Janu - 15 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 15

जानू आणि समीर ची चांगली मैत्री झाली होती..समीर जानू ची खूप काळजी घेई ..एकदा जानू आजारी होती ..तरी कॉलेज ला आली होती .पणं क्लास रूम बाहेर आली नाही ..समीर च आज तिच्या क्लास रूम मध्ये जातो ..पाहतो तर लेक्चर नसतो ..आणि जानू डेस्क वर झोपलेली असते ..तिचा चेहरा खूप कोमेजून गेलेला असतो.समीर समिधा ला विचारतो तिला काय झालं आहे ? समिधा सांगते आजारी आहे .मग ही कॉलेज ला का आली ? तो समिधा सोबत बोलत च असतो की जानू त्याला पहाते आणि कोमेजलेल्या चेहऱ्याने एक हलकीशी smile करते .समीर मात्र काळजी घे अस म्हणून निघून जातो.कॉलेज मध्ये जास्त बोलणार तरी काय ?पणं त्याला जानू चा राग आलेला असतो . तिच्या शी बोलायचं नाही असच तो ठरवतो पणं त्याला जानू चा उदास चेहरा आठवतो आणि तो तिला मॅसेज करतो.

समीर : हॅलो

जानू : hmm

समीर: कशी आहेस ? तब्येत कशी आहे ?

जानू : ठीक आहे ..आता थोड बरं वाटतं आहे

समीर : डॉक्टर कडे गेली होतीस का ?

जानू : हो ,दुपारीच ..औषध ही घेतलं आहे ..उद्या पर्यंत होईन ठीक .

आता मात्र समीर थोडा जास्तच रागात येतो.

समीर : आजारी आहेस आणि कॉलेज ला कशाला आलीस ? इतकी अभ्यासू कधी पासून झालीस ? स्वतः कडे ही थोड लक्ष देत जा .

जानू ला वाटत झालं याच चालू आला राग ..राग तर याच्या नाका वरच असतो ..खडूस कुठला .आजारी माणसाला तर प्रेमानं बोलावं पणं नाही हा काही सुधारणार नाही.

जानू : आजारी माणसाला अस बोलतात का ?

समीर : मग कस बोलतात ?

जानू : अरे थोडा धीर द्यावा प्रेमानं बोलावं ..तुझ्या अशा रागाने तर माणूस अजून आजारी पडेल की .

समीर : ये .ते प्रेमानं बोलणं बिलना मला नाही जमत मी असाच आहे आणि असच बोलता येत मला

जानू : बर

आता या वर काय बोलणार बिचारी बसली शांत .

समीर : काळजी घे आणि वेळ वर औषध घे आणि कॉलेज ला येऊ नकोस पूर्ण बरी होई पर्यंत.

जानू : ok बरं ,झालं का तुझ ? की अजून काही आज्ञा आहेत माझ्या साठी?

समीर : नाही आज एवढ्याच .चल आराम कर झोप .लवकर बरी हो.

जानू : हो ..bye

जानू दुसऱ्या दिवशी कॉलेज ला जाते आज तिला थोड बर वाटत होत .समीर तिला पाहतो काल तर सांगितलं होत येऊ नको म्हणून तर हो बोलली आणि आज तरीही आली ? पागल आहे ही पोरगी तर...आज पुन्हा तो जानू च्या क्लास रूम मध्ये जातो ..क्लास रूम मध्ये जानू एकटीच बसलेली असते ..समीर ला अस एकदम आलेलं पाहून ती गोंधळून जाते ..तेवढयात समीर एक पॅकेट काढून तिच्या डेस्क वर ठेवतो .

समीर: औषध आहे ..मी डॉक्टर्स ना विचारून आणल आहे ..याने तू लवकर बरी होशील..

जानू:अरे पणं

जानू पुढे काही बोलण्या आधीच समीर तिथून निघून ही जातो ..जानू विचार करते .कसा आहे ना हा ? कधी चिडतो,कधी रागावतो,पणं मनात किती काळजी आहे याच्या माझ्या साठी ..खरंच मित्र असावा तर समीर सारखा.

जस जसे दिवस जात होते ..समीर ची अनेक रूपे जानू पाहत होती ..कधी रागीट कधी खूप समजूतदार,कधी खूप कठोर ,आणि जितकं ती समीर ला समजू लागली तितकीच ती त्याच्यात गुंतत चालली होती ..समीर दिसला नाही की ती अस्वस्थ होत होती..कॉलेज ला आल्या आल्या पहिलं ती समीर ची बाईक दिसते का पाहत असे बाईक दिसली की समीर आला आहे हे तिला कळे..समीर ची एक झलक पाहण्या साठी ही जानू आता वेडी होवू लागली होती..काय होत आहे हे तिचं तिला कळेना झालं होत ..पणं ती समीर शिवाय आज कल कोणताच विचार करेनाशी झाली होती.

क्रमशः