Kush - 4 - Last part books and stories free download online pdf in Marathi

कूस! - ०४. (शेवट)

आतापर्यंत आपण पाहिले,

पाटील कुटुंबीयांनी केलेल्या क्रूर गुन्हेगारीचा वैयक्तिक पातळीवर पोलीस उप निरीक्षक नाईक यांना जास्तच मन:स्ताप सहन करावा लागला होता.

आता पुढे!

पाटील कुटुंबियांना ताब्यात घेण्याचे आदेश निरीक्षकांनी शिपायांना दिले. पाटील कुटुंबियांना ताब्यात घेत निरीक्षकांसोबत पोलिसांची एक तुकडी ठाण्याकडे रवाना झाली.

गाडीत निरीक्षकांच्या डोक्यात नको ते विचार सुरू होते; ज्यामुळे त्यांचे डोके दुखू लागले!

ठाण्यात पोहचत पोलिसांकडून फौजदारी खटला नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

मुख्य आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत सोबतंच गुन्ह्यात सामील असलेल्यांवर देखील विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.

या घटनेने निरीक्षकांना चांगलाच मनःस्ताप झाला. या घटनेचा त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध असल्याचे त्यांना वारंवार जाणवत होते!

विचार करून डोकं दुखायला लागलं होतं. डोकं पकडून ते खुर्चीत बसले.

शिंदेंना ते डोळ्यास पडताच आत येत निरीक्षकांची ते काळजीने विचारपूस करू लागले.

"साहेब, काय झाले?"

"आ!"

नाईकांनी गोंधळून वर पाहिले. समोर शिंदे उभे दिसले.

"काही नाही. डोक्यात थोडा त्रास आहे!"

"साहेब, कॉफी आणू?"

"हो!"

थोड्याच वेळात शिंदेंनी साहेबांना कॉफी आणून दिली. त्यांनी ती संपवली; तेव्हा त्यांना थोडे बरे वाटू लागले.

साधारण काही मिनिटं झाली असतील, तेवढ्यात संजीव नाईक यांच्या पत्नी आरती यांचा फोन आला.

उचलून घेत निरीक्षक आपल्या पत्नीची काळजीने विचारणा करू लागले.

"बोल ना आरती?"

"संजू, लवकर घरी ये!"

"काय झाले आहे? सांगशील!"

"ते सर्व नंतर! तू आधी घरी ये!"

"अग सांगशील काय झालंय?"

ते जरा चिडूनच बोलले!

"संजू, तू आधी घरी ये!"

"हो आलोच!"

नाईकांना गोंधळलेल्या अवस्थेत पाहून शिंदेंनी विचारणा केली. शिंदेंना परिस्थितीची कल्पना देत ते लगेच घरी रवाना झाले.

काहीच वेळात ते घरी पोहचले.

"आरती, कुठे आहेस?"

सोफ्यावर टोपी ठेवत भेदरलेल्या आवाजाने सर्वात आधी त्यांनी बायकोला आवाज दिला.

मागून येत त्यांच्या बायकोने त्यांना घट्ट मिठी मारली. मागे वळून बायकोच्या कपाळावर त्यांनी ओठ टेकवले. ती सुखरूप असलेली पाहून देवाचे आभार मानले. पुढे ते बायकोची काळजीने विचारणा करू लागले.

"आरती, काय झाले?"

हातातली प्रेगा न्यूज किट समोर धरत निरीक्षकांच्या पत्नीने इशारा केला.

"संजू, तू बाबा होणार आहेस!"

हे ऐकताच निरीक्षकांनी बायकोला वर उचलून धरले. गोल फिरवत त्यांनी तिला हळूच खाली सोडले आणि ओठांवर ओठ टेकवले.

इतक्या मोठ्या आनंदाच्या बातमीनंतर देखील बायकोच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून निरीक्षकांनी प्रश्न उपस्थित केला.

"आरती! काय झाले?"

"संजू, मी बातमी वाचली! ती बाई?"

"कोण बाई?"

"पाटलांची सून!"

"तिचे काय?"

"ती काही दिवसांपूर्वी मला रस्त्यावरून पळताना दिसली होती!"

"काय?"

"हो, मी तिला पाहून गाडी थांबवली. ती मला घाबरलेली दिसली; म्हणून तिला मी माझ्या गाडीत बसवत पाणी वगैरे दिले. तिला काही विचारणार त्याआधीच ती गाडीतून बाहेर पडली! जराच अंतरावर कोणी तरी तिला गाडीत बसवून निघून गेले!"

"पण मग इतका विचार का?"

"तू पत्रकार परिषदेत त्या बाईची मृत्यू झाल्याची जी वेळ सांगितली होती; नेमकं त्याचं वेळेस माझी प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली!"

"छे!! याचा काय संबंध?"

"संजू, काही दिवसांपासून मी रोज दोन वेळेस टेस्ट करून पहायचे. का पण माहीत नाही, मला काही दिवसांपासून पोटात वेगळ्याच हालचाली जाणवत होत्या! आज सकाळी इन्फॅक्ट घटना घडल्याच्या काहीच मिनटांपूर्वी सुद्धा मी एक टेस्ट केली होती; पण ती निगेटिव्ह आली होती! पण ती बातमी बघता बघता दुसरीकडे मी किट हातात पकडून त्यावर दोन लाईन्स येण्याची वाट पाहत होते आणि नेमकं त्याच वेळी ही गोड बातमी नजरेस पडली!"

"व्हॉट?"

"हो!"

"हे कसं शक्य आहे?"

"Don't know yaar!"

"जाऊदे, इतक्या वर्षांनी आपल्याला हे सुख मिळतंय, हे काही कमी आहे का?"

"हो रे!"

दोघेही एकमेकांच्या कुशीत विसावले.

रात्री १२ च्या सुमारास…!

काही तरी स्वतःपासून दूर जातंय या स्वप्नाने संजीव नाईक यांना जाग आली. ते दचकूनच उठले! त्यांनी पाहिले, तर शेजारी आरती दिसली नाही. दचकून उठत त्यांनी पूर्ण घरात बायकोचा शोध घेतला.

खूप शोध घेतल्यावर त्यांना आरती बाहेरच्या बागेत एका बाकावर बसून दिसली. जवळ जाऊन पाहिले, तर तिच्या बरळण्याचा आवाज ऐकू आला.

खांद्यावर हात ठेवत त्यांनी तिला आवाज दिला. बायकोचं मागे वळून पाहताच अवतार पाहून निरीक्षक घाबरून मागे हटले.

विस्कटलेले केस, आग ओकणारे लाल भडक डोळे! जे पाहून निरीक्षकांना चांगलाच घाम फुटला!

"आरती!"

"आरती नाही, स्वाती!"

"काय?"

"हो!"

"कसं शक्य आहे?"

"आता मीच या शरीरावर राज्य करणार!"

"काय?"

"हो! आजपर्यंत मी तुझ्यासारखे पुरुष पाहिले नव्हते! जे स्त्रियांचा एवढा आदर करतात. तू मला न्याय मिळवून दिला. जरी कायदा नंतर शिक्षा सुनावेल, पण तू माझ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले. मी तर तुझ्या प्रेमातंच पडले रे! आरतीच्या शरीराच्या माध्यमातून माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी निघून जाईल. तोपर्यंत मला आणि गर्भातील या बाळाला प्रेम देशील ना?"

निरीक्षकांना स्वप्नात असल्यासारखे वाटू लागले म्हणून दचकून भानावर येत त्यांनी परत परत डोळे भरून समोर उभ्या आरतीच्या शरीराला पाहिले! कारण आत्मा तिचा नसून तो पाटलांच्या सुनेचा होता!

गोंधळून त्यांनी तिला प्रश्न केला.

"माझी आरती?"

"तुझी बायको तुला एकाच अटीवर परत देईल. माझ्या इच्छा पूर्ण कर आणि तुझी बायको मिळव!"

समाप्त!

©® खुशाली ढोके.