Haiwan a Killer - 10 books and stories free download online pdf in Marathi

हैवान अ किलर - भाग 10

भाग 10

ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..!

आकाशात शुभ्र पांढ-या चंद्राचा गोलसर मुखडा पुर्णत पृथ्वी उजळून

टाकत होता. चंद्राच्या आजुबाजुला काळ्या निल्या आकाश गंगेतले लकाकणारे तारके एका स्फ्टकीसारखे चमकत होते. पुर्णत आकाश लकाकत होत त्या स्फटीकांमुळे. रातकीड्यांची किरकिर अंधारात लपून

बेधुंदपणे वेड्या पिसाट कुत्र्यासारखी हेळ काढुन ओरडत होती.तर कुठे घुबडेचा घुत्कार ऐकु येत होता. फक्त आवाज येत होता..ती अभद्रनशीबाची वटारलेल्या डोळ्यांची घुबड मात्र दिसत नव्हती.

कुठे होती ती ? कोण्या झाडावर बसली होती का ? म्की कोण्या कब्रस्तानात ! अरे बापरे खरंच की. ख्रिश्चन मंदिराच्या पिरेमीड आकाराच्या छप्परा मागे एक कब्रस्तान दिसत होत. कब्रस्तानाला चौहूबाजुंनी कंपाउंड घातलेल दिसल होत.कंपाउंडच्या बाहेर एक मोठ वेडेवाकड्या आकाराच फांद्यांच वडाच झाड दिसत होत. एका जखीणीच्या धारधार नखांप्रमाणे वडाच्या फांद्या खाली लोंबकळत होत्या. वडाच्या मध्यभागी भुगर्भात काळभोर अंधार दिसुन येत होता.

 आणी त्या अंधारवर झाडाच्या एका भारदस्त फांदीवर तपकीरी केसांची जाडी घुबड बसलेली, तीच्या भेदक लालसर डोळ्यांनी ती एकटक पुढे पाहत होती. तिच्या कानांवर एका कुदळचा माती खणताना जसा खच, खच आवाज होतो..तसा आवाज पडला जात एक आठफुट आकृती तिथे कब्रस्तानात.खड्डा खणतांना दिसत होती. त्या आकृतीच्या डोक ख्प्प्ड होत-डोक्यावर पांढरट केस असुन कमरे इतक शरीर पांढरफट्ट अगदी एका प्रेतासारख थंड पडलेले दिसत होत.कमरे खाली

एक चौकलेटी रंगाची पेंट, पायांत काळे चकचकीत बुट घातलेले दिसत होते.एका सैतान सारख देह होत त्याच..नी तो होता रामचंद नाव देवाच देह हैवानाच. हातात कुदळने घेऊन तो कब्रस्तानात एकटाच रात्री प्रेताला गाडण्यासाठी खड्डा खणत होता. बलदंड बाहुंच्या हातात ती कुदळ विशिष्ट प्रकारे हलवत ताकदिने मातीत घुसवत होता.त्याच्या हातात असलेली ती धारद्गार कुदळ एका वाराने दोन फुटांपर्यंत आत घुसत होती.पाच फुट मोठा खड्डा खणून झाल्यावर रामचंदने हातातली कुदळ खांद्यावर ठेवुन..हलकेच मागे वळुन पाहिल.तस त्याच्या हिरवट जहरी नजरेस पाद्रीच शवपेटीत रक्तबंबाळ हातपाय तुटलेले, डोक्याची कवटी फुटलेल देह दिसल. देह म्हंणण्याच मुळ कारण हेच. की पाद्री जिवंत होता.

कब्रस्तानात चौही दिशेना जाडसर रंगाच पांढरट धुक पडलेल.

 वातावरणात कमालीची शांतता, नी तेवढीच थंडी पसरली गेलेली.

ज्याने पाद्रीच देह थरथर काफत मृत्युची भीक मागत होत.

पन मृत्यु आज त्यांच्यावर हसत होता.

" ए निच हैवाना. कशाला जिवंत ठेवलयेस मला ! मारुन टाक ना हरामखोर." पाद्री मोठ्या कष्टाने म्हंणाले. बोलताना त्यांचे रक्ताळले लालसर दात दिसत होते. डोळे अशक्तपणाने खोल गेलेले.

" हे, हे, हे, हे !.. न्हाई न्हाई फादर ! तुला मी मारणार नाही. तुला असंच सडवत ठेवणार ह्या जमिनीत! आणि मग!" रामचंद छद्मी हसला, त्याने एका असुरी कल्पनेने आपले हात एकमेकांस चोळले. हनुवटी जराशी पुढे येऊन त्याच्या खप्पड चेह-यावरचे काळे ओठ फाकले जाऊन ते धारधार मसेरीवाले काले दात बाहेर आले. आजुबाजुला हवेत, जमिनीवरुन सरपटत जाणारा जाड धूका जणु रामचंदचा मित्र होता..जो रामचंदच्या देहाला खुळेआम मीठी मारत होत..तसे त्या धुक्यातुन फक्त रामचंदचे हिरवट जहरी डोळे एका काळ्या अंधारी बिळात असलेल्या पिसाळलेलया सर्पासारखे दिसत होते. रामचंदने पाद्रीच शरीर ठेवलेली शवपेटी उचल्ली. नी खड्डयात वर धरत हळकेच खाली सोडली..लाकडाचा विशिष्ट आवाज होत शवपेटी खड्डयात पडली. 

फादरचा विव्हलण्याचा आवाज ही आलाच. रामचंदने बाजुला खाली पाहिल. खड्डयातुन काढलेल्या मातीच्या ढिगाबाजूनला एक काचेची मोठी बरणी दिसत होती. दोन फुट आणि जाडजुड आकाराची काचेची बरणी. बरणीत काय होत? काय नाही ? हे दिसत नव्हत. कारण त्या काचेच्या बरणीत धुक कोंबलेल..की पांढरट धुर होत? कोणास ठावुक..

काचेची बरणी हातात घेऊन, रामचंद खड्डयाजवळ उभा राहिला..

त्याने हिरवट लकाकत्या डोळ्यांसहित एक कटाक्ष फादर वर टाकला. मग एका हाताने बरणी पकडून, दुस-या हाताने तिच चौकलेटी गोल

झाकण गोल गोल भिंगवत खोलु लागला. दहा-बारा सेकंद निघुन जाताच झाकण खुलल..तस आतल धुक, वाफ बाहेर आली.. रामचंदच्या चेह-यावरुन वर जात, आजुबाजुच्या धुक्यात मिसळली. 

रामचंदने हळकेच एका हिरवट डोळ्याने त्या बरणीत पाहिल.मोठ किळसवाण दृष्य. वळवळणा-या पांढरट रक्तचुसकी अळ्या, क्रोकोचस, मोठ, मोठ्या लालसर विषारी डंखमय मुंगळ्या, जाडजुड एक फुट आकाराच्या घोणी, नाना त-हेच्या विषारी किळसवाण्या, वळवणा-या किड्यांचा खारमा भरला होता आत. रामचंदने ती बरणी हलकेच एक हात वर करत थोडीशी वर नेत हळकेच बिनआधार करत वरुन त्या शवपेटीत सोडली. भुकेलेल्या खाद्य मिळाव तशी ती अघोरी कीटक, बाहेर येताच पाद्रीच्या शरीरावर तुटून पडून..मोठ मोठ्या मुंग्या, अळ्या, घोणी नाकातोंडातुन, कानामधुन शरीरात घुसल्या. आतुन शरीर पोखरु लागल्या, डंखांवर डंख शरीरात असंख्य वादळाच वावटल निर्माण करु लागले. गूरासारख तोंडाचा आ-वासुन पाद्री तडफड करत मोठ्याने किंचाळू लागला..उभा आसमंत दणाणून उठला त्या किंकाळीने..थंड वा-याच्या झोतांसहित आवाज पुर्णत 405 विलेजमध्ये रिपिट होत पाठोपाठ भिंगु लागला. झाडावर बसलेली ती घुबड पंख फडफडवत..फांदीवरुन उठली. नी हळूच येऊन रामचंदच्या खांद्यावर बसली. जणु ते अभद्र घुबड..ह्या ध्यानाच गुप्तहेरच होत जे काही गुप्त माहीती त्याला पुरवत होत.

" असा.. आहे काय... !" रामचंदचे हिरवट जहरी डोळे खूनशीपणे चमकले त्याने बाजूची मातीत रोवलेली कुदळ हळकेच उचलून खांद्यावर ठेवली. व टप, टप आवाज करत कब्रस्तानातुन बाहेर पडला.

××××××××××××××××××

मार्शल आणि निल दोघेही लघुशंकेसाठी एका अंधा-या जागी येऊन आपल पर्सनल काम पार पाडत होते. काहीवेळाने त्या दोघांचही नित्य सोपस्कार पूर्ण पार झाले होते. मग थोड दुर येऊन ते उभे राहिले..मार्शल

ने एक कटाक्ष उजव्या बाजुला टाकला नी खिळल्या सारखा तो एकटक तिकडेच पाहू लागला.

" मार्शल ? तुम्ही ज्या रामचंद नावाच्या भुताच ! आई मीन जो कोणी असो..! त्याचा इथे खात्मा करायला आला आहात. तो ह्या हायवेवर कुठे ही असु शकतो ना? " निलच्या प्रश्नार्थी वाक्यावर मार्शलने पुढे पाहतच फक्त मान डोळावली. निल ने तो पुढे काय पाहत आहे? हे पाहण्याकरीता त्यानेही एक कटाक्ष पुढे टाकुन पाहिल.मक्याच शेत होत पुढे आणि त्या शेतात आजुबाजुला मक्याची रोप उगवुन आलेली. आणि एक प्रश्णार्थक दृष्य दिसत होत तिथे. जे मार्शल पाहत होता. मक्याच्या रोपांना तुडवुन बरोबर ठिक शेताच्या मधोमधुन एक वाट पुढे गेलेली दिसत होती. खाली जमिनीवर टायर्सचे व्रण उमटलेले. पुढे गुडूप अंधार असल्याने जास्त काही दिसत नव्हत.

" व्हॉट द.. फ××× मैन ! अशी मक्याची शेती तर मी पाहिल्यांदाच पाहतोय!" निलने मार्शलकडे पाहील तो अद्याप पुढेच पाहत होता.

" रोपांना तुडवुन शेती केलीये! हा हा हा हा " निल स्व्त:च्या वाक्यावर स्व्त:च हसु लागला. मार्शलच लक्ष मात्र त्याच्यावर नव्हत. त्याने आपला एक हात हळुच हलवत डोळ्यांवर लावलेल्या चष्म्यासमोर आणला, नी हलकेच तर्जनीने एका काचेच्या चौकोनी फ्रेमवर टच केल. टचकरताच त्या काळ्या फ्रेम स्पेशलीस्ट यंत्र नाईट ग्लासप्रमाणे हिरव्या रंगात चमकल्या. त्या काचेच्या फ्रेम्सवर झुम ऑप्शन, आणि अंधारात पाहु शकण्याची स्पेशल दृष्टी मार्शलला मिळाली. पुढुन पाहणा-याला जरी तो

काला चौकोनी फ्रेमचा चष्मा साधारण दिसत असला तरीही तो साधारण मुळीच नव्हता. नायनॉटेक्नॉलॉजी, फ्युचरपावर, विसवी सदितला एक स्पेशल गेजेट होता तो.

" ओह माय गॉड!" मार्शल म्हंणाला.

" काय झाल? मार्शल ! " निल ने विचारल. त्याच्या ह्या वाक्यावर मार्शलने हळकेच आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढुन निल पुढे धरला. तसा निलनेही गंभीर होत.. तो चष्मा एक आवंढ़ा गिळुन हलकेच डोळ्यांवर चढवला. काहीवेळा अगोदर पुढे दिसणारा गुडूप अंधार आता गायब झाला होता. बारीक-बारीक लहानसर वळवलणारे किडे, विँचु, साप, उंदीर त्या पिवळ्या स्क्रीनवर झुम होऊन नावासहित दिसत होते.

"वाव अमेझिंग!" निल ने आजुबाजुला हसुन पाहत एक कटाक्ष थेट सरळ पुढे टाकला. तस त्याच्या चेह-यावर हसु ओसरल, पुढे साठ सत्तर मीटर अंतरावर एक व्हाईट फोर्च्युनर अपघात ग्रस्त अवस्थेत पडलेली.

गाडीच मागच भाग पुर्णत चेंबल गेलेल.टायर्स फुटलेले. आणि धक्कादायब बाब अशी. की त्या हिरव्या स्क्रीनवर गाडीच नंबर दिसल जात -गाडीच्या मालकाचा म्हंणजेच शायनाचा फोटो.दिसत होता.

×××××××××××××××××

क्रमश :