Mysterious taxi - 2 in Marathi Horror Stories by Manini Mahadik books and stories PDF | एक टॅक्सी-दोन प्रवासी - अंतीम भाग

एक टॅक्सी-दोन प्रवासी - अंतीम भाग

विचार करण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते.आपण कुठल्या षडयंत्रात तर अडकवल नाही ना?का कुठलं चेटूक वगैरे झालंय आपल्याला?,असे ना ना विचार त्यांच्या मनात येत होते.अन श्वास कोंडल्यावर ज्याप्रमाणे श्वास घ्यायला माणूस धडपड करतो अगदी तसाच प्रयत्न ते वाट शोधायला करत होते,पण दरवेळी एकमेकांसमोरच येत होते.जणुकाय एकाच ठिकाणी गोलगोल फिरत होते.दमून गेल्यावर दोघेही एका जागी बसले.


जतीन: मला टॅक्सी ड्राइवर चा चेहरा पूर्णपणे आठवतोय रे,अन तो महाराजांचा चेहराही.हां, तो महाराज ओळखीचा नव्हता पण त्याखाली काहीतरी लिहिलं होतं,आठवतंय का तुला?


जोसेफ: मी नाही पाहिलं.


जतीन: हा आठवलं, तिथं लिहिलं होतं 'मला मुक्ती दे'. काय बरं अर्थ असेल त्याचा?अन आता आपण इथून बाहेर कसं निघणार?


जोसेफ: थोडा वेळ वाट पाहूया,कदाचित स्वतःहून काहीतरी घडेल.


जतीन: मलाही तसच वाटतं.


जतीन तंद्रीत हरवला.दुपार टळून गेली पण त्याच्या पोटाने त्याच्या मेंदूला भूक लागलेलं कळू दिलं नव्हतं. जतीन व्यापारी होता,हुशार होता.विचार करत करत तो जोसेफ ला न्याहाळत होता,

जतीन:(स्वतःशीच पुटपुटला)-कमाल आहे ना,कालपर्यंत हा कुठे होता,कोण होता आपल्या आयुष्यात?त्याचं येणं हा खरंच योगायोग असेल का?अन तो म्हणतोय की तो घाटाच्या पुढे थांबलेला मग तो तर पाठीमागून चालत आलेला माझ्या.

अरेच्चा! हे माझ्या लक्षात कसं आलं नाही.बुडत्याला ओंडक्याचा आधार भेटला पण बुडत्याला ओंडका जिकडे जाईल तिकडेच जावं लागतं.

जतीन ला वाटलं हे सगळं जोसेफच घडवून आणतोय.जोसेफ ला केंद्रस्थानी ठेवलं तर हीच शक्यता जास्त होती.

एकदम त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला.अन तो जवळ जवळ ओरडलाच(मोठ्याने)-हे कसं शक्य आहे?

जोसेफ धावतच त्याच्याजवळ आला.जतीन एवढा का दचकला म्हणून त्याच्या पाठीवर हात ठेवला तसं जतीन ने खांदा झटकला अन त्याच्यापासून दोन हातावर सरकला.

असेल काहीतरी म्हणून खांदे उडवले अन दुसरीकडे तोंड केलं.


मघाशी जतीन चमकला कारण त्याला जोसेफच्या अन ड्राइवर च्या चेहऱ्यात बरंच साधर्म्य वाटून गेलेलं.किंबहुना तो ड्राइवर म्हणजे दाढी मिशी लावलेला जोसेफच होता असंही वाटून गेलेलं.पण असा वेड्यासारखा विचार करण्यात काही अर्थ नव्हता.कारण एकाच वेळी एक माणूस दोन अवतारात कदापि अशक्यच. अन घाटात जोसेफ पाठीमागून आल्यासारखं वाटलं असेल कारण की मीच कदाचित उलट दिशेला तोंड करून थांबलेला असेल.शेवटी सगळा अंधाराचाच खेळ होता.

हे कोडं तर सुटलं होतं पण मग काय बरं असेल हे कोड?

जतीन चक्रावून गेला.परत जोसेफशेजारीच जाऊन बसला.


जोसेफ: मला तर वाटतं हे स्वप्नच आहे बहुधा,करण हे सत्य असलं असतं तर आपल्याला हानी पोचवण्यासाठीच घडत असतं; पण तसं अजून काहीच घडलेलं नाही.उलट माणसं सोडली तर इथं मनासारखं शांत वातावरण भेटलंय.


जतीन: ए बाबा,माझा काही इथे राहण्याचा विचार नाहीय,एकतर पोटात कावळे ओरडत आहेत अन दुसरं म्हणजे जनावरांची अन घराची काळजी वाटत आहे.


दोघांनी मनोमन आपापल्या इष्टाना प्रार्थना केली अन अजून काही बाही साकडे ही घालून झाले पण कुठला चमत्कार नाही वा कुठली विपदा नाही.

रात्र झाली.दोघेही भुकेने व्याकुळ होऊन झोपी गेले.रात्रभर कुठलीच हालचाल नव्हती.

सकाळ झाली अन परत एक दिवस कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना पडला.जतीन ने सहज वरती पाहिलं. आकाश निरभ्र होतं

अगदी लोभस.त्याला पाहत पाहत अंतराळाचा बिंदू गाठावा अन बेंबीच्या देठापासून ओरडून लोकांना आम्हाला इथून बाहेर काढा असं ओरडावसं वाटलं.पळ दोन पळाचा वेळ गेला असेल तोवर एक टपोरा थेंब त्याच्या कपाळावर पडला.पाठोपाठ दुसरा, तिसरा अन एकदम शिंतोडे पडायला लागले.तसं आजूबाजूची झाडी मागे मागे सरकत असल्याचं त्याला जाणवलं.मान वळवली तर एकाएकी रोड ही दिसायला लागला.त्याच्या जवळच असणाऱ्या जोसेफ ची ही तीच अवस्था.आता तर लोकही स्पष्ट दिसायला लागले.ओळखीचे चेहरे दिसायला लागले तसे दोघे परत हे स्वप्न का खरे या प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले.

आता दोघांनाही पूर्ण जागे झाल्यासारखं वाटलं. जरा जीवात जीव आला.आपण इथून परत जाऊ का नाही ही आशाच नाहीशी झाली होती.त्याची बायको जवळ आली आणि म्हणाली टेम्पो ड्रायव्हर मुळे तुम्ही इकडेच असाल असं कळलं.फोन तर लागतच नव्हता पण रोड जवळ दोन गाड्या सापडल्यामुळे पोलिसांनी कसून तुमचा शोध घेतला तेव्हा सापडलात आत झाडीत.जोसेफ च्या घरच्यांचीही तीच प्रतिक्रिया.पाठोपाठ पोलिसांचा गोंधळ ऐकू यायला लागला.accident झालेली एक टॅक्सी ही सापडली होती अनपेक्षितपणे. ट्रकमध्ये चढवलेली टॅक्सी पाहताच दोघे चमकले,मूक नजरेने एकमेकांकडे पाहिले. जतीन ने धाडस करून एकजनाला विचारले-किती दिवसांपूर्वी झाला असेल हा एक्सीडेंट?तो इसम उत्तरला - साधारण सहा एक महिन्यापूर्वी झाला असेल. तेव्हा पासून काहीच थांगपत्ता लागत नव्हता टॅक्सीचा.आता मात्र त्यांची त त प प चालू झाली कारण आता त्यांना टॉक्सिवरचा ड्राइवर ओळखीचा ही वाटलेला.

"अन त्याचा ड्रायव्हर ?" घाबरत जोसेफने विचारले.

इसम- त्याचा फक्त सांगाडा सापडला

आता मात्र दोघे घामाघूम झाले आणि परत बेशुद्ध पडले. त्यांना दवाखान्यात नेलं गेलं.एका विलक्षण प्रवासातला साथीदार आता पूर्णार्थाने ओळखीचा झालेला होता. दोघांनीही एकमेकांचा प्रेमाने आणि काळजी घे च्या भावात निरोप घेतला. जोसेफ घरी निघून गेला आणि जतीन ने टॅक्सी मागवली.त्याची बायकोही सोबत होतीच.घराकडे जाताना वाटेत त्याला सगळ्या गोष्टींचा अर्थ लागला की त्यांनी जे अनुभवलं ते फक्त स्वप्न नव्हतं तर एका सत्याच्या शोधात कळत-नकळतपणे लावलेला हातभार होता. त्या दोघांना शोधत-शोधत तिथवर कुणी आलं नसतं तर कदाचित अजून कित्येक दिवस ती टॅक्सी अशीच जगापासून दूर राहिली असती.टॅक्सिवर लिहिलेल्या 'मला मुक्ती दे' या ओळीचा अर्थ त्याला आता उमगला. घर आल्यावर तो उतरला,आणि टॅक्सीचे पैसेही दिले.एका कोड्यातून सुखरूप सुटका झाली म्हणून निःश्वास टाकुन पाठमोऱ्या टॅक्सिकदे पाहिलं अन तो पाहतच राहिला.

तीवर लिहिलं होतं "धन्यवाद मुक्ती मिळाली"..Rate & Review

Bharat Deshmukh

Bharat Deshmukh 2 months ago

Swara bhagat

Swara bhagat 10 months ago

shabda kami padtil, vachtana katha samor ghadte asach vatla.......khup chan Must read😀😀

Manini Mahadik

Manini Mahadik 11 months ago

Karuna

Karuna 11 months ago

Nikita Nik

Nikita Nik 11 months ago