Night Games - Episode 12 books and stories free download online pdf in Marathi

रात्र खेळीते खेळ - भाग 12

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरतो आणि ते पुस्तक शोधण्यासाठी तयार होतो... तो वाडा तो मुलगा गेल्यानंतर पूर्वस्थितीत येतो. त्याला तर ते सगळ अविश्वसनीयच वाटत... पण जास्त विचार न करता तो पुन्हा स्वतः ला सावरतो. त्याला काहीही करून अर्ध्या तासात ते पुस्तक शोधायचे असत नाहीतर त्याच्यासाठी पुस्तक शोधण जास्तच अवघड होवून बसणार होत.. तो वाड्याच निरीक्षण करत करत पुढे जातो. तो सुरूवातीला वाड्यातील वरच्या खोलीत जातो.. पण जस ती खोली पाहतो तसा गोंधळूनच जातो.. वरची जी खोली होती त्या खोलीला फक्त दरवाजेच होते चार भिंतींना चार दरवाजे होते. त्या खोलीत मोजकच सामान होत. एक मोठा टि.व्ही होता, आणि त्याच्याच समोर एक बेड होता... तरीही त्याने त्या टि.व्ही च्या आजूबाजूला बघितल तसच त्या बेडवर बघायला गेला तोवर तो बेड बेड न राहता सिंहासनाच्या रूपात परिवर्तीत झाला.. ते पाहून तर त्याला समजल की हा वाडा फक्त वाडाच नाही तर मायावी सुद्धा आहे. तो दरवाज्यापाशी गेला तर तो कपाटात परावर्तित झाला.. त्याला आधी पुस्तक शोधण सोप असेल अस वाटलेल पण ते जास्तच अवघड होत कारण त्या हे तर समजलेले कि एक तर अर्ध्या तासात कोणत्याही अडचणीशिवाय पुस्तक शोधता येईल किंवा नंतरच्या अर्ध्या तासात दुष्ट शक्तीशी लढून पुस्तक शोधाव लागेल नाहीतर आपला अंत आहे. पण तो वाडा मायावी आहे हे आताच समजलेल.. आता तो प्रत्येक दरवाजा तपासू लागला. एक एक दरवाजा हळूहळू एका वस्तूत परिवर्तीत होवू लागला जेव्हा दरवाजा वस्तूत परिवर्तीत व्हायचा तेव्हा त्या वस्तूत ते पुस्तक शोधायचा. पण त्याला काही केल्या ते पुस्तक सापडेना.. तरीही तो हार न मानता शेवटच्या दयवाज्याजवळ जातो. तो त्याला हात लावतोच तोवर तो दरवाजा बाहेरच्या दिशेला खोलला जातो आणि त्याचा पाय घसरतो.. तो खाली पाहतो तर तो जमिनीपासून खूप उंच अंतरावर असतो... आणि हिंदकळत असतो.. पण तरीही हात दरवाज्याला घट्ट पकडून तो हळूहळू वर येतो व झाल्या प्रकाराने चांगलाच हादरतो कारण जर त्याचा हात निसटला असता तर तो त्या उंचावरून खालीच पडला असता व जीवाला मुकला असता... त्याला तर ती कल्पना करूनच घाम फुटला... पण तरीही त्याने स्वतः ला सावरल. त्याला काहीही करून अर्ध्या तासात पुस्तक शोधायच होत म्हणून.... तो आता वरच्या बाजूच्याच दुसऱ्या खोलीत जावू लागला... तो त्या खोलीत गेला तस त्याला वेगळीच अनुभूती आली या खोलीत नुसत्या वस्तूच भरल्या होत्या... समोर रिकामी अशी जागा पण नव्हती... वेळ तर सरत चालला होता... तो तसच पुढ्यातली वस्तू बघायला गेला तर त्या खोलीत पाणीच भरल ते पाणी हळूहळू वाढू लागल तरीही तो पुढे जावू लागला. त्याने पुढच्या वस्तूला हात लावला तर ती एका पक्षाच्या रूपात परिवर्तीत झाली व खोलीतून बाहेर निघून गेली... अस प्रत्येक वस्तू बघून झाल्यावर तो तिथून बाहेर पडला... त्याचा वेळ तर संपत चाललेला पण काही केल्या पुस्तकच सापडत नव्हत... त्याला कळाल तर होत कि तो वाडा मायावी आहे... तो आता तीन नंबरच्या खोलीत जातो.. तिथे गेल्यावर त्याला फुलांचा सुगंध येवू लागतो... क्षणभर तर तो त्यात हरवून जातो... पण इथे काय नसणार उगाच शोधून वेळ घालवायला नको कारण इथे फुलांचाच वास येत आहे आणि नुसत झाडे दिसत आहेत. कदाचित अंगण असाव खोलीच रूप देवून फुलवलेल अस म्हणून तो तिथे न शोधता पुढे निघून जातो.. त्याला वाटल निसर्गाच्या रूपात काही मायारूपी नसणार...
तो आता खाली येवू लागतो... त्याच्या हातातले पंधरा मिनट संपून जातात आता त्याच्या कडे पंधरा मिनिटे उरलेली असतात नाहीतर दुष्ट शक्ती प्रवेश करणारच असतात... तो वेळ ओळखून भरभर खाली येतो... आता तो खालील एक नंबरच्या खोलीत म्हणजेच सभामंडपात पोहोचतो... सभामंडपात दोन्ही बाजूंनी सिंहासन असतात व मध्ये राजाच सोन्याचा वापर करून बनवलेल सिंहासन असत... तो आता ती बाजूची सिंहासन तपासू लागतो. पण जस तो त्या सिंहासनाला हात लावतो तस त्या सिंहासनावर सेनापती उभा ठाकतो... तसच बाजूच्या सिंहासनावर पण राजाच्या दरबारातले लोक बसलेले दिसतात ते पाहून तर त्याच्या मनात भितीचाच प्रसार होतो... तोवर सोन्याच्या सिंहासनावरून आवाज येतो... कोण रे कोण आहेस तू आणि आमच्या राज्यात काय करतोयस... त्यावेळी वीर थोडक्यात पाच मिनिटात त्या मुलाने सांगितलेली माहिती सांगतो...
अच्छा तर तुला पुस्तक हवे आहे... राजा विचारतो..
हो .... वीर म्हणतो....
बर आम्ही तुला एक मार्ग दाखवू शकतो‌. तस त्याचे दोन मार्ग आहेत आणि पहिल्या मार्गावर गेल्याशिवाय दुसरा मार्ग सापडत नाही... पण तुला आमचा विश्वास जिंकावा लागेल... कारण इथे येणारे काही दुष्ट लोक पण असतात जे चूकिच्या गोष्टींसाठी पुस्तक मिळवू पाहतात.... राजा म्हणाला......
पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे महाराज मी कस तुमचा विश्वास जिंकू त्या कमी वेळात कारण पुढे मग पुस्तक शोधायला पण वेळ लागणार....... वीर म्हणाला....
हिच तर कसोटी असते... पुस्तक मिळवण्याची ती तुला पार पाडावीच लागणार..... आम्ही असाच विश्वास नाही ठेवू शकत कोणावरही....सिंहासनावरील राजा म्हणाला....
बर मग मला काय कराव लागेल तुमचा विश्वास जिंकण्यासाठी ते तर सांगा.... वीर म्हणाला
बर ऐक तू जिथे उभा आहेस तिथून पुढे दहा पावलांवर गेलास कि तिथून डाव्या बाजूला वळ तिथली जागा उकर त्याखाली आमच एक नाणे आहे ज्याच्यात पवित्र शक्ती आहे... ते नाणे फक्त मन साफ असणाऱ्या व्यक्तीच हातात घेवू शकतात जर ते दुसऱ्या कोणी हातात घेतल तर ते राख होऊन जात..... राजे म्हणाले...
तस वीर पाय मोजत मोजत दहा पावलांवर जातो आणि तिथून डाव्या बाजूला वळतो... आणि बोटाने एक निशाण बनवतो व थोड्या दूर अंतरावर असलेले फावडे उचलतो... मनातच म्हणतो बर झाल हे तर लगेच सापडल नाहीतर फावड शोधण्यातच वेळ गेला असता... तो परत बोटाने निशाण बनवलेल्या जागी येतो व तिथली माती उकरून काढतो तस त्याला त्या खाली ते नाण सापडत. तो ते हातात घेतो व परत सभागृहात जावू लागतो.... या प्रक्रियेत त्याची दहा मिनिटे निघून जातात आता फक्त पाच मिनिटे शिल्लक असतात... तो भरभर सभागृहात पोहोचतो... ते सभागृहातले दरबारी, सेनापती, राजा सगळेच खूष होतात... ते त्याला म्हणतात आता तू पुस्तक शोधायला जावू शकतोस...
पण तुम्ही मला एक मार्ग दाखवणार होता ना.... वीर म्हणाला......
अरे आम्ही तर तुला केव्हाच मार्ग दाखवलाय आता तुला तो फक्त ओळखता आला पाहिजे..... सेनापती म्हणाला.
तसा वीर अवाकच झाला.... क काय कोणता मार्ग.....
तो विचारू लागला तोच उरलेले पाच मिनिटे संपून गेली आणि ती सभागृहातली सगळीच गायब झाली.... ते पाहून वीरला एकिकडून राग आला. तो मनातच म्हणाला काय हें नी मला मार्ग दाखवला पण कधी..... त्याचे तर डोक सुन्न झाले तसच मनात भयाची लाट उसळली. कारण अर्धा तास पूर्ण झाला होता...
आता जे संकट पुढे येईल त्याला सामोरे जावे लागणार होत.