Tujhi Majhi yaari - 2 in Marathi Women Focused by vidya,s world books and stories PDF | तुझी माझी यारी - 2

Featured Books
Share

तुझी माझी यारी - 2

स्कूल मध्ये असा एक ही मुलगा नव्हता ज्याला अंजली आवडत नसे..पणं तिच्या सोबत बोलण्याच धाडस मात्र कोणी करू शकत नसे..कारण ती जशी मुलीनं सोबत प्रेमळ पने वागत असे त्याच्या उलट मुलानं सोबत थोडी फटकळ च होती...त्यामळे मनात असून ही मुलं तिच्या सोबत बोलतं मात्र नव्हती.

अंजली च्या वर्गातला नसिर तिला रोज एक टक पाहत असायचा ...आज ही तास सुरू असताना तो अंजली कडे च पाहत बसला होता ..पुढे मॅडम काय शिकवतात या कडे त्याचं लक्ष च नव्हत...अंजली ची नजर त्याच्या कडे गेली तेव्हा तिने सुरवातीला त्याला इग्नोर च केलं पणं तरीही तो पाहणं काही सोडेना त्यामुळे त्याने त्याला रागात पाहून हाताची मुट्टिी करून त्याला ईशाऱ्या ने च मार खाशील म्हणून वॉरणींग दिली ..अंजली ने नसीर ला धमकावल्याच त्याच्या मित्रांनी पाहिलं व ते त्याच्या वर हसू लागले..नसीर ला थोडा राग च आला.

थोड्या वेळाने शेख मॅडम चा तास सुरू झाला ..त्या हिंदी विषय शिकवायच्या...नसीर त्यांचा आवडता विद्यार्थी होता..त्या पुढे शिकवत होत्या ..पणं नसीर च लक्ष नव्हत हे पाहून त्यांनी बसल्या जागेवरून च एक खडूचा छोटा तुकडा फेकून नसीर ला मारला ..त्यांचा निशाणा बरोबर बसला व तो खडू नसिरच्या डोक्यात लागला ..तो मॅडम कडे पाहू लागला तस्स मॅडम बोलल्या.

शेख मॅडम : नसीर क्या चल राहा हैं तेरा ? ध्यान किधर हैं तेरा ?

मॅडम नसीर ला ओरडत आहेत हे पाहून इतर हसू लागले होते त्यात अंजली ही हसत होती ..अंजली हसत आहे हे पाहून नसीर थोड जास्तच खवळ ला..आणि त्याने मॅडम ला सांगितलं..

नसीर : मॅडम ये अंजली बार बार मुझे घुर घुर् के देखती हैं l

नसीर च बोलणं ऐकून तर अंजली च हसू तर गायब झालच पणं तिचा घासा ही कोरडा पडला..वर्गातले सगळे ही थोडे आश्र्चर्य चकित होऊन नसीर कडे पाहू लागले..मॅडम नी अंजली कडे नजर वळवली तस्स ती गडबडून जागे वर उठून उभी राहत अडखळत च बोलली..

अंजली : मॅडम... वो .. वो .. झुट बोल रहा है l

अंजली ला आता मॅडम काय बोलतील याच टेन्शन आलं होत ..कारण नसीर मॅडम चा फेव रेट स्टूडेंट होता आणि रीलेटिव ही होता..मॅडम आपल्याला च खवळतील अस तिला वाटलं.पणं मॅडम नी अंजली कडे पाहून पुन्हा नसीर कडे पाहिलं व बोलल्या.

शेख मॅडम : नसीर वो क्यू तुम्हे देखेगी ? नीचे बैठो और पढांई पे ध्यान दो l

मॅडम नी अस बोलतच अंजली ने सुटकेचा निःश्वास सोडला आणि ती खाली बसली मात्र नसीर च चांगलं च हस झालं मॅडम ने त्याला खोटं ठरवल ..त्याला वाटलं होत मॅडम आपली बाजू घेतली व अंजली ला ओरडतील पणं मॅडम तिला काहीच बोलल्या नाहीत.

मॅडम चा तास संपला तस्स छोटी सुट्टी झाली .अंजली नसीर ला शोधू लागली होती पणं तो बेल वाजल्या वाजल्या क्लास रूम बाहेर पळाला होता..तेवढयात सरु अंजली जवळ आली व तिला रागात पाहून सरु ने विचारल .

सरु : अंजली काय झालं ? तू इतकी का चिडली आहेस ?

अंजली : सांगते थांब पणं तू सांग तू आमच्या क्लास मधल्या नसीर ला पाहिलंस का ?

सरु : हो पणं का ग ?

अंजली : तू पाहिलंस त्याला ? कुठे आहे सांग ना ?

सरु : तो पाण्याच्या टाकी कडे जाताना दिसला मला.

अंजली ने सरु चा हात धरला व तिला ओढत बाहेर घेऊन आली..

अंजली : चल तिकडे जाऊ..

सरु : अग अंजली झालं काय ? ते तरी सांग ?

अंजली : जाता जाता सांगते..

अस म्हणून ती पुन्हा सरूच्या हातात हात घालून टाकी कडे निघाली व जाता जाता तिने क्लास रूम मध्ये काय झालं हे सरु ला सांगितलं..

सरु : काय ? अस म्हणाला तो ?

अंजली : हो ना आणि बेल झाल्या झाल्या बाहेर पळाला भित्री भागुबाई...आता भेटू च दे

दोघी बोलत बोलत टाकी जवळ आल्या थोडी फार गर्दी जमली होती तिथे आणि नसीर ही तिथे होता अंजली ला समोर पाहून आता तो चांगला च हडबडला..

अंजली ने त्याच्या कडे पाहिलं व तोंड वाकड करत तिने त्याच्या स्टाईल मध्ये त्याची नक्कल केली.

अंजली : मॅडम अंजली बार बार मुझे घुरर घूर के देखती हैं l

नसीर : ये अंजली मेरी नकल क्यू उतार रही हो ?

अंजली : मी ...मी तुझ्या कडे बघते होय ? तू काय सलमान खान शाहरुख खान आहेस का ?ध्रुवीय पांढर अस्वल कुठलं?जरा सा गोरा आहेस म्हणून काय स्वतः ला हीरो समजतो ? माझे इतके ही वाईट दिवस आले नाहीत तुला पाहायला..

नसीर : ये अंजली तू तू मुझे अस्वल क्यू बोल रही है ?

अंजली : होय का ? मग पांढ-या अस्वलाला अस्वल नाही तर मग काय राजकुमार म्हणू? घरी जाऊन आरश्यात बघ जरा तुझं हे तोंड आणि मग मला सांग मी काय खोटं बोलले का ते ..आहेस च तू पांढर अस्वल..

अंजली च बोलणं ऐकून टाकी जवळचे सर्व हसू लागले..

नसीर : देख अंजली मुझ से पंगा मत ले वरणा...

अंजली त्याचं बोलण ऐकुन अजून च भडकते व त्याच्या अंगावर धाऊन जात च असते की तेवढयात सरु तिला दोन्ही हातांनी धरून ठेवते..

अंजली : वरणा क्या ? काय रे काय करशील ? खोटं बोलतो आणि वरून भागुबई सारखं पळून जातो क्लास मधून आणि धमक्या काय देतोस ? मी घाबरत नाही..

नसीर : ये अंजली क्या क्या बोल रही हैं तू? भागु बाई ? ये सरिता समझा दे इ स..अंजली को..

अंजली : तिला काय मध्ये आणतोय? माझ्या शी बोल ना ...

सरु : अंजली शांत हो ना प्लीज...

सरु : ये नसीर तू जा इथून ..आणि तुला लाज बीज काही वाटत नाही का रे ? एक तर स्वतः च अंजली कडे पाहत असतोस आणि वरून मॅडम ला खोट सांगतोस ?

नसीर : तो.. वो हसी क्यू मेरे पे ? और मेरी आँखें हैं में किसी को भी देखू तुझे क्या तकलीफ?

अंजली त्याचं बोलण ऐकुन अजून च चिडते ..

अंजली : वा रे वा क्लास मध्ये तर पूर्ण क्लास हसत होता तुझ्या वर आणि तुला बर मीच फक्त दिसले तुझ्या वर हसताना ? आणि डोळे जरी तुझे असले ना तरी मी काही सार्वजनिक प्रॉपर्टी नाही जे तू माझ्या कडे पाहत बसशील ? अंजली त्याच्या पुढे बोटांनी चुटकी वाजवत बोलते.. देख नसीर बेवजह मेरा दिमाग मत घुमा ..पढंने आता हैं ना स्कूल मे तो चूप चाप अपंना काम कर..

त्यांच्या इतक्या वेळच्या भांडणात मात्र छोटी सुट्टी संपली ही आणि पुन्हा बेल झाली तास सुरू होण्याची..दोघे ही एक मेकांना खुन्नस देत क्लास कडे वळा ले...

सरु : अंजली कशा ला मूर्खा सोबत भांडत बसते ..

अंजली : सरु ,तो खोटं बोललं मॅडम सोबत आणि मॅडम नी त्याच बोलणं खर समजून मला काही बोललं असत तर ? मॅडम नी काय विचार केला असता माझ्या बद्दल ?सगळे हसले असते माझ्या वर..

सरु : पणं तस्स काही झालं तर नाही ना ? आणि घाणीत दगड मारला तर घानीच काहीच जात नाही उलट आपल्याच अंगावर घान शींतोडे उडतात..ना ?

अंजली : तू ना खूप भोळी आहेस सरु ...असल्या लोकांना धडा शिकवायला च हवा ..

बोलता बोलता दोघी ही आप आपल्या क्लास जवळ पोहचतात..

अंजली : बर चल बाय मोठ्या सुट्टीत भेटू..जेवण करायला आज बागेत बसू..

सरु : हो ठीक आहे ..आज मी तुझी फेवरेट गवारी ची भाजी आणली आहे..

अंजली : वाव..चल बर बाय..

दोघी ही आप आपल्या क्लास मध्ये जातात व आप आपल्या अभ्यासात मग्न होतात.

दुपारी मोठी सुट्टी होते तेव्हा सरु ,अंजली व तिच्या अजून चार पाच मैत्रिणी मिळून स्कूल समोर असलेल्या बागेत एका मोठ्या झाडा खाली गोल करून जेवण करत बोलत होत्या.

निशा : नसीर किती खोटा आहे ना ?

स्नेहा : हो ना काय बोलला तो शेख मॅडम ला ..की अंजली त्याच्या कडे पाहते.

रेखा : ये अंजली कधी च त्याच्या कडे पाहत नाही..त्याच्या कडेच काय कोणत्याच मुला कडे ती पाहत नाही.

सरु : अग रेखा आम्हा सर्वांना च माहित आहे अंजली कोणा कडे पाहत नाही ते...

अंजली : ये जाऊ दे सोडा तो विषय आता ..ये सरु भाजी दे ना अजून ..

सरु : हो घे तुझ्या साठी च आणली आहे तुला आवडते म्हणून..

अंजली : थँक्यु सरु..

निशा : ये आमच्या ही डब्ब्यातल घे ना..

अंजली : हो हो सगळ्यांचच डब्ब्यातल एक एक घास शेअर करू एकदम संक्रातीच्या भोगी टाईप भाजी होईल..मला खूप आवडते तशी..

तस्स इतर मुली ही हो बोलतात व एक मेकी न सोबत शेअर करतात..

रेखा :ये अंजली पणं भारी सुनावलं स तू त्या नसीर ला..

निशा : ये कधी ग ?

रेखा : छोट्या सुट्टीत ..टाकी वर..

निशा : असू दे त्याला तसचं पाहिजे ...

रेखा : पणं तुला माहित आहे का ? अंजली त्याला काय बोलली ?

निशा : काय ग ?

रेखा : ध्रुवीय पांढर अस्वल..

स्नेहा : काय ? अस्वल ?हा हा हा..

निशा : ये पणं भारी ह अंजली एकदम परफेक्ट नाव ठेवलं स..शोभत य ह..

पांढर अस्वल...अस बोलून सर्व जनिच मोठ्याने हसू लागल्या ..सरु व अंजली ही हसत हसत जेवण करू लागल्या.

क्रमशः