Haiwan a Killer - 2 books and stories free download online pdf in Marathi

हैवान अ किलर - भाग 2

भाग 2

मित्रांनो

जगभरात काही भग्न पावलेली घर, बंगले, कपारी, नदया, तलाव!

 बंद हॉस्पिटल, बंद सिनेमागृह, रस्ते -हायवे .अशी इत्यादी खुप ठिकाण आहेत.ज्या ठीकाणी अभद्र शक्तिंचा खुळेआम वावर आहे! तो वावर त्यांची, प्रचिती आजुबाजुला राहणा-या, रात्री तिथून जाणा-या वाटसरुना येत असते. काहीक्षण का असेना परंतु तो कालोखाचा तिमीर द्वार उघडला जातो, मग त्या जागी घुटमळत असलेले आत्मे बाहेर येऊन त्या जागेंवर आपल बस्तान मांडतात. मग त्या झपाटलेल्या वास्तुत एकदा का मानवी सावजाच प्रवेश झाल, त्यांना मानवाची चाहूल लागली.. की ते आत्मे त्याच्या शरीराचा, देहाचा ताबा घेतात, ताबा घेतला की मरणौत्तर त्या आत्म्यांच्या ज्या काही इच्छा आकांशा, मागे राहील्या असतील.. त्या ते पुर्ण करण्याचा त्यांच कल सुरु करतात. मग त्या झपाटलेल्या, अघोरी, क्लिष्ट, विकृत, शक्तिची प्रचिती जशी समोरच्या मानवास समजते. म्हंणजेच " हा माणुस झपाटलेला आहे हा ! ह्याला कुणी भुताने पछाडलय!" मग सुरु होतो, मांत्रीक, तांत्रिकी करण.. ! शंभर टक्क्या मधून नव्वद टक्के त्या अघोरी शक्तिपासुन वाचतातही.

पन बाकीचे मात्र त्या अघोरी शक्तिचा बळी जातात. असो कथा वाचुयात.

हायवे नंबर 405 हा पाच तासांवर पसरलेला एक वाळवंटी झपाटलेला

हायवे आहे. ह्या हायवेबदल खुप सा-या अफवाही आहेत. त्यातलीच एक अफवाह आपण पाहूयात ! अस म्हंणतात की ह्या हायवेवर खुप वर्षांन अगोदर एकेकाळी हायवे बनण्या अगोदर हिरव्या गार झाडांच घनदाट जंगल होत. ह्या जंगलात नेहमीच शांतता असायची, एकदम स्मशान शांतता ! ह्याच शांततेचा फायदा घेऊन एक भद्रकाल नामक अघोरी ह्या जंगलात आला. त्याला एका विद्येस अवगत करायच होत. विद्या अवगत करण्यासाठी त्याला शांती हवी होती.ती त्याला इथे मिळाली ही.ज्या कारणाने त्याने विद्याची तैयारी सुरु केली..! पन्नास दिवसांपर्यंत तो न खाता पिता, डोळे बंद करुन ध्यानास्थ बसलेला. आज विद्येचा शेवटचा दिवस असल्याने काहीवेळात त्याला विद्या अवगत होणार होती. परंतु नशीब केव्हा कस फिरेल हे नियतीच्या हाती असतं. एका गावातुन दहा दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला होता. सोना, पैसे पोते भरुन चोरुन आणले होते.चोरी झाली म्हंटल्यावर वातावरण चिघळत, लोक संतापुन उठतात. म्हंणुनच वातावरण थंड होईपर्यंत हे सर्व दरोडेखोर दरवेळी ह्या जंगलात लपायचे, खाण्यासाठी, पिण्यासाठी व्यवस्था होतीच झाड फळ नाना त-हा!

नेहमी प्रमाणे चोरी करुन हे सर्व जंगलात आले व त्या सर्वांची नेहमीची लपून बसण्याची जी जागा होती..त्या जागेवर त्यांना एक म्हातारा दिसला. अंगाला राख फासलेला, डोक्यावरचे केस जटा झालेला...खाली काळी लुंगी नेसलेला.

एका दरोडेखोराने त्या अघोरीला दरडावला.

" बाजु हो म्हाता-या! ही आमची जागा आहे? " त्याने अस म्हंणत शिव्या शापही देऊन पाहील..पन हा काही डोळे उघडेना, किंवा जागा सोडेना ! त्या अघोरीची विद्या अवगत व्हायला आली होती.. एका महाभयंकर रक्तपिपासु, मांसभक्षक सैतानाला त्या अघोरीने बंदिस्त करुन आपला गुलाम बनवण्यास ह्या धरतीवर पाताळाची जमीन फाडून भुतळावर बोलावल होत. पन झाल वेगळच.त्या दरोड्याखोरांनी रागाच्याभरात हातातल्या कू-हाडी चालवल्या..हात, पाय, डोक, डोळे, अंगाचा अक्षरक्ष खूळ खुळा केला त्या अघो-याचा. अघोरी मृत पावताच तो सैतान ह्या धरतीवर जन्म घेऊन आला. येताच त्याने त्या सर्व दरोडेखोरांचा निघृण, विकृतपणे खून केला..मालकच नाही म्हंटल्यावर तो सैतान अबंदिस्त झाला, त्याच्या वरच बंधन तूटल गेल. जंगलात तो एका खुळ्या जनावरासारखा वावरु लागला.. जंगलात जो माणुस, महिला फाट्यांसाठी जायच्या , तो-त्या जंगलातुन परत येत नसायचा/च्या. मग हरवलेल्या मांणसाला शोधण्यासाठी जाणा-या मांणसांना त्या हरवलेला स्त्री, पुरूषाच प्रेत, किंवा, सादी हाड सुद्धा मिळायचे नाहीत..उलट काहीबाही भास व्हायचे ! झाडाच्या खोडामागुन कोणी चोरुन पाहत आहे, मागे कोणि असल्याचा भास, वळुन पाहिल्यावर मात्र कोणिही नसायच.कधी कधी खसखस, तर हसण्याचा आवाज यायचा..हळू हळू जंगल झपाटल गेलय! वेगवेगळे तर्क, वितक्र पसरायला वेळ थोडीना लागत? शेवटी मांणसांनी जंगलात जाणच बंद केल..हळु हळू, जंगल भक्कास पडल. मग भारतावर जस इंग्रजांनी हुकूमत गाजवायला सुरुवात केली तेव्हा एका इंग्रज जनरलने ह्या जंगलाची कत्तल केली..भुईसपाट करुन टाकल समंद जंगल..! पन जंगल हटवायला पाठवलेल्या सैनिकांन मधले..रोज एक, किंवा दोन सैनिक आक्समिक रित्या गायब व्हायचे. ते कुठे जात?

कसे गायब होत? त्यांच प्रेत ही मिळायच नाही. सर्व काही रहस्यमय होत! शेवटी इंग्रजांन मार्फत तिथे एक हायवे बनवल गेल. ज्याच नाव होत.. हायवे नंबर 405 ! मग थोडी वर्ष निघुन जाताव इंग्रज भारत सोडून गेले. भारत आझाद झाला.मग हायवेवर बाजुला वस्ती, घर दार बसु लागली, पन दोन वर्षांन नंतर त्या हायवेवरची घर निर्मनुष्यहिंत भक्कास पडू लागली. हायवेबाजुला घर बांधुन मांणस राहत तर होती..पन जसा दिवस ढळायचा, रात्रीच्या अंधारात हायवे भागात काहीतरी अभद्र फिरु लागायच, रात्री -अपरात्री दाराची काडी ठोठावण्यात यायची..! बाहेरुन गुरगुर, खस, खस ऐकू यायची, पन जस दार उघडल जायच, बाहेर कोणिही दिसत नसे. 

एवढ सांगुन ती व्हिडिओ संपली तसा त्या तरुन युवकाने फोन बाजुला 

टेबलावर ठेवला. फोन ठेवला तिथे बाजुलाच एक फोटो फ्रेम होती..

त्यात शायनासमवेत हा युवक दोघेही कैमरा एंजलकडे पाहून हसत होते.आणी हा युवक नक्कीच निल होता.हो निलच होता हा! शायनाचा बॉयफ्रेंड. दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करत होते आणि लवकरच लग्नबंधनात अडकनार ही होते. निलच्या एका हाताला प्लास्टर झालेल दिसत होत. म्हंणुनच शायनाने त्याला आपल्या बरोबर नेल नव्हत. शायना ही एक बिजनेसवुमन होती.एक डील पक्की करण्यासाठी ती एका शहरातुन दुस-या शहरात जाण्यास निघालेली.

पन त्या शहरात पोहचण्यासाठी तिला तो हायवे नंबर 405 मागे सोडावा लागणार होता.निळ तस म्हंणायला अनाथ होता, पेशाने तो इंजीनीयर होता.आणि तो एकटाच आपल्या भल्या मोठ्या 2 bhk फ्लैट मध्ये राहायचा. आता ह्याक्षणी तो त्याच्या रुम मध्ये असलेल्या बैड बाजुच्या टेबल खुर्चीजवळ बसलेला.राहून -राहून त्याला शायनाची फिकिर होत होती. मनाच्या संदी कोप-यात साठवून ठेवलेली भीती आणि काळजी दोन्ही वर उफाळून येत होत्या. कारण हायवे नंबर 405 बदल तो खुप काही ऐकून होता. त्याने हळुच एका हाताने समोरचा काला फोन उचल्ला. एक दोनदा टच करत कोणाला तरी फोन लावला.

काहीसेकंद रिंग वाजली मग हळूच समोरुन कॉल उचल्ला गेला.

" वेलकम ऐण्ड गुडमॉर्निंग सर! लब्दी ट्रैवल्स मध्ये आपल पुन्हा एकदा स्वागत आहे !" एका अपरीचित स्त्रीचा सुरील आवाज.

" थँक्यु मिस "

" वेलकम सर ! बोला काय करु शकतो आम्ही तुमच्यासाठी?"

" अं मैम! " निल ने अस म्हंणतच त्या स्त्रीला शायना जिथे जाणार आहे तो पत्ता सांगितला, कारण तो ही तिथे जाणार होता. मनातल प्रेम तिच्यावर काहीतरी संकट ओढवल जाणार आहे, ह्याची जाणीव करून देत होत.एक अशुभ संकेत निलच्या मनाला सतर्कतेचा इशारा ड़सत होता. निलच ह्या जगात शायन शिवाय कोणिही नव्हत! आणि तिलाच काही झालं तर? 

" अं सर ! " फोनमधुन आवाज आला, त्याच विचार चक्र भग्न पावल.

" हं बोलाना !"

" सर , मी खुप काही सर्च करुन पाहिल. आज सर्वच बस बुक झाल्या आहेत. " 

" प्लीज मैम ! मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज काही होतय का पहाना, प्लीज ! अहो माझ्या हाताला मार लागल्या मुळे प्लास्टर झालंय..नाहीतर माझी गाडी घेऊनच गेलो असतो ना मी!"

" ओके वेट सर! मी ट्राय करते !" काहीक्षण मोबाईल मधुन येणारा आवाज थांबला : पुन्हा ऐकू आला " अं सर, एक बस आहे ! जी तिकडे जाणार आहे. बट!" ती स्त्री बोलायची थांबली.

" अं काय प्रोब्लेम आहे ! सीट नाहीत का? बसायला जागा नाही का ? हे पाहा मला सीटवर बसायला मिळालं नाही तरी चालेल. मी एकवेळ बसच्या टपावर बसेन. नाहीतर उभ राहीन ! पन प्लीज तुम्ही माझी तिकिट बुक करा !" निलच्या ह्या वागण्यावर ती स्त्री काहीशी हसलीस.

" तसं काहीच नाही सर! प्रोब्लेम हा आहे! की ती बस एका कॉलेज तरुणांना घेऊन एका ट्रिपसाठी जाणार आहे ! आणी बसायला वगेरे जागा आहेच ! फक्त तुम्हाला चालत असेल तर सांगा ? तस मी तिकडे कळवते!" ती स्त्री म्हंणाली.

" ओह नो प्रोब्लेम ! काही हरकत नाही ? तुम्ही बिनधास्त बुक करा."

" ओके सर ! मी लागलीच तिकडे कॉल करते आणि मग तुम्हाला फोन करते!"

" ओके मैम ! मी वाट पाहतो " निल अस म्हंणतच फोन कट झाला.

त्याने एका खिश्यातुन सफेद रंगाच कव्हर आणि त्यावर सोनेरी अक्षरात इंग्रजीत लिहिलेल गोल्डमन नावाच सिगारेट बॉक्स बाहेर काढल. मग त्यातल एक सफेद सिगारेट बाहेर काढून ओठांत ठेवल...! सिगारेट बॉक्स त्याने पुन्हा पेंटच्या खिशात ठेऊन, ह्यावेळेस लाईटर बाहेर काढल..मग तो लाईटर पेटवुन त्याने ओठांत पकडून ठेवलेली सिगारेट शिलगावली. एक, एक झुरक्यासहित काहीक्षण का असेना..डोक्यावरच वझ हळक झाल्यासारख वाटत होत. चार पाच झुरके मारुन होताच टेबलावर ठेवलेला काला फोन खणखनला..! त्याने तोंडातली सिगारेट हलकेच एक मोठा झुरका घेऊन, दुस-या हातातल्या चिमटीत पकडली..मग त्याच हाताने कॉल रिसिव्ह केला,

" हा हेलॉ सर !" काहिवेळा अगोदर आलेल्या त्या स्त्रीचाच कॉल होता.

"हा बोला ना मैम!" निल ने हळुच सिगारेटचा एक झुरका घेतला. तोंडातुन धुर सोडल..

" सर हैप्पी जर्नी! तुम्ही त्या बसने जाऊ शकता ! आणि हो बस तुम्हाला !" अस म्हंणतच त्या स्त्रीने बस कोठे भेटेल हे सांगितल.मग निल ने ऑनलाइन पेमेंट करुन, तिथेच फोन कट केला. 

 

क्रमश:

Share

NEW REALESED