Janu - 25 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 25

जानू ने समीर ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला..

जानू : समीर माझं काही चुकलं असेल तर खरंच माफ कर..मी खरंच कधीच रागावणार नाही तुझ्या वर ..कधीच रुसणार नाही..तू बोलशील त स..राहीन..सारखं प्रेम प्रेम करणार नाही..स्टडी करेन ..स्वतःच्या पायावर उभा राहीन..पणं plzz तू मला सोडून जावू नकोस ..मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय..plzzz समीर

समीर : झालं का सुरू तुझं रडगाण .. हेच तर पटत नाही ..मला..मी नसलो म्हणजे काय संपल का सर्व ? अग स्वतःच्या करीयर कडे लक्ष दे..माझ्या सारखा भेटेल तुला कोणी ना कोणी..पणं माझ्या कडून अपेक्षा करू नकोस ..

जानू : मला तुझ्या सारखा कोणी नको समीर ..तूच हवा आहेस ..plzz माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर plzzz समजून घे ना..

समीर : झालं का ? आता बोललीस ना की प्रेम प्रेम करणार नाही आणि परत प्रेम आहे ?

जानू : सॉरी पणं प्रेम तर आहे ना रे ...मी जास्त वेडेपणा करणार नाही ..तुला त्रास ही देणार नाही.

समीर : दर वेळी हेच बोलतेस तू आणि तुझं प्रेम पुराण चालू होत..ऐक माझ्या साठी कोणतंच नात जीवनभर सांभाळता येत नाही..सर्व तात्पुरते असते ..आपण सोबत होतो ..तेव्हा ऐकलं ना तुझ ? वागलो ना तुला हवा तसा ? होतो सोबत तो पर्यंत ठीक होत ना सर्व ..? मग झालं आता वेगळं होत आहे मी तर तू इतका तांडव का करत आहेस ?

जानू : पणं मी तर कधीच तात्पुरता विचार केला नाही समीर ..मी किती तरी स्वप्न पाहीली आहेत आपल्या भविष्याची...मला तर मी असे पर्यंत तू माझ्या लाईफ मध्ये हवा आहेस..

समीर : स्वप्नं? मी कधी बोलल होत तुला स्वप्न पहायला ? आता हा तुझा प्रश्न आहे ..मी यात काही करू शकत नाही ..plz या पुढे मला जमणार नाही बोलायला तुझ्या सोबत ..bye

जानू च्या काळजाचे हजार तुकडे झाले होते..बाबांनी तर तिला कानाखाली दिली होती पणं समीर ने मात्र तिच्या मनावर वार केला होता..शरीरावर च्या जखमा भरतात पणं मन तुटलं की माणूस कोलमडून जातो..अभ्यास ,कॉलेज ,आई बाबा,स्नेहा देि ..या कोणाचाच विचार जानू च्या डोक्यात नव्हते ..होता तर फक्त समीर ..जे झालं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता...समीर असा वागेल असा विचार ही केला नव्हता तिने ..हो तो थोडा रागीट आहे ..पणं असा घात करेल ? नाही नाही ..काही तरी कारण असेल ..समीर नाही अस करणार ..ती स्वतः ला च समजावत होती..सुदैवाने ती कॉलेज ला जावू शकत होती ..बाबा नी तिचं कॉलेज बंद केलं नव्हते स्नेहा प्रकरण झाल्या नंतर..पणं कॉलेज असो की घर कुठेच तिचं लक्ष नव्हतंच...समिधा ला ही जानू ला काही तरी प्रॉब्लेम आहे अस वाटू लागलं होत..लेक्चर चालू असताना च तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला चालू होत असे ..एकटीच कोणत्या तरी विचारत मग्न ..कुठे पाहत असते ही ..हे समिधा ला ही कळत नव्हते..कॉलेज सुटल्यावर सुटल्या ..समिधा जानू ला ओढतच ..कॉलेज मधील बागेत घेऊन गेली.

समिधा : जानू काय झालं आहे ? plz सांगशील का ?

जानू : काही नाही ग..

समिधा : बेस्ट फ्रेन्ड बोलतेस ना मला ? थोडा ही विश्वास नाही का माझ्या वर ? सांग ना plzz तू नाही सांगितलं तर मला कसं कळणार ?

आता पर्यंत शांत असणारी जानू मग समिधा ला बिलगून खूप रडू लागली...समिधा ने तिला शांत केलं व पुन्हा विचारलं ..तेव्हा जानू ने समीर काय बोलला हे तिला सांगितलं..

समिधा : जानू खरंच रागावू नकोस पण मला त्या समीर वर पहिल्या पासूनच विश्वास नव्हता पणं तू खुश होतीस म्हणून मी जास्त काही बोलले नाही..आणि तू कशाला त्या मूर्खा चा विचार करत आहेस ?सोड ना ..तो प्रेमाच्या लायकी चा च नाही...अस कस वागू शकतो तो ? मला नाही वाटत त्याने तुझ्यावर कधी प्रेम केलं असेल ..थोड तरी केलं असत तर अस बोलण्या आधी तुझा विचार केला आता त्याने.

जानू: त्याने जे केलं ते केल ग पणं माझं तर खर प्रेम आहे त्याच्यावर मी नाही राहू शकत त्याच्या शिवाय ..पणं आता तो माझ्या सोबत साध बोलत ही नाही..जानू पुन्हा रडू लागली..आणि एकदम शांत होऊन बोलली..मी सुसाईड करते त्या पेक्षा निदान हा त्रास तर होणार नाही मला .. आणि त्याला ही सुटका मिळेल माझ्या पासून ..

समिधा : ये तू वेडी झाली आहेस का ? असले काही ही विचार करू नकोस ..मी बोलून पहाते त्याच्या सोबत ..मी समजा वेन त्याला ..पणं तू असले विचार करू नकोस ..

जानू : तू खरच बोलशील त्याला ? पण नको त्याला राग आला तर ?

समिधा : नाही मी समजवेन त्याला तू नको काळजी करू .. आणि तुझ्या सोबत बोलायला लावेन..

जानू : खरंच ?

समिधा च बोलणं ऐकून जानू चा चेहरा फुलला होता..

जानू : थँक्यु यू समिधा ..खूप खूप थँक्यु ..

समिधा : खर तर त्याला चार कानाखाली ओढू वाटत आहे मला पण काय करायचं ? अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो?
अस बोलून समिधा हसते ..

जानू : ये ..गाढव नको बोलू त्याला..आणि plz त्याला रागात काही बोलू नकोस .. प्रॉमिस कर plz तू त्याच्या सोबत नीट बोलशील ..

समिधा : हो बाई नको काळजी करू ..मी नीट बोलेन आता नंबर देतेस ना त्याचा ?

मग जानू समीर चा नंबर समिधा ला देते ..आणि त्याच्या सोबत बोललीस की तो काय म्हणाला plzz मला लगेच फोन करून सांग ..मी वाट पाहत आहे..समिधा ही मग ok बोलून घरी जाते ..जानू ही घरी येऊन समिधा कधी फोन करते याची वाट पाहत राहते..

क्रमशः