Anokhi Preet Hi... - 5 books and stories free download online pdf in Marathi

अनोखी प्रीत ही... - ५
भाग पासून पुढे...


सकाळी पक्ष्यांच्या किलबीलाटाने अमीशला जाग आली.....डोळे उघडून पाहिले तर तो काल तसाच गॅलरीमध्ये झोपला होता.....त्याने तोंडावरून हलकेच हात फिरवला.....गालावर ओघळलेले अश्रू केव्हाच कोरडे झाले होते.......कालचा प्रसंग झटकन डोळ्यासमोर तरळून गेला आणि त्याला भूविची आठवण झाली........तसाच तो रुममध्ये आला.......पाहतो तर समोर बेड ला टेकून भूवि खालीच जमिनीवर बसल्या बसल्याच झोपली होती.....चेहरा सुकलेला होता......डोळ्यांच्या पापण्यांवर हलकासा जाडसर पणा जाणवत होता..... ' ही पण रडत होती रात्रभर ????त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला........हम्म्म....एवढी काळजी वाटते तर अशी का वागतेयस.....तुलाही त्रास होतोयच ना barbiedoll ......मग का हा divorce चा अट्टाहास???......मला नेहमी म्हणायचीस की तू एक न उलघडलेल्या कोड्यासारखा आहेस..... मगं आज तूच का अशी वागतीयेस.......माझ्या डोळ्यांत अश्रू न पाहू शकणारी तू आज एवढी कठोर का झाली आहेस ......i don't know तु हे का करते आहेस....... पण मला एवढं नक्किच माहित आहे की तु आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस....नाहीतर मला त्रास होतोय पाहुन तुझ्या डोळ्यांत अश्रू आलेच नसते........' तिच्याजवळ चालत जात तिच्यासमोर खाली बसून हलकेच तिच्या गालावर आलेली बट कानामागे सारत तो विचार करत होता. त्याच्या हातच्या गालावरील स्पर्शाने तीला जाग आली...... डोळे किलकिले करत तीने समोर पाहिले तर अमीश तीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता......तीही त्याच्या निळ्याशार समुद्राप्रमाणे भासणाऱ्या डोळ्यांत हरवून गेली.......तोच निरागस चेहरा पण रडून रडून डोळे लाल झालेले......सिल्की केस कपाळावर घोंघावत होते..... आणि कसल्याशा गहण विचारात हरवलेला तो......'उफ्फ हे डोळे वेड लावतात मला...... एवढे गहिरे की गुंतायला होतं मला.....'ती त्याच्या डोळ्यांत हरवत गालात हसत स्वतःशीच बोलत होती.

आँखो ही आँखों मे इशारा हो गया
बैठे बैठे जीने का सहारा हो गया
आँखों ही आँखों में इशारा हो गया
बैठे बैठे जीने का सहारा हो गया.......


दरवाजातून हळूच डोकावणारी दक्षा हलकेच दरवाजा ढकलून आतमध्ये आली.....तीचा आवाज ऐकूण आपले भूवि-अमीश भानावर आले.....अमीशला एवढ्या जवळ पाहून भूवी पूर्ण भांबावून गेली.....आणि तीला जाग आली आहे हे पाहून अमीश पण गोंधळून गेला त्याने पटकन तीच्या गालावर असलेला त्याचा हात पाठीमागे घेतला आणि तिच्याकडे पाठ करून छातीवर हाथ ठेऊन शांतपणे ऊभा राहिला.....भूवि ने समोर पाहिले तर दक्षा डोळे उंचावून मिश्किलपणे गालात हसत एकदा भूविकडे तर एकदा अमीशकडे पाहत होती......भूवि ही पटकन उठून उभी राहिली आणि लगेच आपली नजर तीच्यावरून वळवली आणि खाली पाहू लागली........दक्षा हळूच चालत अमीशसमोर आली आणि.....

गाते हो गीत क्यूं दिल पे क्यूं हात है ,
खोये हो किस लिये ऐसी क्या बात है ,
ये हाल कबसे तुम्हारा हो गया ???........

त्याच्याकडे पाहून ती गाऊ लागली......त्याला तर ते ऐकून काय करु आणि काय नको असे झाले..... तो काही बोलायला जाणार एवढ्यात तीने आपला मोर्चा भूविकडे वळवला......

चलते हो झूम के बदली है चाल भी ,
नैनों में रंग है बिखरे है बाल भी........

भूविलाही काही सुचेनासे झाले.....कुठेतरी जाऊन तोंड लापवावे असे तीला वाटायला लागले.....खाली केलेली मान तीने काही वर घेतलीच नाही .......आता दोघांची situation पाहून तीला काही हसू कंट्रोल झाले नाही आणि ती जोरजोराने हसायला लागली.....

" ताई..... काय चाललंय तुझं "शेवटी अमीशच कसातरी दक्षाकडे पाहत म्हणाला.तसे भूविने हळूच मान वर करून समोर पाहिले.


" माझं....काहीचं नाही रे.... मी तर गाणे म्हणतेय मला आवडते म्हणून " ती मी का असे स्वतःकडे इशारा करत म्हणाली.

"असं काही नाहीये.....तू.. "अमीश तीला समजावत म्हणाला.

" काय रे....कायं कसं नाही???" ती मुद्दामहून साळसुदपणाचा आव आणत म्हणाली.

" तु जे समजतेय तसं काही नाही....ते... ते भूविच्या डोळ्यांत काहितरी गेलं होतं ते मी..... "अमीश भूविला काहितरी पुढे बोल म्हणून हळूच इशारा करत होता.

" हं... हो... हो.... ते माझ्या डोळ्यांत काहीतरी गेलं होतं ते पाहत होते ते " एवढं बोलून तीने एक मोठा श्वास घेतला." अरे पण......मी काही म्हणालेचं नाही......तुम्ही का एवढं explanation देताय.....नाही म्हणजे आता एवढं सांगताय तर तस्सं काही नाही ना? "ती हळूच गालात हसत भुवया उंचावून त्यांच्याकडे पाहत त्यांना म्हणाली." नाहीssss" दोघांनिही एकाचवेळी सांगितले. तसे लक्षात येताच पुन्हा भूविने मान खाली घेतली.... आणि अमीश इकडे तिकडे पाहू लागला.


" हम्म्म....नसेलच आता तुम्ही म्हणताय तर...." ती तोंड पाडून म्हणाली........ " ते आज सुश्रुता मध्ये जायचे तर आईने लवकर आवरायला सांगितले आहे तेच सांगायला आले होते.....दरवाजावर नॉक केल पण काहीच आवाज आला नाही.....पुश केलं तर दरवाजा उघडाच होता म्हणून आवाज दिला तर तुमचं लक्षच नव्हत.....ते तू तीच्या डोळ्यांत गेलेलं काढत होता आणि ती तुझ्या डोळ्यांत पाहून सांगत होती कुठे ते नाहीका ....." ती आय विंक करत म्हणाली......" म्हणून मग मी आले सरळ आतमध्ये नाहीतर उशीर झाला असता ना " ती हसत म्हणाली.


" हो हो.... उशीर झाला असता" अमीश बळेबळेच हसत म्हणाला.....मनातून तर राग आलेला..... एकतर भूवि माझ्यावर रागवलीये साधं पाहताही नाही माझ्याकडे झोपली होती तेवढेच तीला नीट पाहता आलं असतं..... बोलणे नाही निदान तेवढाच तीचा सहवास पण नाही..... ताई आलीच मध्ये दत्त म्हणून हजर ....तो मनातच चरफडत होता.


" बरं या तुम्ही आवरून.....मी जाते आता खाली आई वाट बघत असेल केव्हाची गेली म्हणून.......आणि याने काही त्रास दिला ना मला बिनधास्त सांग मग पाहा मी याची कशी मज्जा करते " दक्षा अमीशकडे point करून भूविला म्हणाली.तसे भूविने कसनुसं हसतचं मान डोलावली.....'हम्म्म मी त्रास देतोय.....इथे divorce पेपर्स नाचतायत कालपासून डोक्यामध्ये साधं काय बोलू कसं बोलू हे सुचेनास झालंय तिच्यासोबत आणि .......या सगळ्यांना वाटतयं मी त्रास देतोय तिला....काय एक एक नग आहेत आमच्या घरात' अमीश पुन्हा मनातल्या मनात बडबडत होता.


" या रे आवरून लवकर....येते मी"असे म्हणत दक्षा बाहेर निघाली.

"आँखों की गुस्ताँखिया माफ हो sss...... " हळूच दरवाजातून मागे डोकावत दक्षा खट्याळ हसत खाली गेली.

" ही पण ना.... कशात नाही काय आणि फाटक्यात पाय अशी अवस्था आहे माझी "अमीश भूविकडे पाहत बळेच चेहर्‍यावर हसू आणून मनातल्या मनात बोलत होता.तीने त्याला सरळ इग्नोर केले आणि बॅगमधून स्वतःचे कपडे घेऊन अंघोळीला बाथरूममध्ये निघून गेली.


" सरळ सरळ तोंडावर ignore 😱😱😕.....मी तर फक्त online ignore करत होतो " तो नकळत मोठ्यानेच म्हणाला.


" जसे काय खूप मोठे दिवे लावलेत.... "😒😒भूवि बाहेर डोकावत म्हणाली.


" तू ....." 🤔


" खूप अंधार आहे बाई आतमध्ये दिवे लावायला स्विच सापडेना..... अं......सापडले " जणू स्वतःशीच बोलत असल्याचा आव आणत स्विच आॅन करून पुन्हा बाथरूममध्ये जात भूवि म्हणाली.


"अमीश.....जागा हो....कान वाजायला लागले तुझे बहूतेक.....ती बिचारी स्विच शोधत होती आणि मी..... मला काहिपण ऐकू येतेय......तरीपण ती मला म्हणाली का?? " अमीश डोके खाजवत Alexa ला song play करायला सांगून जीम सेक्शनमध्ये निघून गेला....


Music 🎶

हो..... हो.....

असे कसे,बोलायचे
असे कसे बोलायचे, बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांग जरा असे कसे लपायचे हे आता
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा

एकटा मी दिनरात, तरीही तू भोवती
हातात नाही हात, तरिही तू सोबती
मन बेभान बेभान होई
मन प्रीतीला उधान देई
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा

Music 🎶

रोज बहाणे नवे, शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर आतूर झाले
रोज काहूर काहूर नवे
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा......

Music 🎶

भूवि बाहेर आली तर तीच्या कानावर हे शब्द पडताच तीला कसेसेच झाले......'मला नेहमीच असे वाटते की काही गाणी आपल्या आयुष्यात चाललेल्या घटनांचीच जाणीव करून देतात.... माझे आणि अमूचेही तसेच तर आहे......असं वाटतयं माझीच परिस्थितीती सांगितलीये ' आरशासमोर बसून तयारी करत ती स्वतःशीच बोलत होती.....इकडे अमीशही पुशअप्स करता करता जागीच थांबला......'perfect song for my situation.....सोबत असूनही सोबत नाही आहोत आम्ही....कसे नशीब आहे यार.....ती मनापासून होती तेव्हा मी कसा वागलो..... आणि आता सोबत तर आहे पण......shit ' तो ही स्वतःच्या नशिबावर चिडत रागावत song ऐकत होता......दोघेही आवरून खाली आले...... अमीश तिथेच सोफ्यावर न्यूजपेपर वाचत बसला.... भूवि किचनमध्ये जातच होती तर.....


" Hey Ammy " एक मुलगी दरवाजातून धावत आत आली आणि सरळ अमीशला जाऊन मिठी मारली....इकडे ते पाहून किचनमध्ये निघालेल्या भूविचे पाय जागेवरच थबकले......


" what a surprise तान्या ....." अमीश ही तीला आश्चर्य चकित होऊन हसत म्हणाला. Ohhhh तर ही आहे का याची तनू बेबी भूवि नाक मुरडत म्हणाली.

" अॅमीsss.....मी कशी दिसतेय??🤗🤗 see my new hairstyle " त्याच्यापासून दूर होत तीच्या केसां कडे point करत ती अतिउत्साहात अमीशला म्हणाली.

" hey ....not bad dude.....just amazing & beautiful dear"हाताने छान असा इशारा करत तो तीला म्हणाला. आणि इकडे आपल्या भूवि मॅडमचा राग क्षणाक्षणाला वाढत होता.....अमीशने जर आत्ता तिच्याकडे पाहिले असते तर नजरेनेच खाक झाला असता एवढा अंगार डोळ्यात फुललेला.....

"Hello तनिष्का......आता वेळ मिळाला का तूला???"किचनमधून बाहेर येत दक्षा तोंड वेंगाडुन म्हणाली.

" दीsss....मी कॅनडा मध्ये होते ना..... एअरपोर्ट वरून direct घरी गेले आणि लगेच इथे आले....."

" हो का.....मला माहितचं नव्हतं"दक्षा हसत म्हणाली.

" काय ग दी..... " तनिष्का तोंड पाडून म्हणाली.

" ते जाऊदे माकडे....माझ्या लग्नाला का नाही आली तू.... ते सांग आधी " अमीश खोटं खोटं रागावत म्हणाला.मी होते ना एवढी आख्खी याच्यासमोर अजून ती कशाला पाहिजे होती याला मध्ये भूवि मनातल्या मनात चरफडतच म्हणाली.

" ohhh my God.........अशी कशी विसरले मी.... silly Tanya.... मी तुझ्याशी बोलणार नव्हते आणि मी विसरले आहहहहहहह..... "ती तणतण करतच अमीशला म्हणाली.

" आता तुला नाचायला काय झालं ......आणि का बोलणार नव्हती माझ्याशी " तो तनिष्काकडे पाहून म्हणाला.


"तू.... तू मला invite केलं नाहीस.....या तुझ्या तान्या ला विसरलास तू ohhhhhh my God का हा अन्याय.....देवा उचल मला उचल.... "ती डोळ्यातून पाणी काढत म्हणाली .......झाला ड्रामा सुरू मॅडमचा दक्षा मनातल्या मनात म्हणाली..... ' तुझ्या??.....मग मी कुणाची????? 😠😠😠😠हा उचल उचल देवा उचल वारा आला तरी उडून जाईल आणि म्हणे देवा मला उचलं 'भूवि पुन्हा मनातल्या मनात चरफडत बोलत होती." हे काहिही काय.....ताईनी सांगितलं होतं की तुला आणि आई बाबा पण काका काकूंना आमंत्रण देऊन आले होते की " अमीश विचार करत म्हणाला.


" पण तू..... तू स्वतः कुठे मला सांगितल....जा तू मी नाही बोलणार आता...... तू विसरला मला " ती पुन्हा आवाज काढत म्हणाली.


" अगं पण मी सांगितलं काय आणि यांनी सांगितलं काय एकचं" तो दक्षाकडे पाहत तनिष्काला म्हणाला." नाही तू... तू आहे.... आणि ते... ते आहेत.....I'm angry on you don't talk with me...... who are you ?? " ती तोंड फिरवत म्हणाली आणि भूवि तिच्या नजरेस पडली." ती आमिशची धर्मपत्नी ....." अमीश काही बोलणार त्या पूर्वीच दक्षा म्हणाली.


" दी तीला बोलू देना......I'm asking to her na "भूविला वरपासून खालपर्यंत न्याहाळत ती म्हणाली.

" मी तुमच्या भावाची बायको.... " भूवि चेहर्‍यावर हसू ठेवत तिच्याकडे पाहत म्हणाली.


"काय्ययययययययय..... "" ए बाई एवढं ओरडायला काय झालं...... "मायाताई बाहेर येत म्हणाल्या.


" भावाची बायको ....." भूविने उच्चारलेले शब्दच तनिष्काने पुन्हा आश्चर्याने उच्चारले." अगं म्हणजे श्री ची बायको..... असंच म्हणायचं आहे ना?? "मायाताईं भूविकडे पाहत म्हणाल्या." हो तेच..... "भूविनेही मान डोकावून प्रतिसाद दिला.


" हा माझा भाऊ????......no way " तनिष्का अमिशकडे बोट दाखवून डोळे फिरवत म्हणाली." हो म्हणजे ते तुम्ही ताईंना दी म्हणताय सो मला वाटले हे तुमचे भाऊच झाले ना " भूवि जाणूनबुजून काही न कळल्याचा आव आणत साळसूदपणे चेहऱ्यावर खोटं खोटं गोंधळलेले हसू आणत म्हणाली."No no dear..... He is my best best best buddy .......not my brother okay "ती भूविकाला समजावत जोरात हसत म्हणाली." हं.... " हूं बेस्ट बडी म्हणे मला काय माहित नाही का तू कोण आहेस ते याची...... ती कसेतरी हसत मनातल्या मनात म्हणाली.

" झाली का तयारी......आवरा लवकर उशीर करू नका.......मी दहा वाजेपर्यंत येईन म्हणून सांगितलय साठे काकांना ......" विलासराव हॉलमध्ये येत म्हणाले .


" हो झालेय सर्व..... आता नाष्टा करून झाले की निघू लगेच....."मायाताई विलासरावांना म्हणाल्या. आणि तयारी करण्यासाठी किचनमध्ये निघुन गेल्या....तोपर्यंत दक्षा आणि भूवि डायनिंग टेबलवर डिशेस व्यवस्थित लावत होत्या......" अरे काय म्हणतेय आमची परिराणी .....कधी आलीस बाळा तू ???" विलासराव तीथे उभ्या तनिष्काला पाहत म्हणाले.


" आजच आले अंकल......" तीने हसून विलासरावांना प्रतिसाद दिला....... अरेच्चा हिला तर सगळेच ओळखतात इथे....भूवि विचारात पडत म्हणाली.

" बरं..... आलीच आहेस तर आता आमच्यासोबतच नाष्टा करून मग निवांत घरी जा "विलासराव


" हो अंकल....मी नाष्टा केल्याशिवाय जाईन का???..... आणि जर आज मायाआंटीच्या हातचा गाजराचा हलवा असेल तर मग नाहीच नाही........ अहाहा.....काय सुगंध येतोय...... "


" समजलंचं तर तुला.... " गाजराचा हलवा घेऊन बाहेर येत मायाताई हसून तीला म्हणाल्या.


" येस्ससससससस... " तीने अमीशकडे एक नजर पाहिलं आणि धावत जाऊन डायनिंग chair वर बसली.पण पण पण......ती पोहचेपर्यंतच आमीशने पटकन जाऊन आईच्या हातातील हलवा आपल्याजवळ घेतला....... आणि तनिष्काकडे पाहून एक मिस्टेरियस स्माईल दिली....


"Noooooooo.... ammy this is not fair yaar"ती ओठ काढत अमीशकडे पाहून म्हणाली.आणि त्याच्या मागे धावू लागली......तो पुढे आणि ती मागे सर्व हॉलमध्ये इकडून तिकडून पळत होते......


"ये ये पकड.....ह तर फक्त माझा आहे....अम्मम....आहाहा"अमीश तीला अजून चिडवत होता.

" अगं हळू....हळू जरा किती ती घाई..... कुठे पळून नाही जाणार तो हलवा.......आणि हा एक.... एवढे मोठे झाला तरी अजून त्या गाजराच्या हलव्यासाठी भांडता तुम्ही खरचं .... "दक्षा नकारार्थी मान हलवत म्हणाली.अमीश तनिष्काला चिडवत मागे मागे जात भूविला धडकला....ती खाली पडणार तसे आमीशने तीला सावरले......दोघांची नजरानजर झाली......तो क्षणभर तीच्या डोळ्यांत हरवला.....तीने पटकन त्याचे हात आपल्या हातांवरून बाजूला केले आणि एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकून बाजूला झाली....' what is this???..... मी हिला पडताना वाचवलं आणि ही अशी काय जगदंबेसारखी लूक देऊन गेली मला....ohhh my God this girl.....' त्याने आपले डोके पकडले......


" काय रे श्री चक्कर येतेय का तुला..... नाही म्हणजे खूप जोरात धडकलास ना म्हणून विचारलं " मानस गालात हसत अमीशला म्हणाला.अमीशने वर नजर फिरवली तर सगळेजण त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते....त्याने भूवि कुठे दिसतेय का पाहिले पण ती तीथे नव्हती....त्याला लाजल्यासारखे झाले होते.....


"केव्हाच आतमध्ये गेली ती..... "मिटक्या मारत गाजराचा हलवा खात तनिष्काने अमिशला सांगितले.


" हा तर माझ्याकडे......" तीला हलवा खाताना पाहून त्याने आपले हात पाहिले." तू तीला सावरलं मी आपलं गाजराच्या हलव्याला सावरलं..... " ती डोळे मिचकावून त्याला पाहिजे का असे दाखवत त्याच्यासमोर एक एक घास खाऊन त्याला अजूनच चिडवत होती.


"Ohhh no shit ......" त्याने रागाने तिच्याकडे पाहिले.


*************************

युनायटेड किंगडम :

" Plan A successful ...." त्याच्या फोन screen वर pop up झालेला massage पाहून त्याने स्मितहास्य केले आणि समोरील लॅपटॉप वर नजर वळवून तो पुन्हा आपले उर्वरित काम करू लागला.

क्रमशः

©️ मनमंजिरी ❤(Happylife 😇)

Do comments and retting guy's. 😇