Kaay Nate Aaple? - 12 books and stories free download online pdf in Marathi

काय नाते आपले? - 12

मिताली : मग तुझं काय म्हणणं आहे मी काय कराव???

तनुजा : जेव्हा अभि चे आई बाबा येतील तेव्हा त्यांना नकार देऊन टाक..... म्हणजे अभि माझा तरी होईल आणि तसही तुला तुझं करियर करायचं आहे मग उगाच हे नातं जपण्यात काही अर्थच राहत नाहि.....

तू तू सरळ नकार दे ना मितु.....


तनुजा तिच्यासमोर रडून आणि खूप इमोशनल होऊन बोलत होती.....!!

मिताली : अग ताई तू रडू नको.... मी मी नकार देईलच आणि हो तू बरोबर बोलीस मला माझ्या करियर वरच फोकस केल पाहिजे... ह्या सगळ्यात पडून मला काहीच मिळणार नाही..... तू नको काळजी करुस मी नकारच देईल....


तनुजा : प्रॉमिस......


मिताली..: प्रॉमिस


.....
........

मितु ने डोळे उघडले तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं अर्थात ती रडत होती....

तिला कालचा दिवस आठवला जेव्हा अभि तिला कॉलेज बाहेर भेटला होता.......

...
....

मितु कॉलेज सुटल्यावर तिच्या काही फ्रेंड्स सोबत गेट च्या बाहेर पडली तोच तिला अभि चि गाडी दिसली....

" हीं गाडी तर अभिची आहे ना..?? मग हे इथे काय करत आहेत... " मिताली...विचार करत म्हणाली...

" मितु निघायच का??? " नेहा....मितु ला हलवत म्हणाली........

" अ.... हो निघूया कि " मिताली ने एक नजर त्या कार वर टाकली आणि निघतच होती कि पटकन समोर अभि आला.......

मिताली डोळे मोठे करून त्याला पाहू लागली , तो तिच्या पाठी धावत आला म्हणून त्याला दम लागला होता , तस तिने तिच्या बॅग मधली पाण्याची बॉटल त्याच्यासमोर धरली....
पन त्याने ती घेतली नाही......!!

तिने ती परत तिच्या बॅग मध्ये ठेवून दिली......!!

अभि : मिताली मला तुझ्याशि बोलायचं आहे......!!

मिताली : ठीक आहे बोला......

मिताली तिथेच थांबून म्हणाली.. त्याने एकदा तिच्याकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे पाहिले...आणि तिला म्हणाला.

अभि : मला तुझ्या एकटी शीच बोलायचं आहे...

मिताली : पन मला नाही बोलायचं आहे , काय बोलायचं असेल तर इथेच आणि आताच बोला नाहीतर माझी वाट सोडा... मला घरी जायला उशीर होतोय....

अभि ला तिचा जरा रागच आला कारण तो इतका रिक्वेस्ट करून बोलतोय तरी ती ऐकायला तयार न्हवती...!! त्यात इतकक्या attitude ने बोलत होती वरून....

अभि : मिताली प्लिज यार.... एकदा माझं ऐकून तरी घे तू , मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाच आहे ते पन आणि......

मिताली : ठीक आहे...

मिताली ने तिच्या फ्रेंड्स ना जायला सांगितलं आणि ती अभि सोबत जायला रेडी झाली...!!

दोघ पण कार मध्ये बसले....मिताली ने यावेळेस त्याला विचारलं नाही कि आपण कुठे जातोय....

अभि कार चालवता चालवता तिच्याकडे अधून मधून पाहत होता तिच्या मूड चा अंदाज घेत होता..पन ती शांत होती आणि गाल फुगवून बसली होती....!!

गार्डन येताच अभि ने गाडी थांबवली तस दोघ पन उतरले...

मिताली : बोला काय बोलायच आहे ते....

मिताली शांतता भंग करत म्हणाली...

अभि : उम्म्म... कुठून बोलू , कुठून सुरुवात करू खरतर मला अजिबात सुचत नाही आहे..
मी आज पर्यंत तुझ्यासोबत जे वागत आलो ते खरच चुकीचं होतं....

माहित होतं यात तुझीही चूक न्हवती आणि माझीही....!! पन काय करू तुला जेव्हा जेव्हा पाहायचो माहीत नाही का पन खूप राग यायचा..


तुला पाहिले कि लग्नातला तो दिवस आठवायचा. मग अजूनच राग तुझ्यावर निघायचा.... तूझ राहुल सोबत असणं मला अजिबात आवडल न्हवत , त्यात तुला त्याच्या मिठीत बघून अजूनच राग येऊ लागला...

आणि....मी तुला पुन्हा हर्ट केल , प्रत्येकवेळी मी तेच करत आलो तुझ्यासोबत.....

पन उशिरा का होईना मला पश्चाताप होतोय या सगळ्याचा... I'm sorry.......
मी आतापर्यंत तुझ्याशी जे काही वागलो , बोलो त्याबद्दल....!!! I know तू इतक्या लवकर तर मला नक्कीच माफ नाहि करणार..... पण तू मला एक चान्स तर नक्कीच देऊ शकतेस.....

I promise मी या पुढे मी तुला कधीच हर्ट होऊ देणार नाही...!!
मितु प्लिज.. आपल्या नात्याला थोडा वेळ तर देऊन बघ...
उद्या आई बाबा तुमच्या घरी येणार आहेत , तेव्हा ते विचारतील.... तुला हे नातं ठेवायचं असेल तर ठेवू शकते नाहीतर तुझ्यावर जबरदस्ती नाहि.......

" मितु plzz एकदा विचार कर....... " अभि तिला request करत म्हणाला....

मिताली : पन का तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे??? कि तुम्ही ते नातं तिकवण्यासाठी माझ्याकडे request करत आहात...!

मिताली अभि ला म्हणाली....

अभि : कारण मला तू आवडतेस.... मी तुझा पहिले कितीही राग करत असलो तरी तुझं आमच्या घरी असणं आवडत होतं.... पन मला ते कळत न्हवत....

मिताली : ओह असं काय पाहिले माझ्यात कि मी तुम्हाला अचानक आवडू ही लागली.....?? आणि मुळात मला त्या घरी यायची मुळीच इच्छा नाही आहे , माझा जो अपनाम त्या घरात झालंय तो आता बस्स्स्स plzzz....

खूप सहन केल मी , आणि एका सुनेची जी कर्तव्य असतात ती मला कधी जमणारच नाही...

मिताली आपल्या मता वर ठाम होतं म्हणाली......

अभि ला सुचत न्हवत कि तिला आता कस समजावूया...

अभि : हे बघ मितु प्लिझ तू समजून घे ना... फक्त एक चान्स तर तू देऊच शकते yaar आपल्या नात्याला , माझं तनुजा वर प्रेम नाही आहे.... कस समजावू तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे...

ते कधी झालं , कस झालं माहीत नाही मला.. पन झालं yaar काय करू मी....
तू मला माझी बायको म्हणून माझ्या घरी हवीच आहेस.....!!

अभि पन त्याच्या बोलण्यावर ठाम होता....!!! मिताली ला आता काय बोलावं सुचत न्हवत......

मिताली : प्लिझ तुम्ही मला माझ्या कॉलेज जवळ सोडा मला इथे थांबायचं ही नाही आहे.....!!

मिताली थोडी हायपर होतं म्हणाली....

अभि : मितु yaar तुला माझी प्रत्येक गोष्ट खोटी का वाटतेय , माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे , तू सांग मी काय करू म्हणजे तुला माझं प्रेम समजेल.....

अभि तिचा हात हातात धरून म्हणाला.... तस मितु ने त्याचा हात झटकला आणि त्याला चिडून म्हणाली....


मिताली : मला तुम्ही घरी सोडत आहात कि मी जाऊ........

अभि आता शांत झाला त्याला अजून तिला त्रास द्यायचा न्हवता..

मिताली गाडीत जावून बसली , अभि ने गाडी स्टार्ट केली आणि मितु च्या घराच्या दिशेने फिरवली....

गाडी मध्ये मगाचसारखीच शांतता होती.......!!!


....
........

मितु च घर आल तशी ती उतरली आणि गाडी ला पाठ करून उभी राहिली..... तिच्या मनात अजूनच गोंधळ सुरुवात होता ती अभि च्या बोलण्याचा विचार करतच होती...!!

अभि फक्त इतकंच म्हणाला....


" तू पुन्हा एकदा विचार कर...... बाकी तुझी मर्जी " असं बोलत त्याने कार स्टार्ट केली आणि निघून गेला.....


मितु पन तिच्या घरी आली.....!!



....
.......

हे सगळं आठवून तिच्या डोळ्यातून अजूनच पाणी आल......!! कदाचित ती तनुजा च न ऐकता बोली असती कि.... " हो मला हे आमचं नातं टिकवायचं आहे..... ती अभि ला accept करायला तयार आहे...."

पन नाही जमलं तिला ते बोलायला......!!!


रूठी है शब ते रब्बा
रब्बा दिल भी है रूठा
सब कुछ है बिखरा बिखरा
बिखरा सा रूठा रूठा

चुप माही चुप है राँझा
बोले कैसे वे ना जा
बोले कैसे वे ना जा
आ जा आ जा…

बोले कैसे वे ना जा
बोले कैसे वे ना जा
चुप माही चुप है राँझा
आ जा आ जा…!!

...
......

सगळं अगदी तनुजा च्या मनासारखं होतं होतं....!! दिवस असंच सरत होते , अभि आणि मिताली चा डिवोर्स ही झाला होता....

पन या क्षणी काय होतं होतं हे मितु ला च ठाऊक , त्या दिवसानंतर अभि एकदा पन मितु शी बोला नाही कि त्याने तिच्याकडे पाहिले.....

तो तनुजा ला वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता...!! अशातच त्यांची लग्नाची डेट फिक्स झाली.....

मितु ला तर आता कुठेतरी जावून जीव देऊसा वाटत होता.... तिलाही अभि आवडू लागला होता.... हे तिला आता कळून चुकले होते.....!!


क्रमशः