, अ भंग - contemplation. books and stories free download online pdf in Marathi

।। अ भं ग - चिंतन ।।

चिंतन
------------
नवीन मराठी वर्ष (गुढीपाडवा)


फक्त दारु पिण्याच्या निमित्ताने इंग्रजी नववर्ष साजरे करणारे आपले कांही हिंदू जन जरा हेही वाचा आणि आपला नववर्षाचा दिवस *गुढी पाडवा, शालिवाहन शके १९४५* मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करा.


🙏 *गुढीपाडवा वर्षारंभ कां ?*🙏

*१) आपण सर्व हिंदू आहोत !*
*२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !*
*३) आपण तिथी प्रमाण मानतो !*
*४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !*
*५) तिथी अनादी काळ दर्शवते !*
*६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !*
*७) कालक्रमण हे ब्रह्मदेवापासून आहे !*
*८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !*
*९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे !*
*१०) आता आपण वराह कल्पात आहोत !*
*११) या कल्पातील ७व्या मन्वंतरात आहोत !*
*१२) ७व्या मन्वंतरातील २८व्या युगात आहोत !*
*१३) २८व्या युगातील कलियुगात आहोत !*
*१४) कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत !*
*१५) शालिवाहनाच्या १९४४ व्या वर्षात आहोत !*
*१६) शके १९४४ वर्ष दि. २१.०३.२०२३ ला संपणार आहे !*
*१७) गुढीपाडव्याला शके १९४५ वर्ष चालू होणार आहे !*
*१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे .*
*१९) हे माप इंग्रजांना माहित नव्हतं !*
*२०) त्यांनी त्यांच्या धर्माचा शक चालू केला !*
*२१) त्याला इसवीसन म्हणतात !*
*२२) इसवीसन म्हणजे इसाई सण !*
*२३) इसाई म्हणजे येशू नावाने !*
*२४) आपण ईश्वर नियोजित कालक्रमण मानतो !*
*२५) मागे गेलो तर ब्रह्मदेवा पर्यंत !*
*२६) पुढे गेलो तर प्रलया पर्यंत !*
*२७) हे सर्व निसर्ग संमत आहे !*
*२८) हे सर्व वृक्ष सृष्टीला सुद्धा मान्य आहे !*
*२९) वृक्षांना चैत्रात पालवी फुटते !*
*३०) म्हणून चैत्र पालवी म्हणतात !*
*३१) फुटती तरुवर उष्णकाळमासी !*
*३२) पक्षी सुद्धा हे कालक्रमण मानतात !*
*३३) कोकिळा वसंत ऋतूत गाते !*

*मित्रांनो.......! जे पशू-पक्ष्यांना माहित आहे, ते कालक्रमण मनुष्य नावाच्या प्राण्याला शिकवावं लागतं ! हे दुर्दैव आहे.*
🙏
┈┉❀꧁꧂❀┉┈

*विचारसागर चिंतानमाला*




पूर्व पक्षीने तिसरी शंका उपस्थित केली होती कि , *सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात .म्हणून त्यांचे ठिकाणी वैराग्य शमादीकांचा अभाव असतो आणि मोक्षामध्ये तर विषयसुख मुळीच नाही .याकरिता मोक्षेच्छेवान अधिका-याचा अभाव आहे ,म्हणूनही ग्रंथारंभ निष्फळ आहे*.

यावर सिधान्ति समाधान करतात की ,सर्व पुरुष विषयसुखाचीच इच्छा करतात हे म्हणणे प्रथम बरोबर नाही.कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा कोणताही विषय नसतो तरी आपण म्हणतो," मी सुखाने झोपलो." विचार केला तर जीव फक्त सुखाचीच इच्छा करतात मग ते सुख विषयापासूनच व्हावे असा त्यांचा आग्रह नाही.मग सिधान्ति पुर्वापक्षिलाच प्रश्न करतात .
१) जगात कोणीच मुमुक्षु नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे?*
२) मुमुक्षु असूनही ग्रंथाचे ठायी प्रवृत्त होत नाही,म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे?*
जगात कोणीही मुमुक्षु( मोक्षाची इच्छा करणारा ) नाही असे म्हणणे बरोबर नाही .कारण सर्व पुरुषांना सर्वदू:खनाश व नित्यसुख प्राप्तीची इच्छा आहेच. *सर्वदू:खनाश आणि सुखप्राप्ती हाच मोक्ष आहे* म्हणून *सर्व मुमुक्षूच आहेत.*
अतिशय सुंदर संदेश आहे भावी पिढीसाठी विचार केला गेला पाहिजे समाजातील अनिष्ट प्रथा या व्यापारी वर्गाने आपल्यावर लादलेल्या प्रथा आहेत विवाह संस्कार हा अत्यंत आगळावेगळा असा संस्कार आहे त्यामुळे वधू-वरांच्या जीवनामध्ये अमुलाग्र असा बदल होत असतो परंतु व्यापारी वर्गाच्या लोकांनी आपल्यावर दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक नको त्या गोष्टी दाखवायला सुरुवात केली व आपण सुधारक म्हणून त्या गोष्टीचा अवलंबून चालू केलं त्यामुळे आपण खऱ्या गोष्टीला महत्त्वच द्यायच्या विसरलो व लौकिकासाठी विधी करू लागलो आपल्या लोकांमध्ये कोणत्याही कार्याला मुहूर्त पाहतो परंतु त्या मुहूर्ताला जे महत्त्व दिलं गेलं पाहिजे ते आपण विसरतो आणि समाजासमोर नको ते प्रदर्शन दाखवत असतो हे कुठेतरी बंद झाले पाहिजे .


धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏