Lock down benefits ... ️ books and stories free download online pdf in Marathi

लॉक डाऊन फायदे...️

खरं म्हणजे, या विषयावर बोलावं तितकं कमीच...😁😁
सगळ्यात जास्त नुकसान जर का कुणाचं, कोरोना काळी झालं असेल..... ते म्हणजे, लग्नसमारंभ व्यवसाय असणाऱ्यांचं...... लग्न सराईच्याच सिजनमध्ये कोरोना आला..... पूर्ण धंदा मंद.... माझेच मोठे वडील त्यांच्या घरी कार्यालय आहे...... एकही ऑर्डर त्यांना या वर्षी न मिळाल्याने, आणि आहे त्या ऑर्डरही लोकांनी काढून घेतल्याने त्यांना कितीतरी मोठ्या रकमेच नुकसान सोसावं लागलं..... आता, त्यांचा साईड बिझनेस होता म्हणून बर..😓😓.... नाहीतर, ज्यांच फक्त एकाच व्यवसायावर घर चालतं त्यांचं काय? या प्रश्नाने मनात अनेक समस्यांच्या - विचारांनी, डोकं वर काढलं.....😓

असो, आज मी माझा व्ययक्तिक अनुभव, आपल्या सगळ्या वाचाकांसोबत शेअर करणार आहे....

तर, माझ्याच मैत्रिणीच्या आत्येभावाच लग्न..... १३ एप्रिल रोजी त्याची तारीख ठरली..... मलाही आमंत्रण होतेच...... पण, मी मुद्दाम जाणं टाळलं...... ते काय आहे ना..... मी गवर्नमेंटच्या नॉर्म जाणीवपूर्वक पाळते....😎🙏... तर, मी गेली नाही हा मैत्रिणीच्या मनात राग होताच आणि नंतर तिने काय केले असेल याची कल्पना न केलेलीच बरी....😂 असो, तो आपला विषयही नाही म्हणा...😁😁 पण, लग्नात नेमकं काय घडलं हे, ती मला सांगायला विसरली नाही.....😁😁

तिचे कर्तव्य समजून, तिने सांगायला सुरुवात केली......😁😁😂 लग्नात पन्नास पेक्षा कमी मंडळी बोलावण्याचा सरकारचा नियम होता... तरीही, लग्नात त्यांनी तब्बल दोनशे लोकांना बोलावलं होतं....🙄 का? तर, म्हणे त्यांच्यात कमी लोक बोलावले की, वाळीत टाकलं जातं.....🤦🤦 ही सामाजिक मानसिकता बघा....😏 झालं मग दोनशे मंडळी जमली....😠 आणि याची पराकाष्टा तर तेव्हा गाठली गेली.... जेव्हा, त्या मंडळीला त्यांच्या एरियात वेगवेगळ्या घरी थांबण्याची व्यवस्था केली गेली.....🙄🙄 का? तर, पोलिसांना याचा सुगावा लागता कमा नये...😠😡 भारतीय लोकांनी कोरोना आधी सीरियस घेतला नाही.....😏 म्हणून, आज स्वतः कोरोना सीरियस झालाय आणि आज कितीतरी जीव तो घेऊन जातोय.....🤐(RIP.🙏😓).... पण, लोकांना स्वतःच्या खोट्या इमेजची जास्तच काळजी पडलेली असते..... खोटी यासाठी.....☝️☝️ कारण, त्यांच्या मागेही लग्नात काही ना काही चुका काढणारे असतातच....😠😠

तर, जी मुलाकडील मंडळी होती...... त्यांनी चांगलंच आदरातिथ्य करवून घेतलं.... आणि हुंडा सरळ न घेता, इंस्टॉलमेंटमध्ये लग्नानंतरच्या काही महिन्यात घेणार असे सांगितले..... मुली कडची मंडळी होती घरची समृध्द..... पण, मुलीला नंतर ते लग्न मान्य नव्हतं..... आधी तिचा होकार होता..... पण, तेव्हा मुलाकडील मंडळींनी अशी जास्त हुंड्याची मागणी नव्हती केली.... त्यांनी लग्न मंडपात अशी मागणी केली...... आणि माझा स्वतःचा हा अनुभव आहे..... की, काहींना वाटतच असतं, लग्नमंडपात मागणी केली की, इज्जत जाऊ नये म्हणून हुंडा हवा तितका दिला जाईल.... आणि त्यांना छळ करायला कुणी तरी मिळेल..... ह्या असल्या मानसिकतेचा खरंच नाश व्हायला हवा......😡☝️🙏 .. मग त्या माझ्या मैत्रिणीच्या होणाऱ्या वहिनीने, स्वतःच लग्नच मोडून दिलं...... कारण, ती सजग होती..... पूर्ण वऱ्हाड परतून आलं.... आणि त्या वऱ्हाड मंडळीत एकाला कोरोना बाधा होऊन त्याचा मृत्यू झाला.... बाकीच्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणून क्वारंटाईन केलं गेलं..... सुदैवाने बाकीचे दगावले नाहीत...... नाहीतर, फुकटची शान कधी जीवावर बेतली असती कुणास ठाऊक....!??😓🙏

तर, बघा ना..... म्हणजे, इतकी मोठी समस्या...... की, आज देशच काय....... तर, पूर्ण जग हतबल आहे त्या समस्येपुढ....... काय, तर फक्त आणि फक्त एकमेकापासून दूर राहून, योग्य अंतर राखूनच आपण त्या विषाणूला, स्वतःला त्याची बाधा होण्यापासून थांबवू शकतो..... आणि भारतातील काही लोकांनी, त्याच समस्येला, एक मनोरंजनाचा विषय बनवल्याची उदाहरणे गेल्या काही महिन्यात पुढे आली.....😠

लोकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जर, नियमांच पालन केलं असतं ना..... तर, काही प्रमाणात कोरोनाला आळा घालण्यात आपले शासन यशस्वी झाले असते..... शासन अधिकृत अधिकारी दिवस - रात्र कार्यरत होते..... त्यांना फक्त हवं होतं की, आपण आत सुरक्षित रहावं.... पण, आपण बघतो की, काही ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी असू देत.... नाहीतर, महिला वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत..... पंजाबमध्ये तर हिंसेचा कळसच गाठला गेला..... एका सहाय्यक उपनिरीक्षक पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा हात कापला गेला.....😓😓 ती बातमी बघून खरंच आपण माणूस तरी आहोत का?? या प्रश्नावर विचार करावा लागला.....😡😡🤬🤬

तर, लॉक डाऊनमध्ये फक्त लग्नच चर्चेतील विषयाचा भाग नव्हता..... तर, इतरही असे काही संवेदनशील मुद्दे घडले की, ज्यावर बोललच गेलं नाही...... आणि आता सध्या तर नको त्याच विषयांवर बोललं जातंय..... असो....🙏✍️😓

कृपया अर्थाचा निरर्थ नकोय.....✍️🙏☝️ फक्त सकारात्मक मुद्दे मांडण्याचा निखळ प्रयत्न..... निस्वार्थ लिखाण...... धन्यवाद.....🙏☺️