Haiwan a Killer - 11 books and stories free download online pdf in Marathi

हैवान अ किलर - भाग 11

भाग 11

" हेय हेल्लो.! कोणी आहे का आत?" मायरा बसमधुन खाली उतरत.बाजुलाच असलेल्या हॉटेलच्या काचेच्या दारातुन आत आली होती. हॉटेलच्या आत कालोखाने गर्दी केली होती. तर हॉटेलच्या पुढील बाजूस असलेल्या काचेच्या दोन भिंतींमधुन चंद्राचा थोडासा प्रकाश आत येत होता...त्याच प्रकाश थोडस अंधुक का असेना दृष्य दिसत होत. मायरा ज्या जागेवर ऊभी होती..त्याच जागेपासुन डाव्या हाताला हॉटेल मालकाच अर्धगोल टेबल होत.उजव्याबाजुला ग्राहकांसाठी टेबल खुर्च्या ठेवलेल्या दिसत होत्या. मायराने वळुन पुढे पाहील. समोर एक किराणा स्टोरसारखी मोठी सात फुट खिडकी होती..त्या खिडकीतून आतल बंद स्वयंपाक घर दिसत होत. मायराच्या आजुबाजुला चारही दिशेना काल अंधार तीचा घात करण्यासाठी टपून बसला होता.

" शट फोन पन आताच विसरायचा होत मला! " मायरा त्या अंधारात पाहत मनात म्हंणाली. तिने जागेवरुनच एक गिरकी घेत बाहेर जाण्याच ठरवल-कारण हॉटेल बंद असल्यासारखच भासत होत..की तेवढ्यात त्या शांततेत बंद स्वयंपाक घरातुन काहीतरी भांड पडल्यासारख आवाज आल.(ठण, ठन, ठन, ठनऽऽऽऽऽऽऽऽ) त्या शांततेत आवाज मानवी देहाच्या आत थरथरणा-याला स्पर्श करुन गेला..मायराने जागेवरुन पुन्हा वळुन त्या स्वयंपाक घराकडे पाहिल.नकळत तिने विस्फारलेल्या डोळ्यांनी घशातुन एक आवंढा गिळून त्या स्वयंपाक घराकडे पाहिल.

xxxxxxxxxxxxxx××××××

बसमध्ये कॉलेज तरुन-तरुनी अगदी शहाण्या मुलाप्रमाणे गप्प बसलेली. सागर - आर्य्ंश सुद्धा त्यातच होते. सोज्वळ आपली गोलसर काळी हेट तोंडावर ठेऊन झोपला होता-त्याच्याबाजुलाच खिडकीपाशी प्रणया बसलेली. खिडकीतून बाहेरचा थंड वारा तिच्या केसांना फूंकर मारत हळकेच वर उडवत होता. प्रणया अगदी गोरी चिट्टी फॉरेनर तरुनीसारखीच दिसायची. म्हंणायला तीची फैमिली वर्ष पंधरा वर्ष परदेशातच राहिलेल, तिकडच बदलता हवामान तिच्या शारीरीक रचनेवर, डोक्यावर परिणाम पाडून गेलेला. तिच्या गोळसर गो-यापान चेह-यावर तिने व्हाईट मेकअप मारलेला, बारीक कालसर डोळ्यांच्या वर पापण्यांना निळसर रंगाने रंगवलेल, ओठ काळ्या लिपस्टिकने भिजवुन टाकले होते.म्हंणायला अमेरिकन बैड गर्ल लुक दिसत होत तीच. अंगावर एक ब्लैक मिनी टी-शर्ट आणि खाली निळी जीन्स घातलेली.

उघड्या खिडकीतुन येणा-या थंड वा-याने तिने सोज्वळचा एक हात आप्ल्या दुस-या हातात आडकवून घेतला.तस त्याला जाग आली.

डोक्यावर ठेवलेली काळी हैट त्याने हलकेच बाजु काढली व आळस देत म्हंणाला.

" आऽऽऽह ! पोहचलो आपण?" त्याने प्रणयाकडे पाहील. त्याचा आवाज ऐकून भितरे आर्य्ंश सागर चवताळून उठले. शेवटी सोज्वळ

त्यांचा लिडर होता. कूणालाही न घाबरण, उलट बोलन, रिस्पेक्ट फक्त मित्रांची बाकी सगळे बिना लायकीचे हा स्वभावच होता त्याचा. तो उठताच सागर-आर्यंश दोघांनीही बस थांबल्यापासुन ते मार्शल-निळ दोघ बाहेर जाण्याच प्रसंग त्याच्या समोर अगदी मीठ मसाला जास्त घालूनच सांगितला.

" डोंट वरी गाईज. बस यांच्या बापाची असेल, आपण नाही. कळल? " सोज्वळने नेहमीचा डायलॉग मारला.

" चला थोडे पाय मोकळे करु!" सोज्वळ आलोखे पिळोखे देत सीटमधोमध असलेल्या वाटेतुन चाल पुढे आला. वामनराव आपल्या ड्राईव्हरुम मध्ये बसलेले. म्हंणुनच ही मुल दारातुन केव्हा बाहेर निघुन गेली.हे त्यांना महितीही नव्हत. वामनरावांसहित काही हुशार मुल-मुली

आपल्या जागेवर गप्प बसलेले. बसमध्ये पेटलेल्या आकाशी ट्यूबमध्ये वामनराव धरुन एकूण चौवेचाळीस जण होते. मायरा, ती चार कॉलेज तरुन, मार्शल, निल सर्व तर बाहेर होते.

×××××××××××××××××××××

 " अं, हा, हा, हा, अं, हा, हा, हा अं, हा हा !" शायनाच्या गाडीच काळ टायर गळ्यात घालुन.तूटलेली काळी स्टेरिंग हातात धरुन तिचे सेकंदा-सेकंदाला मुके घेत निल भोकाड पसरवुन ओक्साबोक्षी रडत होता. स्टेरिंगला ओठ टेकवुन मुक घेत होता. तर पुन्हा खांदे हलवून रडत होता. तर मार्शल आजुबाजुला त्या काळ्या चष्म्याने गाडीच निरीक्षण करत, आजुबाजुचा परिसर ही पाहत होता.

" निल जस्ट शट अप मैन ! स्टॉप क्राइंग ! " मार्शल पुढुन गाडीचुआ दुस-या बाजुने उभ राहून त्याच्या अंगावर खेकसलाच..तसा तो अजूनच एका लहान मुलासारखा रडू लागला. कुत्र्यासारखा कुई, कुई आवाजात.

" माझ प्रेम संपल, मी पुन्हा अनाथ झालो."

"निल आई एम सॉरी मला तुझ्यावर ओरड़ायला नको हव होत! " मार्शलने भावुक होत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. व पुढे म्हंणाला.

"हे बघ मला वाटत ती अद्याप जिवंत आहे!"

" कशी काय जिवंत असेल? गाडी फुटली, स्टेरिंग तुटली.अजुन ती सुद्धा कुठेच दिसत नाहीये. नक्कीच त्या रामचंदने माझी गर्लफ्रेंड खाल्ली.अं, हा हा, अं हा, हा, अं हा हा हा, अं !" निल पुन्हा स्टेरिंगचे मुके घेऊ लागला. 

" मेली माझी शायना ! मला अर्धवट सोडुन गेली ! " निल एकटाच बडबडू लागला. की तेवढ्यात..

" निल ! " निलच्या कानांवर एक ओळखीचा आवाज घुमला.

त्यांचे हुंदके थांबले..त्याने गर्रकन वळून मागे पाहिल. मागे शायना, तिच्या बाजुला तिला वाचवणारी ती म्हातारी, आणि तिच्या बरोबर होता काळ्या जाडजुड फुगलेल्या शरीरयष्टीचा मायकल.(कुत्रा)

" जिवंत आहे मी ! आणि मेले तरी सोडणार नाही तुला.!" 

निल ने शायनाला पाहताच त्याच्या डोळ्यांतुन अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. गळ्याततल टायर, हातातली स्टेरिंग बाजुला फ़ेकत तो शायनाच्या दिशेने धावला..शायनाच्या डोळ्यातुन टचकन अश्रु ओघळले. काहीवेळापुर्वी तिच्या मनात प्रश्णांनी थैमान घातल होत. की पुन्हा त्याच्याशी भेट होईल का? की कायमच ह्या गावात कैद राहाव लागेल? पन अचानक आलेल्या बसच्या आवाजाने.. शायनाला कळून चुकलं होतं..की आपल्यासारखेच वाटसरु इथे आले असतील ! रामचंदने त्यांच शिकार करण्या अगोदर त्यांना वाचवायला हव.म्हंणुनच ती म्हातारीला, व मायकल (कुत्र्याला) बाहेर घेऊन आली होती.पन शायनाला अचानल ओळखीचा आवाज ऐकु आला..ती त्या आवाजाच्या रोखाने निघाली..नी पुढे पाहताच तिला भेकाड पसरुन रडणारा निल दिसला. निल-शायना दोघांनीही एकमेकांना कडकडून मीठी मारली..मीठी मारताच फ्रेक्चर झालेल त्याच एक हात हलकेच चेंबल..

पण शायना पुन्हा मिळाली ह्या आनंदात ती वेदना जाणवलीच.

" तु इथे का आलास? तुला माहीतीये का ? इथे खुप धोका आहे !"

शायना पुढे काही बोलणार तोच निल ने अडवल.

" सर्व माहीतीये मला ! ह्यांनीच सांगितल" निलने मार्शलची ओळख ते आतापर्यंत झालेल्या सर्व घटनेच थोडक्यात वर्णन कळवल.

" ह्या कोण?" निल ने त्या म्हातारीकडे पाहिल. तसे शायनाने तिच्या समवेत घडलेल सर्वप्रसंग निल ला सांगितल. जे ऐकून मार्शल, निल दोघांचेही डोळे विस्फारले.

" माय गॉड! मग तो रामचंए कुठे गेला काही माहीती ?

शायनाची माहीती ऐकल्यावर मार्शल म्हंणाला.

" नाही ना! पनऽऽऽ!" शायनाच्या तोंडून जस हे वाक्य निघाल..आणि त्या पन पुढे ती बोलणार की तोच (पोंऽऽऽऽऽऽऽम ऽऽऽऽऽ) पुर्णत वातवरण त्या अभद्र हॉर्नच्या आवाजाने दणाणुन उठल. शायना-निल, मार्शल, ती म्हातारी चौघांनी वळुन दूर हायवेकडे पाहिल.एक काळ्या रंगाची ट्रक पुढच्या हेडलाईट पेटलेल्या अवस्थेत अगदी भरधाव वेगाने हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने पुढे जाताना दिसली.

परंतू आश्चर्यकारक गोष्ट अशी. की त्या ट्रकमधल्या ड्राईव्हरुमध्ये पेटलेल्या लाल उजेडात ड्राईव्हसीटवर कोणीही बसलेल दिसत नव्हत...जे पाहून शायनाचे डोळे विस्फारले.

" ती बघा ! ती त्याची ट्रक आहे. आणि ड्राईव्हसीटवर कोणीच बसल नाहीये !. "

" ओह शट, " निलने मार्शकडे पाहिल. पुढे त्या सर्वांना एक निळी बस दिसत होती. आणि त्या बसमागुन येणारी ती काळी बिन ड्राईव्हरची सैतानी ट्रक.

" नोऽऽऽऽ!" मार्शल निल दोघेहो एकसाथ ओरडले. पुढे काय घडणार आहे हे त्या दोघांना कळून चुकलं होतं. की त्याचवेळेस त्या ट्रकने त्या बसला मागुन येत एक जोरदार धडक बसवली. त्या धडकेने त्या बसच मागच भाग चेंबल! बसची चाक जागेवरुन हळली..नी थेट बस पुढे पुढे जात..त्या लोख्ंडी विद्युत ऑनलाईन असल्यालेल्या खांबल्यावर आदळली.बसचा स्पर्श लोख्ंडी खांबाला होताच. वरच्या काळ्या वायर्स एकमेकांना स्पर्शुन ठींणग्या उडाल्या..! सळसल करत निळी आकाशी वीज बसच्या इंजीन मध्ये घुसली..नी पुढ़च्याचक्षणाला..एक मोठा विशाल स्फोट नी विशिष्ट प्रकारचा आवाज झाला (धडाम्मऽऽऽऽ). पुढे एक तांबड्या रंगाचा मोठा गोल अग्नी वर्तुळाकार आकाशात वरवर जातांना दिसला..खालच सर्वकाही मिनीटभरासाठी दिवस असल्यासारख उजळुन निघाल. बसच छप्पर सर्वकाही धाडधाड चौवेचाळीस प्रेतांच्या देहांसहित धाडधाड करत पेटू लागल. बसच्या काचा फुटून लाल रंगाने माखुन खाली रस्त्यावर पडलेल्या...एकदोन

नव्वद टक्के भाजलेली देह घेऊन कही तरुन मुल रस्त्यावरुन रेंगाळत पुढे पुढे जाताना दिसत होती. मांस, केस, जळाल्याचा होरपळून निघणारा करपट सुगंधित वास चौहीदिशेना दरवळत होता. बसच्या जागी एकुण चौवेचाळीस जिवंत प्रेतांची चिता प्रकांड रौद्र अवतार धारन करुन जळत बसलेली.

" ए ऽऽऽऽऽ! हरामखोर !" सोज्वल मोठ्याने ओरडला. त्याच्या बाजुलाच प्रणया, आर्यंश-सागर रस्त्यावरच उभे होते. आणि त्यांच्यापासुन थोडपुढे चाळीस मीटर अंतरावर ती काळ्या रंगाची आणि मागे मोठ कंटेनर असलेली ट्रक पाठमोरी ऊभी होती. सोज्वळचा आवाज इकडे मार्शल, निल, शायना, त्या म्हातारीने ऐकला होता.

" त्या पोरांना इकडे बोलवा ! नाहीतर ती ट्रक त्या चौघांनाही मारुन टाकेल.कमॉन फ़ास्ट!" ती म्हातारी म्हंणाली.

" हेय ! हेय? हेऽऽ!" निल आपले हात हलवत मोठ्याने त्या चार मुलांमा आवाज देत होता. प्रणयाला कोणाचीतरी हाक ऐकु आली.तिने डाव्या बाजूला वळुन पाहिल..तिथे तिला एकुन चार जण ऊभी दिसली. त्यातला एकजण त्यांना मोठ्याने आवाज देत होता-तो होता निल.त्याच्या बाजुला व्हाट शर्ट ब्लैक जीन्स घातलेली एक तिच्यापेक्षा दोन तीन वर्षाने मोठी शायना ऊभी होती. तिच्या बाजुला एक काळ कोट, काळी पेंट घातलेला म्हंणजेच मार्शल उभा होता. आणी सर्वात शेवटी एक म्हातारी जिच्याकडे एक काला कुत्रा होता.

" हेय गाईज ! ती सर्व आपल्याला बोलावत आहेत. "

" कोण?" घामागुम झालेला सागर म्हंणाला.त्याने प्रणयाने सांगितलेल्या दिशेला पाहीला. मग सोज्वळ- आर्यंशनेही पाहील. समोर उभ्या ट्रकच इंजिन हलकेच घर्रघर्र आवाज करत सुरु झाल..मागची लाल लाईट सैतानासारखी पेटली, आक्राळविक्राल हसु मागच्या नलीतुन काळ धुर सोडत हसल..! हळुच गाडीचे गियर्स ऑटोमेटिक शिफ्ट झाले...गाडीसमोरुन हायवेवरुन रेंगाळत जाणा-या त्या बिच-या जीव वाचवणा-या तरुणांच्या कमरेची हाड तोडत पुढे निघुन गेली. मग स्टेरिंग आपोआप डाव्याबाजुला फिरुन एक टर्न ट्रकने घेतल. तस त्या चौघांना काहीक्षण ड्राइव्हरुम मध्ये पसरलेल्या लाल दिव्याच्या उजेडात कोणिही दिसल नाही. चौघांच्याही अंगावर सरसरुन काटा उभा राहिला. भीतीने डोळ्यांच्या खोबण्या मोठ्या झाल्या. पोंऽऽऽऽऽऽमऽऽऽऽ ट्रकच्या हॉर्नचा अभद्र आवाज मुळाच्या देठापासुन मेंदूत झिंनझिण्या आणून गेला.

" पळाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" सागर, आर्यंश, सोज्वळ-प्रणया एकसाथ किंचाळे. नी वेगाने चौघांनी मार्शल निलच्या दिशेने धाव घेतली.

ईकडे शाय्ना, निळ, मार्शल, त्या म्हातारीचही काही वेगळ सांगायला. सर्वांचे पाय थरथरत होते.

" पळा, पळा..! घरात चला लवकर ! " ती म्हातारी मायकलचा गळ्यातला पट्टा मागे खेचत ओरडली. 

" निल चल!" शायनानेही निलच दंड मागे खेचत त्याला घेऊन जायला निघाली. ( हा पुढील सीन वाचताना शुऽऽ कोई है बैकग्राउंड म्युझिक आहाऽऽ..आहाऽऽऽऽ ऐकून किंवा इमेजीनेशन करुन भाग वाचा. खुप चांगल फिल येइळ) सागर, आर्यंश, सोज्वळ-प्रणया दगड गोट्यातुन मक्याच्या रोपांना पायाखाली तुडवत अगदी वेगाने धावत पळत किंचाळत पळत होते. त्यांच्या मागे पिवळेजर्द हेडलाईटसचीती सैतानी ट्रक डॉग धरलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखी त्यांची हाड चावायला नाहीतर मोडायला येत होती. मक्याच्या शेतातल्या खड्डयांमधुन खालीवर होत ती ट्रक वेगाने पुढे पुढे येत होती..तिचा पिवळाजर्द हेडलाईटचा प्रकाश ह्या चौघांच्या पाठणावर पडला होता. की अचानक एका खड्ड्यात त्या ट्रकच चाक फसल. ती जागेवरच थांबली..इंजीनचा घर्रघरता आवाज, नी नळीतुन कुत्र केकटाव तस आवाज काढत धुर बाहेर येऊ लागला. ट्रकच चाक खड्डयातुन बाहेर येण्यासाठी धडपडू लागल..मागे पुढे होऊ लागल.

" या मुलांनो, इकडे या लवकर! त्या ट्रकच चाक खड्डयात फसलय! कमॉन." मार्शल ओरडला. ती सर्वजन मार्शलजचळ पोहचली..आणि ईकडे त्या ट्रकच टायर निघाल गेल. तशी ती पुन्हा पोमऽऽऽऽऽ हॉर्नचा अभद्र आवाज घुमवत..पिवळी हेडलाईट पुढच्या दिशेने फेकत त्यांच्या दिशेने येऊ लागली. परंतु आतापर्यंत ते सर्व तिथून नाहीसे झाले होते.सर्वजन वाचले होते.

 

क्रमश: