Janu - 22 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 22

समीरच कॉलेज पूर्ण झालं होत..सुदैवाने त्याला लगेच नोकरी ही मिळाली होती.. पणं जानू च कॉलेज च शेवटचं वर्ष सुरू झालं होत ..आणि तिचं फक्त समीर आणि समीर च चालु होत ..समीर च्या प्रेमात ती मीरा झाली होती....आणि या गोष्टीचा राग समीर ला यायला लागला होता..तिने थोडा अभ्यासात ही लक्ष द्यावं म्हणून तो तिला समजावत होता...कधी कधी ती ही समजून घ्यायची..समीर ला नोकरी मिळाल्याचा तिला खूप आनंद होता पणं त्या बरोबर आता समीर कॉलेज मध्ये आपल्याला रोज दिसणार नाही याचं दुःख ही झालं होत..रोज समीर ला पहायची सवय झाली होती ..कॉलेज मध्ये आल्या आल्या अजून ही तिचं लक्ष ..पार्किंग मध्ये जायचं ..अजून हि ती तिथे समीर ची बाईक शोधायची ..पणं कधी असणार बाईक तिथे ? समीरने तर केव्हाच कॉलेज सोडलं होत ना...सुरवातीला कॉलेज तिला नकोस वाटू लागलं पणं शिक्षण ही गरजेचं होतं ना ..मग काय ..समीर कॉलेज मध्ये नसला तरी त्याच्या आठवणी आहेत..आणि आपण बोलतो ही त्याच्या सोबत याचा विचार करून ती पुढे निघाली.
जानू ने तिच्या ही नकळत समीर सोबत तिच्या भविषाची असंख्य स्वप्नं पाहिली होती..केलं तर लग्न फक्त समीर सोबतच करायचं..बाबा नी विरोध केला तरी..ही त्यांच्या मनाविरुद्ध ही जायचं समीर साठी...समीर ची खूप काळजी घ्यायची ..त्याचा खडूस पणं त्याच्या पासून दूर करून ..त्याला .. हसता खेळता समीर बनवायचं..समीर वर इतकं प्रेम करायचं..की समीर साठी ..जानू म्हणजेच सर्व काही होईल..पणं समीर चे विचार अजून तरी लग्ना पर्यंत पोहचले नव्हते..तश्यात त्याने जानू ला बजावलं ही होत की जरी केलंच लग्न तर ते फक्त घरच्यांच्या परवानगीनेच करायचं ..नाही तर अजिबात नाही..आता याला कोण सांगणार ..माझे बाबा या जन्मात तरी परवानगी देणार नाहीत असा विचार जानू करीत असे ..हे देवा सर्व टेन्शन माझ्याच नशिबी लिहालास का ? अस म्हणून ती देवाला हात जोडत असे.
समीरचा जॉब आणि जानू च कॉलेज या मुळे त्यांना भेटायला जमत नसे..पणं बोलणं मात्र पूर्वी पेक्षा वाढलं होत..एकदा सहजच जानू ने समीर ला मॅसेज केला.

जानू : समीर .. समज ह ..आपल लग्न झालं ना तर..

समीर : झालं का तुझ ? सारखं लग्न ?

जानू : अरे मी नुसता समज बोललं ना..

समीर : बर बोल बाई..

जानू : ह..तर आपल लग्न झालं ना ..मी रोज तुला तुझ्या आवडीचे पदार्थ बनवून घालणार..सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुझा चेहरा पाहून दिवसाची सुरवा त करणार.. आणि तू ऑफिस ला जाणार.तू परत आलास की ..मग आपण दोघे मिळून चहा पिणार.

मग समीर ही त्या कल्पनेत रमून बोलतो.

समीर : तू किचन मध्ये काम करत असणार ..आणि मी पाठीमागून येऊन तुला पकडणार ..आणि तुझे केस ओढणार ..गाल ओढणार..

जानू : ये काय रे ..तू तेव्हा पणं मला त्रास देणार ?

समीर : अग ..त्रास नाही ग प्रेमाने ओढणार ग..बर पुढे सांग.

जानू : मग मी ना जेवताना रोज तुला स्वताच्या हातानी चारणार..

समीर : मग तर माझी मज्जा आहे..मी ही तिला भरवणार मग..

जानू बोलतच राहते ..

समीर : बस बस ..झोप आता ..ही पागल पोरगी तर मला ही पागल करेल ...

जानू त्यावर त्याला एक साँग टाईप करून पाठवते.

जानू: इस दिवाणे लडके को
कोई समझाये
प्यार मोहब्बत से ना जाणे
क्यू ये घबराए

समीर ते गाणं ऐकून किती तरी वेळ हसत राहतो..

बरेच दिवस झाले होते ..समीर भेटला नव्हता आणि त्याचं बोलणं ही कमी झालं होत ..पणं जानू ला ते सहन होत नव्हत ..ती सारखी समीर ला मॅसेज फोन करत राहायची ..आणि त्याचा रिप्लाय नाही आला की चिडत रागवत असे..कधी कधी समीर तिचा रुसवा दूर करत असे..पणं कधी कधी रुसू दे म्हणून तसचं सोडून देत असे..मग शेवटी ..जानू च आपला राग सोडून बोलत असे.
आज बऱ्याच दिवसांनी जानू व समीर भेटणार होते ..जानू तर खूप खुश होती...समीर साठी तिने एक अबोली रंगाचा शर्ट विकत घेतला होता..तो पाहिल्या पहिल्याच हा शर्ट समीर ला खूप छान दिसेल असा विचार तिने केला होता.
दोघे बागेत भेटले..समीरने ही जानू साठी एक केसरी रंगाचा टॉप आणला होता..जानू ला ही तो खूप आवडला..आणि समीर तर शर्ट पाहून तिला ओरडला च ..कशाला आणलेस ? तुला जॉब लागला की मी करेन माझी सर्व शॉपिंग तुझ्या पैशांनी या पुढे काही आणि नकोस म्हणून त्याने तो शर्ट घेतला..थोडा वेळ बोलत बसल्या नंतर..समीर ने जानू चा हात हातात घेतला व बोलू लागला.

समीर : तुला माहित आहे का मला तुझ्यात सर्वात जास्त काय आवडत ?

जानू : काय रे ?

समीरने तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालुन पाहिलं..जानू लाजली..

समीर : तुझे हे डोळे..

जानू : का ? डोळेच का ?

समीर : कारण मी जेव्हा पणं या डोळ्यात पाहतो ..मला या डोळ्यात मीच दिसतो..

जानू : तूच आहेस तर तू च दिसशील ना ..

समीर : हो पणं एकदा भास्कर दिसला होता यात..

जानू चा चेहराच पडला..तिने आपला हात समीरच्या हातातून काढून घेतला..

जानू : कोण भास्कर ? मी नाही ओळखत..आणि मी तुला सोडून कोणाला पाहिलं नाही आणि पाहणार ही नाही..

समीर ला कळलं तिचा चेहरा उतरलेच ..बर sorry

समीर ने जानू कडे पाहून एक छान स गाणं म्हटलं..

जादू हैं नशा हैं
मदहोशिया हैं
तुझं को भूला के अब
जावू काहा
देखती हैं जिस तरह से
तेरी नजरे
मे खुद को छुपावू काहा?

जानू गाणं ऐकून खुश झाली ..समीर तिला चल जावू बोलला पणं ती अजून थोडा वेळ थांबू बोलू लागली..बर चल तिथे एक मंदिर आहे तिथे जावून दर्शन घेऊन मग जावू अस तो बोलला.
जानू तर विचार करू लागली ..बहुतेक शहरातल्या सर्व मंदिरा नच दर्शन मला समीर करायला लावणारं आहे पहावं तेव्हा मंदिरातच घेवून जातो..

समीर : अग काय विचार करतेस ? चल ना लवकर.

जानू : हो हो.

इतक्यात पाऊस सुरू झाला ..दोघे ही थोडे भिजले तसा समीर तिच्यावर ओरडला च ..तुला सांगत होतो ना..जावू म्हणून आला ना पाऊस ..भिजलो ना ..तुला कोणत्याच गोष्टीच गांभीर्य नाही..
जानू तर शॉक च झाली ..हा परत चिडला..किती दिवसातून भेटलो होतो ..थोडा वेळ जास्त थांबावं वाटलं तर काय चूक केली ? पावसात ही तिच्या डोळ्यात पाणी तरळल..आणि समीर ला ते दिसलं..

समीर : आता रडु नकोस ..हे असल इमोशनल होण मला अजिबात आवडत नाही..

जानू एक ही शब्द बोलली नाही..मग तो जरा शांत झाला..जानू रुमालने आपला ओला झालेला चेहरा पुसत होती..

समीर : आता एकटी चाच् पुसणार आहेस का ? माझे ही हात ओले झाले आहेत पुस अस म्हणून त्याने त्याचे हात जानू पुढे केले तिने ही रुमाल ने ते पुसले..
उगाच भेटीचा आनंद मावळायला नको म्हणून ती हसली..पाऊस कमी झाल्यावर मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतलं..आणि मग घरी निघून गेले.

क्रमशः