Tu Hi re majha Mitwa - 4 books and stories free download online pdf in Marathi

तू_ही_रे_माझा_मितवा... - 4





ऋतूला रात्री उशिरा जाग आली,अजूनही थकवा जाणवत असला तरी ताप उतरल्यामुळे जरा हुशारी आली होती.
तिची चाहूल लागताच शेजारी पेंगुळलेल्या प्रिया आणि तनु लगेच उठल्या. तनुने तिला व्यवस्थितपणे भिंतीला टेकवून बसवलं, तिचं ब्लॅंकेट सारखं केलं.
“You Ok?” तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया म्हणाली.

मानेनेच होकार देत ती भिंतीला मागे टेकून बसली.

“हे बघ आता आराम करायचा हं..दोन दिवस सुट्टी टाकायला सांगितली आहे डॉक्टर काकांनी.” तिला समजावणीच्या सुरात तनु म्हणाली.

“दोन दिवस?..अजिबात गरज नाही.I am absolutely ok.आणि हो प्रिया, माझ्या घरी सांगितलं नाही ना? ते उगाच दोन दिवस तिकडे बोलावतील आणि मग पुन्हा लग्न,स्थळं,मुलं.. उगाचच कटकट,अबोला होता तेच ठीक होतं असं वाटतंय” ती वैतागत म्हणाली.

“नाही ग बाबा,फोन आला होता घरून पण म्हटलं झोपली आहे.उद्या कर तूच फोन.ओके”

“ह्म्म्म..करते”

“तरी मी तुला सकाळी म्हणत होते नको जाऊस पण तू ऐकणार नाही कधी,एक बरं की तुझा तो कलीग होता सोबत नाही तर अवघड झालं असतं नाही सगळं.”
तिला पाणी देत तनु म्हणाली.
“हो ग! त्याचं ते वर माझ्या सेक्शनला येणं अगदी unexpected होतं.तो आला काय,थांबला काय...स्ट्रेंज!! खरतरं आमचं इतकी ही चांगलं बोलणं नाही की त्याने मला क्लिनिकपर्यंत पोहचवावं. मला नसतो खरं त्याचा काही प्रोब्लेम पण तोच वाकड्यात शिरतो नेहमी.”
तिचा आवाज अजूनही क्षीण होता.

“पण खरं सांगू ऋतू मी थोडाच वेळ बोलले त्याच्याशी पण खूप प्युअर...वॉर्म असा वाटला म्हणजे तू म्हणते तसं खडूस, वाकड्यात शिरणारा नाही वाटला गं तो. His eyes were full of emotions.त्याच्या डोळ्यात किती काळजी होती तुझ्यासाठी. मला तर वाटलं..............”

वहावत जाऊन बोलता बोलता ती अचानक थांबली तसं तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत ऋतू म्हणाली-

“काय वाटलं?”

उठून उभी राहत मिश्किलपणे हसत मस्त आळस देत ती म्हणाली-
“ काही नाही...उगाच आपलं”
ऋतूसाठी आणलेलं सूप व्यवस्थित ठेवत प्रिया म्हणाली-
“ये असं नाही हं..तुला काय वाटलं ते सांगायलाच हवं असं अर्धवट नको बोलत जाउस..अर्धवट वाक्यांचे खूप अर्थ निघतात.”

तिच्या बेडवर झोपत ती म्हणाली-“काही नको, तिला ज्या गोष्टी पटत नाही त्या तिला का सांगायच्या.”

हातातलं सूप थोडं ढवळत,हळुवारपणे हसत ऋतू म्हणाली-“तनु हे खूप obvious आहे...तुला वाटलं असेल की त्याला मी आवडते म्हणून..”

“नाही!! असं वाटलं की त्याची ती त्यावेळची अस्वस्थता पहिली असतीस तर तू नक्की त्याच्या प्रेमात पडली असती.”

तिच्या ह्या वाक्यावर प्रिया आणि तनु दोघीही हसल्या. तिला एक उशी मारत प्रिया म्हणाली-
“बोलले ..!! लव्हेरीया स्पेशालिस्ट डॉक्टर बोलले.”

प्रियाकडे बघत हसून ऋतू म्हणाली-
“अग डॉक्टर तरी टेस्ट करतात मग रोगाचं निदान करतात..पण तनुने एक लव्ह क्लिनिक टाकलं तर डोळे बघूनच-‘तुला १०० डिग्री प्रेम झालंय, तुला फक्त बारीक बारीक फ्लर्ट आहे, अरे! तुम्हाला किती जास्त क्रश झालाय...तुम्ही पथ्य पाळा...” असं सांगतील.”

तिच्या ह्या विनोदावर दोघीही खळखळून हसल्या. तसं अचानक काहीतरी आठवल्यासारखं तनु थांबली आणि म्हणाली-
“ये jokes apart ,ऋतू त्याने तुला जाग आल्यावर एक मेसेज टाकायला सांगितलाय गं.”

हातात उगाच फोन घेऊन गोल फिरवत ती म्हणाली-
“जाऊदे गं..असंच म्हटला असेल.इतक्या रात्री कुठे मेसेज करू? आणि बाय द वे..ह्या महाशयांची GF आहे.रेव्व्वू!!”

“प्लीज कर मेसेज..त्याने हेल्प केलीय यार तुला.” तनु जागेवरूनच ओरडत म्हणाली.

ऋतूने फोन चेक केला..शोकेस ट्रेनी,शोकेस ओफ़िशिअल,यारी दोस्ती...कितीतरी ग्रुपवर भरपूर अपडेट्स होते आणि वेद्चे Are you ok? मेसेज होते. अर्धा तासाच्या गॅपने, एक तर अवघ्या मिनिटापूर्वीचा होता.-‘प्लीज अपडेट’

तिला हसू आलं,हातात फोन होता आणि डोक्यात विचार सुरु होते-
‘इतके दिवस झाले सोबत आहोत पण कधी याचा पर्सनल मेसेज नाही,ट्रेनीग्रुपवर मात्र डिस्कशनमध्ये नेहमी माझ्या विरुद्ध आणि आज पहिल्यांदा पर्सनल मेसेज टाकलाय तो ही काळजीने.मुलीं आजारी असल्यावरच मुलं जास्त हळवे होतात का? तनुला हसले खरतरं पण तो सोबत होता तेव्हापासून खूप सिक्युअर आणि pampared वाटत होतं..Infact छान वाटत होतं, किती गोंधळ उडवून दिलाय ह्या मुलाने आयुष्यात, नेमकं काय होतंय ते ही सांगता येत नाही...सोबत हवीहवीशी वाटतेय एवढं मात्र नक्की..’

थोडा विचार करून तिने रिप्लाय केला- ‘Yes I am ok, Thanks for all your help’

लगेच रिप्लाय आला-“would you mind if I call you now?”

तिला उगाच धडधडलं..तनु आणि प्रिया त्यांच्या बेडवर होत्या.तिने हळूच तनुला आवाज दिला.

‘तनु तो म्हणतोय कॉल करू का?सांग ना ..बोलू का?’

‘बोल की..सांग त्याला तू ओके आहे,काळजी करू नको. कधी नव्हे त्या उत्सुकतेने ती आतल्या बेडरूममध्ये गेली,तिने मेसेज केला.

“I won’t mind…..”

काही क्षणात त्याचा कॉल आला.

‘हेल्लो...!” ती क्षीण पण गोड आवाजात म्हणाली.

“heyy how are you?...you are still sounding very low!”

“no I am fine…”

“काय म्हटले डॉक्टर? किती दिवस आराम सांगितलाय?

“हाय फिव्हर होता..दोन दिवस सांगितलंय आराम करायला पण इतका आराम कोण करतं?..उद्याची सुट्टी टाकेन फक्त.”

“कर की आराम ..तुझ्यावाचून काय अडतंय का शोकेस मिडीयाचं..”

“ह्म्म्म ..बघते.by the way खूप खूप थान्क्स,आपलं अगदी कॅजुअल बोलणं सुद्धा नसतांना तू एवढी मदत केली.मला ट्रेनिंगचे दिवस आठवून गिल्टी फील होतंय यार,खूप भांडले ना?”

“चालायचंच.त्याचा आता काही विषय नाहीये, ...dont think so much …आता ताप नाहीये ना?"

“नाही आता अगदी ओके”

“ओके देन ...चल ठेवू?”

‘अजून थोडा वेळ बोलला तर काय बिघडेल याचं?’ असं तिला उगाच वाटून गेलं.मनावर दगड ठेवून मुद्दाम आवाजात सहजता आणत ती म्हणाली.

“हो हो चल बाय..मी ही आराम करते”

“बाय...”

एका मिनिटाच्या पॉज नंतरही दोघांनी फोन ठेवला नव्हता.ती अजूनही फोनवर आहे हे समजून तो म्हणाला-

“हेल्लो... काय झालं..ठेवतेयेस ना? काही सांगायचं आहे का?”
“ नाही ऐकायचंय .............”

आपसूकच बोलून गेल्याने ती दचकलीच.... आणि तिने डोक्याला हात मारत जीभ चावली... “शी..!! काय बोलून गेलो आपण..”

“काय?? ...अग व्यवस्थित ऐकायला नाही आलं.”तो बारकाईने तिचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत होता.
“अरे काही नाही...ते ते तुझं जॅकेट ...ते सांगत होते, माझ्याकडेच राहिलं..”वेळ मारून नेत ती म्हणाली.

“ठीक आहे ग,दे भेटल्यावर. तो काय विषय आहे का?”

पुन्हा एक पॉज...

“हॅलो...ऐकतेय ना?” तो शांतपणे म्हणाला.

“ऐकतेय ना ..फक्त बोलायला काही सुचत नाहीये.. Awkward होतंय जरा.असं तुझ्याशी कॅजुअल बोलायची सवय नाहीये,त्याचं काय आहे तू थोडा खडूस आहे ना.” ती निरागसपणे पटकन बोलून गेली आणि “हे आपण असं काय बडबडतोय...” हा विचार करून तिने पुन्हा डोक्याला हात मारला.

“खडूस...मी?” खडूसवर जोर देत तो म्हणाला.’हे असं खडूस बोलतांना ही नक्कीच क्युट दिसत असणार..’ एक हलकसं स्माईल त्याच्या चेहऱ्यावर पसरलं.

“न....नाही मीन्स तसं नाही..खडूस म्हणजे आपलं कधी पटलं नाही ना एकमेकांशी म्हणून मी तुला खडूसच म्हणते?..”

“ओके ! खडूस...आणि अजून काय काय म्हणतेस...” तो हळुवारपणे म्हणाला.

“अम्म्म ..स्टुपिड...” ती गोड आवाजात म्हणाली.

“अजून....” तिला डोळे मिटून आठवायचा प्रयत्न करत तो म्हणाला.

रात्रीचं शांत,स्वप्नाळू वातावरण..फोनच्या दुसऱ्या बाजूला कधी हवासा वाटणारा,कधी अनोळखी वाटणारा ‘तो’ आणि त्यात त्याचं असं हळुवार मोरपिस फिरवल्यासारखं बोलणं..तिच्या काळजात धडधडायला लागलं,थोडी घाबरली देखील..हे कुठेतरी भलतीकडेच वळतय,उगाच गुंता वाढेल,आवरायला हवं! ती सावरली.

“बस...सध्या तरी एवढंच,चल ठेऊ का फोन...झोपते आता आणि तुलाही उशीर होईल ऑफिसला जायचं ना ”

“अं..हो..actually !! खूप वेळ झालाय..झोप आता,काळजी घे,बाय,गुड नाईट.” तो ही सावरला.

इच्छा नसतांना फोन ठेऊन ती झोपायला गेली खरी पण झोप येणार तरी कशी होती?...त्याच्या एक एक शब्दामधून काय काय अर्थ निघत होता, हा विचार करत तिचा उशिरा डोळा लागला.

**************
टी-सेक्शनला नेहमीप्रमाणे गर्दी होती.जय आणि रेवाची मस्ती,बडबड चालू होती.वेद डोळे मिटून खुर्चीला मागे टेकून बसला होता.
‘वेद..कॉफी गार होतेय.’ जय त्याला हलकेच हलवत म्हणाला.

‘वेद..कशाला रात्री उशिरापर्यंत जागरण करत असतोस रे? जेव्हा पहावं तेव्हा ऑन लाईन..’ तिच्या आवाजात काळजी होती.

“ by the way तो रात्रभर ऑनलाईन असतो हे बघत तू का साक्षात जागी असतेस रेवा..?” जय ने तिला चिडवलं तसं लाजेने गोरीमोरी होतं तिने जयला एक चापट मारत ती म्हणाली-

“very smart ..jay पण बऱ्याच वेळा मी रात्री ई-बुक वाचत असते म्हणून मला माहित आहे.”

“हो का? दिवसभर वेदांची पारायणे आणि रात्री ई-बुकांचे..वाह्ह्ह आयुष्याची साक्षात लायब्ररी झाल्यासारखं वाटत असेल नाही तुला?.” तो हसत म्हणाला.

दोघांची बडबड ऐकून वैतागत पेंगुळलेल्या डोळ्यांनी जयकडे बघत वेद म्हणाला-
“ये साक्षात...कितीवेळा सांगितलंय तुला, तिला असं चिडवू नकोस म्हणून आमची निखळ मैत्री खपत नाही का तुला? काहीही tag काय लावतोस."

निखळ मैत्री ह्या शब्दाने रेवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.ती कसनुसं थोडंस हसत म्हणाली-
“बघ ना..कसाय हा,काहीही बोलतो.”

“रेवू तू पण गप्प बस..काय प्रताप करून ठेवलास काल? ऋतुजाचे रीस्पोंस क्लियर केलेस आणि म्हटलीस सलोनी आहे वर तिच्यासोबत,पण सलोनी तर लगेच गेली.ती एकटी होती सेक्शनला आणि आजारी होती,हाय फिवर होता तिला..मी वेळेवर वर गेलो नसतो आणि कॅब करून तिला दवाखान्यात नेलं नसतं तर काय झालं असतं माहित नाही.”

हे त्याचं बोलणं ऐकून मात्र रेवाला राग अनावर झाला-
“don’t tell me वेद ..तू त्या ऋतुजाला मदत केली? पूर्ण ट्रेनिंग पिरीयडमध्ये किती अपोझ केलाय तिने तुला..आपलं प्राइज गेलंय तिच्यामुळे आणि तू ?

“रेवू ट्रेनिंगच्या भांडणाचा बदला अश्याप्रकारे घेणं कुठल्याच सबबीवर योग्य नाही...not done at all,तिच्या जीवावर बेतलं असतं तर काय केल असतं आपण?” तो पुन्हा तिला शांतपणे समजावत म्हणाला.

रेवा प्रचंड चिडलेली होती.वेद काल तिच्यासोबत होता,तिला दवाखान्यात घेऊन गेला, ही गोष्टच तिच्या पचनी पडत नव्हती.’आता भांडण होऊ शकतं’ असा अंदाज घेत सारवासारव करत जय म्हणाला- “रेवा मला पटतंय वेदचं,ती एकटी होती,आजारी होती,तिला काही झालं असतं तर? माहित असूनही काही केलं नाही म्हणून केवढा गिल्ट बसला असता,..बरंच झालं हा तिथे प्रकटला ते”

“वेद ती किती ओव्हरस्मार्ट आहे माहित आहे ना तुला...शी.. मला पटतच नाहीये तू असं कसं वागू शकतो?’ ती बेचैन झाली होती.
तिला शांत करत वेद म्हणाला-
‘रेवू तिच्याजागेवर कुणीही राहिलं असतं तरीही मी हेच केलं असतं...अश्यावेळी भांडण,राग,खुन्नस विसरायचं असतं..'

“ओके..ह्यावर मला काहीच म्हणायचं नाहीये..” ती रागाने ताडताड निघून गेली.

“वेद नक्की ऋतुजाच्या जागेवर दुसरी कुठलीही मुलगी असती तर तू हेच केलं असतं?” जय ने ही पिच्छा पुरवला.

“ofcourse jay and you know that right?”

“ते आहेच, पण मदत केल्यावर काळजी करत असं रात्रभर जागरण पण केलं असतस ?” त्याच्या पेंगुळलेल्या डोळ्यात बघत जय म्हणाला.

त्याच्या प्रश्नाचा रोख बघून त्याच्या डोळ्यात बघायचं टाळत तो म्हणाला-
“चल..खूप कामं पेंडिंग आहे..लंचला भेटू”
पाठमोऱ्या वेद्कडे तो बघतच राहिला. उरलेला दिवस तसा शांत शांतच गेला. ऋतुजा आज समोर नव्हती म्हणून तरी रेवाचा राग जरा शांत होता.आज लंच देखील शांततेच झालं,रोजसारखी मस्ती नव्हती.काहीशी रुखरुख लावतच तो दिवस संपला.

**************

“ सौम्या..खरंच तू स्वतः ऐकलंस? नक्की ?”

टी सेक्शनमध्ये एका कोपऱ्यात नेत ऋतू सौम्याला विचारात होती. एक दिवस सुट्टी घेऊन ती आज ऑफिसला आली होती. पीच कलर इन शर्ट,क्रीम कलर ट्राउझर,हलकासा डोळ्यांचा मेकअप,सुंदर प्लम कलर लिपस्टिक.केसांची हाय पोनी.थोडा थकवा जरी जाणवत होता तरी चेहरा नेहमीसारखा गोड गुलाबी होता. बघणाऱ्याने वळून दोन वेळा बघावंच अगदी.

“ऋतू मी स्वतः ऐकलंय..कालच मेसेज करणार होते पण म्हटलं,जाऊ दे आराम करत असशील..उगाच डिस्टर्ब होशील..आज सांगितलं कारण तू तिला समोर समोर विचार असं चीप का वागली ते..”

“R U sure वेदला हे माहित होतं?” तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

“हो बाबा,तो सा ज ना तर म्हणत होता बरं झालं वेद तू गेलास नाहीतर उगाच गिल्ट राहिला असता.” चहाचा एक सिप घेत ती म्हणाली.

आता मात्र ऋतूचा संताप अनावर झाला होता.उपहासाने नाटकी हसत ती म्हणाली-
“...ओह्ह हो आता मला कळतंय तो बरोबर तेव्हाच वर कसा आला,थांबला,मला क्लिनिकपर्यंत पोहचवलं...अपडेट्स घेतले..मी बरी आहे की नाही म्हणून...thats mean त्याच्या लाडक्या रेवूवर प्रकरण शेकू नये म्हणून ही धडपड तर...आणि मी मूर्ख..मला वाटलं...!!”
तिने एका दमात थंड झालेला चहा पिऊन टाकला.
“तुला काय वाटलं?”
आश्चर्याने सौम्याने विचारलं.तिला उत्तर द्यायचं टाळत ती म्हणाली.
“काय वाटणार हेच..हा इतका कसा बदलला ते,म्हणजे त्यांना अजूनही राग आहे आपण जिंकलो त्याचा.” तिला खरंतर खूप रडावसं वाटत होतं.

“तिची कम्प्लेंट करायची का सलोनीकडे?”

“leave it…मला हे सगळं वाईट स्वप्नासारखं विसरायचंय...”
आजूबाजूला बघत सौम्य म्हणाली -
”by the way आज दिसत नाहीये इकडे ते mad angle triangle”

“चल..मॉर्निंग मिटींगचा मेसेज आलाय.निघतेय मी.”

मॉर्निंग मिटिंगमध्ये रेवाची आणि तिची नजरानजर झाली, दोघींच्या डोळ्यातला संतापाला सीमाच नव्हती.पुढच्या प्रोजेक्टचे डीटेल्स घेऊन त्या जागेवर आल्या.ऋतूच्या डेस्कवरच्या बॅगेत वेदचं जॅकेट होतं ती बॅग तिने रागाने ड्रॉवरमध्ये कोंबली. नवीन प्रोजेक्ट चे डीटेल्स तिने वाचायला घेतले पण चित्त थाऱ्यावर नव्हतं,त्यात तिची नजर सकाळपासून वेदला शोधत होती पण तो आज सकाळपासूनच मिटींगमध्ये होता,त्यालाही वाटत होतंच की ऋतू ऑफिसला येईल म्हणून.काल तसे जुजबी मेसेजही झाले होते.मिटिंग संपली ती लंच ब्रेकलाच.तो तडक रेवाच्या डेस्कजवळ आला तसा जयराज ही पोहचलाच होता. त्यांना आलेलं पाहून रेवा उठली,पाण्याची बॉटल घेऊन ती क्युबिकच्या बाहेर आली.वेदने पाहिलं..पिच रंगाचा शर्ट आणि गोंडस चेहरा..पण डोळे पाणावलेले होते.त्याने हिम्मत करून विचारलं-

“hi ऋतुजा कशी आहेस?all ok?”

त्याने तिला विचारल्यावर तोंड वेंगाडून रेवा पुढे निघून गेली,तसा तिच्यामागे जयही गेला.
त्याच्याकडे लक्ष न देता पुढ्यात असलेल्या फाईलमध्ये काही नोंदी ती करायला लागली. काय बिनसलं असावं हिचं? त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते.

“काय झालं ऋतुजा ...बोलायचं नाहीये का..?” त्याने पुन्हा जागेवरूनच विचारलं.

डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना तिने हलकेच रुमालाने टिपले आणि ती उठली तो उभा होता त्याच्या विरुद्ध बाजूने बाहेर जाणार तोच समोर आरुष उभा ठाकला. वेदच्या चेहरयावर नाराजी पसरली. तिच्याशी बोलूनच जायचं म्हणून तो रेवाच्या डेस्कजवळ घुटमळला.
“heyy dear कशी आजारी पडलीस हा?..बरं वाटतंय ना आता,कॉल करणार होतो तू दिसली नाहीस म्हणून पण नंतर कळलं तू आजारी आहेस मग म्हटलं let not to disturb you, so आज तडक भेटायला आलो”

डोळ्यांच्या कोनातून वेद्कडे पहात मुद्दाम नाटकी लाडीकपणे ती आरुषला म्हणाली.
“ohh thanks sir..”

तसा तो थोडं पुढे सरसावून तिच्या कपाळाला हात लावून ताप बघायचा प्रयत्न करणार तोच वेद तिथे आला,तो तिला असं टच करणार हे बघून त्याला खूप राग आला होता .त्याच टोनमध्ये तो म्हणाला –
‘तुला ऐकू आलं नाही वाटतं मी मघापासून काय म्हणतोय ते..मला ट्रेनिंगच्या रिपोर्टची हार्डकॉपी हवीयं.’

त्याला आलेलं पाहून थोडं फॉर्मल बोलत आरुष निघून गेला. तो गेल्यावर तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकून वेदही निघून गेला.वॉशरूममध्ये जाऊन मग तिने मनसोक्त रडून घेतलं, वेदवर पुन्हा कधीही विश्वास ठेवायचा नाही असं काहीस ठरवून ती नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागली..काजळ,लायनरला टच अप करून ती बाहेर आली आणि लंचला निघाली.

**************

ऑफिस सुटल्यावर,आजचा दिवस किती खराब गेला ह्या विचारातच ती खाली आली.हातात वेद्च्या जॅकेटची बॅग होती.ती तिच्या गाडीजवळ आली,तिची गाडी निघणार नाही अशी पद्धतीने वेदने त्याची यामाहा आडवी लावली होती. दुसऱ्या बाजूने कंपाउंडची भिंत होती.तिने आजूबाजूला तो कुठे दिसतोय का ते बघितलं. बाजूच्या रेग्युलर पार्किंग लॉटमध्ये रेवा आणि जय बोलत होते,नंतर निघूनही गेले पण वेद नव्हता, वॉचमन ही जागेवर नव्हता.तिने जरा इकडे तिकडे नजर फिरवली,त्याला ती कॉल तर करणारच नव्हती.तिने बघितलं पर्किंग बाहेरच्या टपरीवर मस्त तिची मजा बघत,तो चहा घेत होता..तिने संतापाने दुरूनच हाताने इकडे ये असा इशारा केला.त्याने हसून खांदे उडवत हातातला कप दाखवला आणि इशाऱ्यानेच पाच मि. दाखवलं.

“खडूस,मी सकाळी इग्नोर केलं म्हणून,जाणूनबुजून करतोय” ती पुटपुटली.

त्याने आरामात बेंचवर बसून अजून एक कप चहा घेतला. ती आता वैतागली.तिने त्याला पुन्हा रागात घड्याळ दाखवली.पुन्हा पाच मि.असं दाखवत तो हसला.तिने रागात एक लाथ त्याच्या गाडीच्या टायरला मारली.त्याला हसू आलं. त्याने पैसे दिले आणि तो गाडीकडे यायला निघाला.
दिवसभरातून आता कुठे तिने त्याच्याकडे पूर्ण बघितलं होतं. बरगंडी इन शर्ट,फॉर्मल नेव्ही ब्लूजीन्स,कॅजुअल जॅकेट, शुगरी डिंपलचा कॉपीराईट. नाही विरघळायचं!!! ...स्वतःला बजावत तिने निग्रहाने त्याच्याकडे बघायचं टाळलं, दुसरीकडे लक्ष वळवलं.
तिच्याजवळ आल्यावर तो म्हणाला.-
“yyyesss madamबोलावत होतात तुम्ही?”

“त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली-“वेद नाटकं नकोय गाडी काढ..”

त्याने शांतपणे गाडी काढली आणि तिच्या गाडीशेजारी लावून,त्याच्या गाडीला टेकून उभा राहिला.
तिने जॅकेटची बॅग त्याला दिली. “thanks" ती कोरडेपणाने म्हणाली आणि ती गाडी चालू करायला म्हणून चावी लावायला गेली तसं तिचा हात चावीसकट पकडून थोडं त्याच्याकडे खेचलं, तिचा चेहरा त्याच्यासमोर आला. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला-“काय झालं ऋतूजा ..का चिडलीये? कारण तर कळू दे?’
हाताला हिसका देत हात सोडवत,डोळ्यात जमलेलं पाणी पुसत ती म्हणाली-“ कारण जाणून घेऊन काय करशील आता मी बरी आहे.. एकदम फाईन..तुझ्या रेवूने मला मुद्दाम सेक्शनला अडकवलं आणि नंतर तिच्यावर काही प्रकरण शेकायला नको..तुम्हाला गिल्ट नको म्हणून तुला माझी मदत करावी लागली.सो सॉरी फॉर that.तुला सगळं माहित होतं वेद ...का वागलास तू असा?”

“i can explain this ऋतुजा..फक्त माझं पूर्ण ऐकून घे ..” तो विनवणी करत म्हणाला.

“नाही ऐकायचं मला आणि बोलायचं ही नाहीये..” तिने डोळे पुसले.

“हे बघ ऐक..मला माहित नाही तुला हे कुणी सांगितलं पण मी सांगतो ते ऐक,मी जे केलं ते कुठलही गिल्ट वाटू नये म्हणून नाही, तर..खरंच तुझी काळजी न बस काळजीच हेच कारण होतं.वर तुझ्याकडे येण्यापासून तर तुला दवाखान्यात ड्रॉप केलं तोपर्यंत चित्त जागेवर नव्हतं...”

त्याच्यावर अजूनच चिडत ती म्हणली-
‘काय कारण होतं रे तुला माझी काळजी करण्याचं?मैत्री होती आपल्यात यापूर्वी? साधी ओळख नव्हती आपली,हाय हेल्लो गुडबायवाले पण कलीग नव्हतो आपण,मग कुठून आली ही काळजी? काय संबंध आहे आपला एकमेकांशी?'

भुवया उंचावून कपाळावर आठ्या पाडत चिडक्या स्वरात तिच्या दोन्ही खांद्याना घट्ट पकडत तो म्हणाला-
“Yes...राईट question ..मला काळजी वाटायचं कारण काय...चल वाटते मला विनाकारण तुझी काळजी काही प्रॉब्लेम आहे? नाहीये आपल्यात मैत्री..आणि मला करायची सुद्धा नाहीये..मैत्रीपलीकडेही असतात की गोष्टी काही प्रॉब्लेम आहे? तू बोलत नाहीस ग पण डोळे बोलतात ना दिवसाचं पाहिलं स्वीटेस्ट हाय आणि जातांना Hardest गुडबाय.सगळा दोष मला देऊ नको हे दोन डोळे,कॅफिन भरलेले कॅपचिनो..तुझ्यापेक्षा जास्त बडबड करतात माझ्याशी ,हा संबंध आहे...अजून काही ऐकायचं आहे का?"

ती स्तब्ध झाली..तो काय बोलत होता ते सगळं फक्त कानावर पडत होतं.त्यावर विचार करून काही बोलायची तिला शुध्द राहली नव्हती. ती त्याला काहीच न बोलता गाडीकडे वळली तसं तिचा एक हात पकडून त्याने पुन्हा तिला मागे खेचलं. तिच्या डोळ्यात आरपार बघत तो म्हटला-
“माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं”

“नजर हटव वेद! माझे डोळे वाचू नको ?” तिचा श्वास जलद झाला होता.

“का ?” त्यानेही दीर्घ श्वास घेत हळुवारपणे विचारलं.

“कारण ते खरं बोलतात वेद...!!”

झटक्यात हात सोडवत,गाडी बाहेर काढून, चालू करत ती निघून गेली.

ती निघून गेलेल्या रस्त्याकडे पहात तो पुटपुटला

“तुझे डोळे खरं बोलतात , पण ज्या भाषेत बोलतात ना ती शिकायचीय मला”

क्रमशः

©हर्षदा