RIMZIM DHUN - 14 books and stories free download online pdf in Marathi

रिमझिम धून - १४

'जुई त्यांची चाललेली बडबड ऐकून घेत होती. शेवटी त्यांनी अर्जुनच्या खोलीत येऊन तिची बॅग आणि पर्स ठेवून दिली. ते पाहून जुईने त्यांना बाजूची खोली उघडायला सांगितली. तर त्या नाही म्हणाल्या.
''साहेबानी तुमचं सामान इथे ठेवायला सांगितलं आहे. जर तुम्हाला बाजूची पाहिजे असेल तर साहेबांकडून चावी घ्या. मग मी ती खोली साफ करून देते.'' मावशी म्हणाल्या. आणि जुई 'ओके' बोलून अर्जुनच्या रूममध्ये शिरली. एव्हाना तो फ्रेश होवून कपडे चेंज करत होता. जुई सोफ्यावर बसून त्याच्याकडे बघत होती. शर्ट घालायला त्याने हात वरती केला आणि तो 'उफ' करून तसाच उभा राहिला.
''अर्जुन स्वतःची जरा काळजी घेत जा. अजून तुझं ऑपरेशन पूर्णपणे बरं झालेलं नाहीये. त्यात तू त्याच बँडेज सुद्धा चेंज केलेलं दिसत नाही.'' जुई त्याच्याजवळ आली आणि तिने त्याचा टीशर्ट खाली ओढून त्याला तो घातला होता.

''नंतर ड्रेसिंग करशील?'' अर्जुन अगदी वाईट तोंड करून म्हणाला.

''करते आणि हे पाठीवर कसले निशाण आहेत? काय लागलं होत का?'' जुई त्याच्या पाठीवर खांद्याच्या खाली असलेल्या मोठ्या काळ्या डागावर हात फिरवत बघत म्हणाली.

''गोळी लागली होती. डाग तसाच राहिलाय अजून.'' अर्जुन आरशात बघून केस व्यवस्थित करत होता.

''आणि हे खाली कमरेवर?'' जुई आरशातून त्याला बघत विचारत होती.

''डॉक्टर फार चौकशी करत नसू नका. अख्या बॉडीवर बऱ्याच जखमा सापडतील. प्रत्येकाचं कारण थोडी लक्षात राहत.'' अर्जुन मागे वळून टीशर्ट सरळ करत म्हणाला.

''लहान असताना हाताला नुसतं खरचटलं तरी दहा मिनिट रडत बसायचास. आणि आता हे काय करून बसला आहेस?'' जुई तशीच उभी राहून त्याच्याकडे बघत होती.

''काय करणार? तेव्हा कोणी मिस डॉक्टर उपचार करायला सोबतीला नव्हती ना. म्हणून प्रत्येक जखमेचे निशाण तसेच राहिले.''

''अर्जुन असं एकट्याने राहण्यापेक्षा मामी आणि काकांच्या बरोबर राहायचं ना.'' जुई काळजीच्या सुरात म्हणाली.

''आणि काय करू? मी गुन्हेगाराच्या दुनियेत वावरतो, त्यामुळे माझी फॅमिली संकटात येते. त्यांच्या सोबत राहिलो तर त्यांच्यावर हल्ला होईल. हे गुंड लोक त्यांना टार्गेट करतील. माझ्या आयुष्यात सेफ्टी काहीच नाही ग.'' अर्जुन अगदी निराश होऊन म्हणाला.

''आणि तुझी स्वतःची फॅमिली असेल तेव्हा?'' जुई त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.

''म्हणून तर तुला शोधण्याचा केव्हा प्रयत्न केला नाही. पालघरला माणसे पाठवून तुझी माहिती काढणे मला सहज शक्य होत. पण मी मुद्दामहून तुला विसरण्याचा प्रयत्न करत राहिलो. नैनितालला तू अचानक अशी समोर आलीस, आणि नंतर तुझी ओळख पटल्यावर सगळं संपलं होत. त्यात माझ्या हातात एक खूप अवघड केस आहे. दॅट्स व्हाय, फस्ट टाइम इन माय लाईफ, आय एम टू नर्व्हस.'' अर्जुन खाली सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला.

''अर्जुन मी तुझी रिस्पॉन्सिबिलिटी बनून राहणार नाही आहे. किंवा तुझा विकनेस बनून सुद्धा मला राहायचं नाही. तू आणि तुझ्या कर्तव्याच्या आड मी केव्हाही येणार नाही. आय प्रॉमिस. आणि विनाकारण माझी काळजी करत बसू नकोस. मला शेवटच्या क्षणापर्यंत माझं सौरक्षण करता येत. त्यासाठी मी कोणावरही अवलंबून राहत नाही.'' जुई खाली बसून त्याचा हात स्वतःच्या हातात घेत त्याला समजावत होती.

''जु, आय नो, काहीच दिवसांपूर्वी तू त्या कठीण प्रसंगातून एकटीने मार्ग काढलास. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाहीस. पण तुला कल्पना सुद्धा नाही अशा लोकांच्या सोबत मी वावरतो. काळजी वाटणं साहजिक आहे.'' अर्जुन

''असूदेत ना. आयुष्य असंच असतं. सेफ्टी कोणाच्या आयुष्यात आहे. सगळेच इनसीक्युअर आहेत. म्हणून आपण आपल आयुष्य जगायचं सोडून देतो का? माझं जेवढं आयुष्य असेल ते मला सुखी आणि समाधानी म्हणून जगायचं आहे. आणि तुझ्याशिवाय माझ्या सुखी आयुष्याची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून फक्त माझ्या बरोबर राहा. सोबत नसलास तरी चालेल.'' जुई

''आय एम ऑलवेज विथ यू. आणि तू काहीही म्हणालीस तरीही, युअर रिस्पॉन्सिबिलिटी इस माय प्रायोरिटी. पण यापुढे तू जरा जास्त अलर्ट राहा. एकटीने कुठे फिरू नकोस. आणि तुझ्या फ्लॅटला सेफ्टी ग्रिल्स आणि कॅमेरे वेगैरे बसवून घे. प्लिज.'' अर्जुन तिच्या हातावर किस करत म्हणाला.

''त्या दिवशी तू मला तुझ्या पोस्टची कल्पना दिलीस ना, तू कोण आहेस हे मला समजल तेव्हाच मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आली होती. मला तुझी कमजोर बाजू बनून नाही रहायचं. या आठवडाभरात घराचं सगळं काम करून घेईन. नको काळजी करू. आणि माझ्यासाठी जरा स्वतःकडे लक्ष देत जा. स्वतःची काळजी घे. प्लिज.'' जुई त्याचा चेहेरा आपल्या दोन्ही हातानी कुरवाळत म्हणाली. आणि तो मानेनेच हो म्हणाला.

''आय लव्ह यु सो मच जु.'' अर्जुनने बसल्या जागेवरून तिला मिठी मारली होती.

''माझा जीव आहेस तू अर्जुन. माझ्यासाठी बेफिकीरपणा सोड, आणि स्वतःला थोडं जप. तू व्यवस्थित तर माझं अख्ख जग सुखी. नाहीतर काहीच नाही.'' जुई त्याच्या पाठीवर थोपटत होती.

बाहेर दारात उभ्या राहून जेवण करणाऱ्या मावशी हे दृश्य बघत होत्या. आपल्या साहेबांची काळजी करणारी कोणीतरी आलेली आहे हे पहिल्या नंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा किंचितश्या ओल्या झाल्या. डोळ्यांना पदर लावून त्या दारातून दोन पाऊल मागे गेल्या आणि हळू आवाजात ओरडल्या. ''ताई आवरलं का? खाली टेबलवर जेवण लावलय.'' त्या आवाजाने जुई अर्जुन पासून थोडी लांब झाली. आणि चेंज करण्यासाठी आतल्या रूममध्ये गेली.

''मावशी आम्ही येतो.'' म्हणत अर्जुन बाहे येऊन मावशींच्या पाठोपाठ खाली निघून गेला.

******

'पोलीस इन्स्पेक्टर राठोड फोनवर बोलत होते. फोनवर पलीकडे त्यांचे वरिष्ठ अधिकारी मिस्टर वाघमारे बोलत होते.'

''राठोड, काय घोटाळा झाला? तो पंडित सुटलाच कसा काय?'' वाघमारे

''वाघमारे सर, घाटात गाडी थांबवली तेव्हाच गडबड झाली. मागून येऊन त्या फॉर्च्युनर ने सरळ उचलला त्याला.'' राठोड

''तुमची माणसे काय झोपली होती.'' वाघमारे

''सर, त्या नवीन हेड ने दोनच कॉन्स्टेबल सोबत घ्यायची परमिशन दिली. आम्ही तिघेच होतो. त्यात ते दोघे अगदी शेळपट निघाले. मी एकटा काय करणार?'' राठोड

''नवीन हेड कोण? तुम्ही फक्त तुमची गाडी घेऊन जाणार होतात ना? आपलं आधीच ठरलं होत.'' वाघमारे

''सर, ऐनवेळी या केसच्या संदर्भात वरून चौकशी पथक पाठवण्यात आले. त्यांच्याकडे परवानगी पत्र होते. ते सगळे लोक आमच्या सोबत पुण्याला यायला निघाले. त्यामुळे सगळा गोंधळ झाला. आणि तुम्हाला सांगायचं तर तुम्ही एका मीटिंगमध्ये बिझी होतात.'' राठोड

''चौकशी पथक कोणी पाठवले? मला याची काहीच कल्पना नाही. आणि हेड कोण आहे त्यांचा.'' वाघमारे डोक्याला हात लावून बसले.

''सर अर्जुन म्हणून कोणी तरुण अधिकारी आहे. माझ्या अर्ध्या वयाचा असेल. पण आपले दोन्ही कॉन्स्टेबल चरचर कापतात त्याला बघून.'' राठोड सांगत होते.

''अर्जुन.....?  राठोड पूर्ण नाव काय?'' अर्जुन नाव ऐकताच पलीकडून वाघमारे मोठ्याने ओरडले होते.

''अर्जुन दीक्षित म्हणून होता कोणीतरी. का सर काय झालं?'' राठोड घाबरले.

''अर्जुन दीक्षित बोलतोस तू. अरे अर्जुन दीक्षित म्हणजे A.D. तो एक वादळ आहे वादळ. त्यांच्या वयावर जाऊ नकोस, त्यांचं नाव घ्यायला सुद्धा अख्य पोलीस डिपार्टमेंट घाबरत. A.D. म्हणत जा यापुढे. तो कोणीतरी वेगैरे एकेरी बोलू नको. कोणी ऐकलं ना तर तुझी नोकरी गेली समज.'' वाघमारे कपाळावरचा घाम पुसत होते.

''A.D. कोण आहेत तरी कोण. आपल्याला त्या लोकांनी काय सरळ सरळ सांगितलं पण नाही. डायरेक्ट वरून ऑर्डर आली. आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन पुण्याला निघालो. मला वाटलं तुम्हीच पाठवलं असेल त्यांना. काय झालं काय साहेब?'' राठोडचा बी.पी. वाढत होता.

''एवढी पॉवर आहे त्याच्याकडे कि तो कोण ते तो स्वतः कोणाला सांगत नाही. पोलीस बघता क्षणी सलाम ठोकतात. बदली होऊन इथे नवीन आलास म्हणून तू एकटाच असशील ज्याला A.D. माहित नाही. माझ्या बापाचा बाप आहे A.D.. मी त्याला काय पाठवणार. माहित आहे कोण आहे?'' वाघमारे सर खुर्चीवरून उठून फेऱ्या मारू लागले होते. हाताला फोन सावरत ते पुढे म्हणाले.
''याच वर्षी स्पेशल नियुक्ती केली गेली आहे. मुबई एन्काउंटर स्क्वाडचा हेड आहे. आपले बारा वाजले असं समजा आता आणि योजना पंडित केस हातची गेली. आता आपण यात खऱ्या गुन्हेगाराला वाचवू शकत नाही. त्यामुळे पद्धतशीर अंग काढून घ्या. आणि कलटी मारा. मंत्री साहेबांना घेतलेले पैसे परत पाठवून देऊ आणि कोपरापासून हात जोडून माफी मागू. पण आपला जीव प्यारी असेल तर त्यांना या पुढे मदत करायची नाही.'' बोलून वाघमारे साहेबांनी आपला फोन खाली ठेवून दिला. आणि टेबलवरच थंड पाण्याचा ग्लास त्यांनी तोंडाला लावला.


इकडे राठोडच्या बी.पी. ने उच्चांक गाठत होता. मुबई एन्काउंटर स्क्वाडचा हेड हे वाक्य ऐकताच त्याचा हातातून फोन गळून पडला. पुढचं ऐकण्याआधी तो पलंगावरून खाली आडवा झाला. पलंगावरची चादर भिजली होती. आणि त्याची पॅण्ट सुद्धा. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सची धावाधाव झाली. त्यांना ताबडतोब बेडवर ठेवून उपचार सुरु करण्यात आले. हे कशामुळे झालं ते मात्र त्याने कोणाला कळू दिले नाही.

*****

'जेवताना जुईचं लक्ष अर्जुनवर होत. तो सतत फोनवर नजर ठेवून होता. जुईचे जेवून झाले, तरीही त्याच्या ताटातली अर्धी पोळी देखील अजून संपलेली नव्हती. शेवटी जुई वैतागली. ''अर्जुन शांतपणे जेवणार आहेस, कि तो मोबाइल फेकून देऊ.'' तिने सरळ मोबाइल घेऊन बाजूला केला. आणि समोर उभ्या असलेल्या मावशी हातात पोळीची डिश घेऊन त्या दोघांकडे बघत जागीच उभ्या राहिल्या. मंगेश जेवत असताना त्याला ठसका लागला होता. त्या दोघांकडे पाहिल्यावर जुईला आपली चूक लक्षात आली.

''सॉरी, अर्जुन सर शांतपणे जेवा. जेवून झाल्यावर मोबाइल देते.'' तिने आपले वाक्य सावरले. आणि मंगेश मोठं मोठ्याने हसायला लागला.

''मॅडम तुमच्या सारखीच कोणीतरी पाहिजे होती. नाहीतर साहेबांच्या ताटातल्या दोन पोळ्या एक तास झाला तरी संपायच्या नाहीत.'' मावशी गपचूप येऊन जुईला म्हणाल्या.

''अगदी मनातलं बोललात मावशी.'' मंगेश त्यांना दुजोरा देत म्हणाला.

''मावशी मॅडम नका म्हणू हो. जुई म्हणालात तरी चालेल.'' जुई म्हणाली आणि मावशी 'बरं, जुई ताई म्हणते.'' म्हणत हसल्या.

अर्जुन काहीही न बोलता जेवत होता. जेवणावरून कोणीतरी त्याला ओरडले होते. हि पहिलीच वेळ. जुई थोडं त्याच ऐकणार होती, तो तरी काय बोलणार. जेवतानाच त्याच्या फोनची रिंग वाजली आणि त्याने जुईकडे पहिले.
''जुई महत्वाचा फोन आहे. दे प्लिज.''

जुईने फोन त्याच्याकडे सरकवला. जेवत असताना त्यो फोनवर बोलत होता. ओके बोलून त्याने फोन ठेवला. आणि मंगेशने त्याच्याकडे पहिले.

''ते नवीन पोलीस इन्स्पेक्टर राठोड, त्यांना हॉस्पिटलमध्ये अटॅक आला.'' अर्जुन मंगेशला सांगत होता.

''पण साहेब, त्याने काळ्या फॉर्च्युनरला अडवायचे टाकून, आतल्या संशयित आरोपीवर गोळ्या का झाडल्या. ते मला समजले नाही. तसे नसते केले तर आपल्या फॉर्च्युनर मधल्या लोकांनी त्याला गोळी मारली नसती.'' मंगेश आश्चर्याने विचारत होता.

''पुण्याला पोहोचण्यापूर्वी पंडित काकांना म्हणजेच त्या संशयित आरोपीना गोळ्या मारण्याची ऑर्डर मिळाली होती त्याना. खूप पैसा मिळालाय, बरेच  वरिष्ठ यात समाविष्ट असणार. प्लॅनींग मजबूत होते, पण ऐनवेळी सकाळी जाऊन मी कमिशनर ऑफिस मधून त्या पोलिसांच्या गाडीसोबत पुण्याला जाण्याची परमिशन मिळवली. एवढेच नाही तर हि केस मी आता स्वतःच्या डिपार्टमेंटकडे स्पेशल केस म्हणून मागवून घेतली आहे. त्यामुळे घाबरला असेल तो. आणि अटॅक आला असणार.'' अर्जुन त्याला सांगत होता. त्याच एक एक वाक्य ऐकून जुई मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती.

''योजना पंडित मर्डर मिस्ट्री केस आता तुमच्या अंडर आहे तर. मजा आहे. डिपार्टमेंटचा धुवा उडणार मग.'' मंगेश हसत म्हणाला.

''अर्जुन तू योजना पंडित मर्डर मिस्ट्री केस बद्दल बोलतोयस?'' जुई मध्येच म्हणाली.

''येस, तुला माहित आहे?'' अर्जुन

''न्यूजला पाहिलं होत रे मी. म्हणजे गेले आठवडाभर त्याच न्यूज सुरु आहेत. पण हे पेशन्ट म्हणजेच संशयित आरोपी आहेत?'' जुई

''एस, पण ते निर्दोष आहेत. पंडित काका म्हणतात त्यांना सगळे. योजना पंडिताचे काका. म्हणून तर त्यांना सोडवून मी इथे आणलय.'' अर्जुन जेवण आटोपून उठला. त्याच्या मागोमाग मंगेशही उठला. जुई हात धुवून बाहेर आली. आणि मावशी किचनमध्ये निघाल्या.

क्रमश