Abhagi - 18 books and stories free download online pdf in Marathi

अभागी...भाग 18

आज शेवटचा पेपर मधू ला पेपर पेक्षा उद्या आपण साया ला भेटणार याच च जास्त टेन्शन आल होत..इतक्या दिवस ती वाट पाहत होती ..पणं तो दिवस जसा जवळ आला तसा तिचा जीव घाबरला होता.. एकटीने भेटायचं ठरवलं होतं तिने पणं तिचं धाडस होत नव्हत म्हणून तिने सायली व अनु ला ही सोबत न्यायचं ठरवलं.मधू कॉलेज मध्ये पोहचली ..सर्वांनी शेवटचा पेपर दिला पेपर छान गेला..मधू सायली व अनु ला घेऊन बागेत झाडा कडे गेली.

सायली : चला एकदाचे पेपर संपले ..टेन्शन संपले.. हुरे..आता पार्टी करायची.

अनु : हो ना ..आपण आजच पार्टी करू ना मधू?

सायली व अनु ने मधू कडे पाहिलं तर ती टेन्शन मध्ये दिसली..

सायली : ये मधू काय झालं ? पेपर तर संपले आता काय टेन्शन घेऊन बसली आहेस ?

मधू: सायली अनु तुम्ही विसरल्या ना ? उद्या साया भेटणार आहे.

अनु : अग हो ग पेपरच्या नादात विसरूनच गेलो सर्व.

सायली : अग मग काय होत ? तुलाच तर भेटायची इच्छा होती ना मग तुझी इच्छा पूर्ण होत आहे मग अजून टेन्शन का घेत आहेस?

मधू: यार सायली खरंच माहित नाही पणं माझं मन खूप घाबरल आहे ग..अस वाटत जसं काही तरी होणार आहे ..

अनु : ये मधू काही ही काय विचार करतेस..पहिल्यांदा भेटणार आहेस ना म्हणून तुला तस होत असेल..होय ना सायली ?

सायली: हो अनु बरोबर बोलतेय मधू,आणि आम्ही आहे ना तुझ्या बरोबर.

मधू: सायली आणि अनु प्लीज एक हेल्प करा ना .

सायली : प्लीज कशाला बोलतेस मधू आपण फ्रेण्ड्स आहे आणि तुझ्या साठी काही पणं ..सांग ना .

मधू: तुम्ही दोघी ही चला ना माझ्या सोबत..तुम्ही थोड दूर थांबा मग साया भेटला ना तुम्ही ही या समोर ..मग तेव्हा आपण मिळून पार्टी करू .

अनु : बर ठीक आहे ,आम्ही येतो तुझ्या सोबत कुठे भेटणार आहे तेवढ सांग.

मधू: हो आज साया नी सांगितलं की मी तुम्हा दोघींना फोन करून सांगेन ..मग आपण सोबत जावू .

सायली: ओके ठीक आहे ..आता तरी थोड हास ना बाई..किती ते टेन्शन ?

त्यावर मधू हसते..मग तिघी ही घरी जाण्यासाठी वळतात च की तो पर्यंत विराज त्यांच्या कडे पळत येतो..

विराज : कसे गेले पेपर तिघींना ही ?

तिघी ही छान म्हणून सांगतात..

विराज : मधू ,मला तुझ्या सोबत थोड बोलायचं आहे .

मधू: हा बोल ना.

विराज : थोड बाजूला येतेस का ?

मधू : अस काय बोलणार आहेस ? आणि सायली आणि अनु माझ्या बेस्ट फ्रेन्ड स आहेत त्यांच्या समोर बोलू शकतोस तू ..बोल इथेच.

मग विराज चा नाइलाज होतो ..तो नोट बुक मधलं लाल गुलाबाच फुल काढतो व मधू समोर धरून बोलतो.

विराज : मधू..मला तू खूप आवडतेस..आज पर्यंत मी खूप मुलींशी फ्ल रट केलं पणं ..आज मी खर बोलतोय..माझं तुझ्या वर प्रेम आहे..i love you Madhu.

मधू,सायली अनु तिघी ही शॉक होतात ..विराज अस काही बोलेल याचा विचार तिघींनी ही केला नव्हता ..आणि मधू ला ही काय बोलावं कळेना ..

विराज : बोल ना मधू काही तरी..

मधू : सॉरी विराज .. खरंच तू चांगला आहेस पणं मी तुला नेहमी फ्रेन्ड च समजलं .. तुला नक्की कोणी ना कोणी चांगली भेटेल.. पणं मी नाही रे..तुझी ती खास व्यक्ती.

मधू इतकंच बोलली आणि विराज तिथून काहीच न बोलता निघून गेला ..त्याला खूप वाईट वाटलं..मधू ला ही आपण विराज ला दुखावलं म्हणून दुःख झाल होत पणं तिचं प्रेम साया वर होत ..हे तिने विराज ला सांगितलं नाही कारण अजून तिलाच माहित नव्हत तो कोण आहे..शेवटी तिघी ही घरी गेल्या.