Mrudula - 1 in English Short Stories by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | मृदुला - 1

मृदुला - 1

मृदुला हि एका गावातील परिस्थितिने गरीब असलेल्या घरातील मुलगी . घरामध्ये आई - बाबा, मृदुला आणि तिचा लहान भाव उत्कर्ष असे राहत होते . मृदुला लहानपणापासूनच हुशार, थोडी घाबरट , जगाची पारख नसलेेली पण समजूतदार , नेहमीच समोरच्याला समजून घेणारी आणि येईल त्या परिस्थितिमध्ये सांभालून घेणारी मुलगी होती .
आज मृदुलाचा दहावी चा निकाल होता . ती आणि घरातील सर्वच खूप उत्साहित होते . मृदुला सकाळीच लवकर उठून आईबाबांच्या पाया पडून निकाल आणण्यासाठी गेली होती . इकडे आई बाबा आधीच स्वागताच्या तयारीत होते . तितक्यात मृदुला धावत ओरडत आली , आई - बाबा मी पहिल्या नंबरने पास झाले . आई - बाबांचा आनंद गगनात मावेना . याच आनंदामध्ये बाबा मृदुलाला बोलून गेले ,'आज तु तुला हवं ते माग मी नक्की देणार !' मृदुला ने संधीचा वापर करून घ्यायचं असं ठरवले , ती लगेच बाबांना बोलून गेली 'मला पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये जाण्याची इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा '! बाबांनी हि तिला बोलल्याप्रमाणे पुढे होकार दिला .
दुस-याच दिवशी मृदुला तिच्या बाबा बरोबर शहरामध्ये पोहचली . दोघांनी मिळून सर्वच कॉलेजमध्ये चौकशी केली आणि शेवटी दोघांनी मिळून एका कॉलेजची निवड केली . आता रोज रोज गावातून शहराकडे प्रवास करून मृदुलाचा जास्तीत जास्त वेळ प्रवासामध्येच जाणार आणि याचा परिणाम तिच्या अभ्यासावर होणार हे बाबांना माहित होते म्हणून त्यांनी तिची राहण्याची सोय सुध्दा कॉलेजच्या बाजुलाच केली . पहिल्यादांच मुलगी आई-बाबांपासून आणि गावापासून लांब जाणार होती याची घरी चिंता होतीच पण मुलीचे स्वप्न ,जिद्द ही तितकीच महत्वाचे होते .
काही दिवसामध्येच कॉलेज सुरू होण्याचे समजले म्हणून मृदुलाला आता शहरामध्ये यावे लागले . आता पासून मृदुलाचा आयुष्यातील खरा प्रवास सुरू झाला होता . आता पासून प्रत्येक अडचण एकटिलाच दूर करायची होती .मृदुला हवं तसं राहता येणार म्हणून खुश होती पण काही अडचणी येतील का ? या विचाराने घाबरून हि गेली होती . मृदुलासोबत कॉलेज मधील काही मुली राहत होत्या पण कॉलेज मध्ये त्यांचे विषय वेगवेगळे असल्यामुळे त्या काही सोबत नव्हत्या . मृदुलाला कॉलेज नंतर क्लास पर्यंत चा प्रवास हि एकटीलाच करावा लागत होता . सर्व नवीन असल्यामुळे मृदुलामध्ये भिती होती . याच भितीमुळे मृदुलाला सतत काही प्रसंगाना सामोर जावे लागत होते . त्यामध्ये एक मुलगी म्हटलं की हे होणारचं ,सहन करावं लागणार आणि हे घरी सांगितल तर आपल्याला शिक्षण सोडून पुन्हा गावी जावे लागेल असे विचार ती करत स्वतःला समजवत असे .
शेवटी मृदुलाची भिती आता सतत तिच्या आजुबाजूला वावरू लागली होती . कॉलेज मधून क्लास पर्यंत अर्धा तास अंतर होते. मृदुला आजुबाजूला बघत अगदी छोट्याशा गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीचे ती निरीक्षण करत असतं, त्यामध्येच तिचा वेळ जात असे . असेच एकदा नेहमी प्रमाणेच मृदुला कॉलेजचे लेक्चर संपल्यानंतर क्लास मध्ये जाण्यासाठी निघाली . पण आज तिला वेगळ जाणवत होत . कॉलेजच्या गेट बाहेर पडल्यापासून कोणीतरी पाठलाग करतयं अस तिला जाणवत होत . ती नेहमी प्रमाणेच आजुबाजूला बघत होती कोणी दिसतय का ? पण तिला कोणी दिसत नव्हतं . यामध्ये ती क्लास पर्यंत पोहचली कधी हे कळलचं नाहि तिला . असे सतत 3 ते ४ दिवस होत होतं . मृदुलाची भिती वाढत जात होती .
पावसाचे दिवस होते, त्या दिवशी पावसाचा जोर वाढत चालला होता . मृदुला घाई घाई मध्ये क्लास साठी निघाली तितक्यात तिच्या छत्रीला मागून सतत काहीतरी लागत असल्याचे तिला जाणवले, म्हणून तिने मागे वळून बघितले आणि ईतके दिवस मनात येणारी भिती तिच्या समोर उभी
होती .मृदुला भितीने आणि थंडीने थरथरत होती , तिला काही सुचेनासे होत होते तितक्यात तिच्या कानावर आवाज आला ' मला तु खूप आवडतेस, मी कित्येक दिवस तुझा पाठलाग करत आहे ' . हे ऐकून मृदुलाला पळता भुई कमी झाल्यासारखे झाले . ती भानावर नव्हती तिला काही कळत नव्हते . आपण क्लास साठी निघालोय हे ही ती विसरली होती तितक्यात एक जोराचा हॉर्न कानावर आला आणि मृदुला भानावर आली . ती कस बसं क्लास मध्ये पोहचली पण तिला हे सर्व कोणालाच सांगता नाहि आले . तिला सतत आता काहीतरी भयानक होणार हे दिसत होते कारण समोर हे सर्व वाक्य बोलणारी व्यक्ति तिच्या वडिलांच्या वयाची होती . ती फक्त शरीराने क्लास मध्ये होती पणा मनाने , विचाराने ती अजूनही तिकडेच होती . मृदुलाला आता क्लास बाहेर पडण्याची हि भिती वाटत होती .( क्रमशः)

Share