक मेकात गुंफून धर सोड धर सोड चालू च होत..

अंजली सरुच्या डोक्यात एक टपली मारत बोलते..

अंजली : अशी नाही बोलणार मी तिथे ..माझं मी बोलेन तिथे नीट ..पणं आता तू आहेस ना इथे ? आणि माझं जोपर्यत पाठांतर होत नाही तोपर्यंत माझ्या अस येरझाऱ्या चालूच राहणार ह माझी सवय आहे ग सरु..

सरु हसत बोलते..म्हणजे हे तुझ्या पाठांतर राच सिक्रेट आहे तर..?

अंजली : हो ..आता शांत बस आणि ऐक ..

त्यानंतर अंजली सरु ला भाषण बोलून दाखवते..तेव्हा ती मध्येच अटकते..

अंजली : सरु ..एक शब्द सांग ना.. पुढ चा .. अग आठवेल मला लगेच सांग ना..

सरु डोक्यावर हात मारून घेते व तिला सांगते ..

अंजली : हा आठवल ..

अस म्हणून अंजली पुन्हा पुढचं बोलून दाखवते..

सरु : अंजली पाठ झालंय पणं अजून ही थोडी तयारी हवी..

अंजली : हो म्हणून तर तुझ्या कडे आले य ना..

अंजली परत दोन तीन वेळा सरु ला ते भाषण म्हणून दाखवते ..

अंजली : हा आता हे शेवटचं सरु .. फायनल..

सरु : बेस्ट लक अंजली..

अंजली मग हाताची घडी घालून एका जगी उभी राहून सरु ला पूर्ण भाषण बोलून दाखवते या वेळी ती कुठेच चुकत नाही आणि पूर्ण परफेक्ट बोलते..भाषण संपते तस्स सरु टाळ्या वाजवत बोलते..

सरु : ये...ये..अंजली झालं एकदाचं पाठ छान एक ही चूक नाही केली तू ..आता उद्या ही असच बोल..

अंजली ही हसून हो बोलते..

सरु : चल आता सरबत करू ..

मग दोघी मिळून सरबत करतात आणि पित पितच सरु टीव्ही सुरू करते ..दोघी बसून टीव्ही पाहू लागतात नेमका टीव्ही वर धडकन पिक्चर सुरू असतो..

सरु : अंजली तुझा पिक्चर लागला आहे ..

अंजली : काय ?

सरु : अग धडकन लागला आहे..अंजली तुम सिर्फ मेरी हो.. मैं तुम्हे भूल जाऊ ये हो नाही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दुंगा..

सरु अक्टिंग करत बोलते ..तस्स अंजली तिच्या डोक्यात टपली मारते ..

अंजली : नौटंकी कुठली ..बस शांत..

सरु : ये अंजली कधी येणार तुझा देव आणि कधी बोलणार तुला असं?

अंजली : जेव्हा तुझा सागर येईल तेव्हा ..

सरु थोड डोळे मोठे करून अंजली कडे बघते व बोलते ..

सरु : सागर कोण ?

अंजली : तुझं नाव काय आहे ?

सरु : सरिता..

अंजली : हो ना मग सरिता म्हणजेच नदी ..आणि नदी तर समुद्राला जाऊन मिळते ना ..समुद्र म्हणजे सागर..झाला की नाही मग तुझा सागर..

सरु हसायला च लागते..

सरु : वा वा...भारी ह..पणं तू इथे ही भूगोल घेऊन बसली होय ? हा हा..सरु परत हसू लागते आणि अंजली ही हसून पुन्हा पिक्चर पाहू लागते ..तेवढ्यात गाणं सुरू होत ..पिक्चर मध्ये ..

महिमा चौधरी पार्टी त डान्स करत गात होती..

हे हे हे ये हे हे.. आ हा हा आ आ..

अक्सर इस दुनिया में..
अनजाने मिलते हैं..
अनजानी राहो में मिल के खो जाते हैं..
लेकीन हमेशा वो याद आते हैं...

अक्सर इस दुनिया में..

आँखो से बात होती हैं..
धड़कन भी साथ होती है...
कोई ना समझे ये इश्क़ की जुबां..
रू रू ..रू रू..रू

धीरे धीरे से वो दिल में बस जाते है..
चोरी चोरी से वो दिल को चुराते है..
फिर एक दिन वो बिछड़ जाते है..

सरु च फेवरेट साँग होत ते ती डायरेक्ट गाण्यावर डान्स करू लागते गाणं गात गातच ..अंजली तिचा डान्स पाहून हसत होती..

अक्सर इस दुनिया में...

ये दिल तो प्यार मांगे है
सच्या दिलदार मांगे है
जाने मोहब्बत मिले किसे काहा...
रू रू रू..रू रू रू..

सरु डान्स करता करता अंजली ला ही ओढून डान्स करायला घेते व तिचा हात धरुन च डान्स करू लागते..

जब ऐसी रातो में दीवाने मिलते है..
नज़रे टकराती है,फिर दिल धड़क ते है..
चाहत के अफसाने बन जाते है..

हा आ ..अक्सर इस दुनिया में..

गाण संपत तस्स अंजली तिचा हात सोडून खाली बसते ..सरु ही दमून उसासा टाकत खाली बसते..

अंजली : सरु तुला हे गाणं खूप आवडत ना ग ?

सरु : हो माझं फेवरेट साँग आहे हे..बघ ना त्याचे बोल किती छान आहेत ...तो आणि मी सुध्दा अनोळखीच होतो ना मग आपली ओळख झाली मैत्री झाली आणि आता आपण बेस्ट फ्रेन्ड आहोत..

अंजली : हो ..इतकं डोक त्या गाण्यात लावतेस ते च जरा अभ्यासात लावत जा कल्याण होईल पोरी..

अंजली एकदम बाबाजी स्टाईल मध्ये हात करून बोलते ..सरु ही मग तिच्या पुढे झुकत हात जोडून बोलते..

सरु : हो माते..

दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसतात ..सरु हळूच अंजली कडे पाहून विचारते..

सरु : अंजली एक विचारू का?

अंजली : विचार की ..विचारू म्हणून काय विचारे ते आहेस..

सरु : प्रेम म्हणजे काय ग ?

अंजली डोळे विस्परून च तिच्या कडे पाहत विचारते ..

अंजली : काय म्हणालीस सरु ?

सरु जीभ चावून शांत च बसते काहीच बोलत नाही..

अंजली सरु कडे पाहून मोठ मोठ्याने हसू लागते..

अंजली : सरु तू मला भुमितीतील प्रमेय विचार मी सांगते ..प्रेम बिम हे असल काही मला माहित नाही..

सरु ही बळे बळेच हसते..

अंजली : पणं सरु तू का असं विचारत आहेस ? काय चाललं आहे तुझं ?

सरु नजर चोरत च बोलते..

सरु : माझं कुठे काय ? काही नाही ..ते असच विचारल ग..

सरु पटकन विषय बदलायचा म्हणून बोलते..

सरु :अंजली उद्या साठी च्या कार्यक्रम साठी गजरा मिळाला का ग ?

अंजली : नाही ना..मी पप्पा ना येताना आणायला सांगणार होते पणं विसरले .

सरु : अग ती आमच्या वर्गातली पूजा इथे च राहते ..आमच्या घरा जवळून थोडेच दूर आहे त्यांच्यात खूप मोग्र्याची फुले आहेत ..जाऊन आणुया का ?

अंजली : हो का ? मग चल आणू ना..

सरु आणि अंजली पूजाच्या घरी जातात तिच्या घरा भोवती पूर्ण मोग्ऱ्याची झाडे होती आणि त्याला फुले लगडली होती ..

पूजा : अरे अंजली आज तू इकडे ?

अंजली : हो सरु कडे आले होते ..ती बोलली पूजा कडे ही जाऊन येऊ..

पूजा : या ना आत या..

सरु व अंजली घरात जातात पूजाची मम्मी ही दोघी न सोबत बोलते व त्यांना चहा करून देते..थोडा वेळ गप्पा मारून मग दोघी जायला निघतात ..

सरु : पूजा मोग्ऱ्याची फुल घेऊ का ग ? गजरा करण्यासाठी उद्या घालता येईल ना..

पूजा बोलण्याआधी तिची मम्मी बोलते..

पूजाची मम्मी : अग घ्या की ..विचारता काय ? छान गजरे बनवा आणि उद्या घालून जावा..

अंजली : थँक्यु काकू..

मग सरु व अंजली थोडी फुले तोडून घेतात पूजा ही त्यांना तोडू लागते व अंजली व सरु पुन्हा सरुच्या घरी येतात.

अंजली : सरु चल मी ही जाते आता ..उद्या सकाळी लवकर ये पाटील मॅडम नी मला लवकर यायला सांगितलं आहे ..झेंड्याच्या कटया भोवती रांगोळी काढण्यासाठी ..

सरु : ठीक आहे येते मी ..

अंजली मग तिच्या घरी निघून जाते.

क्रमशः