Collection of short stories... - 2 - Final part books and stories free download online pdf in Marathi

लघु कथा संग्रह... - 2 - अंतिम भाग

🤩🤩 "करू आठवणी ताज्या, शाळेतील वाक्प्रचारांच्या" 🤩🤩

नाव : खुशाली ढोके (@Khushinsta)

वापरण्यात आलेला वाक्प्रचार : तोंडावाटे ब्र न काढणे.....

लघु कथा श्रेणी : प्रेम.

लघु कथा शीर्षक : अबोल प्रेम.


सत्या आमच्याच कॉलेजचा स्मार्ट, हँडसम बॉय…. सगळ्या मुली इज लाईक साखरेवर मुंग्या…. बट, मी मुंगळा बनू पाहत होते…. पण, काय फायदा तो तर माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता…

एकदा कॉलेज ॲन्युअल पार्टी मध्ये त्याचं अट्रॅक्शन मिळावं म्हणून, मी शॉर्ट वन पिस विअर् करायचं ठरवलं…. बट, यस तो ऑक्वर्ड वाटणार नाही आणि त्याचं पुर्ण अट्रॅक्शन मी मिळवू शकेल, याची पूर्ण काळजी माझ्या नाजूक मनाला ध्यानात ठेवत मी घेतली होती….

लाँग स्लीव्ह्स अँड थ्री फोर्थ लेंथ असा तो वन पिस मी विअर् केला…. ओह यस, कलर…. कलर ही मस्त डार्क ब्राऊन अँड त्यावर सिंपल मेकअप विथ ओपन हेअर स्टाइल…. जस्ट परफेक्ट…

जाणार मी एकटेच सो, स्कूटी घेतली आणि कॉलेज पोहचले…. तो अजूनही दिसत नव्हता… कदाचित आला नसेल…. म्हणून, मग मी जाऊन ग्रुप मध्ये उभे राहिले…. थोड्याच वेळात बॉइज ग्रुप मला डोळ्यास पडला…. त्यात सत्या, किती हँडसम ना हा…. मी ह्या विचारात असतानाच सानिया अँड ग्रुपचं कन्व्हर्सेशन कानावर पडलं….

*शिवानी* : "हे, सानिया…. लूक सत्या…. यार सच ए…."

*सानिया* : "जस्ट शट अप…. स्टे इन यूअर् लिमिट्स….. ही इज माइन….. अंडस्टुड…."

हे ऐकताच मी गोंधळले…. *सानिया द मोस्ट ब्युटीफूल गर्ल फ्रॉम मॅल्मोन डिसुझा कॉलेज, द मोस्ट हँडसम बॉय इन सेम कॉलेज जर एकमेकांवर त्यांचं प्रेम असेल तर, माझ्यासारख्या पोटावरिल लहानपणीच्या त्या जळालेल्या डाग असणाऱ्या मुलीसोबत तो का प्रेम करेल?*

माझ्या ह्या प्रश्नाने मला इतके ग्रासले की, मी तोंडावाटे ब्र न काढताच तिथून निघून घरी आले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली...

समाप्त….

_____________________________________________


हॅश टॅग ट्रेण्ड

#वैद्य_विद्या

नाव : खुशाली ढोके (खुशी)

शीर्षक : मनात डोकावताना….


सकाळी ११:०० वाजता…..

केबिनमध्ये डोक्यावर हात ठेवून बसून होतो…. आज आलेला पेशंट किती नैराश्यात होता ना! पण, त्याच्या नैराश्याचे कारण, तोच होता…. सतत नकारात्मक…. काहीही विचारलं की, मी नाहीच करू शकत म्हणायचा…. लोकं का इतकी नकारात्मक होत असावीत? त्याला आजूबाजूचे वातावरण कितपत जबाबदार माहीत नाही…. पण, कुठेतरी ते स्वतःच याला जबाबदार असतात….

आई : "अग ये उठ आता सकाळचे ०९:०० वाजलेत…"

मी खडबडून जागे झाले….. बघितलं तर, मी घरात माझ्या रूम मध्ये झोपून होते आणि मी बघितलं ते एक स्वप्न होतं….

देवा हे काय होतं…..

उठले, फ्रेश होऊन कॉलेज साठी बाहेर पडले…. डोक्यात एकच विचार तो म्हणजे, लोकांच्या मनातील न्यूनगंड कायमचा दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ञ बनण्याचा…. कारण, स्वप्नात मी एक मानसोपचार तज्ञ होते आणि लोकांच्या मनातील आजारांवर काम करताना त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करता यावा यावरच मी काम करत होते…..

_____________________________________________हॅश टॅग ट्रेण्ड

#शेतकरी_काळ्या_मातीचा

नाव : खुशाली ढोके (खुशी)

शीर्षक : संकल्पनेच्या जोरावर...


राम्या एका गावचा लघु शेतकरी…. जेमतेम दीड एकर शेती..! त्यात भर म्हणजे, शेती कोरडवाहू…..!

राम्या शिक्षित होता….. प्रयत्न खूप केले पण, यश मिळत नव्हते…. आता यश नाही म्हटल्यावर एकच उपाय त्याच्या समोर होता…. तो म्हणजे, शेतीचा…. म्हणून, कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष न देता गावाकडं निघाला आणि शेतीला सुरुवात केली……

वर्षे गेली पण, पाहिजे तसं उत्पन्न मिळत नव्हतं… कधी तरी निराश होऊन आत्महत्या करायचा विचार ही मनात डोकावून गेला होता… पण, राम्या होता खंबीर मनाचा म्हणून, लगेच ते विचार तो धुडकावून लावत असे… पण, आता शेतीतील कमी उत्पन्न त्याला उदरनिर्वाहासाठी कमी पडू लागले होते…. लग्नाचं वय झालं होतं मात्र, मुलगी कोणी देईना! कारण, राम्या शेतकरी होता…!

राम्या एक दिवस सहज गावात फेरफटका मारायला म्हणून, घराबाहेर पडला….. रस्त्यात त्याला त्याचा मित्र कार्तिक भेटला…. त्याच्याशी बोलताना राम्याला तो खूप दुःखी असल्याचे जाणवले… कारण, माहीत झाल्यावर राम्याच्या डोक्यात एक युक्ती आली…..

कार्तिक त्याला सांगत होता की, कमी शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधेच्या अनुपलब्धतेमुळे कार्तिक पंचवीस एकर शेती असून ही पाहिजे तसं उत्पन्न काढू शकत नव्हता… राम्या मनातच विचार करू लागला…. जर, ही समस्या कार्तिकला आहे…. मग गावात असे किती तरी शेतकरी आहेत ज्यांना शेतीची योग्य माहिती नाही…. मग त्यांनाही प्रशिक्षणाची गरज असेलच…. हा सगळा विचार करत असता त्याला काही सुचले आणि त्याने दुसऱ्याच दिवशी शहराकडे धाव घेतली….

शहरात तो त्याच्या मित्रांना भेटला जे कृषी विभागात उच्च पदांवर कार्यरत होते…. राम्याला अपयश आल्याने तो अधिकारी बनू शकला नव्हता... मात्र, त्याचे जिवाभावाचे मित्र आज वेगवेगळ्या विभागात कार्यरत होते…

राम्याच्या समस्या त्यांनी नोंदवून घेतल्या आणि त्याला योग्य ती मदत देऊ करण्याचे आश्वासन ही दिले…. राम्या गावात येऊन सर्वांना प्रशिक्षण सुविधेची माहिती देऊ लागला…. गावात लवकरच त्यांची एक टीम येणार असल्याचं त्याने गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन सांगितले…

सगळ्यांना त्याने फक्त सहानुभूती न देता कशाप्रकारे आपण माहिती मिळवून शेतीचा विकास साधू शकतो हे सांगितले…. त्याच्या बोलण्याने गावातल्या लोकांना थोडा धीर आला…. लगेच गावात ह्या प्रशिक्षण कल्पनेला मान्यता देण्यात आली आणि काम सुरू ही झाले…. गावकरी प्रशिक्षण घेत असता सोबतच शेतीच्या कामात आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा योग्य वापर करू लागले….

कालांतराने त्यांच्या गावात शेती उत्पादन तसेच उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळू लागला जो की, फक्त एका संकल्पनेच्या जोरावर त्यांच्या वाट्याला आला होता….

गावच्या पाटलांनी, राम्याला स्वतःचं शेत देऊ केलं…. पाटलांच्या मागे त्यांच्या संपत्तीला कोणीही वारीस नसल्याने त्यांनी राम्याला दत्तक घेतले आणि त्याला मोठ्या मनाने स्विकारले….

समाप्त....


_____________________________________________