Love affected she books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाने झपाटलेली ती........

      प्रेम हे खूप वेड असत मग त्या प्रेमात मुलगा असो वा मुलगी . प्रेम म्हणजे काय तर दोन जीवांना एकमेकांची झालेली सवय ,  एकमेकांच लागलेलं वेड आणि अजून काही असू शकत. प्रेमाचं सांगायला गेलं तर प्रेमामध्ये माणसे काय पण करतात.

     अशीच एका मुलीची प्रेमकथा नाहीतर तर तिने सहन केलेल्या वेदना आणि बरच काही . मी ऐका कॉलेज चा विद्यार्थी मी आज तुम्हाला माझ्या अनुभवलेल्या ऐका मुलीबद्दल काहितरी संगत आहे कथेच्या माध्यमातून ते तुम्हाला नक्कीच आवडणार अशी माझी ऐक अपेक्षा . तर आजच्या दिवसापासून गेल्या सात महिन्यात ऐका मुलीसोबत जे काही झालं ते तुम्हाला सांगत आहे . 

        ऐका अनोळखी मुलीने कॉलेज ला प्रवेश घेतला आणि तिचा प्रवास चालू झाला तिला पण वाटल नसेल कधी की माझ्यासोबत अस होईल पण होत ते चांगल्यासाठीच होत असे म्हणायला काही हरकत नाही . मी ज्या मुलीबद्दल बोलतोय ती माझ्यासाठी पण आनोळखी होती . पण म्हणतात ना कोणाचे ओळख कशी होईल सांगता येत नाही असच माझे पण झालं . ती मुलगी दिसायला खूप सुंदर. तिच्या कडे सगळ्यांची नजर जात तिचे ते हसणे खूप भारी वाटायचे . जो तो त्या मुलीकडे लक्ष देत असत . 

      तिची माझी ओळख झाल्यानंतर आम्ही ऐक बहीण भाऊ म्हणून बोलत . ती मला सगळ्या गोष्टी सांगत असत कोण तिला मेसेज करत . कोण तिला प्रपोज करत हे सगळ ती मला सांगत असायची नेहमी . तुला खूप जणांनी त्रास दिला. पण चूक कधी ऐकाची नसते त्यामुळे चूक काहीदा तिची पण असत. तिने माझ्या पासून ऐक गोष्ट लपवली कारण तिला वाटेल मी तिला काही बोलेल . पण कस असत कॉलेज च्या जीवनात त्या गोष्टी केल्या नाहीत तर परत खूप त्रास होतो . 

    सांगायचं अस की तिला ऐका मुलासोबत प्रेम झालं तीने मला ते 3 महिने सांगितलं नाही . मला तिच्यावर डाऊट येत असत पण मी पण लक्ष घालत नसत. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट जास्त दिवस लपवून राहत नाही . ती गोष्ट मला समजली आणि मला खूप राग आला . मी तिच्यावर खूप विश्वास ठेवून बोलत असत. पण मी ती गोष्ट सोडून दिली मनल जाऊदे आपल्याला काय करायचं जे करायचं तिला करुदे. 

     अस म्हणून तिला ज्यामुलासोबत प्रेम झालं ती माझा खास मित्र . खूप वाईट वाटल की आपण खूप विश्वास ठेऊन आपल्याला सांगितलं सुद्धा नाही मनाला खूप वाईट वाटल . त्यानंतर तो मुलगा कॉलेज ची डिग्री घेतल्यानंतर निघून गेला . त्यानंतर तिच्या मागे खूप मुल लागत . तिला मेसेज करत प्रेमासाठी तिला हो म्हणायला लावत . तिने खूप त्रास सहन केला . तिला पण नंतर सवय लागून गेली ती पण मुलांना रिस्पॉन्स देत असत . माझ्या कानावर खूप गोष्टी ऐकायला मिळत मी त्या टाळत चालत. 

     तिला मी खूप वेळा समजून सांगत असत की अनोळखी मुलाना तू रिस्पॉन्स नको देऊ ती काहीच ऐकत नसत . तिला खूपदा मी समजून घेत असत .तिने खूप वेळा माझा विश्वास तोडला होता त्यामुळे मला तिच्यावर विश्वास नावाचा शब्द राहिलाच नव्हता . पण मला तिच्यात नेहमी एक वेगळ करण्याची जिद्द दिसत . तिला खूपदा अभ्यास कर मनल्यावर नेहमी रिस्पॉन्स हा येत असत. पण परत आहे ते आहे . 

    तिला खूपदा मी टाळलं पण म्हणतात असा विचार येत ,अरे आपण तिला जर टाळत असेल तर तिला सपोर्ट कोण करणार त्यामुळे मी तिला नेहमी चांगल्या गोष्टी सांगत . 

वरील कथा काल्पनिक नसून ती ऐका वास्तविक वक्तिवर आहे . तिला कोणी कसा त्रास दिला यातून मी ही कथा लिहून आहे . या कथेतून मला ऐवडच सांगणं आहे मुलींना की तुम्ही प्रेम करा पण आई आणि वडील यांचा विचार करा . आणि कोणत्याही मुलांना रिस्पॉन्स देत नका चालू .

      

.......कथालेखक

कल्पेश डांगे**