Tu Hi re majha Mitwa - 6 books and stories free download online pdf in Marathi

तू_ही_रे_माझा_मितवा... - 6



आजूबाजूला असणारं भान हरपायला भाग पडणारं वातावरण, समोर,अगदी समोर असणारा वेद,त्याच्या मागे असणारा खळाळत्या पाण्याचा पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती; आता मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती. नकळत का होईना आपण वेदला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना? ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं.

ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करणार तसं वेदने दोन्ही हात
तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले, नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती.तिला खरंतर वेदने असं काही करणं अगदीच अनपेक्षित होतं.तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली.
“हे बघ तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडिया बद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही,पण जर प्रॉब्लेम माझ्या गालावरच्या डिंपलचा असेल तर मात्र अवघड आहे.”

तिच्या कानाशी तो हळुवारपणे म्हणाला आणि गोड हसला.
तिच्या हृदयाची धडधड अगदी कानांशी आली होती.आपण हे असं काहीतरी बोलून आता फसलो आहोत हे लक्षात आल्यानं ती सैरभैर झाली.काहीही झालं तरी आपण ह्याच्या प्रेमात आहोत ते त्याला सांगायचं नाहीये,कळू द्यायचं नाहीये हे तिने मनाला पुन्हा पुन्हा बजावलं. दोन्ही बाजूला हात टेकवून वेद ने तिला पुरतं अडकवलं होतं.ती अवघडून उभी होती.थोडं अवसान गोळा करत,चाचरत ती म्हणाली-

“शुटींगचा प्रॉब्लेम चालू आहे तर obvious आहे मी डिंपल कपाडिया बद्दलच बोलत होते,मी तुझ्या डिंपलबद्दल का बोलू? ते तू तुझ्या गर्लफ्रेंडकडून ऐकत असशीलच ना?.”

त्याला हसू अनावर झालं.तिला जरा चिडवायला तो म्हणाला-

“ह्या खळ्यांवर तर तिने केंव्हाच जीव ओवाळून टाकलाय! विषय तो नाही ये...!”

त्याच्या चेहऱ्यावरचं मिश्कील हसू पाहून तिला खरतरं राग आला.

‘म्हणजे हा मान्य करतोय की याची जीएफ आहे आणि ती नक्की रेवाच असली पाहिजे.’
लागलीच मनात निष्कर्ष काढत तिने रागाने त्याच्याकडे पाहून त्याच्या एक हात जोर लावून बाजूला करायचा प्रयत्न केला पण तो तिला जराही बाजूला करता आला नाही,थोडं खाली वाकून ती बाहेर पडली आणि विरुद्ध दिशेने तरातरा पुढे निघाली. तिच्या ह्या रागाचा अंदाज बांधत तो देखील मागे निघाला.
एका उंच पसरट दगडाजवळ आल्यावर तो काहीतरी लक्षात आल्यासारखं थांबला आणि त्याने ऋतूला आवाज दिला.

“ऋतूजा एक मिनिट,मागे बघ.”

तिने वळून बघितलं.एका उंच पसरट दगडावर वरून पाण्याच्या दोन धारांनी विलग होत अगदी तसाच झिरमिळीत पडदा केला होता जसा अपेक्षित होता,त्यासाठी मात्र कॅमेराची पोजिशन बदलावी लागणार होती.उंचावरून समांतर शुटींग घेतलं तर जबरदस्त परिणाम साधला जाणार होता. तिला आनंद झाला. ती धावतच मागे आली.

"wwwaaahhhhhww!!! वेद, वर जाऊया का?”
तिचा आनंद डोळ्यात समावत नव्हता.

“ओके,पण हळू, जरा जपून.”

आनंदाच्या भरात ती करत असलेली गडबड बघून तो काळजीने म्हणाला.
तरीही थोडी धडपड,गडबड करत ते वर पोहचले.
शांत, जरा कुंद अश्या वातारणात पाण्याचा खळाळता आवाज आणि मधूनच होणारी पानांची सळसळ,पक्ष्यांची एखादी शिळ असं सगळं मिसळून वेगळीच धुंदी त्या क्षणांमध्ये भरली जात होती. ह्या शांततेवर कर्कश ओरखडा म्हणून वेदचा फोन वाजला.टीम रिसोर्टवर पोहचली होती आणि हे मागे राहिल्याने टीम लीडरने काळजीने फोन केला होता,त्याला जरा जुजबी कारण सांगून ‘पोहोचतोच’ म्हणून त्याने फोन ठेवला.
त्याने वळून पाहिलं,थोडंस दूर ऋतू उभी होती,पाण्याचा पडदा निरखत,स्वतःशीच बोलत काहीतरी ठरवत होती.जरावेळ तो बघतच रहिला,तिचं लक्ष जाताच मात्र त्याने घाईने नजर फिरवली.

“वेद,हे बघ इथे ते मॉडेल उभे राहिले ना,की पर्फेक्ट शॉट मिळेल.”

काहीतरी अचानक सापडल्याच्या आनंदात ती म्हणाली.
तो सुद्धा तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला.

“yes, perfect.हेच लोकेशन सांगू या आपण आता पुन्हा आल्यावर.”

त्याने ही सहमती दर्शवली.

“आणि हे बघितलंस का? खालच्या ह्या उंच सखल दगडामुळे त्यांची उंची सुद्धा मॅच होईल,हो ना.?”
मघाचा उत्साह बोलण्यात कायम होता.

“Yes ,actually..”

“Ohh I am so happy! वेद इथं उभा राहतोस? Preview बघूया जरा”

तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘ओके’ वेद तिच्या समोर,हाताच्या अंतरावर होता.

“थोडं पुढे !” स्वतःला सावरत,पाण्यापासून किती दूर आहोत याचा अंदाज घेत ती म्हणाली.तिने समोर बघितलं तसं तो अजूनही थोडा दूर होता.

“ओके?”

“अरे बाबा,little more closer!”

उभं राहायला परफेक्ट जागा कुठली असेल याचा अंदाज घेत ती म्हणाली.तसं अगदी तिच्यासमोर येऊन तो उभा राहिला,तिने त्याच्याकडे चेहरा वळवताच,त्याच्या अगदी डोळ्यांना भिडलेले डोळे बघून ती गांगरली.तो मात्र बघतच राहिला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी थोडंस का असेना पण प्रेम दिसतंय का हे शोधत! दोघांमध्ये आता होती ती फक्त क्षणांची शांतता,थिजलेले शब्द आणि बोलके श्वास! वाऱ्याने मधूनच उडत येऊन तिच्या गालांवर रुळणारी बट त्याने हळुवारपणे कानामागे केली. तिचे डोळे आपसूकच मिटले.त्या मिटलेल्या पापण्या न निरागस चेहरा बघून तो एकदम भानावर आला. तिच्या ओठांवरच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा झालेला मोह टाळत त्याने तिच्या गालवर एक टीचकी मारली. तिने खाड्कन डोळे उघडले. ती कावरीबावरी झाली.काही झालंच नाही असं दाखवत,एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला
-
“Perfect! This will work.चला आपला बीट व्यवस्थित पूर्ण होणार असं दिसतंय,हो ना?”

“अं...हो ..yes you are right,हे वर्कआउट होईल”

तिनेही जमेल तेवढी सावध प्रतिक्रिया दिली.
दोघेही एकमेकांकडे पाहून मघाच्या क्षणांवर पांघरून घालायला बळजबरी हसले.
त्यादिवशी संध्याकाळी होत आल्याने लोकेशनवर फक्त चर्चा आणि ट्रायल झाली.चर्चेतही महत्वाचे इनपुट्स दिल्याने टीम लीडर आणि सिनिअर्सने दोघांचं भरभरून कौतुक केलं.रेसोर्टवर रात्री सोबत डिनर केल्यावर सगळे आपापल्या रूमकडे निघाले.

*******

खिडकीचा पडदा सारखा करायला म्हणून वेद खिडकीजवळ आला. त्याचं सहज बाहेर लक्ष गेलं,थोडंस दूर,कानात हेडफोन घालून रिसॉर्टच्या ‘Artificial lake’ समोरच्या बेंचवर ऋतुजा बसलेली होती.
“बाहेर एवढी थंडी आणि गार वारा असतांना ही बिनधास्त टी आणि नाईट पॅन्ट घालून बसलीये मूर्ख”
स्वतःशी बोलत त्याने त्याचं बेडवरचं जॅकेट उचललं आणि तो बाहेर निघाला.
ऋतू गाणे ऐकण्यात गुंग होती.तिच्या बाजूने येऊन तिचं लक्ष वेधण्यासाठी त्याने गोड हसत तिच्यासमोर एक चुटकी वाजवली.तिने कानातले हेडफोन काढले.तिच्यापासून जरा अंतर ठेऊन बसत त्याने तिच्याकडे जॅकेट सरकवलं.

“किती थंडी आहे ऋतुजा इथे, तशीच बसली होतीस!”

त्याच्या आवाजातली काळजी तिला सुखावून गेली.

‘थंक्स,मी रूममध्येच माझं जॅकेट विसरले आणि आता पुन्हा रुममध्ये जायचा कंटाळा येतोय,म्हणून बसले होते तसेच आणि तुला नाही का वाजत थंडी?’

“थर्मल्स जिंदाबाद” तो हसत म्हणाला.

तिला हे वातावरण स्वप्नवत वाटत होतं.इतका सुंदर एकांत आणि सोबत,ज्याच्या बोलण्यावर,हसण्यावर किंबहुना ज्याच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करावं असा वेद!
वर आकाशात पूर्ण चंद्र होता,मागे टेकून ती एकटक चंद्राकडे बघत होती.वेदने एक नजर तिच्याकडे बघितलं.

‘एरवी सतत वारा प्यायलेल्या ह्या केसांत एक एक चांदणं माळलं तर? तर! तर! काळजाचा तिट करून हिच्या गालावर लावावा लागेल नाहीतर माझीच नजर लागायची.’
तिच्या शांत निरागस रुपाला तो डोळ्यात भरू पाहत होता.

थोडा अंदाज आल्याने तिने वळून वेद्कडे पाहिलं,ती फक्त हसली.

“काय बघतेय एवढं आकाशाकडे?” जरा आश्चर्यानेच त्याने विचारलं.

“The moon....You know वेद, मी कितीतरी तास असंच चंद्र,चांदण्या बघत बसू शकते!”

चंद्रात अगदी खोलवर हरवल्या सारखी ती म्हणाली.

“आणि मी तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो” तो पुटपुटला.

“काही बोललास का?”

“ Selenophile !!”

“काय्य?” त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ तिला लागत नव्हता.

“I said selenophile…म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती!” तो प्रसन्न हसला.

“का तुला नाही चंद्र आवडत? Writer तर सहसा फिदा असतात चंद्रावर”

“नाही असं नाही, पण पण मला समुद्र प्रचंड आवडतो,एखाद्या शांत किनाऱ्यावर बसून समुद्राची गाज ऐकायला फार आवडतं आणि त्यापेक्षाही जास्त आवडतो तो सागराच्या कुशीत विरघळणारा सूर्य..तो सूर्यास्त! जगात कुठेही सापडलो नाही तरी कुठल्यातरी किनाऱ्यावर निळाई डोळ्यात साठवत नक्की बसलेला दिसेन मी.”

“इतकं प्रेम करतोस समुद्रावर?”

“नाही! सध्या कमीच करतोय,कुणावर तरी त्याच्यापेक्षा जास्त करतोय”
तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळुवारपणे तो म्हणाला.

“कुणावर?” नकळत तिचे डोळे भरून आले होते.

“आहे कुणीतरी जिच्या डोळ्यांचा, कितीही खोल उतरलं तरी मनाचा थांग लागत नाही,जिच्या केस भरतीला आलेल्या लाटांसारखे उगाच हेलकावे खातात, जिच्या ओठांवर,गालांवर सुर्यास्ताची लाली उमटली की मला काही सुचेनासं होतं, जिच्या हसण्यात ती मजा नाही, जी तिच्या रुसण्यात आहे.
जिचं हसणं त्या समुद्रासारखं खारट आणि रुसणं गोड आहे,जिला समोरच्याचे डोळे वाचताच येत नाही,अश्या एका मुर्खावर प्रेम आहे माझं”
एक मिनिट सुद्धा तिच्यावरून नजर न हटवता तो बोलत होता.
ती स्तब्ध झाली,ह्यावर काय बोलावं,कसा प्रतिसाद द्यावा? तिचे शब्द हरवले होते.

“वेद!!” तिच्या ह्या हाकेने तो जरा भानावर आला.

उगाच सारवासारव करत तो म्हणाला-

“how is my dialog? एका प्रोजेक्टच्या संदर्भात लिहला होता,खूप दिवसांपूर्वी.”

“खूप छान लिहतोस तू वेद,शब्दांशी,एखाद्या व्यक्तीच्या इमोशनशी खूप छान खेळता येतं रे तुला!भारी आहे डायलॉग,फक्त यानंतर मला कधीही ऐकवू नको.”

त्याच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकत ती जागेवरून उठली, अंगावरचं जॅकेट काढून त्याच्यापुढे फेकून ती तरातरा रूमकडे निघून गेली.

“वेद्च्या प्रत्येक शब्दांत तू आहेस,श्वासात तू आहे.कुणावर काय विचारतेस वेडाबाई तुझ्यावर अन फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, आणि तुझंही आहे मला समजतंय पण आजू थोडा वेळ!आपलं लव्ह कोन्फेशन हटकेच असायला हवं.”

तिने फेकलेल्या जॅकेटवर त्याने हलकेच ओठ टेकवले.

************

“काय गं! काल ही जेवली नाहीस,आजही अशीच बसून आहेस,काय झालंय?”
जयराज स्वतःची प्लेट टेबलावर ठेवत म्हणाला.समोर रेवा शांत बसली होती.

“इच्छा नाहीये रे!”

“वेद नाहीये म्हणून का? की तो तिकडे ऋतुजासोबत आहे म्हणून?”

“तसंच काहीसं! काय गरज होती त्याला जायची,अगोदर तर नाही म्हटला आणि नंतर आपल्याला न सांगता गेला देखील, आणि काय रे तुझा तो फुल प्रुफ प्लान वैगरे काय,तोंडावर आपटलो आपण ”
वैतागत ती म्हणाली.

“हो ना यार,साक्षात कपाळमोक्ष झाला,किती बोलला तो मला.”

“जय, खरं सांग त्याला ती ओव्हरस्मार्ट आवडते ना?”

“रेवा,तो सांगत नसला तरी कळतंय की ते आणि तिलासुद्धा तो आवडतो,Confirm.”

“जय,मला ते नकोय,तू काहीही कर,वेद तिच्यापासून दूर व्हायला हवा.” डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत ती म्हणाली.

“रेवा,जाऊ दे ना...आपण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात हात द्यावा गं,आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या नाही!”

“मग,हेच तत्त्वज्ञान तू वेदला सांग ना?”

“रेवा ते दोघं प्रेमात आहेत,आणि ऋतुजा आपल्याला आवडत नाही तो आपला प्रोब्लेम आहे.”

“हो तो आपला प्रॉब्लेम आहे ना,मग आपणंच सोडवायचा,by hook or crook ऋतुजापासून तो दूर व्हायलाच हवा.मी ते केल्याशिवाय राहणार नाही.”

डोळे पुसत,ती ताडताड निघून गेली.

*************

दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरापर्यंत रिसोर्टच्या शुटींगच काम संपल. काम खूप छान झाल्याने सगळे खुश होते.तासाभराने परतीचा प्रवास सुरु होणार होता,त्या आधी टी-ब्रेकला सगळे जमले होते.
वेद जाणूनबुजून आपल्याला त्रास देत आहे हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं.आज सकाळपासून ती त्याला टाळत होती.
वेद सिनियर्ससोबत बोलत उभा होता. ती कप घेऊन जरा दूर एकटी जाऊन बसली,पण लक्ष वेदकडेच होतं.
त्याची डोळ्यात भरणारी उंची,जबरदस्त फिजीक आणि त्याला कॉम्प्लीमेंट करणारा स्लिमफीट ब्लॅक शर्ट.तिला मनात कुठेतरी वाटलं की त्याने तिच्याजवळ येऊन बसावं,पण तो गप्पांमध्ये रंगला होता.

“कितीवेळा फिरून फिरून प्रेमात पडायचं ह्या खडूसच्या, अजून थोडावेळ असंच बघत बसले तर राग टिकणार नाही.”
स्वतःशीच बोलत ती उठली आणि त्याच्याकडे पाठ करून बसली, अर्थात त्याच्या नजरेतून ते सुटलं नाही.तो त्याचा कप घेऊन तिच्या टेबलजवळ गेला.

“ बसू का?” खुर्चीवर ऐसपैस बसत तो म्हणाला.

“हे साधारणपणे बसायच्या अगोदर विचारतात आमच्यात.” नाकावरचा राग कायम होता.

“हे बरयं,एकतर स्वतः इन्व्हाईट करायचं आणि नंतर भाव द्यायचा नाही.”

“मी कधी म्हटले तुला इकडे ये?”

“मागे म्हटलं होतं ना तुला,तुझे डोळे जास्त बोलतात तुझ्यापेक्षा.मघापासून बोलवतच होतीस की!” एक मिश्किल हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं.
उत्तरादाखल एक रागीट कटाक्ष तिच्याकडून आला.

“दहा मिनिटापूर्वीचे आणि आताचे असे मिळून एक लाखभर रुपये झाले तुझे.”

तिला चिडवायचा एक क्षण ही न गमावता तो म्हटला.

“काय्य?कसले?” तिने गोंधळून विचारलं.

“माझ्याकडे एकटक बघायचा Tax with GST,काळजी करू नको बिल देत असतो मी .” खळखळून हसत तो म्हणाला.

हातातला कप टेबलावर जवळपास आपटत ती उठली आणि समोरच्या गार्डनमधल्या कट्ट्यावर जाऊन बसली.

“अरे,चिडते का? थांब....! ओके बाबा I am sorry” तो तिला थांबवायचा प्रयत्न करत म्हणाला.

ती कट्ट्यावर बसली होती.ब्लश पिंक शॉर्ट कुर्ता,ऑलिव्ह ग्रीन लॉंग स्कर्ट आणि खांद्यावर रुळणारे सॉफ्ट कर्ल,माफक मेकअप.गोड दिसत होती ती.
तो शेजारी जाऊन बसला.

“अरे यार गंमत केली,का छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसतेस?”
तिची समजूत काढत तो म्हणाला.

तिने रागाने वळून त्याच्याकडे पाहिलं.डोळे डबडबले होते.

“छोट्या छोट्या गोष्टी वेद? तू मला किती त्रास देतोय कळतंय का तुला? नेहमी मजाक,मस्ती,कधीतरी अचानक तुझ्यातला लेखक जागा होतो आणि मग मी गोंधळात पडेल असं काही तरी तू बोलतोस वरून गम्मत केली असं सरळ म्हणतोस.असं नसतं ना वेद! जॉबच्या पहिल्या दिवसपासून तू छळतोय,रोज असं काहीतरी करतोस की दिवस तुझ्या विचारातच संपायला हवा.इतकं काही बोलून जातो की मी विचार करत बसते,अर्थ लावत बसते तुझ्या प्रत्येक वाक्याचा. मी कंटाळलेय रे आता हा सगळा विचार करून,वेद हे सगळं काय चालू आहे,बास्स! मी कालच ठरवलं आहे,मुंबई ब्रांचला ट्रान्स्फर मागायची आणि शांततेत रहायचं.मला इतक्या टेन्शनची सवय नाहीये वेद,I can’t handle it anymore.मी दूर गेलेलंच बरयं.”

आणि तिच्या आसवांचा बांध फुटला. तिच्या गालावर ओघळणारे आसू बघून तो हवालदिल झाला. तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन त्याने आसवांमुळे ओले झालेले गालावरचे केस हलकेच बाजूला केले.तिचा चेहरा अगदी समोर पकडत,तिच्या डोळ्यांमध्ये बघत तो म्हणाला.

“ऋतू!! प्लीज रडू नको,see I am really very sorry! मला कळतंय तू माझ्यामुळे हर्ट होतेय अगदी प्रत्येकवेळी आणि हा गुंता वाढत चाललाय.खूप बोलायचंय,खूप काही सांगायचंय, ऐकायचंय, थोडा वेळ दे मला,सगळं सॉर्ट होईल.तूच एकटी नाही सहन करत आहेस हे टेन्शन,मी सुद्धा तीळतीळ मरतोय ह्यात आणि हे असं माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट तेवढी करू नकोस,शक्य नाहीये ते, जिथं जाशील तिथून उचलून घेऊन येईल तुला.सगळा दोष मला देऊन मोकळी झालीस,तुझं काहीच चुकलं नाही? किती वेळा इग्नोर करत असतेस मला. तू मला दिलेल्या त्रासाचा,मी तुला दुखावल्याचा,सगळ्या गोष्टींचा हिशोब मांडूया पण आता नाही, योग्य वेळी.तोपर्यंत तुझ्या ह्या डोळ्यांना जरा कंट्रोलमध्ये ठेव,नको ना काजळ भरत जाऊ त्यांच्यात जीव घेतात ते आणि हे केस असे गच्च वर बांधून घेत जा.ते असे मोकळे असले ना की मी बांधला जातो त्यांच्यात आणि मग काहीही लिहतांना तूच लिहिली जातेस, खरंतर त्रास तुझा मला जास्त होतोय,समजतंय का तुला.?

ती फक्त ऐकत होती.हा प्रेमाचा अधमुरा,रॉ अमचुअर क्षण तिला हृदयात कायमचा साठवायचा होता.
ती तशीच बसून होती.आत उठणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या वादळाला थोपवून धरत.

तो पुन्हा मागे फिरला.तिच्या पापण्या हाताने अलगद बंद करत त्याने डोळ्यांवर ओठ टेकवले.

“मघाशी तू रुसून इकडे आलीस माझी कॉफी अर्धवट राहिली होती आणि ह्या डोळ्यात काही कमी काफिन नाहीये ,म्हणून दोन सिप घेतले.”

तो पुढे गेला एक गोड स्माईल देऊन त्याने हात केसांमधून फिरवला त्याच्या घोटीव दंडावरचा त्याच्या Attitude ला समर्पक असा टॅटू अगदी उठून दिसत होता-

“Livin la vida loca”

क्रमशः

*©हर्षदा*

कळावे,

लोभ असावा (कमेंटमधून दिसावा)