Nakaltacha Pravas - 1 books and stories free download online pdf in Marathi

नकळतचा प्रवास - भाग 1

ही गोष्ट आहे अश्या वैक्तींची ज्या नकळत आपल्या आयुष्यात येतात आणि आपलेसे होऊन जातात......चला तर सर्वात आधी भेट करून घेऊया आणि सुरवात करूया आपल्या प्रवासाला........


बारावीच्या सुट्टट्या संपल्या होत्या.....आज कॉलेजे मुल मूली खूप खुश होत्या...आज नंतर एक नवीन प्रवास सुरू होणार होता. आज त्यानेचे 12 वी चे रिझल्ट आणायला सगळे चाले होते. या नंतर ते सगळे वेग वेगळया कॉलेज मध्ये वेगवेगळ्या कोर्सेस ला जाणार होते आपले काही मित्रमैत्रिणी सुटणार होते पण नवीन मित्रमैत्रिणी मिळणार ही होते. ही पाहा ही चले न ती मानवी दिसायला सुंंदर, बोलायला गोड, तशीच मनाने मायाळू, शांत स्वभवाची, सगळ्यांना समजून घेणारी,. अभ्यासात एकदम हुशार, middle क्लास कुटुंबातली मुलगी......
"मनु थांब अग येऊदे मला किती जोरात चालते" आली पाहा ती रुद्रा मानवी ची मैत्रीण नुसती मैत्रीण नाही हा जिवलग मैत्रीण.....रूद्रा दिसायला मधेम ,तडकाफडकी बोलणारी, बिनधास्त राहणारी, जशाच तसा तिचा स्वभाव होता, अभ्यासात बरी....तिचे वडील पोलीस होते त्यामुळे का काय पण ही रुद्रा अशी एकदम बिनधास्त गर्ल झाली होती....

मानवी रुद्राला: " तू चल न जरा जोरात किती हळू चालते बसची वेळ झाले चल की लवकर.....रुद्रा:" कशाला टेन्शन घेतेस आपली सिद्धी आहे की बस थांबवायला😁, आणि आता तरी कशाला टेन्शन घेतेस झाले दिवस संपले अता आपले या कॉलेजचे अता कोन नाही बोलणार उशिरा गेलं तरी ".....मानवी:" बघा तरी किती खुश होते ही.."
आता ही सिद्धी कोण?............ विचार करताय का?....सिद्धी ही दिसायला गोळूमोळू , नेहमी फक्त खाण्याचा विचार करणारी, नेहमी हसरी, मनमिळाऊ स्वभावाची, कुठलीही गोष्ट समजून घ्यायला जरा वेळ लावणारी, अभ्यासात जरा कची..तिच्या वडिलांचं हॉटेल होत त्यांच्याच कॉलेजच्या बाजूला.....
मानवी:" आली ग बस ऋद्रा चल"... सिद्धी:" या जागा ठेवले तुम्हाला बसा इथे" ....
मानवी:" बर ठरवलं का कोणाला कशाला addmission घ्यायचे ते ...... रुद्रा:"लक्षात ठेवा काही झालं तरी आपल्याला एकच कॉलेज मध्ये एडमिशन घ्ययचंय बर"...... सिद्धी:" हो हो तुम्ही नसल्या तर काय होईल माझ"🤔..... नको रे बाबा .....आपण एकच कॉलेजला जाऊ...." मानवी:" हो ग एकच कॉलेजला जाऊ पण तरी कशाला एडमिशन घ्यायचं हे ठरलच पाहिजे न" रूद्रा रुद्रा:" पाहू रिझल्ट भेटल्यावर "...सिद्धी:" चला कॉलेज आल.".....चला आधी हॉटेल वर नाश्ता करू न मग जाऊ"... ऋद्रा" झालं मॅडम च चालू " सिद्धी रुद्रा कडे रागाने बघते रुद्रा:" नको जास्त डोळे वटारू चल" सिद्धी:" बाबा आम्हाला नाश्ता द्या" सिध्दी चे बाबा:" आल्या का तुम्ही बसा सांगतोच..." त्या नाश्ता करतात आणि रिझल्ट घ्यायला जातात....

कॉलेज मध्ये सर सर्वांना एका क्लास मधे बसायल सांगतात. ह्या रुद्रा सगळ्यात आधी जाते न पाहिल्या बेंचवर बसते पण मानवी आणि सिद्धी बसायच्या आधीच एक मुलगी तिथं बसते... रुद्रा (रागात):" आयय केते उठ इथून, मी आधी बसले इथ " ती मुलगी:" नाय उठणार जा काय करशील" रुद्रा: शिःस्तित सांगते उठ" ती मुलगी " नाय उठणार जा!!!!" रुद्रा ने खरच रुद्र रूप धरण्या आधीच मानवी पुढे येते मानवी:" सोड रुद्रा कशा हिच्या नादी लागतीस चल आपण तिथे बसू.... रुद्रा" पण का....."तीच बोलणं संपण्या आधीच मानवी " चल कशाला हिच्या मुले तुझा शेवटचा दिवस वाया घालवते चल" अस बोलू त्या तिघी दुसऱ्या बेंच वर बसतात.
आता ही मुलगी कोण ही केतकी जीच कधीच त्या तिघिंशी जमलं नाही आणि त्याच कारण ही होत ते कळेलच.....
थोड्याच वेळाने सर क्लास मध्ये येतात...कॉलेज चे काही दिवस काही आठवणी मुलांना सांगतात आणि त्यांचे रिझल्ट्स देतात.रिझल्ट घेतल की त्या परत सिद्धीच्या हॉटेल मध्ये जातात. त्या तिथे मस्त गप्पा मारत बसलेल्या असतात.तेवढ्यात एक मुलगा येतो " हाय.....घेतला का तुम्ही रिझल्ट आणि पुढचं काही ठरल का कुठे कशाला एडमिशन घ्याच ते ".... सिद्धी" नाही रे बघू आता घरी गेल्यावर काय ते...." रुद्रा:"मग तुझ ठरल का?" तो मुलगा:"अजून कॉलेजचं नक्की नाही पण डॉ.करायचे हे फिक्स आहे"....मानवी" चांगलं आहे मग" तेवढ्यात त्याला कोणी तरी आवाज देत आणि तो जातो.

आता हा मुलगा कोण ते सांगायचं राहिलं हा प्रबोध अतिशय हुशार मुलगा, दिसायला खूपच हँडसम.....सगळ्या कॉलेज मधल्या मुलींचा क्रॅश, कॉलेज मधल्या फक्त ह्या तिघी मुलीनं सोबत तो जरा बोलायचं कारण तो आणि मानवी आठवी ते दहावी एकत्र शाळेमध्ये होते....हो अजून एक राहिलं हेच ते कारण की केतकीच ह्या तिघी सोबत कधी जमलं नाही कारण तिला ही प्राबोध खूप आवडायचा पण तो तिने कितीही काही केल्या कधी तिच्याशी बोललाच नाही....आणि तिला नेहमी अस वाटायचं की प्रबोधला मानवी आवडते......तिलाच काय सगळ्यांनाच अस वाटायचं त्या तिघी सोडून...
नंतर त्या घरी जायला निघतात.
रुद्रा्:" आज संध्याकाळी माझ्या घरी या मग आपण पाहू पुढचं" मानवी:" ठीक आहे येतो".....
सध्याकली मानवी लवकरच रुद्राच्या घरी येते रूद्राच्या मम्मीने त्यांच्यासाठी नाश्ता आधीच बनवलेला असतो..... ती आल्या वर त्या दोघी रुद्रच्या रूम मध्ये जातात.रुद्रा:" ही सिद्धी अजून आली नाय तिला कॉल कर बर" मानवी:" अग येईलच मी यायच्या आधीच कॉल केलता तेव्हा ती निघालेली येतच असेल बघ" रुद्रा:" ठीके आहे " मानवी:" काय ग काही थरल का तुझ म्हणजे तुझे पप्पा मम्मी काही बोले का काही?" रुद्रा :" ते बोलेत तुला जे आवडेल ते कर .....आणि तुझ काय" ...मानवी:" तुला माहिती न मला डॉक्टरला च addmission घ्यायचे पण मला झालंय नंबर लागला पाहिजे कुटल्या चांगल्या कॉलेजला"

तेवढ्यात सिद्धी येते. सिद्धी:"काय चालायय तुमचं ....अरे वाा येवढं नाश्ता " आणि जोरात ओरडते " मावशी thank you" त्यावर मानवी आणि सिद्धी हसायला लागतात.....मानवी:" सिद्दू तुझ काय ठरलंय कशाला एडमिशन घ्यायचं..." सिध्दी:" विषयच नाही तू घेशील तिथं तुझ काय ठरलंय ते सांग "
रूद्रा:" तीच ठरलंय डॉक्टर ला तुझ काय मग"......मानवी:"पण नंबर लागला पाहिजे फकत " सिद्धी:" अरे जर तू अस बोलशील तर माझ का होईल...माझा कसा नंबर लागेल आणि मला तुमच्या सोबतच राहायचे."

मानवी:" हो हे ठीक आहे पण,अस चालणार नाही ..मी करीन आणि तूही तसे करशील. ,तुला काय सर्वात जास्त आवडते ते सांगा. " सिद्धी:"मला खायला आवडते." मानवी:"त्याशिवाय,तूला काय सर्वात जास्त काय आवडते आणि तुला कंटाळा ही येत नाही." सिद्धी:"काहीही नाही" रुद्रा :" मला माहित आहे" मानवी:"फाशियन डिझायनिंग".....मानवी:बरोबर. सिद्धी त्यांचे चेहरे पाहू लागतात.......मानवी:"मग तु तेच का करत नाही, फाशियन डिझायनिंग?" " सिद्धी:"मी" मानवी:"होय तूच. मग ठरल!!!!!!!" रुद्रा तुझ काय...." रूद्रा:" अग मला न इंजिीअरिंग करायचे माझ्या मावशीचा मुलगा करतो ते मी पाहिलंय त्याचे बुक्स आणि रूम भरी केलंय आणि त्याला विचारल की बोलतो की जे आम्हाला शिकवतात तेच मी घरी ट्राय करतो म्हणून मला पण तेच करायचे " मानवी:" चांगलं आहे मग तुझ एकदम ठरलंय आता फक्त आपले सगळ्यांचे addmission एकाच कॉलेजला झाले म्हणजे झाल." सिद्धी:" हो ना ते मेन आहे".... रूद्रा:" मी माझ्या ताईला विचारलेला तर ती म्हणाली होती की मुंबईला एक कॉलेज आहे तिथे डॉक्टर आणि इंजिीअरिंग एकच कॉलेज मध्ये आहे आपण तिथे ट्राय करू आणि काही कॉलेज आहेत जे जवळ जवळ म्हणजे जरी आपण एका कॉलेज मध्ये नसलो तरी किमान जवळ असू न." मानवी:" हा चला मग फॉर्म भरू" त्या फॉर्म भारतात आता 7 दिवसांनी पहिली लिस्ट लागणार होती.....

बघू आता काय होत 7 दिवसानंतर......
तोपर्यंत तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा....छोटासा प्रयत्न केलाय त्यात काही चूक झाली असेल तर माफ करा आणि मला माझी चूक सांगा म्हणजे पुढच्या वेळेस ते टाळता येईल.......नक्की वाचा आणि कसं वाटलं ते सांगा......परत भेटू पुढच्या भागात😊