कोरोना समजून घेतांना… in Marathi Social Stories by s m rachawad books and stories Free | कोरोना समजून घेतांना…

कोरोना समजून घेतांना…

कोरोना समजून घेतांना…

       कधी कोणी  कल्पना सुद्धा केली नसतील की न भूतो न भविष्यती या २१ शतकात सगळ्या जगाला हादरून सोडणारा कोविड-१९ या महामारीचा उदय होईल म्हणून. या महामारीचा सामना करण्याकरता जगभरातील राजकर्ते, नोकरशहा, शास्त्रज्ञ व संपूर्ण मानवजात अक्षरस हतबल झालेले आहेत. या विषाणूचा धोका पहिल्यांदा चीनचे डॉ. ली वेनलियांग यांनी वर्तवला, त्यांनतर अवग्या 100 दिवसांत या महामारी विषाणूने जगभरात वनव्यासारखा पसरला. ना धर्म, ना जात, ना देश तसेच गरीब व श्रीमंत हे काहीच भेदभाव न करता बघताबघता अतिशय निर्दयपणे या महामारीने संपूर्ण वुहान शहर, चीन व साऱ्या जगाला वेढलं.
 कोरोना विषाणूची उत्पत्ती व स्वरूप:
       या विषाणूचे सर्वप्रथम रुग्ण हे चीनमधील वुहान शहरात डिसेंम्बर 2019 मध्ये सापडला, तेंव्हा हा विषाणू सार्स कोव्हि-2 म्हणून ओळखले जाऊ लागले. फेब्रुवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूचे नाव कोव्हिड-19 असे नामकरण केलं. को- करोना, व्ही- व्हायरस, डी-डिसीज. 2019 मध्ये सापडलेला हा विषाणू असल्याकारणाने कोव्हिड-19 असे नाव देण्यात आलं. हा विषाणू मुळात निर्जीव असून याचे रेणू ह्या गोलाकार प्रथिनांच्या साखळ्यानी बनलेले असतात. त्यावर स्निग्ध पदार्थांचे आवरण असते. या विषाणू भोवती काटेरी कवच असल्याकारणाने ते वस्तूवर किंवा अंगावर पडले असता सहज चिटकवून बसतात. जेंव्हा बाधित व्यक्ती खोकलतो त्यावेळेस तुषार विषाणूसह आजूबाजूला वस्तूवर पडतात. त्या वस्तुंना आपला हात स्पर्श झाल्यास ते आपल्या हाताला चिटकतात त्यांनतर ते हात नाकाला किंवा चेहऱ्याला स्पर्श झाल्यास हे विषाणू श्वसनाद्वारे किंवा तोंडावाटे घशात जाऊन फुफ्फुसात पोहोचतो. किंवा बाधित व्यक्ती थेट निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांच्या खोकलल्यामुळे तुषार विषाणूसह निरोगी व्यक्तीच्या श्वसनाद्वारे किंवा तोंडावाटे घशात जाऊन फुप्फुसात पोहोचतो,.
       हे विषाणू शरीरात गेल्यावर हल्ला कसा करतो याच एक प्रचलित विचार आहे, हा विषाणू शरीरात गेल्यावर रक्तातल्या हिमोग्लोबिन मधला लोहाचा अनु वेगळा करून टाकतो. त्यामुळे श्वसन घेऊन सुध्दा पुरेश्या प्रमाणात प्राणवायू हा स्नायू, पेशी, शरीराच्या इतर भागात पोहोचू शकत नाही. परिणामी रक्तवाहिन्याना व फुफ्फुसाना ईजा होऊन रोग्याचा मृत्यू होऊ शकतो.
लक्षणे:
       अमेरिकेतील यूएस अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोनाचे लक्षणे खालीप्रमाणे जाहीर केले आहे.
मुख्य लक्षणे: ताप, कफ, श्वास घेण्यात अडचणी. 
नवीन लक्षणे: थंडी वाजणे, थंडी वाजून अंग शहरणे, स्नायूदुखी, घसा धरणे, चव आणि वास संवेदना तात्पुरती जाणे. छातीत दाबल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, चेहरा व ओठ निळसर होणे, उठून बसता न येणे अशीही काही लक्षणे आहेत.
      कोरोनाच्या संसर्गात सौम्य व तीव्र प्रकारच्या वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. विषाणूचा संपर्क आल्यापासून 14 दिवसात ह्या लक्षणे दिसतात. म्हणून करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंद करण्यासाठी विदेशातून आलेले /दुसऱ्या राज्यातुन  आलेले /  दुसऱ्या विभागातून आलेले/दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले/ रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक जे कि संशयित रुग्ण किंवा विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात हे शक्यता गृहीत धरून त्याना 14 दिवस वेगळे राहण्यास सांगितले/ठेवली जाते त्यास अलगीकरण (क्वारंटाइन) असे म्हणतात. या 14 दिवसानंतर त्यांना कोणतेही लक्षण न दिसल्यास वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नसते, असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 14 दिवसानंतर व्यक्ती कोणतेही काळजी करण्याची गरज नाही व आपल्या दैनंदिन व्यवहारास सुरूवात करू शकतात.
कोरोनाचा वैश्विक प्रसार:
       कोरोना या महामारीचा वैश्विक स्थरावरील वेगाने प्रसार पाहता आपल्या देशाच्या पंतप्रधानानी याचा प्रसार व जिवितहानी रोखण्यासाठी अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले. परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी 22 मार्च ला देशात जनता कर्फ्यू लागू केली. आणि 25 मार्च पासून संपूर्ण देशभरात टाळेबंदी लादली. आतापर्यंत या टाळेबंदीची एकूण चार टप्पे पूर्ण झाली असून आता पाचवा टप्पा चालू आहे. यास लोकांचा सक्रीय प्रतिसाद मिळाला. याचा परिणाम असा झाला की इतर विकसित व प्रगत देश्याच्या तुलनेत भारत कोरोना या महामारीला रोखण्यात आतापर्यंत तर यशस्वी राहिले. त्यामुळे भारतात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हे इतर देशाच्या तुलनेत फारच कमी आहे. मृत्यू पावणाऱ्यांची संख्या व मृत्यूदर कमी राहण्यामागील कारण ह्या एकूण बाधितांची संख्या कमी, हवामान, जीवनमान व येथील लोकांची सरासरी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे, होय. जगात एकून बाधितांच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारत चौथ्या स्थानावर आहे. एकंदरीत भारताचा मृत्यूदर हे 3.2% आहे. या तुलनेत जागतिक मृत्यू दर 7.5% इतका आहे. भारताची हि परिस्थिती जगातील बहुसंख्य प्रगत आणि श्रीमंत देशाच्या तुलनेत सध्यपरिस्तिथीत तरी चांगली आहे. या ठिकाणी भारताने  घेतलेल्या योग्यवेळी व योग्य निर्णय/ धोरण याचं यशच म्हणावं लागेल. वेळीचं जनता कर्फ्यू लादून टाळेबंधी केली नसते तर आज भारताची परिस्तिथी खूप वाईट झाली असती. कारण इतर विकसित देशाच्या तुलनेने आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि आरोग्य संबधीत पायाभूत सोयी सुविधा तेवढया सक्षम नाहीत. यास कारणीभूत आपल्या देशात आरोग्यवर होणारा खर्च हे सकल राष्ट्रीय उत्पनाच्या केवळ 1% च आहे. म्हणूनच आपल्या देशात आरोग्य सोयी, सुविधा पुरेशी व सक्षम असल्याचे दिसून येत नाहीत. स्वातंत्र्य मिळवून येवढे वर्ष होऊन गेले तरी अजून आपण आपली आरोग्य व्यवस्था मजबूत करू शकलो नाही ही खेदाची बाब आहे. याउलट इतर विकसित देशांच्या लोकसंख्या कमी असून देखील आरोग्यावर होणारा खर्च हे जास्त आहे, म्हणून विकसित देशात आरोग्य सुविधा या सक्षम असून देखील या वाढत्या रुग्ण संख्येला आरोग्य सुविधा पुरवण्यात समस्येचा सामना करत असताना दिसून येत आहेत. आपल्या देशातील परिस्थिती पाहता, सरकारने वेळीच कठोर पावले उचलली नसती व जनतेने या युद्धात प्रतिसाद दिला नसता तर निश्चितच आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झालं असता व त्यास रोखणे नियंत्रण बाहेर गेला असता. म्हणून अगदी वेळेवर घेतलेली खबरदारी हे कोणत्याही जागतिक व देशांतर्गत अशा नैसर्गिक आपत्ती समस्यावरील उपाय असू शकते व अशी परिस्थिती उदभवले तर आरोग्य व्यवस्था किती सक्षम असावं लागतं त्याकरिता आरोग्यक्षेत्रात प्रभावी सुधारणा करणे किती गरजेचे आहे, हे कोव्हिड ने दाखवून दिले आहे. हा सर्वांसाठी कसोटीचा काळ असल्याने अशाक्षणी परिस्थितीला सामोरे जाताना संयम, सहनशीलता व प्रतिकार ह्या गोष्टींची किती आवशक्यता आहे याची सर्वाना जाणीव झाली. 
भारताने टाळेबंदी केलेल्या प्रत्येक टप्प्यातील कोरोनाचे  स्वरूप: 
       या समस्येचा सामना प्रभाविपणे करण्यासाठी टाळेबंदी हेच उपाय व त्यास लोकांचा सक्रिय प्रतिसाद असणं खूप गरजेचे आहे. आतापर्यंत शासनाने एकूण पाच टप्प्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्याचे विवरण खालीलप्रमाणे.
1)ला टप्पा
मार्च 25 ते 14 एप्रिल
भारत एकुण बाधित: 562 महाराष्ट्र एकुण बाधित:122
मृत्यू:13                         मृत्यू:3                                                               
मृत्यू दर:2.31%              मृत्यू दर:2.46%

2) रा टप्पा
15 एप्रिल ते ३ मे      
भारत एकुण बाधित :12340 महाराष्ट्र एकुण बाधित:2916
मृत्यू:417                          मृत्यू:187
मृत्यू दर:3.38%                 मृत्यू दर:6.41%

3)रा टप्पा
4 मे 17 मे 
भारत एकुण बाधित:42533  महाराष्ट्र एकुण बाधित:12974
मृत्यू:1373                        मृत्यू:548
मृत्यू दर:3.23%                 मृत्यू दर:4.22%
                                                                                           
4)वा टप्पा 
18 मे ते 31 मे
भारत एकुण बाधित: 101139          महाराष्ट्र एकुण बाधित:35058
मृत्यू:3163                                   मृत्यू:1249
मृत्यू दर:3.13%                            मृत्यू दर:3.56%

एकूण 4 टप्प्यातील: 
सरासरी मृत्यू दर: भारत:3.01%      
सरासरी मृत्यू दर:महाराष्ट:4.16%

5)था टप्पा
1जून ते 30 जून
        (संदर्भ: लोकसत्ता 25 मे 2020) 
      टाळेबंदी केलेल्या वरील चार टप्प्यातील आकडेवारीवरून असे लक्षात येते कि देशातील व महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. देशातील व महाराष्ट्रातील मृत्यू दर मात्र टाळेबंधीच्या तिसऱ्या टप्प्यापासून कमीकमी होत असताना दिसून येते. हे मृत्यू दर कमी होण्यामागील कारण शासनाने अलीकडील आरोग्यव्यवस्थेबाबतीत राबविलेले प्रभावी धोरण व लोकांमध्ये कोरोनाबाबतीत हळूहळू वाढत असलेली जागृती होय, असे वाटते. असे असले तरी महाराष्ट्राचे मृत्यू दर हे देशाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची सरासरी मृत्यू दर हे 4.16 % असून तेच भारताची सरासरी मृत्यू दर हे 3.01 % एवढी आहे. आणि देशातील एकूण बधितांपैकी 22% बाधित महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू दर हे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने जास्त असल्याकारणाने महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. 
       भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला केरळ मधील त्रिचूर जिल्ह्यात आढळला. चीनमधील वुहान शहरात शिक्षण घेत असलेला हा विध्यार्थी भारतात आल्यावर तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल. तर महाराष्ट्रातला पहिला रुग्ण हे 9 मार्च 2020 ला पुण्यात सापडला. दुबईतून आलेले दांपत्य तपासनी केला असता कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाल. भारतात कोरणोनामुळे  पहिला मृत्यू 12 मार्च 2020 ला झालं. 76 वर्षाचा वयस्कर व्यक्ती सौदी अरेबियातून भारतात आला, दुर्दैवाने त्याचा मृत्यू या कोरोनामुळे झाला. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू 16 मार्च 2020 ला कस्तुरबा गांधी हॉस्पिटल, मुंबई येथे झाला. तो 63 वर्षाचा वृध्द होता.
आर्थिक व सामाजिक परिणाम थोडक्यात:
      आंतरराष्ट्रीय नानेनिधीचा प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिव्हा या म्हणतात की, आताची जी आर्थिक परिस्तिथी उदभवली ती 2008 च्या आर्थिक मंदीपेक्षा काही कमी नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाला या विषाणूला रोखण्यात वेळीच यश आले व निधितरलतेतील समस्या सोडवता आल्या तरच 2021 मध्ये ही परिस्थिती सुधारते. 
     या कोरोनामुळे जागतिक व देशांतर्गत अर्थव्यवस्था उदवस्थ झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प झालं आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेत मागणी व पुरवठा नसल्यामुळे आर्थिक मंदीची अवस्था तयार झाली आहे. देशाची सकल राष्ट्रीय उत्पन्न व त्याचा वाढीव दर कमी झालं आहे, हे वाढीव दर 3.1% इतकी  कमी झाली आहे. उद्योगधंदे व इतर व्यवसाय  बंद पडल्यामुळे शहरी  व ग्रामीण भागात प्रचंड बेकारी फौज निर्माण झाली आहे. भारतात या बेकारीचा दर आता 24% इतकी वाढ झालेली आहे. नजीकच्या काळात या कोरोनावर औषध निघेल तरच या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य होईल.
      या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा दूरगामी परिणाम सामाजिक जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पडत असलेली दिसून येते. उधोगधंदे व कारकाने बंद पडल्यामुळे शहरी व ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली. लोकांना हाताला काम नसल्यामुळे वर्तमान व भविष्याची चिंता लागली. असं वाटत होत कि या कोरोनामुळे सर्वजन एकत्र आल्यावर आपापसातील प्रेम व आदर  वाढेल आणि नाती व मैत्रीचे संबंध अधिक दृढ होईल. पण  प्रत्यक्षात वेगळेच अनुभव पाहावयास  मिळतात.   व्यक्तीव्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये एकमेकाविषयी अविश्वास, भीतीचे वातावरण, भविष्याची चिंता व गैरसमज वाढीस लागलेले दिसून येते. परिणामी नातीसंबंध, मैत्रीचे संबंध बिगडत चाललेली आहेत. परिणामी भविष्यात कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार व अराजकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हि वाईट परिस्थती वर्तमान व भविष्यात येऊ द्यायचे नसेल तर या संकटकाळात एकमेकांना मदत करणे, सहकार्याची भावना ठेवणे व एकमेकाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे वाटते. ज्या प्रमाणे सूर्यास्त नंतर सूर्योदय आहे, दुख नंतर सुख आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक वाईट परिस्थिनंतर चांगली परिस्थिती येण हे तेवढच तथ्य आहे. म्हणून अशा परिस्थितीचा सामना करताना सहनशीलता, संयम व वेळ ह्या महत्वाची ठरतात. असे म्हणतात कि, संकट काळ हेच कसोटीचा काळ असतो, यावरूनच व्यक्तीच्या चारित्र्याची उंची ठरते व तो अधिक बलवान होतो, हे वास्तव आहे. म्हणून अशा परिस्थितीचा सामना खंबीरपणे, मनोधैर्यांने करणे व परिस्थिती बदलाची वाट बघने हेच या वाईट परिस्थितीवरील उपाय आहे, असे वाटते.  
निरोगी शरीर, निरोगी मन व मनोधैर्य असणे किती महत्वाचे: 
     निरोगी शरीर व निरोगी मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणतात ना “शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरूस्त” व “मन तंदुरुस्त तर शरीर तंदुरुस्त”. कारण या दोन्ही गोष्टीचे संतुलन ही एकमेकावर अवलंबून असते.
    म्हणून शारीरिक व मानसिक संतुलन राखणे किती गरजेचे आहे अशा परिस्थितीत. व्यक्ती जेंव्हा  दोन्ही पातळीवर संतुलित असते, तेंव्हा त्याची  रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. म्हणतात ना रोगप्रतिकारक शक्ती जेवढा जास्त तेवढा रोगापासून संरक्षण, हे वास्तव आहे. वास्तविक पाहता असे जेंव्हा साथीचे आजार येतात ना, तेंव्हा साथीच्या आजारापेक्षा भीतीचेच वातावरण जास्त निर्माण होते याचे प्रमुख कारणे म्हणजे सतत चिंता, तणाव, नैराश्य, संताप, चिडचिड, असुरक्षितता वाटणे, अविश्वास वाटणे यामुळे  मेंदूतील dopamine, serotonin  व noradrenaline ह्या रसायने पुरेश्या प्रमाणात स्राव होत नाहीत. परिणामी मानसिक संतुलन बिगडते व त्याचा थेट परिणाम शारीरिक संतुलणावर पडतो. परिणामी एकुणत व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता शारिरिक  पातळीवर जेवढं मेहनत घेणे जरुरीचे आहे तेवढेच भावनिक पातळीवर पण गरजेचे आहे. 
       शारीरिक पातळीवर संतुलन राखण्यासाठी योग्य व सकस आहार आणि व्यायामची गरज आहे तर मानसिक स्थरावर भावनिक नियोजन उत्तम व सक्षम असणे गरजेचे आहे. भावनिक पातळीवर संतुलन राखण्यासाठी आंनंदी व तणावमुक्त जीवन जगणे हा एकच उपाय आहे. त्यासाठी नकारात्मक विचार न करणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, फसव्या व खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवणे, कोणतेही गोष्ट मनावर न घेणे, प्रेरणादायी साहित्य वाचणे तसेच योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करणे हे महत्वाचे ठरते.
काळजी घेणे महत्वाचे..
मास्क वापरणे, हात नियमितपणे धुणे, सामाजिक अंतर ठेऊन राहणे, घरामध्ये राहणे, प्रवास टाळणे.
दाराच्या मुठीला स्पर्श केल्यानंतर, लिफ्टच बटन दाबल्यानंतर, दरवाजाची बेल वाजवल्यानंतर, एटीम मधून पैसे काढल्यानंतर सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ काळजीपूर्वक हात धुतली पाहिजेत.
गळाभेटी, हातात हात मिळवणं, टाळ्या देणं, पाठीवर थाप मारण, लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येणं टाळणे.
तणावमुक्त जीवन, व्यायाम, आहार, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गोळ्या तसेच झंडू पंचारिस्ट, च्यवनप्रश सेवन करणे.
वेगवेगळ्या भाज्या, फळ , डाळी व बिया सेवन करणे .
मांसाहार सेवन करणे त्यात प्रामुख्याने मध्ये मटण, चिकन, मासे  आणि  अंडी  सेवन करणे.
सध्याच्या आरोग्य क्षेत्रातील कोव्हिडं उपचारात अडचणी थोडक्यात..
      खाजगी रुग्णालयात करोनावरील खर्च विचारात घेतल्यास सर्वसामान्य कक्षात दाखल व्हायचे झाले तर रुग्णांना प्रतिदिन 4 हजार रु. खर्च त्यात रूग्णखोली, तपासणी फी, पीपीही किट, जेवनाच खर्च चा समावेश आहे. पण त्यात  औषधे, सर्जिकल, साहित्य खर्च समाविष्ट नाही.
स्वतंत्र खोली घ्यायचं असेल तर-5 ते 7 हजार रुपये प्रतिदिन. 
अतिदक्षता:10 हजार रु प्रतिदिन. 
अशाप्रकारे सरासरी 14 दिवसाचा  खर्च किती महागडी ठरतो याची कल्पना येते. सगळेच गरिब लोक व मध्यम वर्गीय ह्या महागडी उपचार करूच शकत नाही, त्याना त्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या उपचारावरतीच अवलंबून राहावे लागते कारण शासकीय रुग्णालयात मोफत उपचार आहे. असे असले तरी शासकीय आरोग्य सोयी सुविधा आपल्या देशात फारच कमी आहेत. व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरील संभाव्य ताण कमी करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काळजी घेण्याबरोबर शासनाच्या प्रत्येक धोरनाच्या कार्यात सक्रीय प्रतिसाद देणे गरजेचे आहे,असे वाटते.
काही लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे.. 
       संसर्गाने एखाद्याला एकाद्या रोगाची लागण झाली तर त्या व्यक्तीची त्यात काय चूक ? करोनाचा आजार पण तसेच नव्हे काय ? करोना झालेल्या व्यक्तीकडे संशय व बहिष्कृत नजरेने बघणे, मानसिक अत्याचार करणे, वेळ प्रसंगी त्या व्यक्ती सोबत संबंध तोडणे हे कितपत योग्य..? ठीक आहे ना अशा रोगीपासून सामाजीक अंतर ठेवून तुम्ही दुर राहा पण तुमच्या अशा वागण्याने त्या व्यक्तीच्या मनाला काय वाटेल व त्याच्या मनाची अवस्था काय होईल हे कधी तुम्ही विचार केलात का? ही परिस्थिती उद्या कोणावरही ओढवू शकत नाही काय? अशा प्रकारे वागणे हे मानवतेला शोभणारे नसून ते अमानवीय, असंवेदनशील व अशोभनीय  आहे. म्हणून व्यक्ती आपल्या विचारात, वर्तनात व दृष्टकोणात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत माणसाने माणुसकी जपणे खूप गरजेचे आहे तरच माणुसकी या शब्दाला अर्थ राहील, असे वाटते.
     सहनशीलता व संयम ह्या  आव्हानास तोंड दयायला खंबीर बनवतात. हा सर्वांसाठी कसोटीचा काळ असल्याने याचा सामना धैर्याने व खंबीरपणे करावे.
कोरोनामुळे माणसं कळाली, त्यांच्या खोचक नजराही . संकटकाळी आपले कोण असतात याची जाणीव झाली.
कोरोना हा आजार श्वसनामुळे होत असल्यामुळे कोणत्याही पदार्थांच्या सेवनामुळे होत नाही, असे असले तरी सध्य परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरील पदार्थांचे सेवन न करणे अधिक चांगले.
वातानुकूलित खोलीत कोरोना विषाणूमिश्रित थेंब जास्त काळ टिकवून राहतात. जास्त तापमान असलेल्या खोलीत हे थेंब लवकर सुकतात. म्हणून वातानुकूलित यंत्रणेचा कमीतकमी वापर करणे , खिडक्या व दरवाजे उगडे ठेऊन जास्तीत जास्त हवा खेळती ठेवणे गरजेचे आहे.
 उच्च रक्तदाब , मधुमेहाचे रुग्ण, मूत्रपिंड व्याधी असणारे , कर्करोग , गरोदर महिला व जेष्ठ नागरिक ह्या गटातील व्यक्ती  अधिक जोखीमचे आहेत. अन्यथा रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर काही समस्या नाही. 
कोरोना हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होतो.
कोरोनाबाधित  झालेले रुग्ण आता बरे होत आहेत त्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. पण होऊ नये म्हणून व झाल्यावर काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
आजाराशी लढा देऊन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे, वैधकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रयत्नांचे  कौतूक करावे. त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघायला पाहिजे. कोरोनाशी लढणाऱ्या या योद्धाना बहिष्कार नको, प्रोत्साहन द्या.
कोरोनाबाबत समाजात एक अदृश्य व अनामिक भीती निर्माण होणे साहजीकच आहे मग अशा भीतीचा स्वार्थासाठी उपयोग करून घेणारी मंडळी आहेत. विषाणूपासून व रोगापासून सुटका होण्यासाठी तंत्र,मंत्र, जप-जाप्य, धार्मिक प्रार्थना, पूजापाठ अशा विविध अवैज्ञानिक व अंधश्रद्धेवर आधारीत गैररकृत्य करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
सण समारंभ, लग्न, धार्मिक कार्यक्रम व राजकीय कार्यक्रमात एकत्र येणे टाळावे. आवश्यकता निर्माण झाल्यास सामाजिक अंतर ठेऊन चालावे.
रेल्वे, बस  व  विमान ह्याने प्रवास करताना सामाजिक अंतर ठेवू प्रवास करणे, बाहेर कुठेही जाताना सामाजिक अंतर ठेवणे.  
मजकूर छायाचित्र, ध्वनीचित्रपीत खातरजमा केल्याशिवाय पसरवू नये.
वाट्स एप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटाक आदी प्रसार व समाजमाध्यमांचा उपयोग अफवा व  चुकीची माहिती पाठवण्यासाठी करू नये.
सहसा व शक्यतोवर वर्तमानपत्र, जागतिक आरोग्य संगटना, आरोग्य विभाग व प्रशासन यांचाकडून आलेल्या महितीवरच विश्वास ठेवणे चांगले.
प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे.
शेवटी, तामिळनाडूतील आजच्या कविपैकी  अव्व्ल दर्जाचे कवी कै. मुथू यानी करोनाच्या विध्वंस व क्रूर प्रव्रत्तीवर एक  सुंदर  कविता रचली आहे.
“अनुपेक्षा इवलासा मारख तू 
चाहुलसी लागू न देता ईवलासा तू
युद्ध न करताही विनाश करणारा तू ”….. (संदर्भ: प्रस्तुत कविता लोकसत्ता वर्तमानपत्रातील आहे). 
      पण करोना नक्की तू संपणार एक ना एक दिवस कारण निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक  गोष्टीस अंत आहे, त्यामुळे तू काही त्यापेक्षा वेगळं असूच शकत नाहीस, आता जरी तू आपले वर्चव दाखवत असेल पण या युद्धात मानवच जिंकणार! मानवच जिंकणार!
करोना प्रतिकारासाठी नागरिक निधी:
पीएम केअर फंड( PM CARES Fund): Prime Minister's Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund.
      करोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना नागरिकांचाही हातभार लागावा या उद्देशाने आपल्या देशाच्या पंतप्रधानानी नागरिक साहाय्य आणि आपत्कालीन स्थिती निवारण निधीची घोषणा 28 मार्च 2020 ला केली.या निधीतून सशक्त भारताचे दिर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. 
देणगी  देण्यासाठी www.pm.india.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/यूपीआय/ नेट बॅंकिंग/आरटीजीएस/नेफ्ट ह्याद्वारे या निधीला देणगी देता येईल. या देणग्याचा आयकर अधिनियम 1961(80- जी) नुसार आयकर कपातीची सुट 100%आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-19:
करोनाच्या साथीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक काटेकोर उपाययोजना करत आहे. त्यांपैकी “मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-19” हे एक होय.
 या उपाययोजनामध्ये व्यक्ती, अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था ह्या स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. या साथीच्या नियंत्रनासाठी मुख्यमंत्री सहाययत निधी कोव्हिड-19 हे स्वतंत्र बॅंक खाते उघडण्यात आले आहे. या देणग्याचा आयकर अधिनियम 1961(80- जी) नुसार आयकर कपातीची सुट 100%आहे. 
बचत खाते क्र.39239591720   शाखा कोड-00300 
 स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
चर्चिले शब्द:
अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन):                                                                                                
       कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंद करण्यासाठी विदेशातून आलेले /दुसऱ्या राज्यातुन  आलेले / दुसऱ्या विभागातून आलेले/दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले/ रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक जे कि संशयित रुग्ण  किंवा विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात हे शक्यता गृहीत धरून त्यांना 14 दिवस वेगळे राहण्यास सांगितले/ठेवली जाते.
      दरम्यानच्या काळात त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण (आयसोलेशन) कक्षामध्ये हलवले जाते. या संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये याकरिता प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना या वॉर्डमध्ये ठेवले जाते.  करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात.
आरोग्य सेतू एप: आपल्यापासून रुग्ण कुठे व किती मीटर/कि.मी अंतरावर आहे याची माहिती बसल्याठिकाणी मोबाईलवर या एपद्वारे बघता येते.
इतर शब्द: Personal protective equipment, Surgical Masks, Surgical N95 Respirators, Hand sanitizer, lockdown, Hydroxychloroquine tablet, thermal scanners, stretchers. 

By...
एस.एम.रचावाड                                                                
मु. पो.पाळज. ता.भोकर जि.नांदेड.
मो.न. 9552868726

Rate & Review

s m rachawad

s m rachawad 10 months ago

Munjabhau navghare

Munjabhau navghare 10 months ago