Tichi Aaturta books and stories free download online pdf in Marathi

तिची आतुरता

  मी आज ऐक कथा लिहीत आहे . हि कहाणी कशाची आहे मलाच माहीत नाही. मुळात हि कथा लिहायची नव्हती पण काही कारण अशी असतात की ती आपल्याला बोलून दाखवता येत नाही.

            'तिची आतुरता' म्हणजे काय असत हे सर्वांना माहीत असत . कॉलेज च जीवन अस असत की १८ ते २५ हे वय अस असत सर्वांना काहितरी वाटत, आपल्यासोबत कोणतरी असावं . मला पण अस वाटायचं की आपल्याला कोण तरी असावं कॉलेजच्या जीवनामध्ये पण ,आई वडील आठवले की वाटायचं नको अस नको करायला .

            मी बी. फार्मसी कॉलेज ला प्रवेश घेतला तो पण इच्छा नसताना पण असो . पहिलं वर्ष होत ,सगळे नवीन होते ओळख नव्हती कोणासोबत, काही मित्र भेटले . कॉलेज दररोज नियमित चालू झाले . रोज कॉलेज करायचे त्यामधे मी हॉस्टेल ला होतो . हॉस्टेल म्हटल की जेवण चांगले नसते पण पोटासाठी खायचो. सर्व चांगल चालू होत कॉलेज मधे काही मुले प्रेमात पडले होते तर काहींना प्रेम काय असत माहीतच नव्हत . मला होता थोडा अनुभव प्रेमाचा त्यामुळे माहीत होत मला प्रेम काय असत.

                 प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

 

प्रेमात वय ,जात हे काहीच कळत नसत त्यामुळे म्हणतात ना प्रेम आंधळ असत. हे अगदी बरोबर . अस माझ्यासोबत बऱ्याच वेळा घडल होत. अशातच एक वर्ष निघुन गेले पण आमचं कुठ काही सूत्र जुळल नाही. 

      आमचे सगळे मित्र म्हणायचे पाहू आता नवीन वर्षाचे मुली आल्यावर. अशातच नवीन मुले मुली आले , पण अस झाल नवीन वर्षाचे मुली आल्या आणि आम्हाला सुट्ट्या होत्या . त्यानंतर 15 दिवसाची सुट्टी संपल्यावर, आलो कॉलेजला परत .

      कॉलेज ला आल्यावर नवीन चेहरे पाहायला भेटले. त्यामधे काहीच जुळले होते तर काही तशेच होते . कॉलेज च वार्षिक स्नेसंमेलन होते . हे सर्व कार्यक्रम चालू झाले होते. आम्ही मुलांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला होता . आम्ही काय पण करायचो म्हणजे , कोणता पण डान्स करायचो , कारण आम्हाला लाज वाटत नव्हती . ना आमची कोण गर्लफ्रेंड ना कोण . यामुळे आम्ही खूप मज्जा केली.

                  हे सगळे कार्यक्रम झाले . माझ्या अंगात खूप मस्ती मी केला ऐका मुलीला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवला . तिने देखील मला प्रतिसाद दिला . ती पण खूप बोलायची मी पण खूप बोलायचो. अस रोज चालायचं .मला तिची सवय लागून गेली. तिला मी जर नाही बोललो तर माझा दिवस चांगला जात नव्हता . मला करमत नसायचं ती जर माझ्याबर बोलली नाही तर. तिची आणि माझी भांडण पण होयची. ती खूप टेन्शन घ्यायची. तिला जर टेन्शन आल तर मी खूप घाबरायचो . ती मला दादा च म्हणायची मग मी पण तिला ताई म्हणायचो. 

           १५ ते २० दिवस झाले ती घरी गेली . ती घरी गेल्यानंतर मला करमत नसायचं. तिला पाहण्याची ती आतुरता कायम राहायची तिचे ते हसणे हे मला खूप आवडायचे . ती घरी गेल्यावर तिला रोज विचारायचे जेवण झाले का नाष्टा झाला का . त्यानंतर ती आली कॉलेज ला आणि मी गेलो घरी . मला तिची खूप आठवण येत होती पण काय विलाज नव्हता . तीला रोज फोन लावणे , बोलण , हसन हे सगळ अस ऐक घट्ट नातं बनल होत.

            तिला मी खूप मदत करायचो केव्हाच नाही म्हणत नसे. काही वेळा नाही मनल्यावर तिला खूप राग येत असे . पण काय करणार काही गोष्टी करायच्या नसतात . मी तिला भावनाच्या भरात काय पण म्हणत असे पण, ती सांभाळून घायची. ती मला म्हणायची एकतर ताई मन नाहीतर फ्रेंड मन . 

            ती म्हणायची "ताई" हा शब्द खूप पवित्र आहे . तू नीट बोल अस म्हणायची. माझ्याकडून खूप गालबोट लागले ताई या शब्दाला . ती माझ्यावर खूप रागवत असायची. पण मी तिला शांत करायचो. ती मला खूप वेळा बोलली, माझ्यासोबत बोलू नको तू , मला खूप वाईट वाटायचं .

            तिला आणि मला एक महिना झाल बोलून . त्याच दिवशी माझ्याकडून परत मोठी चूक झाली मी तिला अपशब्द बोललो थोडे ती खूप रागावली माझ्यावर ती डायरेक्ट बोलली माझ्याबर कायमच बोलायच बंद कर . 

            त्या दिवशी माझ्या मनाला खूप वाईट वाटल की आपण खूप वेळ चुकलो. तिला मी दहा वेळेस मनलो असेल माफ कर मला पण ती ऐकतच नव्हती . खूप रडू येत होत . खूप वाईट वाटलं . 

            यावरून मला अस लक्षात आल की ,

 

   आपली एक चूक सगळे नाते संबंध तोडू शकते .

 

आतुरता हा एक मोह आहे तो कधीच धरला नाही पाहिले, कारण कोणतीच चांगली गोष्ट माणसाकडे जास्त दिवस टिकत नाही .  

 

                                               कथा लेखक                                                       कल्पेश डांगे