Middle class and money books and stories free download online pdf in Marathi

मध्यम वर्ग आणि पैसा

      मध्यम वर्ग या शब्दाचा अर्थ काय आहे हे सळ्यांनाच माहीत आहे . मध्यम वर्ग म्हणजे असा कोणता समजा नाही, तर ज्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या चांगली नाही असे लोक किंवा ज्या लोकांची घरची परिस्थिती चांगली नाही असे लोक म्हणजे मध्यम वर्ग .

     मध्यम वर्ग आणि पैसा या दोन गोष्टीमुळे काहींना आपले सगळे जीवन गरिबीत जगावे लागते . मी ही कथा लिहण्याचे कारण म्हणजे मी पण एक  मध्यम वर्ग घरात जन्म घेतलेला मुलगा आहे . मी अनुभवले  काही प्रसंग सांगतो . मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला घरचे म्हणायचे बाला तुला नोकरी लागली पाहिजे चांगला पगार पाहिजे असं घरचे म्हणत असायचे . मला पण तेव्हा वाटायचं अरे आपण पण मोट झाल्यावर चांगल्या नोकरीला लागू असा तेव्हा वाटायचं. 

      काहीच्या मागे खूप अडचणी असतात पण ते त्या अडचणींनीवर मात करून पुढे जात असतात . जसे की उदाहरण द्यायचे झाले तर 21 व्या वर्षी आयएएस झालेला तो रिक्षचालकाच मुलगा अन्सार शेख असे बरेच उदाहरण आहेत , की अतोनात कष्ट करून यशस्वी होतात . 

     शिक्षण म्हणल की पैसा हा लागतोच , पैसा नसला तर शिक्षण घेता येत नाही . मध्यम वर्गातले हे मुल असतात ज्यांच्याकडे पैसा नसतो आणि असला की कसेतरी शिक्षण करतात तर नोकरी मिळत नाही , आणि मिळालीच तर पगार नसतो ह्या सगळ्या अडचणी फक्त आणि फक्त गरीब मुलांनाच येतात असे नाही . अशा अडचणी सगळ्यांना येतात पण ज्या लोकांनाकडे पैसा असतो ते जातात पुढे आणि पैसा नसणारे राहतात मागे असच घडत असत . 

   मी जे मुल गरीब आहेत , ज्यांची परिस्थिती चांगली नाही त्यांना असं सांगतो की , कष्ट करत राहायचं जे तुम्हाला फळ भेटणार आहेत ते नक्की भेट असत . 

     || कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका ||

  भविषयकाळात येणार काळ हा असा आहे की,  ज्यांच्याकडे बुध्दी , नवीन काहितरी करण्याची जिद्द तीच व्यक्ती येत्या काळात टिकणार आहे त्यामुळे आपण नेहमी कष्ट करत राहायचं.

मध्यम वर्गातले सगळ्या मुलांनी आपल्या आईबाबा कडे पाहून त्यांचे कष्ट पाहून शिकले पाहिजे आणि त्यांचे चीज केले पाहिजे . 

   जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जर करायची असेल त्यासाठी चांगली संगत , प्रामाणिकपणा , मनामधे चांगले विचार हे जर असेल तर माणूस कुठे पण पोहचू शकतो. 

    पैसा ही अशी गोष्ट आहे त्यातून खूप काही करता येत आणि गमवता पण येत त्यामुळे पैसा हा टिकवता आला पाहिजे. चालू परस्तिती अशी आहे की, कोणत्याही गोष्टीची महागाही खूप वाढली आहे . त्यामुळे पैसा कसा मिळवता येईल याकडे लक्ष द्या.

   ही संपूर्ण कथा ही  खास करून मध्यम वर्गाच्या मुलांसाठी लिहली आहे.

खाली ऐक प्रेरणादायी कविता आहे .

यश आपल्याच हातात असत

विचार काय करतोस,

काहितरी करून दाखव..

वेळ जाईन निघून,

प्रवाहामध्ये तरून दाखव..||

लाखो आले अन गेले,

बोल घेवडे सगळे..

स्व:ता काही नाही केले,

फ़क्त लोकाना उपदेश दिले..||

उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..

सत्याची कास धरून तर बघ..

कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..

एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..

यश आपल्याच हातात असतं…

|| पैसा ||

पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??

घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.

  स्वप्न दाखवतोस मोठी मोठी

  पण अनेकदा ठरतात अगदी खोटी.

  तुझ्याच लोभात अनेक गुरफटतात,

  आपल्यांशी भांडून दूर जातात.

पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??

घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.

  सर्वांनाच आहे तुझी गरज फार,

  तुझ्याच प्राप्तीस होतात अनेक ठार.

  नाचवितोस सर्वांना आपल्या बोटाच्या टोकावर,

  तरी तुझेच नाव सर्वांच्या ओठावर.

पैसा! पैसा! आहेस तरी कैसा??

घालतोस माणसांच्या विचारांना वळसा.

 

                                                    -कथालेखक

                                                   -- कल्पेश डांगे