Indraza - 12 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 12

भाग -१२



फोन कॉल नंतर शिवराज खूपच टेन्शन मध्ये आले....त्यांना कळत नव्हतं की आता काय करावं? त्यांच्या परिवाराला कस जपावं??....



शिवराज - हा माझ्या मुलींना काही करणार तर नाही ना...संजू यादव... खूपच बेकार माणूस होता पण तो तर? मग हा कोण? मला आता माझ्या मुलींना... माझ्या परिवाराला वाचवायला हवंय... पण मी एकटा काय करू? कस करू? त्यात या बायका माझं ऐकणार नाहीत...आणि त्यांना मला टेन्शन ही नाही द्यायचंय..
हा..इंद्रा......



दिव्या - अहो..अहो.... चला जेवायला.... अहो...



शिवराज - आ आ हो हो आलोच... पोरी कुठयत ग??



दिव्या - बाहेर बसल्यात जेवायला... तुमची वाट पाहत आहेत..



शिवराज - बर आलोच...



तारा - दिदा you know आज काय झालं?



जिजा - काय?



तारा - माझ्या स्कूल चा बंटी आठवतोय का? त्याची आज पॅन्ट फाटली 😂😂😂😂😂



जिजा - काय.. 😂कशी?



तारा - dont know तो लेसन वाचायला उठला आणि खूप जोराचा आवाज झाला तस त्याची पॅन्ट फाटली 😂आज तर तो मागे हात ठेवूनच चालत होता... 😂मज्जा आली ग 😂रोज मला त्रास द्यायचा आता बरोबर समजलं असेल...



जिजा - हा ना 😂😂😂😂खूप मज्जा आली असेल..



तारा - हो 😂



शिवराज - अम्म्म bad manners...तारा....



तारा - बाबा.... (जीभ काढत )



शिवराज - तारा..जिजा मी आणि आई तुम्हाला नेहमी काय शिकवण देत आलो..जेवताना हसायचं नाही..जास्त बोलायचं नाही..आणि समोरच्यावर असं हसायचं ही नाही..जर तो अडचणीत आहे तर आपल्याला मदतीचा हात पुढे करता आला पाहिजे ना?



तारा - बाबा पण त्याने मला त्रास दिलाय खूप...



शिवराज - त्याने त्रास दिला म्हणून त्याला तू बजावलस ना? आणि तो तुला त्रास द्यायचा बंद झाला मग आता तो संकटात असताना तू का त्याची मदत नाही केलीस? हसत का बसलीस..जर तू हात पुढे केला असतास तर त्याची त्याला चूक कळली असती आणि त्याने तुझ्यासोबत मैत्री केली असती..बग बाळा शत्रू ला सुद्धा मदत करावी जर तो अडचणीट असलं




दिव्या - हो..पण सारख्या सेम चुका करणाऱ्या माणसाला ही माफ करू नये..कारण अशी माणसं चुका करतच राहतात...



जिजा - हम्म बरोबर बोलताय तुम्ही..



तारा - हो आई बाबा मी लक्षात ठेवेन... सॉरी...



शिवराज - हम्म आम्ही शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो... काय माहित मी उद्या असेल नसेल



जिजा - बाबा असं का बोलताय..असं नका म्हणू...



शिवराज - बर बाई... नाही म्हणत...😂



दिव्या - 😂


(जिजाला कॉल आला )



जिजा - हॅलो बोल मन्या...... 📲



मनाली - काय करत आहेस?....... 📲



जिजा - आताच जेवले..बोल न...... 📲



मनाली - आपण फिरायला जाऊयात का? चौघा...तू इंद्रा मी आज्या...???...... 📲



जिजा - अग पण आज? कस? अचानक?📲



मनाली - अग कंटाळा आलाय आता घर ते कॉलेज...कॉलेज ते घर करत.... आज्या रेडी आहे यायला आता तुमचं सांगा... मग मला संध्यकाळ पर्यंत भेटा....... 📲



जिजा - बर ठीके.. जाऊयात... मी आणि इंद्रा येतो..हम्म बाय....... 📲


*******************


आपले नवीन कपल मनजिंक्य आणि जुने कपल इंद्रजा😂बाहेर जायचं म्हणून एकत्र भेटले....त्यांना सुचतच नव्हतं की बाहेर कुठे जायचा...विचार करत ते लोक कॅफे मध्ये बसले...अचानक त्यांचा प्लॅन झाला जुहू बीच ला जायचा...चौघा आज ट्रेन मधून गेले....जस इतर कपल्स जातात......


मनाली अजिंक्य जिजा इंद्रा आजूबाजूला दरवाज्यात उभे होते....अजिंक्य ने मनालीचा हात पकडला होता....आणि एकमेकांकडे ते बघत उभे होते...इंद्रा जिजाकडे एकटक पाहत होता....हवेने हळुवार तिची उडणारी केस त्याच्या तोंडावर हळूच झूळूक मारून जात होती....ते त्या आवडत होता....ते लोक जुहू ला पोहोचले....


जुहू बिचावर सर्व काही होता.....horse riding...पाणीपुरी,भेळ,आईस्क्रीम, गोळा जे हवाय ते सर्व काही होता....खूप मोठा आणि सुंदर असा तो समुद्र होता....तसाच अथांग, सुंदर....!!!



आजचा दिवस त्यांचा होता....❤️ एकमेकांत ते इतके हरवले होते की आजूबाजूच जग विसरून ते त्यांचा दिवस एकत्र घालवत होते....
.
.

अजिंक्य - मन्या...चल घोड्यावर बसुया...


मनाली - बरीच घाई झाले तुला घोड्यावर बसायची...



अजिंक्य - व्हय घाई तर झाली हाय..पण काय करणार वाट तर बघायचं लागणार हाय... तवर ह्या घोड्यावर तरी बसुया काय..??



मनाली - वेडा... चल



अजिंक्य - ओ भाई साहब ठीक से बिठाओ मुझे मेरी शादी बचचे होने है अभी तक... गिरा वीरा मत देना काय?



मनाली - ए काहीही हं...



अजिंक्य - काहीही काय? आता ये की वर..



मनाली - आपण एकाच घोड्यावर बसायचंय...



अजिंक्य - व्हय ये लवकर आता...
(हात पुढे करून )



मनाली - हम्म......(त्याचा हात पकडत)



अजिंक्य - घाबरू नको घट्ट पकड नाय तर मला बी घेऊन पडशीन....
चलो भय्या.....



मनाली - ठीके तुला घेऊन नाही पडणार....



अजिंक्य - अग मस्ती केळी..रुसतीस काय लगीच?



मनाली - आज्या मला भीती वाटते...



अजिंक्य - आता बी तुला भीती वाटत्या? (तिला मागून घट्ट पकडत )



मनाली - आता कसलीच भीती नाही.....(लाजत )



अजिंक्य -👀



मनाली -🙈
.
.
.

जिजा - वाव!! किती मोठा आणि छान समुद्र आहे ना... खूपच सुंदर आहे....



इंद्रजीत - हम्म खूप सुंदर आहे...



जिजा - हो ना...
ओयय मला बघून का बोलतोयस 😂



इंद्रजीत - मग? तुझ्याईतक या जगात काय सुंदर असेल का? असूच नाही शकत?



जिजा - काहीही हं 👀🙈



इंद्रजीत - हाय! तुझा हे लाजणं... यावर चार ओळी आठवल्या.....

"आता हे रोजचेच झाले.."
"तीच येणं,लाजून जाणं.."
"मग अचानक वळून पाहणं"
" सगळंच आहे जीवघेणं "

(Pratiksha. Wagoskar )



जिजा - वाव किती छान बोलतोस रे तू..तुझ्यासारखा रागीट आणि कठोर मनाचा माणूस जो आधी होता तो असाही असू शकतो हे कुणाला ठाऊक नसावं अजून 😂



इंद्रजीत - नाहीच..काही खास माणसं आणि तुझ्याशिवाय हा इंद्रजीत भोसले खरा कसा आहे हे कुणालाच नाही माहिती....



जिजा - मी ठीके पण खास माणसं कोण? घरची मंडळी का? की मैत्रीण मित्र?



इंद्रजीत - नाही... आ ते आ आहेत कुणीतरी...बर तू तुला पाणीपुरी खायचीय का? की गोळा?



जिजा - आ हम्म..



इंद्रजीत - चल...



जिजा - हो चल....


इंद्रजीत - भय्या...जिजा स्पेशल पाणीपुरी...एकदम तिखीवली😂


दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.....😂
.
.
.
.

मनाली - ए गोळा खाऊयात ना?



अजिंक्य - तू तर लहानच लेकरावांनी करत्यास ग..चल गप्प...शेम्बडी होशील....



मनाली - अरे यात लहान काय? मला गोळा खावा असं नाही वाटतं का?? आणि झली तर झाली शेम्बडी...



अजिंक्य - अरे पण... ऐक की माझं...



मनाली - नाही... मी नाय... मला घेउंन दे नाही का म्हणतोयस....?



अजिंक्य // इंद्रजीत - अरे बाबा तुला सर्दी होईल म्हणून म्हणतोय.......
(दोघ एका सुरात )



अजिंक्य - इंद्रा भावा बर झाला आलास..अरे हिच्यासोबत एकटं पाठ्वलंस खरं पण हे बग कशी करतेय...हट्ट कराय लागले... गोल्यासाठी...



इंद्रजीत - ही पण बग ना...



मनाली // जिजा - तुम्ही आम्हाला गोळा देणार आहात की नाही? हो की नाही?
(एका सुरात )



अजिंक्य // इंद्रा - नाही........
(एका सुरात 😂)



जिजा // मनाली- ठीके.... मग.... 😏



दोघी पण खाली रस्त्यावर बसतात.....त्यांना असं मधेच बसलेला बघून सगळे त्यांनाच बघतात.....



अजिंक्य - मनाली उठ काय करालीस?



इंद्रजीत - जिजा उठ अग सगळे पाहत आहेत... हट्ट का करतेस आजारी पडशील म्हणून बोलतोय ना...



अजिंक्य - मन्या उठ...



मनाली - नाही पहिले गोळा दे...



जिजा - तू मला लहान म्हणालास ना मग आता मी लहान मुलांसारखं करते आता तू हट्ट पुरव


मनाली // जिजा - हो की नाही.....



अजिंक्य // इंद्रा - बर ठीके देतो उठा....




जिजा // मनाली - ये..... 😂



इंद्रजीत - कशा आहेत या? स्वतःच हट्ट पूर्ण करायला मागे पूढे नाही बघत 😂



अजिंक्य - व्हय तर खतरनाक आहेत लई....😂



मनाली अजिंक्य आणि इंद्रा जिजा एकच गोळा खात असतात....गोळा खाताना होणारी नजरानजर 👀हळूच होणारा स्पर्श.... ❤️सगळंच खूप वेडावणार होता आणि त्यांना हवंस होता....
.
.
.
त्यांनी खूप फोटोज काढले.....मजा केळी मग येऊन रेतीवर बसले......त्या अथांग पाण्याकडे बघत त्यानी दोघांच्या खांद्यावर मॅन टेकवली......कुठे तरी एका शॉप वर गाणी वाजत होते....
चौघे पण त्या गाण्याच्या ओळीवर हरवून गेले..जणू काही ते लोकच समोर आहेत❤️त्यांच्या नजरे समोर त्याचं चित्र उभ राहील...
.
.
.

🎶

सजदे मे यू ही झुकता हू
तुम पे ही आके रुकता हू
क्या ये सबको होता है?
हमको क्या लेना है सबसे
तुमसे ही सब बाते अब से
बन गये हो तुम मेरी दुआ

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने ये क्यूँ हुआ है
के बन गए हो तुम मेरे खुदा


तू कहे तो तेरे ही कदम के मैं
निशानों पे चलूँ रुकूँ इशारे पे
तू कहे तो ख्वाबों का बना के मैं
बहाना सा मिला करूँ सिरहाने पे.....(मनाली)

तुम से दिल की बातें सीखी
तुम से ही ये राहें सीखी
तुमपे मर के मैं तो जी गया
खुदा जाने के मैं फ़िदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने ये क्यूँ हुआ है
के बन गए हो तुम मेरे खुदा......(अजिंक्य)


दिल कहे के आज तो
छुपा लो तुम पनाहों में
के डर है तुमको खो दूंगा
दिल कहे संभल ज़रा
ख़ुशी को ना नज़र लगा
के डर है मैं तो रो दूंगा.........(इंद्रजीत)

करती हूँ सौ वादे तुमसे
बांधे दिल के धागे तुमसे
ये तुम्हें न जाने क्या हुआ..........(जिजा)

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने ये क्यूँ हुआ है
के बन गए हो तुम मेरे खुदा.......(इंद्रजीत)



सजदे मे यू ही झुकता हू
तुम पे ही आके रुकता हू
क्या ये सबको होता है?......... (अजिंक्य)

हमको क्या लेना है सबसे
तुमसे ही सब बाते अब से
बन गये हो तुम मेरी दुआ.............(मनाली)



खुदा जाने के मैं फ़िदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने ये क्यूँ हुआ है
के बन गए हो तुम मेरे खुदा.........(इंद्रजा)

🎶
.
.
.
.


जिजाचे विकएंड होते म्हणून आज ती उशिरा पर्यंत झोपलेली......आज इंद्राने ही तिला त्रास द्यायचा नाही असं ठरवलेला....पण तेवढ्यात तिचा फोन वाजलाच....


जिजा - अम्म जिजा बोलतेय........ 📲



स.व्यक्ती - काय म ओळखलं का? तुमच्या या हितचिंतकला....... 📲



जिजा - तू पुन्हा? कोण आहेस कोण तू? का मला सारखा?........ 📲



व्यक्ती - हो हो थांब थांब..अग झोपा काय काढतेस? जा इंद्राच्या घरी आणि ती मुलगी जिचं मी तुला सांगितलं होता तिच्याबद्दल शोध तुला माझ्यावर भरोसा नाही ना म्हणून...तुला त्या मुलीचा फोटो त्यांचे फोटो नक्कीच मिळतील....मग तर पटेल ना?.......... 📲(फोन कट)



जिजा - हॅलो हॅलो...शीट परत तेच हा बोलतोय हे खोटं आहे हे सिद्ध करायला मला इंद्राच्या घरी जावंच लागेल..पण हा आहे कोण? ज्याला मी झोपले हे कळत.... इंद्राच्या घरात काय आहे नाही हे कळत...?
.
.
.

मल्हार - माई..



ममता - हा बाळा काय झालं?



मल्हार - माई वहिनीसाहेब आल्यात...



ममता - अरे वाह! जिजा आले का?



मल्हार - हो...



ममता - आलेच चल...
जिजा....



जिजा - आई कशा आहात?



ममता - मी मस्त तू कशी आलीस?



जिजा - आ सहजच म्हंटल अभी ला ही भेटावं बरेच दिवस निट्स बोलण नाही....



ममता - अच्छा... बर मग जा इंद्राच्या खोलीत आहे तो..अग विकएंड ला तो त्या दोघांच्याच खोल्या साफ करतो बाकी कोणाला हात लावू देत नाहीत ते..



जिजा - हो ठीके मी पण मदत करते त्याला...



ममता - हो बाळा जा ना...



जिजा - अभि... अभि.... हाय!!



अभिजीत - अरे जिजा.....वहिनी.......



जिजा - ए वहिनी काय?



अभिजीत - आता वहिनीच म्हंटल पाहिजे ना...



जिजा - मी सर्वात आधी तुझी मैत्रीण आहे आणि मगच इंद्राची होणारी बायको समजलं....



अभिजीत - ह्म्म्म ये बस हेल्प मी...



जिजा - का रे हेल्प?? काय झाला? इंद्रा कुठेय?



अभिजीत - ते स्टडी रूम मध्ये आहे...
अरे यार....



जिजा - काय झाला?



अभिजीत - अग मी माझा फोन रूम मध्ये ठेवून आलो..आणि मला अर्जंट कॉल येणार होता... थांब हा मी आलोच तोवर तू कर....हा वेट....



जिजा - येस येस...



अभिजीत जातो तस जिजा उठून इंद्राच्या खोलीची तपासणी करते....त्याच्या कपाटात बघते...ड्रॉव्हर चेक करते..खोली तपासते तिला कुठेच काही मिळत नाही..हार मानून ती बसते,तेवढ्यात तिची नजर समोर ठेवलेल्या फोटो फ्रेम कडे जाते...ती नीट बघते तेव्हा तिला समजतं की त्यात काय तरी गडबड आहे...



ती पुढे जाऊन ती फ्रेम हलवते तर फ्रेम च्या मागे छोटासा ड्रॉव्ह होता...ते पाहून जिजा शॉक होते...पण तो पासवर्ड शिवाय ओपन होत नव्हता....तेवढ्यात अभिजीत आला ती जाऊन पटकन काम आवरू लागली....



अभिजीत - हम्म बोल..काय ग? काय झालं? अस्वस्थ वाटतेस?



जिजा - नाही तर.... 🤧
आ इंद्रा कधी येईल....?



अभिजीत - अग आज भाऊंची पार्टी आहे तो उशिराच येईल कदाचित...
चल झालं बाबा... खूप काम केला मी आज 😂चल आता कॉफ़ी पिऊ.... आज तू जेवल्या शिवाय नको जाऊ..मी तर बोलतो राहा मी कॉल करतो काका ना....



जिजा - फ्रेमच्या मागे असं लपून छपून काय ठेवलंय त्यात?? इंद्राने असं का केलाय? काय आहे त्यात?
(मनात)



अभिजित - अग बोल



जिजा - आ हो हो... चालेल....



अभिजीत - आज सोबत कॉफ़ी घेऊयात....



जिजा - हो...



अभि आणि जिजा त्यांच्या रूमच्या बाल्कनी मध्ये बसतात...मस्त थंड हवा येत होती...चांदण्यानी आकाश भरून गेलं होता....दोघ मस्त बाजूला बसून कॉफ़ी पीत होते....



जिजा - ए भारी आहे हू तुझ्या रूमची गॅलरी..इंद्राच्या रूम पेक्षा ही भारी...



अभिजीत - i know.... तुला आवडली??



जिजा - हो मग...



अभिजीत - ठीके नंतर तुम्ही दोघ इकडेच शिफ्ट व्हा मग....



जिजा - हम्म..
मग तू कधी करनार लग्न? कधी बघशील मुलगीच?



अभिजीत - आता मन नाही ग..ज्या मुलीला मी निवडलेला, मनापासून तिच्यावर प्रेम केलेला तीच मला नाही मिळाली...



जिजा - कोण रे? तू मला काही बोला नाहीस?



अभिजीत - तेच तर बोलूच तर नाही शकलो..तुला काय तिला काय??
कधी बोलता नाही आलं मला..कदाचित आलं असत तर बर झालं असत.... माझ्या मनातली गोष्ट सुद्धा मी तिला हिम्मत करून बोललो असतो.... इतक्या वर्षाची मैत्रीण तुटली तर? हा विचार करून मी गप्प बसलो...



जिजा - कोण होती ती??



अभिजीत - सोड ना... तू बोल तुझा...



जिजा - अरे माझं काय... तुला माहुते का ती आपल्या कॉलेजची पियू.....



अभिजीत - हा तीच ना जी आज्या च्या माग लागलेली.... बर तीच काय 😂



इंद्रा घरी आला तो फुल्ल ड्रिंक केलेला होता....त्याला त्याची शुद्ध नव्हती.....जिजा ला झोप लागली ती अभिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आणि अभि तिच्या..... हे सगळं इंद्राने पाहिलं...तो खोली कडे जात असताना आवाजाने जिजा उठली....आणि पळत इंद्राच्या खोलीत गेली.....



जिजा - इंद्रा....? तू आलास??



इंद्रजीत - आ हो...



जिजा - इववव तू ड्रिंक केलंयस??



इंद्रजीत - नो बेबी....



जिजा - ठीके मग सरळ चालून दाखव....



इंद्रजीत - ओके....



जिजा - मी सरळ म्हंटल वाकड नाही..इंद्रा इतकी दारू कधी पासून प्यायला लागलास....आणि सिगरेट ही ओढलीस.....



इंद्रजीत - सॉरी यार आजचा प्यायलो...आणि फ्रेंड्स नी फोर्स केला म्हंणून...सॉरी...



जिजा - ठीके इट्स ओके..झोप तू... हू झोप उद्या बघते तुला.... माझं काम होउदे.....



इंद्रजीत - काम?



जिजा - नथिंग झोप तू...झोप ना...



इंद्रजीत - हम्म्म्म



जिजा - हा झोपलाय तोवर मी तो ड्रॉव्ह ओपन करायच ट्राय करते..आज खरं काय ते समजू दे.. मला माहिते तो मुलगा जे बोलत होता खोटं होत कदाचित त्या ड्रॉव्ह मध्ये त्याचे important पेपर असतील.. पण त्याच पासवर्ड काय असेल??? 🙄
(विचार करत).... हा i think, बंगल्याच नाव "पंचगंगा" पासवर्ड आहे..तो एकदा बोलत तर होता.... हम्म..



जिजा पासवर्ड टाकते तस तो लोकर ओपन होतो....मग ती त्यातून एक पेटी बाहेर काढते...पेटीवर लॉक होता त्या लॉक ची चावी बाजूलाच लावलेली होती..तिने पेटी उघडली समोरच तिला मुलीचे दोन तीन फोटो दिसले..एक दोन फोटोज मध्ये इंद्रा आणि ती सोबत होते...मुलगी दिसायला गोरीपान होती..खूपच सुंदर एखाद्या बाहुली सारखीच जणू!! जिजापेक्षा ही सुंदर!!


त्यात एक डायरी होती...गुलाबाचं सुकलेलं फुलं...हातातली अंगठी...खूप साऱ्या चिठ्या होत्या...छोटा आरसा ज्यावर "इंद्रजीत❤️पिहू" असा लिहिलेला होता...जिजा हे सगळं पाहून शॉक झालेली...



जिजा - म्हणजे त्याने सांगितलं ते खरं होता?? इंद्रजीत च्या आयुष्यात मुलगी होती? आणि त्याने तिचा खून? नाही नाही हे शक्य नसेल माझा इंद्रा कुणाचा खून नाही करू शकत...मला त्याच्या भूतकाळात जावंच लागेल..जाणून घ्यावं लागेल कोण होती ही?? यासाठी मला इंद्राला ही जाब विचारावं लागेल किंवा मलाच याचा शोध घ्यावा लागणार..ही डायरी वाचते कदाचित काही कळू शकेल.....
.
.
.
.
क्रमश :

तर मंडळी कसा वाटलं आजचा भाग??? कोण असेल पिहू? इंद्राचा भूतकाळ काय असेल?? यामुळे होणार का जिजा आणि इंद्रा मध्ये अनबन??




©Pratiksha Wagoskar