Mhatarapan - 1 books and stories free download online pdf in Marathi

म्हातारपण - 1 - निपुत्र



रस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्यात अडचण निर्माण होत असे. वर्गात तात्या मुलांना शिकवत होते. तात्या इतिहासाचे पदवीधर इतिहास हा विषय जितका त्यांच्या आवडीचा होता. तितकेच तेही मुलांना आत्मीयतेने शिकवत . तात्यांचा ज्या ज्या वर्गात पिरियड असायचा त्या वर्गातील मुलांची इतिहास या विषयातली गोडी वाढत होती. तात्यांना शिकवत असतांना मनोरंजन खूप असायचे हास्य कालोंळ हीं कमी नसायचं.. आज मात्र तात्यांना थोडं अस्वस्थता जाणवत होती. तरीही शिकवत होते. मुलांचं नुकसान होईल . शेवटचा पिरियड आहे अजून दहा पंधरा मिनिट शिकव्वायचं मग हालगरजी कशाला .. तात्या या मतावर ठाम होते. तात्याच्या लग्नाला बारावर्ष होऊन गेले. तरीही घराच गोकुळ झालं नाही. तात्याच्या सौं मालती ताई यांना लहान मुलांचं खूपच आकर्षण गल्लीतली लहान मुलं खेळत असली, कीं मालतीताई तासांनंतास त्यांना पाहत बसत. त्यांचं हसणं, बोलण, खोड्या कारण हे सारकाही पाहणे म्हणजे सुखाचा क्षण असायचा. मालती ताईच्या घरी पाळणा हलवा देवाने आपली इच्छा पूर्ण करावी अशी मनोमन इच्छा होती. त्यासाठी अनेक हॉस्पिटलचे दरवाजे झीजवून देखील त्यांना यश आलं नाही . गावातील काही जानकार म्हातारी माणसं त्यांना धीर देत. अजून कुठे तुझं वय झालं. होतील मुलं .. मुलं काही काहीना उशिरा हीं होतात . आणि सोबत एखाद उदाहरण देऊन टाकत. माझ्या माहेरी एक कुटुंब होत. त्यांना चक्क विसवर्षाने मुलं झालं त्यांनीतर अशाच सोडली होती. होतील मुलं एव्हड मनाला लावून घेऊ नये .

मालती ताईचा रोज कोणता न कोणता उपवास असायचा देवाला एकच मागणी देवा लवकर माझी कूस उजळू दे .. मला हीं आई व्हायच आहे.

त्यामुळे मालती ताईची तबियत खराब होत.. सारखं एकच विचार आई केव्हा होणार. एक दिवस चतुर्थीला मालती ताईंना चक्कर आले आणि घरात पडल्या दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर .. हातात सलाईन लावले . समोर आई बसली होती . काही वेळ काहीच समजलं नाही नक्की काय झालं.

तीन दिवसांनी तात्यानी मालतीताईला माहेरी पाठवून दिले.

त्यांवेळी आतासारखे फोन नव्हते. पत्र पाठवलं कीं खुशाली समजत असे.

अधूनमधून तात्या किंवा मालती ताई खुशालीचे पत्र पाठवत .. असे मात्र एकही पत्रात तात्यानी मालती ताईंना येण्यासाठी गळ घातली नाही. असेच दिवस निघत होते. माहेरी अंगारे धुपारे करून झाले. मालती ताई आता ठणठनित होत्या. माहेरी काहीच्या तोंडून ऐकू येत मुलंबाळ झालं नाही म्हणून नवऱ्याने टाकून दिले . मुलं झालं नाही ततर वंशावळ कशी वाढेल.. अश्या होणाऱ्या कूजबुजला मालतीताई वैतागल्या होत्या

माहेरी देखील त्यांची ससेहोलपट होत होती.

अखेर तात्याना पत्र लिहिलं .. शक्य तेव्हद्या लवकर घेयला यावे .""!

तात्याचे हालहीं वेगळे नव्हते. मालतीताई गेल्यापासून सारकाही हातानेच करावं लागत होत.

आता तर तात्या हॉटेलमधेच जेऊ लागले. मालती ताईच्या हातची चव म्हणजे अन्नपूर्णा.. !

तात्यांना आठवण आली .. निघावं आणि घेऊन यावं .. आता तस करता येत नव्हते. घरातून प्रेशर वाढत चालला होता. आई आणि अण्णा चे मत होते कीं मालतीला डिव्हर्स द्यावा. आणि दुसरं लग्न कराव. मालती ला मुलं होणार नाही "!आणि कितीदिवस अस वाट पाहणार आहेस. लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा. लग्नाला पंधरा वर्ष झाले घराचं गोकुळ झालं नसलं तरी मन गुंतली होती . तात्यासाठी मालतीताई शिवाय जगणे किंवा मग दुसऱ्या लग्नाचा विचार करणे दोघेही प्रकरण अशक्य होते. तात्याची घालमेल वाढत चालली होती.

तात्यांना पत्र पाठवून दोन हप्ते होऊन गेले.मालतीताईची शंका वाढू लागली . पत्र पोहचल असेल का ? मग त्यांनी उतर कळवायला हवं होत. आतापर्यंत असं कधी झाल नाही. या वेळी काय कारण असेल.?? असे विविध प्रश्न सतावू लागले.

रात्रीचे तीन वाजले तरी मालतीला झोप येत नव्हती. सकाळी पोष्टऑफिस मध्ये जाऊन यावं पत्र तात्याना मिळाले कीं नाही. खातरजमा करावी.

तात्याचे काका काकु आले होते. सकाळी बैठक झाली मालतीला फरकती देऊन तात्याने दुसरं लग्न कराव. सोबत मुलीचा फोटो हीं आणला होता. शेवटी तात्याने स्पष्ट केल मी पुनः लग्न करणार नाही. मालतीला फरकती देण्यास हीं तयार नाही. जर मालतीला माझ्या सोबत राहायची इच्छा नसेल . तर मालतीला रीतसर फरकत देईल. मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करू नये.

मालतीताईना माहेरी येऊन सहा ते सात महिने झाले . मुलीला किती दिवस असं माहेरी ठेवायचं.. गुणाजी अण्णा मालतीला सासरी घेऊन निघाले.

मालतीच्या आयुष्याची फरपट बघवत नव्हती. डोळे मिटन्या आधी तिच बाळ कडेवर खेळवाव.. हीं अशा निराशेत विलीन होत गेली.

तात्याना मालतीला पाहून आनंद झाला… तात्या आणि मालतीचे जीवन अनेक नगमोडि वळणाच्या रस्त्याने गुरुफाटलं होतO.

त्यात तात्याची बदली झाली नागपूर शहरात .. दुसऱ्याच दिवशीच तात्या शाळेत हजर झाले.

नागपूरच वातावरण मालतीताईला मानवल तबेत सुधारली काहीप्रमाणात तरीही मनाचा खाली कोपरा आजही रिकामाच होता.

मालतीताईच्याच ओळखीतल नातेवाईकाच मुलं आपण सांभाळू त्याला मोठ करू हा विचार तात्याला योग्यच वाटला .

मे महिन्यात कडक उन्ह पडल होत. अंगाची लाहीलाही होत होती. दोघेही नागपूरहुन निघाले .

तीस किलोमीटरचा प्रवास करत . त्याच्या घरी पोहचले . सर्व आदरतिथं झालं . मुलाला पाठवण्यास तेही राजी झाले. सगळं आवरू रात्रीच्या गाडीने नागपूरला आले. आज मालतीताई खूपच खुश दिसत होती. ममता ओसंडून वाहत होती. तात्या हीं मालती ताईच्या चेहऱ्यावर उमटनारे .. भाव जपूनच ठेवत होते.

संसाराला सुखाची पालवी फुटू लागली.. प्रत्येक क्षण आंनद आणि समाधान घेऊन आला. जगन सरस होऊ लागलं.

कुणालच्या सहवासात चार वर्ष कधी संपले कळलेच नाही.. तात्याहीं रिटायर झाले होते. शाळेत त्यांचा निरोप समारंभ थाटात पार पडला.

आणि काहीच दिवसात पुन्हा दुःखाचे वारे वाहू लागले. कुणाल आपल्या गावी परत गेला.. तात्याचा भाऊ प्रॉपरटीसाठी भांडू लागला . .. सतत दगग होऊ लागली .. तात्याना हार्टअट्याक आला. तात्या हॉस्पिटलमध्ये icu त होते. सर्व जबाबदारी मालतीताईवर येऊन पडली. मालतीताईनी खूप काळजी घेतली. तात्या बरे होऊन घरी आले.

मालतीताईंना कुणालचा खूप मोठा आधार होता. कुणाल गेल्यापासून घर जाणू निर्जीव झालं होत. मालतीताई मोठा पेच मध्ये अडकली गेली . इकडे तात्या तिकडे कुणाल ""! कुणालला पुन्हा घेऊन यावे अशी इच्छा व्यक्त केली.., होती. तात्याचे भाऊ वाद घालत.. पुढे चालून प्रॉपर्टीचा हक्क कुणाला कडे असेल. त्यांना तस होऊ द्यायचे नव्हते . तर इकडे तात्याना आजाराने त्रस्त केलेले..

मुलं दत्तक घेणे जमणार नव्हते. आधी वेळ होता. तेव्हा आपल्याला मुलं होईल .. म्हणून वर्ष वाट पाहण्यात निघुन गेले.

आता कुठलाहीं धाडसी निर्णय घेण्याच सामर्थ्य उरलेलं नव्हतं. गरज पडली तर शेजारी राहत असलेली माणसं मदत करायची.

तात्या आणि मालतीताईचे एकमेकांवर खूप प्रेम. आणि श्रद्धा असल्याने स्वतःला भाग्यवान समजत.

तात्याना कोणी निपुत्र किंवा मालतीताईंना वांझ म्हटलं तरी आता फरक पडत नव्हता. जे आपल्या नशिबात नाही. त्याचा विचार करून दुःखी होणं सोडलं होत. हातात आहेत जितके दिवस आयुष्य आनंदात जागून घेऊ.. पुढच पुढे बघू.. !

आणि तात्याची तबियत खालावत गेली.. गेली दोन महिने तात्या बेडवर पडून होते. आस्थमा, हार्ट, तसंच हर्नियाच ऑपरेशन झालं होत. तात्याकडे खूप कमी दिवस उरले .. होते. तात्याच्या काळजीने मालतीताईची तबेत खालावत गेली.

एका दिवशी तात्याना पुन्हा अट्याक आला..हॉस्पिटल मधें नेण्यात आले. दोन दिवसांनी तात्याची प्राणजोत मावळली..

मालतीताईना विश्वासात घेऊन .. दिराने सर्व प्रॉपर्टी नावे करून घेतली. दीड वर्ष मालतीताई आपल्या गावी होत्या.. नेहमी अस्वस्थ राहत असत. चीडचीड खूप वाढली होती . तात्याशिवाय जगणे अशक्य होते.

तात्याच्या आठवणी सोबतीला घेऊन जगणं सुरू होत. तबेत आणि मानसिक आरोग्य ढासळत गेलं .

भाऊ माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. त्याला जेव्हा कळल प्रॉपर्टी केव्हाच दीराच्या नावे झाली .. बाजारात जाण्याचा बहाणा करून गेला. तो पून्हा आलाच नाही.

जीवन जगत पैसा आणि माणसं दोघेही महत्वाचे..

असं असल.. मरणाच्या दारात उभे असताना कधी पैसा बाजी मारतो तर कधी माणुसकी "!

आज पैशाने बाजी मारली होती. सकाळीच फोन वाजला .. कुणाल अजून झोपलाच होता. सकाळ केव्हाच झाली . अजूनहीं लोळत होता. अंग जड झालं.. भारीपण जाणवत होत. काही प्रमाणात अस्वस्थता ..

दोन वेळा रिंग वाजून बंद झाली.. रिंगचा तो कर्कश आवाज.. मूड ऑफ करत होता.

रागात एक शिवी ढासली .. भेंचोत ""! कोणाला कंड आलाय आज..

फोन कानाला लावला..

मालतीताई गेल्या…?""!!!

कुणालचा विश्वास बसेना काय ऐकतोय आपण. !

कुणाल जाऊ शकला नाही. खूप दुःख झालं रडला.. स्वतः ला कोंडून घेतलं.

जग हे व्यवहारी आहे. कोणाला कुणाचं काय घेणं.. असच काही झालं.

कुणालचा आवाज बंद दाराच्या आत .. बंदिस्त राहिला.. कायमचा …….."!!

©®