You don't know books and stories free download online pdf in Marathi

न कळलेला तू....




ट्युशन क्लास जॉईन केले...... क्लासचा व्हॉट्सअँप ग्रुप ही जॉईन केला..... सगळं मस्त सुरू होतं..... अचानक एक दिवस ती मोबाईल चाळत बसली तेव्हा नकळत बोटांनी तिचं मन त्या ग्रुपकडे वळवले..... ती फ्लोमध्ये त्या ग्रुपची चॅटिंग वाचू लागली..... वाचता - वाचता तिचं लक्ष एका मुलाच्या डीपीवर गेलं.... दिसायला हँड्सम, गॉगल वगैरे फुल हीरो स्टाईल असा तो तिला फोटो मध्ये दिसला...... नकळत तिचे बोट त्याच्या मेसेज चॅट बॉक्सकडे गेले आणि मेसेज टाइप झाला......

ती : "हाय....👋👋"

तिकडून रिप्लाय न आलेला बघून ती विचारात पडली......🙄 आरश्यासमोर उभी राहून ती स्वतःशीच पुटपुटत......

ती : "मी इतकीही वाईट नाही की त्याने मला इग्नोर करावं...... अरे इतकी मुलं मरतात माझ्यावर..... आणि मला कुठे याच्याशी लग्न वगैरे करायचं आहे..... ते तर तो मला असाच आवडला आणि मी मेसेज केला..... त्यात काय.... आणि तसही माझा अक्षत आहे की..... त्याच्याशी मी लग्न सुद्धा करणार आहे..... आणि अस कुठं लिहिलंय की, एखाद्याशी आपण कमिटमेंट केली की, कुणा दुसऱ्या सोबत फ्लर्ट करू शकत नाही..... आणि अक्षतला तरी कुठे कळेल?? कोण सांगेल त्याला??... काही दिवस याच्याशी बोलून बघते कसा आहे...... दिसायला तसा वाईट नाही.... इन्फॅक्ट अक्षत पेक्षाही हँड्सम आहे..... काही दिवस डेट करेल.... नंतर तो कुठे आणि मी कुठे.....😁😁"

वेगळच हसू चेहऱ्यावर आणत, ती बेडवर आडवी होऊन त्या डीपी मधल्या मुलाच्या स्वप्नात हरवली.....😇

ही नुपूर..... अक्षत आणि तिची रीलेशनशिप गेल्या पाच वर्षांपासून होती..... पण, ही शिकायला दुसऱ्या शहरात असल्याने अक्षत खूप दुःखी होता..... एज्युकेशन खूप महत्त्वाचं म्हणून त्याने तिला स्वतःपासून दूर राहून फक्त स्टडी करायचा असं सांगितलं होतं...... त्याने तिच्याशी आता बोलणं सुद्धा कमी केलं होतं.... कारण, बोलण्यापेक्षा तो वेळ ती स्टडी करण्यात वापरू शकेल......

नुपूरचं मात्र इकडे वेगळच होतं.... जोपर्यंत ती अक्षत जवळ होती, त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या.... तेव्हा मात्र तिला त्याची किंमत नव्हती..... जेव्हा ती त्याच्यापासून लांब गेली..... तिला तो जवळ असावा असं नेहमी वाटायचं...... अक्षत नेहमी तिची समजूत काढून तिला स्टडी करायला प्रोत्साहित करायचा..... पण, नुपुरला मात्र तितकंच पुरेसं नव्हतं..... तिला नेहमी वाटायचं की, आपल्याला नेहमी प्रेम दाखवून देणारा बॉय फ्रेंड असावा..... त्याचं आपल्यावर किती प्रेम हे त्याने काहीतरी सेलिब्रेशन करून तिला दाखवून द्यावं.... अक्षत मात्र एकदम साधा, अन् रोमँटिक म्हणता येणार नाही..... पण, गरज पडल्यास तिच्यासाठी काहीही करणारा...... त्याला वाटायचं की, हे वय फक्त करीयरवर फोकस करणारे असले पाहिजे.... लग्न झालं की, सगळी मस्ती करायची..... म्हणून, तो त्याच्या करीयर विषयी खूप केअर फुल होता......

अक्षत दिवसातून एकदा नुपूरला कॉल करून विचारपूस करायचा पण, तिला नेहमीच जास्त हवं असायचं.... त्याच्याशी असच बोलत रहावं अस तिला वाटायचं..... पण, ते शक्य होत नसल्याने ती आता वेळ घालवण्यासाठी दुसरे पर्याय शोधू लागली......

दोन दिवसानंतर नुपूर अंघोळ करून, कसल्या तरी विचारत होती तेव्हा तिच्या फोनची टोन वाजली.... बघितलं तर त्याच मुलाचा मेसेज व्हॉट्सअँप वर आलेला..... तो मेसेज बघून, तिच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली.....😊 पटकन तिने त्याला रिप्लाय केला.....

नुपूर : "हाय..... Buddy....☺️"

तो : ".... Hey..... Hi.....☺️"

नुपूर : "काय करतोय.....🙂"

तो : "काही नाही.....🙂"

नुपूर : "तुला आवडेल मी बोललेलं तुझ्याशी.....🙂"

तो : "फक्त आवडेल नाही..... खूप आवडेल....😘"

नुपूर तर तो इमोजी बघून हवेतच होती.... एका अनोळखी व्यक्तीने तिला तो ईमोजी पाठवला होता.....☺️ या आधी तिने कधीच अक्षत व्यतिरिक्त कोणाचा विचार सुद्धा केला नव्हता..... पण, कोण जाणे तिच्यासाठी हा अनुभव नवीनच होता त्यामुळे ती अक्षतला विसरून त्या अनोळखी व्यक्तीच्या आठवणीत गुंतून गेली..... अक्षत कॉल करायचा तर कधी बिझी आहे किंवा स्टडी करतेय अस सांगून त्याला ती इग्नोर करायची......

असेच दिवस जात होते...... इकडे नुपूर त्या मुलासोबत हँग आउट करायची आणि अक्षतला तर ती पूर्णपणे विसरूनच गेलेली..... अक्षत ही आनंदी होता की, नेहमीच तक्रार करणारी त्याची ती नुपूर अभ्यासात तीचं पूर्ण लक्ष लावते आहे..... पण, त्याला या गोष्टीची पुसटशी कल्पनाही तिने येऊ दिली नाही..... तिकडे तिचं फिरणं, एन्जॉय करणं असच सुरू होतं...... तीन - चार महिने झाले असतील एकदा त्या मुलाने तिला डिनर साठी इंव्हाईट केलं...... ती छान पैकी त्याला आवडेल म्हणून शॉर्ट ड्रेस घालून बाहेर पडली...... आज ती जरा जास्तच स्वतःला स्पेशल फील करवत होती......🥰

त्याने दिलेल्या अड्रेस वर ती पोहचली तर त्याने एक रूम बुक केलेलं त्यात छान डेकोरेशन केलं होतं......😍 ती स्वतःला खूप नशीबवान समजत होती..... तिला तर आता अक्षत आठवत ही नव्हता......😒

तो : "वेलकम नुपूर.....😘"

नुपूर : "थँक्यू.....🤩"

त्याने तिला स्वतःच्या हातांवर उचलून घेतलं..... खरं तर हे तिच्यासाठी धक्कादायक होतं...... कारण, पाच वर्षांपासून अक्षतने तिच्या इच्छेविरुद्ध तिला हात देखील लावला नव्हता..... पण, तिला त्या प्रेमाची किंमत नसल्याने, ती आज एका अशा व्यक्तीच्या हातांवर होती, ज्याच्यावर विश्वास ठेवणे आज तिला महागात पडणार होते...... आजवर लिमिट क्रॉस न करणारी ती नुपूर आज वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये सापडणार होती......

त्याने तिला उभ केलं आणि खुर्ची पुढे करून तिला बसण्यासाठी वेलकम केले..... ती जाऊन एखाद्या परीसारखी त्यावर बसली..... त्याची नजर तिला खालून - वर एखाद्या शिकारी सारखी बघत असलेली बघून, ती थोडी घाबरली..... पण, ते एक हॉटेल आहे आणि हा करून - करून काय करणार या आत्मविश्वासाने ती परत कंफर्टेबल होऊन बसली.....

तो : "तू आज खूपच क्यूट दिसतेय..... अगदी एखाद्या हेरॉईन सारखी.....😘"

नुपूर : "थँक्यू.....☺️"

तो : "वेटर......"

वेटर त्याने ऑर्डर केलेलं सगळं घेऊन आला...... दोघांनी आधी केक कट केला..... नंतर जेवण करून निवांत बसले...... थोड्याच वेळात म्युजिक प्ले झाला....... तिला हात पुढे करून त्याने इन्व्हाईट केलं...... तिला थोडं अडखळलं...... पण, ती तरीही स्वतःला सावरत उठली..... दोघेही एकमेकांत बुडालेले..... काही वेळ त्याच पोज मध्ये डान्स केल्यावर, त्याची बोटं तिला तिच्या बॅकलेस पाठीवर रेंगाळत असलेली भासली..... ती त्याला विरोध करणार तोच त्याने तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली...... ती त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती पण, काहीच फायदा नव्हता त्याने तिच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला होता..... तिला अक्षत आठवायला लागला होता...... अक्षत सोबत तिने विश्वासघात केला आहे असच तिला तिचं मन सतत सांगत होतं...... तिला अक्षत सोबत घालवलेले क्षण आठवले..... तो कसा तिला प्रेमाने बघायचा आणि त्यातच समाधान मानून, तिला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपायचा..... त्याला फक्त ती हवी होती.... आणि आज तिच्या एका चुकीमुळे ती एका अशा व्यक्तीला आपली अस्मिता उध्वत करण्यासाठी, स्वतः त्याच्या जवळ गेली होती.... ज्याला तिच्याशी काहीच घेणं - देणं नव्हतं.....😒

ती हे सर्व आठवून रडत होती.... त्या व्यक्तीला विरोध करत होती पण, त्या नराधमाच्या डोक्यात आज तिचे लचके तोडण्याचा विचार धिंगाणा घालत होता..... ती कस तरी त्याला डायनिंग जवळ घेऊन आली आणि त्यावर ठेवलेल्या चाकुला हात पुरवू लागली...... खूप प्रयत्नानंतर तिने तो चाकू हातात पकडला आणि त्याला जोरात हातावर मारला..... तसाच तो विव्हळत मागे झाला..... तिला खाऊ की गिळू अशा नजरेत बघत.....

तो : "ब्लडी बीच..... तुझ्यासारख्या किती तरी जणींना मी रोज विकत घेतो...... आली साली सती - सावित्री बणायला..... आधी स्वतः जवळ येणार, आम्हाला रिझवण्यासाठी असले कपडे घालणार आणि मग स्वतः नाटकं करणार साली......🤬🤬"

नुपूर : "तुझ्यासारख्या माणसांना आमची लचकीच तोडायची असतात..... तुम्हाला प्रेम हा भावच नसतो...... आता जर माझ्या जवळ आलास ना तर उभं चिरेल मी......😡😡😡"

तो : "तुला जास्त माज आहे थांब मी उतरवून देतो......🤬😡 साली..... थांब तू....."

तो तिच्यावर धावून येणार तेवढ्यात ती स्वतःचा पर्स उचलून दरवाज्याच्या दिशेने धावते...... तो तिच्या मागे पळतो..... खरं तर तीच लक्ष आधी त्या हॉटेल कडे गेलेलं नसल्याने ती मोठी चूक करून बसते...... त्या हॉटेल मध्ये त्याने सर्व बुक केलं असतं आणि तिथली लोकही आज नुपूरला मदत करणार अस वाटत नाही...... हे सर्व लक्षात येताच ती जवळ काही जड वस्तू भेटते का हे शोधते...... तिला जवळच एक फ्लॉवर पॉट दिसतो...... तो अंगावर धावून येणार तोच ती त्याच्या दिशेने तो पॉट फेकते....... तो जागीच पडतो..... ही डोअर ओपन करून मिळेल त्या दिशेने पळत सुटते...... थोड्या अंतरावर येऊन ऑटो करते आणि आपल्या रूमवर परत येते......

तिला अक्षत सोबत घालवलेले ते क्षण आठवतात ज्यात स्वार्थ नव्हता..... होतं ते फक्त प्रेम...... जरी त्याने तिला आज पर्यंत एकही गिफ्ट दिलं नसलं पण, त्याने आपलं हृदय तिच्या नावावर तर कधीच केलं होतं... मग तिला काय गरज होती अशा अनोळखी व्यक्तीच्या नादी लागायची..... हा सगळा विचार करत असता फोन रिंग होतो..... तंद्री तुटते ती बघते तर फोन अक्षतचा असतो..... कारण, गेले कित्येक दिवस तिने त्याला कॉल केला नसतो......

या मनःस्थितीत ती त्याच्याशी बोलण्याच्या बिलकुल मूड मध्ये नसते.... म्हणून, ती फोन तसाच बेडवर फेकून, ती बाथरूम मध्ये शॉवर घ्यायला जाते...... आणि किती तरी वेळ तशीच तिथे बसून फक्त रडत असते......

इकडे अक्षत तिला कॉल वर कॉल करतो..... ती काही फोन उचलत नाही...... तो लगेच रिझर्व्हेशन करून, तिच्या जवळ जावून, नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हे माहीत करावच लागेल या निर्णयाने बॅग पॅक करतो...... दुसऱ्याच दिवशी तो तिकडे जाणार असतो.......

इकडे नुपुरची तब्येत खूप बिघडते...... ताप, डोकेदुखी त्यामुळे ती दोन दिवस काहीही न खाता - पिता झोपून असते...... अक्षत रूमवर येऊन डोअर नॉक करतो पण, काहीही रिस्पॉन्स मिळत नाही..... तो खूप प्रयत्न करतो आणि लँडलॉर्डला दुसरी की मागून डोअर ओपन करून आत येतो आणि बघतो तर नुपूर ची अवस्था बघून त्याला रडू येतं...... तो तिला हात लावून बघतो तर तिच्या अंगात इतका ताप असतो की, चटक्याने तो घाबरून जातो..... लगेच डॉक्टरला कॉल करून बोलावून घेतो.... डॉक्टर येऊन चेक करतात आणि त्याला मेडीसीन लिहून, निघून जातात....

तो तिला जवळ घेऊन प्रेमाने तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो....... ती काही तासांनी शुध्दीवर येते...... अक्षतला जवळ बसलेला बघून ती त्याच्या गळ्यात पडून जोर - जोरात रडायला लागते...... अक्षत साठी तिचे अश्रू हे खूप दुःख देणारे असल्याने आज पर्यंत त्याने तिला रडवले नसते.... तो सुद्धा तिला जवळ घेऊन खूप रडतो...... ती शांत होत नसलेली बघून तो तिला भानावर आणायला गालावर किस करतो...... ती किती जरी बेभान असली, किती जरी त्याच्यावर चिडली असली तरीही हा किस मात्र तिला खुलवून जातो..... नेहमीचा स्पर्श बघून ती अक्षतच्या चेहऱ्याकडे बघते आणि अजुन रडते.....😭

अक्षत : "नुपूर काय झालं तुला..... का इतकी रडतेय..... आणि इतकी तब्येत बिघडली बाळा सांगायचं ना..... तुला मी इथे स्वतःची काळजी न घेता अभ्यास करण्यासाठी पाठवलं का...... तिकडे आई - बाबांना तरी सांगायचं ना..... मी आलो म्हणून बरं झालं.... नाहीतर.....🥺🥺"

ती अजुनच त्याला बिलगून रडते......

अक्षत : "अग ये वेडे का इतकं रडतेय तू...... तुला काही प्रॉब्लेम आहे का सांग ना ग मला...... अस रडत बघून मला राहवत नाही..... बोल ना काही....🥺🥺😟"

नुपूर थोडी शांत होते......

नुपूर : "मी तुला सगळं सांगितलं तर तू मला सोडून तर जाणार नाही ना.....😭😭😭"

ती परत त्याला बिलगते...... आणि रडते......😭😭

अक्षत : "तू सांग ना ग मी प्रॉमिस केलेलं की, कितीही काही झालं मी तुला कधीच सोडून जाणार नाही...... सांग ना ग....🥺🥺😟"

नुपूर आजवर घडलेलं सर्व अक्षतला सांगते..... त्याला तर विश्वासच बसत नाही..... त्याच्या पायाखालून जमीन सरकते.... कुणाला दोष द्यावा स्वतःला ज्याने तिच्यावर इतका विश्वास ठेवला होता की, तिला जी त्या विश्वासाचा विचार न करता दुसरीकडे पर्याय शोधायला निघाली होती...... तो काहीच बोलत नसलेला बघून......

नुपूर : "अक्षत आय एम रिअली व्हेरी सॉरी...... मला नव्हत करायचं हे.....😭😭"

अक्षत : "पण आता तर तू हे केलं आहेस ना.... मग..... यानंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवावा अस वाटतं का तुला?"

नुपूर : "अक्षत मी यानंतर नाही अरे अस वागणार एक चान्स दे..... प्लीज....😭😭"

अक्षत : "तू तुझं रडणं थांबव आधी.....🥺"

ती रडायची थांबते......

अक्षत : "माझीच चूक झाली ना नुपूर मी तुला कधी दिखावा केला नाही की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे..... तुला अन् कंफर्टेबल वाटेल म्हणून मी कधीच माझ्या लिमिट क्रॉस केल्या नाहीत..... तुझ्या इच्छेविरुद्ध काही करण्याआधी मी तुझा विचार केला...... पण, तुला तर हेच सर्व हवं होतं ना....... सॉरी मीच चुकलो.....🥺"

नुपूर : "प्लीज ना असं नको ना बोलू.....😭"

अक्षत : "सांग ना मग मी काय बोलावं..... तुला स्वतःपासून लांब मी याच साठी पाठवलं होतं का सांग ना.... माझ्या प्रेमात काही कमी होती सांगायचं ना मला..... अग जीव ओवाळून टाकत होतं ग तुझ्यावर त्याची पार वाट लावून टाकलीस तू...... आता आधी सारखा मी तुझ्यावर विश्वास करू शकेल का....😠"

नुपूर : "सॉरी ना अक्षत...... माझी चूक झाली.....😭"

अक्षत : "आता मला शांत राहू दे......😣😣 काही ऑर्डर करतो खाऊन घे....."

रात्रभर अक्षतच्या डोक्यात एकच गोष्ट होती की, आपण तिच्यासाठी चांगला विचार केला..... काही गोष्टी दिल्या नाही म्हणून तिने बाहेर त्याचा पर्याय शोधला..... पण, त्या गोष्टी खरच महत्त्वाच्या होत्या का हा विचार न करता ती दुसरीकडे मला विसरून कशी काय जाऊ शकते...... मी जिच्यावर इतकं प्रेम करतो ती अस करेल वाटलं नव्हत..... या विचारात त्याला कधी झोप लागली कळलं नाही...... मॉर्निंग उठून दोघेही शांत होते..... अक्षतने बॅग पॅक केल्या आणि जायला निघणार की मागून त्याला नुपुरने पकडले......

नुपूर : "प्लीज नको ना जाऊस.....😭😭"

अक्षत : "नुपूर.... इकडे ये..... मी जातोय याचा अर्थ माझा तुझ्यावर असणारा विश्वास पूर्ण पणे तुटला अशातला भाग नाही...... माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे आणि नेहमी असेल...... फक्त मनात एक सल नेहमी राहील की, आपण ज्या व्यक्तीसाठी इतकं केलं तिला ते अपुर होतं म्हणून, तुझ्यासाठी समोर मला खूप काही करायचं आहे..... मी असलो - नसलो तरीही तुला पुरणाऱ्या गोष्टी नेहमी असतील याची मी गॅरंटी देतो...... इथून पुढे तुला जे लागेल मला सांग मी देईल.... त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल......"

इतकं बोलून तो बाहेर पडतो..... इकडे नुपुरने काय गमावलं हे तिला तिच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू सांगत असतात.....

असेच दिवस गेले..... नूपुरला नवीन गिफ्ट सुद्धा महिन्यातून येत राहायचे पण, आता त्यात ती मजा नव्हती जी अक्षत सोबत काही क्षण घालवून ती अनुभवायची......💔💔

ही होती नुपुरची आपबिती...... तिचे अनुभव माझ्या शब्दात कसे वाटले नक्की सांगा...... तिच्या परवानगीने तिचे अनुभव व्यक्तिगत सुरक्षेच्या हेतूने, नाव बदलवून मांडले आहेत......

कधी - कधी वस्तुंसाठी आपण कोणाच्या तरी भावना दुखवून बसतो आणि त्याची भरपाई आपल्याला त्या व्यक्तीला गमावून करावी लागते..... म्हणून, कधीही व्यक्तीवर प्रेम करा ना की, त्या व्यक्तीने काय दिलं यावर.... कारण, एखादी व्यक्ती आयुष्यातून गेली ना, तर त्याची भरपाई कितीही पैसा मोजून देखील होत नाही...... अस मला नुपूर सांगते......😒😒 ती काय सहन करते ऐकून खरच तो अनुभव किती त्रासदायक असेल याचा विचारही करवत नाही.......🤐🤐