Anokhi Preet Hi... - 4 books and stories free download online pdf in Marathi

अनोखी प्रीत ही... - ४

भाग पासून पुढे:

" मीच तो.... Your would be husband dear " अमीश शांतपणे म्हणाला.

" कायssss....खोटं बोलतोयस ना तू? "भूविका ओरडून म्हणाली.


"नाही " तो तीच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.


" कसे शक्य आहे... त्याचे नाव तर श्री? "ती गोंधळून म्हणाली.

" तू मनू असू शकतेस तर मी श्री का असू शकत नाही? "तो आय विंक करत म्हणाला.

" म्हणजे.... तू ?"भूविका आश्चर्याने म्हणाली.

" हो....श्री माझे टोपणनाव.... श्री आणि तुझा अमीश एकच आहेत भूवी.... "तो तुझा या शब्दावर भर देत गालात हसत तीला म्हणाला .

" नाही हे नाही होऊ शकत.....तू म्हणजे श्री आणी तू एकच....नाही " ती अविश्वासाने म्हणाली." तुला विश्वास बसत नाहीये....but unfortunately yes " तो पुन्हा तीच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ' हे काय करून बसले मी.......ज्या व्यक्तीपासून दुर पळत होते त्याच्याशीच लग्न??? मला अजूनही विश्वास ठेवायला जड जातेय' भूवि स्वतःशीच म्हणाली.

"भूविss"तीला स्वतःतच हरवलेले पाहून अमीशने आवाज दिला.


" तू माझं नाव घेऊ नकोस....... का करतोयस हे सर्व ???.....wait... wait....मला माहीत नव्हते पण त तुम्ही मला पाहायला आलात तेव्हाच तुला समजलेले ना?....की अगोदरच तुझं ठरलेलं सर्व..... " ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली.


" नाही भूवि ,मलाही तेव्हाच समजलं....."तो तीच्या हातावर आपला हात ठेवत तीला विश्वास देत म्हणाला.

" तरिही तू???......ohhhh अजून मन भरलं नाहीये का? माझा अंतच पाहायचं ठरवलयसं तर तू! " ती त्याचा हात झीडकारत त्याला पाहत कुत्सित हसत म्हणाली.

" No dear......i love you my barbiedo..."

" no.... no any single word Mr.Aamish kamat .....no....I just hate you.... just hate " ती
त्याचे शब्द मध्येच तोडत रागाने थरथरत म्हणाली.


" but I love you from my bottom of the heart...मला तु कायम माझ्या सोबत हवी आहेस भूवी" तो पुन्हा अगतिक होऊन म्हणाला.


" I said that I just hate you.......आणि तु ज्या गोष्टीसाठी इथे आला आहेस ना तीच जर आता होणार नसेल तर.... "


" What do you mean..... होणार नसेल म्हणजे..... don't say की तू हे लग्न होऊन देणार नाहीस" तो अस्वस्थ होत तीला मध्येच थांबवत म्हणाला.


" हो.....बरोबर ओळखलंस.....हे लग्न होणार नाही. मी आताच जाऊन आईबाबांना नाही म्हणून सांगणार आहे "

"नाही.....भूवि तू असं काहीच करणार नाहीयेस.... प्लिज तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस......ऐक माझं"


" माझं ठरलंय आणि यामध्ये काहिही बदल होणार नाही...."ती ठामपणे म्हणाली.

" भूवि प्लिज......dont ....dont do this.... Trust me....i know माझी खूप मोठी चूक झालीये बट प्लिज माझं एकदा ऐकून घे... " तो खूपच भावनिक झाला होता....एकप्रकारची अस्वस्थता आणि तिला पुन्हा गमावण्याची भिती त्याचा डोळ्यांत साफ दिसत होती.


" Trust..... ohhhh that word really....तोच तर नाहीये ना आता तुझ्यावर....तोच तर नाही.....ना ही कधी होईल अपेक्षाच सोडून दे..... काचेला तडा गेला की गेलाच....."ती विषण्ण हसत म्हणाली.....तीच्या रागासमोर त्याची अवस्था तीला अजीबात दिसत नव्हती....खरेतर तीला समजून घ्यायची नव्हती.


" भूवि फक्त एकदा.... फक्त एकदाच ऐकूण घे......मला माझी बाजू मांडायची एक संधी तरी दे.....आणि तरिही तुला मी नको असेल तर मग....तुला हवा तो निर्णय घे मी काहीच बोलणार नाही "तो जड अंतःकरणाने एक एक शब्द उच्चारत होता." नाही..... मला काहीच ऐकायचं नाही....आपला काहीचं संबंध नाही......इथूनपुढे कधी माझ्यासमोर येऊ नकोस....मला तू नको आहेस पुन्हा माझ्या आयुष्यात.... नको आहेस...." ती आपली पर्स सावरत उभी राहीली आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली.डोळे किंचीत ओलावले होते.


"नको भूवि....नको.... मला एकटं सोडून जाऊ नकोस .....मी... मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय " धावत तिच्यामागे जात तीचा हात हातामध्ये घट्ट पकडून ठेवत तो तीला आर्जव करत होता." हात सोड.... अमीश हात सोड माझा" ती समोर पाहूनचं बोलतं होती कदाचित भिती होती त्याच्या डोळ्यांत पाहिल्यावर कदाचित मी पुन्हा स्वतःला हरवून बसेल आणि मगं मला निर्णय घ्यायला कठीण होऊन जाईल.


"नाही सोडणार .....तू... तू मला सोडून जाशील.....नको ना ग अशी वागूस.....तू म्हणशील ते ऐकेन मी....कधीच तुला दुखावणार नाही मी वचन देतो तुला.... पण प्लिज forgive me......मी मरून जाईन गं " अक्षरशः त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते .....त्याची तळमळ त्याने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती.आजूबाजूचे लोकही त्यांच्याकडे पाहून हळहळत होते अगदी...


" okay...... ठिक आहे मी तयार आहे लग्न करायला " ती काहितरी विचार करून निर्णायकपणे म्हणाली.


" खरंच....भूवि खरं....बोलतेयस ना तू? " तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला.

"हो, मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला."असे म्हणून त्याच्या हातातून हात सोडवत एकदाही मागे न पाहता ती तिथून निघून गेली.

*************************


आणि आज ते लग्नबंधनात अडकले होते....

" hello....are you hearing me " भूविका त्याच्यासमोर चुटकी वाचवत म्हणाली. तीच्या आवाजाने तो भानावर आला.

" आठवलं???.....मी काय म्हणाले होते " ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"हो म्हणजे..... तू म्हणाली होतीस की मी तयार आहे लग्न करा....."अमिश


" येस मी लग्न करायला तयार आहे पण ....... आपल्यात कधीच एक नवरा बायकोचं नातं नसेल .......तू विश्वास ठेवण्यास पात्रच नाहीयेस समजलं.... "भूविका त्याचे वाक्य मध्येच तोडत म्हणाली." पण मगं लग्न ?? "

" हे लग्न नाहीच मुळी.... ही तर फक्त एक तडजोड आहे.......तुझ्यासाठी मी माझ्या आईबाबांचा आनंद नाही हिरावून घेऊ शकत..... आणि काय सांगणार होते मी त्यांना ,का नाही लग्न करायचं मला ......तूझ्यासारखं नाहीये रे माझं कोणाच्या भावनांशी खेळायला नाही जमत मला.... पण तू.... तू अपवाद आहेस.....तू केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुला व्याजासकट परत करेन शब्द आहे माझा.... आणि हो काय म्हणाला होतास तू त्यादिवशी तुला दुखावणार नाही......सर्व ऐकेन तुझं right.....wait हे Divorce papers .....त्यावर sign कर आणि तुझा शब्द पुर्ण कर"ती बॅगमधून डिव्होर्स पेपर्स काढून त्याच्यासमोर पकडत म्हणाली.


" Divorce papers " तो अवीश्वासाने धक्का बसून भुविकडे पाहत म्हणाला. तीने काहिही न बोलता त्यावर sign कर असे पेनने खुणावले.


"भूवि....का करतीयेस हे.... मला त्रास होतोय गं.... प्लिज थांबव हे सर्व"तो हताश होऊन म्हणाला.

" अरे का ??? म्हणजे तुला तर माहितच आहे की सर्व का ते ...... आणि थांबवतेच तर आहे....कायमचचं तर थांबवतेय....सहा महिन्यानंतर निघून जाईन मी तुझ्या आयुष्यातून कायमची.....सगळ्यांपासून दूर......आई बाबांना सांगू नकोस माझ्या फक्त.....त्यांच्या डोळ्यांतील पाणी नाही बघवणार मला "ती ही अगतिक होऊन म्हणाली." पण का ???मला हवी आहेस तू. ....तू सोडून जायची भाषा का करतेयस..........मला माफ कर एवढी मोठी शिक्षा का भूवि??? ........माझी होऊनही माझी नाहीयेस तू ....नको गं अशी वागूस ...."अमीश


"तेव्हाही मी अशीच अगदी अशीच विनवणी करत होते.... पण काय???.....काय म्हणाला होतास तू.....you are nothing for me.....मी दुसर्या कोणावर तरी प्रेम करतो.... तूझ्या असण्याने किंवा नसण्याने मला काहीच फरक पडतं नाही.... आठवलं??असाच म्हणाला होतास ना?" भूविका


" please forgive me....I'm begging you भूवि " तो खाली गुडघ्यावर बसून हात दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तिची माफी मागत होता.....

" नाही.....शक्य नाही ते आता..... You promise me तु मला कधीच दुखावणार नाहीस.... आणि माझी इच्छा हीच आहे की जर तूला खरचं माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तू त्या पेपर्स वर sign करावीस....नाहीतर मी आत्ताच हे घर सोडून जाईल.... नंतर काय सांगायचे ते तुझे तू ठरवं"भूविका कठोरपणे म्हणाली.

"भूवि....प्लिज " तीने आपली पाठ फिरवून घेतली....

" मी.... मी करतो त्या पेपर्स वर sign " तो जड अंतःकरणाने खाली पाहत म्हणाला. तीने काहीच न म्हणता पेपर्स त्याच्यासमोर धरले.त्याने ते पेपर्स हातात घेतले.... तीने अगोदरच sign केली होती..... त्याने एकवार तिच्याकडे पाहिले ती शांत उभी होती.... निर्विकार.....थरथरत्या हाताने त्याने पेपर्स वर sign केली....आणि तो तडक तिथून बाहेर गॅलरीमध्ये निघून गेला.
' भूवि का एवढी बदललीस तू???ते माझ्यासाठी असणार प्रेम कोठेच दिसत नाही गं तूझ्या डोळ्यांत.....तीरस्कर करायला लागलीये तू माझा........एवढा नकोसा झालो आहे का मी तूला??? ......Divorce papers ..????लग्नाच्या पहिल्याच दिवशी.....मला माहितीये मी तुझ्याशी खूप चुकिचे वागलोय.....माफीसाठीही पात्र नाही......तुला खूप दुखावलं मी....तू अशी नव्हतीस भूवि.....खूपचं कठोरपणे वागतीयेस माझ्यासोबतं....तूला जराही जाणवत नाही का ग मी बदललोय.....माझ्या डोळ्यातील अश्रूही तूला खोटे वाटतायत का गं....नाही मी तूला कोठेच जाऊ देणार नाही......या सहा महिन्यातं मी पुन्हा तूझा विश्वास परत मिळवेन......तूला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईन.....नक्कीच......पण मला सोडून जाण्याची भाषा नको करूस गं......तीळतीळ तुटतो आतून जीव.....अजूनही तुला दुखावल्याच्या गिल्ट मनात घेऊन जगतोय.......मी हार नाही मानणार .......तू मला आपलसं नाही केलसं तरी चालेलं ......पण तुला दुखावल्याच प्रायश्चित्त मी नक्कीच करेन......बसं तू मला माफ केलंस की मी स्वतःच दूर निघून जाईन तूझ्या आयुष्यातून......."तीथेच बसून गुडघ्यात मान खुपसून तो मूकपणे अश्रू गाळत होता.....आणि दूर कुठेतरी गाण्याच्या ओळी त्याच्या व्यथा शब्दांत मांडत होत्या.........

Don't go tonight
Stay here one more time
Remind me what's it like
And let's fall in one more time
I need you now by my side
It tears me up when you turn me down
I'm begging please , just stick around
I'm sorry don't leave me
I want you here with me
I know that your love is gone
I can't breathe
I'm so weak , I know this isn't easy
Don't tell me that your love is gone
That your love is gone
Don't tell me that your love is gone
That your love is gone......

Music 🎶🎶......

I'm sorry don't leave me
I want you here with me
I know that your love is gone
I can't breathe
I'm so weak , I know this isn't easy
Don't tell me that your love is gone
That your love is gone
That your love is gone

I can't breathe
I'm so weak, I know this isn't easy
Don't tell me that your love is gone
That your love is gone.......

( Dylan Matthew & Slander )

Readers हे Song read करता करता नक्की ऐका....अमीशचे pain त्यामधून जास्त चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला....


' I'm sorry अमीश.....really sorry....मला माहिती आहे मी खूप त्रास देते आहे तुला....मी का लग्न केले हे मी तुला आत्ताच नाही सांगू शकत.... शब्द दिला आहे मी कुणालातरी.....वेळ आल्यावर नक्कीच सांगेन तुला......तुला काय वाटलं तुझे अश्रू मला दिसणार नाही....तुझी तळमळ मला दिसत नाही???.....सगळं कळतय रे.....पण मन अजूनही विश्वास ठेवायला कचरतेय....पुन्हा तू मला सोडून गेलास तर मी नाही पुन्हा उभी राहू शकणार.....त्यापेक्षा आपण वेगळे झालेलोच ठिक आहे.....तुझ्या डोळ्यांत पाहायचीही भिती वाटते.....पुन्हा गुंतले तर बाहेर पडणं नाही जमणार मला...... तू नेहमी माझ्या भावनांशी खेळत आला आहेस......कसा विश्वास ठेवू सांग ना तुझ्यावर.... तुझ्यापासून दूर जाययचीही भीती वाटते आणि तुझ्यासोबत रहायला ही मन मानत नाही......का अशी अवस्था करून ठेवलीयेस माझी......का???......तुलाही जाणीव झाली पाहिजे दुसऱ्यांच्या भावनांशी खेळल्यावर काय त्रास होतो.....जीवंत असूनही रोज रोज मरण काय असतं.....या सहा महिन्यांत तू दिलेल्या प्रत्येक वेदनेची तुला जाणीव करून देईन अमीश.....एवढं चांगल वागायचं नाटक करू नकोस.....मी यावेळी अजीबात फसणार नाही....." ती ही तिथेच रूममध्ये खाली बसून स्वतःशीच बोलत होती....डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले......

क्रमशः

©️ मनमंजिरी ❤(Happylife 😇)

*************************

पुढील भागात :

" Hey ammy...."दरवाजातून पळत येत ती अमिशच्या गळ्यात पडली.आणि इकडे भूविचा राग क्षणाक्षणाला वाढत होता.(Thanks पाठीमागील भागांना तुम्ही खूपच छान प्रतिसाद दिलात...आजचा भाग कसा वाटलाcomment करून नक़्की सांगा......)