Haiwan a Killer - 13 books and stories free download online pdf in Marathi

हैवान अ किलर - भाग 13

भाग 13

" पळ सागर पळ! जिव वाचवायच असेल तर हा हायवे पार करावा लागेल. " रात्रीच्या निलसर उजेडात, सरळमार्गी हायवेवरुन आर्यंश-सागर दोघेही त्या रामचंदच्या कचाट्यातुन जिव वाचवण्यासाठी पळत सुटले होते. आजुबाजुला डाव्या उज्व्या साईटला वाळवंट सोनेरी वाळु अंगावर घेऊन शांत झोपली होती. त्या वाळवंटातल्या सोनेरी वाळूवर झाडांच्या आकृत्या ह्या दोघांना पुढे-पुढे जाताना पाहत होत्या. पुढे आर्यंश..तर मागे बॉडीबिल्डर शरीराचा सागर होता. दोघांनीही आतापर्यंत दोन किलोमीटरच अंतर पार केल होत. आर्यंश म्हंणायला लुकड्या शरीर यष्टीचा होता. म्हंणूनच त्याला दम लागल नव्हत. पन मागचा सागर मात्र हाफु लागलेला. त्याच्या पावलांचा वेग कमी-कमी होत होता. बॉडी बिल्डर असावा तर असा?

" सागर पळ! पळ लवकर.!" पुढे पळणारा आर्यंश जागेवरच थांबुन

गुढघ्यांवर हात टेऊन मोठमोठ्याने श्वास भरणा-या सागरकडे मागे पाहत म्हंणाला.

" न्हा..न्हा..! नाय..मह...म्ही..मी अजुन नाय पळु शकत."

धाप लागलेल्या सुरात सागर म्हंणाला. आर्यंश त्याच्या जवळ आला.

त्याचा एक हात खांद्यावर ठेऊन " पळ नाहीतर हकनाक मरु! म्हंणत त्याला सोबत घेऊन धावु लागला.

" आर्या ! सोड मला! तु..तुझा जिव वाचव " सागरने आर्यंशकडे पाहिल.

" नाय! मी तुला सोडून नाही जाणात!" आर्यंश पुढे हायवेकडे पाहत

म्हंणाला. न जाणे किती किलोमीटर दुर होत शहर!

" आर्य ऐक माझ ! सोड मला! आणि तु जा पुढे.तुझा जिव वाचव.!"

" अरे भाई अस कस बोलतोस तू? तुला असंच सोडून मी जाऊ ! मी मित्र आहे तुझा शत्रु नाही!"

" आर्या ! तुला तुझा जीव प्यारा आहे की मित्र ?" सागरने मोठा भांबावुन सोडणारा प्रश्ण आर्यंश समोर ठेवला.

" तुला ऐकायचय! तर ऐक..माझ्यासाठी मित्रच प्यारा आहे. " आर्यंश..

" थांब आर्यंश ! " सागर आर्यंश दोघेही थांबले.

" ही वेळ प्यार वगेरे दाखवायची नाही. तर जिव वाचवायची आहे! तो हैवान कधीही त्याची ट्रक घेऊन आपल्या मागे येइळ.आणि माझ्यामुळे तु ही मरशील. म्हंणुन सांगतोय! तु पुढे जा? मी मागुन येतोच ना! हे बघ वाद गाळत बसु नकोस. जिव वाचव बस्स!" सागरने आर्यंशच्या खांद्यावरुन हात काढुन घेतला. त्याला नजरेने पुढे जाण्यासाठी होकार दर्शवला.

" ठिक आहे सागर !" आर्यंशने आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवल.मग होकारर्थी मान हलवून तो लागलीच वेगाने पुढे पळून जाऊ लागला.शेवटी काहीही असो जान सलामत तो पगडी पचास

. नाही का? सागर पुढे जाणा-या आर्यंशच्या आकृतीकडे अंधारात विलीन होत नाही तो पर्यंत राहिला होता. मग जस आर्यंश नजरेसमोरुन दिसेनासा झाला. तसा तो हायवेच्या रस्त्याकडेला चालत जात, बाजुलाच एक काळ दगड होत त्यावर बसला. एकवेळ त्याच्या नजरेसमोरुन पुढे दुर दूर वर पसरलेल्या अंधारात सोज्वल-प्रणया, आर्यंश तिघांचेही हसरे चेहरे, दंगामस्तीतले क्षण दिसले.तसा तो मान हलवतच हसला. न जाणे पुढे आता ह्या सर्वांशी भेटही घडणार होती ? की नव्हती ? हे देवालाच ठाऊक!. सागर आपल्या विचारचक्रांत हरवुन गेलेला. एक प्रकारे तंद्रीच लागली होती त्याची.की तेवढ्यात (पोंऽऽऽऽऽमऽऽऽऽ) एक मोठा हॉर्नचा आवाज सागरच्या कानांवर घुमला.तो आवाज ऐकुन त्याच्या अंगावर सर्रकन भीती चढली. धाडकन सागर दगडावरुन उठला, नी त्याचवेळेस त्याच्या पुर्णत शरीरावर एक पिवळसर प्रकाश पडला-इंजिनचा घर्रघर्रता भसाडा आवाज, त्या दोन हेडलाईटस, लाल रंगाची गोल गोल भिंगणारी चाक, नळीतुन काळ धुर

सोडत ती ट्रक अगदीवेगाने यमाच्या रेड्यासारखी धावुन आली.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" सागरने दोन्हीहात हवेत उचल्ले, तोंडवासल, जीभ बाहेर आली, डोळे विस्फारले. नी एक शेवटची जोरदार किंकाळी उभा आसमंत दणाणुन गेली. पिचकारी मारल्यासारख लाल रक्त त्या काळ्या दगडावर उडाल, ज्या दगडावर काहीवेळा अगोदर जिवंत सागर बसला होता! होता? त्या काळ्या दगडाबाजुलाच हायवेवर सागरच सताड उघड्या डोळ्यांच निर्जीव प्रेत पडल होत. आणि त्याच्या डोक्यामागुन ती सैतानी ट्रक मागचे लाल दिवे पेटवत पुढे पुढे जाताना दिसत होती. कारण हायवे नंबर 405वरुन सुटका होण असंभव होत.

°××××××××××××××××××××

"अं, हा, अं हा, अं, हा, हा, आ" शायना मोठमोठ्याने रडत होती. 

 तर निल तिला शांत करत होता.

" शायना प्लीज शांत हो ! हे बघ जे झाल ते झाल!" निल, सोज्वळ, प्रणया चौघेजन एका कुडाच्या झोपडीत होते. नऊफुट उंचीच्या काठ्या आणी त्यांना शेण चिटकवल होत..वर छप्पर म्हंणुन काठ्यांवर पेंढा अंथरला होता. उन्हाळा-हिवाळा दोन मोसमांत काहीक्षण का असेना आसरा देणारी झोपडीच होती म्हंणा ती. सोज्वलने जीन्सच्या खिशातुन

एक सफेद रुमाल काढला..व निल ला दिला. निल ने तो घेऊन शायनाकडे सोपावला.

" हे सागर आर्यंश कुठे राहीले असतील? आपल्या मागे आले का ते ?" प्रणया सोज्वळकडे पाहत म्हंणाली. शायनाने सर्वप्रथम डोळे पुसले. 

" नाही ना! " सोज्व्ल इतकेच बोलला.

" मला वाटत की आपण सर्व बाहेर येण्या अगोदरच ते पळाले होते."

निलने सोज्वल प्रणयाकडे पाहील. की तेवढ्यात शायनाने रुमाल नाकावर ठेऊन (खस, खस) करत शिंकरल. तो आवाज ऐकुन सोज्व्ल-प्रणया दोघांनीही तिच्याकडे पाहिल. सोज्व्लने तर कसतरीच तोंड केल. नाक शिंकरुन शायनाने रुमाल निलकडे सोपवल..जो त्याने पाचही बोटांत धरुन! " थँक्यू!" म्हंणत सोज्व्ल समोर धरला. काहीक्षण सोज्व्ल लाल टपकत त्या रुमालाकडेच पाहत राहिला. जणु पेरेलाईस झाला की काय बिचारा.

" नाही नको! नको. दे तिलाच !" सोज्व्ल एकदम भानावर येत पुढचे सात आठ दात दाखवत कसतरी हसतच म्हंणाला. 

" म्हंणजे ते दोघे अगोदरच दारातुन बाहेर आले. मग गेले कुठे असतील?" प्रणया विचार करत म्हंणाली. की तेवढ्यात

त्या झोपडीच लाकडी दार वाजल. दार वाजताच सर्वांच लक्ष तिकडे फिरल. परंतु दार उघडायला कोणिही गेल नाही! काहीवेळ निघुन गेला. बाहेरुन कसलही आवाज किंवा हालचाल झाली नाही. सोज्व्ल-प्रणया निल शायना चौघांनी आळीपाळीने एकमेकांच्या चेह-याकडे पाहिल. प्रत्येकाच्या मनात भय साचल होत. डोळे त्या दारापल्याड कोण असेल ह्याचा शोध घेत होते. की पुन्हा थाप पडली.

" ठोक, ठोक, ठोक "

" को, को..कोण आहे?" निल हिम्मत एकवटून दाराकडे पाहत म्हंणाला.

परंतु प्रतिउत्तर आल नाही. की पुन्हा एकदा थाप पडली., ठोक, ठोक, ठोक. तसा निल हलकेच दाराच्या दिशेने निघाला.

" निल नको जाऊस ! तो रामचंद असला तर?" शायना त्याच हात धरत बोलली.

" नो शायना! मला वाटत बाहेर नक्कीच कोणीतरी माणूस आहे! "

" हे तु इतक्या कोन्फीडंन्टली कस म्हंणु शकतोस!" शायना म्हंणाली.तसा निल दात विचकत हसला, एक हात मागे डोक्यावर ठेउन तो खाजवत म्हंणाला.

" ते मी झोमटे क्रीएशन स्टोरीज मध्ये अस वाचलय की भुत, पिशाच्च तीन वेळा दार ठोठावत नाहीत."

" अच्छा! मग जा उघड दार?" शायना थंड सुरात डोळ्यावरची एक भुवई उंचावत म्हंणाली. तिचा तो लुकनेस पाहून निल जागीच गोठला.

" वेट मी पाहतो!" सोज्व्लने बाजुलाच निलने सोबत आणलेली काठी हातात घेतली..नी चार पाच पावले चालुन दाराजवल आला. त्याने एक कटाक्ष हळुच त्या तिघांचर टाकल..मग एका हाताने दाराचा कडी कोयंडा हलकेच सरकवला.तसा बाहेर जे काही अभद्र टग धरुन होत..ते दारला धक्का देऊन आत शिरल. ज्याला पाहून निल-शायना सोज्व्ल - प्रणया सर्वांच्या तोंडून एक शब्द निघाल. " मार्शल !"..होय मित्रांनो दार 

उघडून मार्शल आत आला होता. आत येताच त्याने आपल्या मागे दार ओढुन कडी कोयंडाही सरकवुन दार पुन्हा बंद केल होत.

" मार्शल ! तुम्ही ? मग त्या आज्जी कुठे आहेत?"

शायना म्हंणाली. तिच्या ह्या वाक्यावर मार्शल मात्र गप्प बसला. व काहिवेळाने म्हंणाला.

" मी नाही वाचवू शकलो त्यांना ! नेमक एनवेळेसच माझ्या हत्यारांना वापरणार होतो..पन नेटवर्कच नाही मिळाल.!" मार्शल ने पुन्हा एकदा चौकोणी काळ्या वॉचच्या चालू हिरव्या स्क्रीनवर पाहील.." नो सिग्नल!" इंग्रजीत नाव येत होत.

" ओह शट! मग आता काय करायचं ?" प्रणया.

" आता फक्त एकच मार्ग आणि एकच पॉइंट आहे! " मार्शल.

" काय!" निलने मार्शल कडे पाहिल.

" फेस-टू-फेस ! शत्रुच्या इलाक्यात जाऊन त्याला उडवाव लागेल ! "

" बट प्लैन! काय आहे ?" सोज्वल.

" हे पाहा ! " मार्शलने धीरगंभीर कटाक्ष त्या सर्वांवर टाकल.

" मी अस ऐकलय की हा गाव फक्त सात दिवसां करीता ह्या हायवेवर असणार आहे. आणि एकदा का सातव्या दिवसाचा अवधी संपला. की मग ही विलेज आपल्या सर्वांना घेऊन पुढील पंचवीस वर्षाँसाठी गायब होईल."

" व्हॉट!" शायना -निल सोज्व्ल-प्रणया एकसाथ ओरडले.एक धक्काच बसला हे वाक्य ऐकुन त्या सर्वांना.

" होय हे खर आहे. " मार्शलने सर्वांकडे पाहिल.

" आणि एक महत्वाची गोष्ट म्हंणजे. आपल्याला हे ठावुक नाही की आज कितवा दिवस आहे ? पाहिला, दूसरा, की " मार्शलने चष्मा घातला नव्हता.त्याने आपल्या काळ्या डोळ्यांनी एक एक करत सर्वांकडे पाहिल. पुढे म्हंणाला.

" की सातवाऽऽऽऽ!" 

क्रमश :