Utkarsh - 2 books and stories free download online pdf in Marathi

उत्कर्ष… - भाग 2

उत्कर्ष भाग

काल माझ्याशी नशेत मग्रुरीने बोलणारा तो तरूण - उत्कर्ष आता माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला होता..

डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा,अंगावर फिक्क्या पिवळट कलरचा चुरगळलेला ती शर्ट, मूळचा हिरवा कलरअसलेली पण आता विटलेली बर्मूडा, चेहऱ्यावर बावळटपणाची झाक असलेला उत्कर्ष माझ्यासमोर बसून पाणी पीत होता…

“ उत्कर्ष तुम्हारा नाम टू बढीया है, फिर ऐसा बिगडा क्यू है भाई?” काल त्याने केलेला उध्दटपणा अजून माझ्याडोक्यातून गेलेला नव्हता..

“ अंकल सॉरी बोला ना मै…कभी कभी बियर पिया तो होता है गलती! “

“ वैसे आप क्या पढे है? क्या करते हो? “

“मै इंजिनीअरिंग किया हैं..”

उत्कर्ष इंजिनीयर होता, बायजूस कंपनीत काम करतोय म्हणाला…

मी प्रश्न विचारत होतो आणि तो उत्तरे देत होता..

त्याचे वडील अमरावतीला सावकारी करायचे.प्रचंड पैसा ठेऊन ते अकाली वारले होते.

माझ्या खालच्या मजल्यावर असलेला फ्लॅट त्याच्या विवाहीत बहिणीचा होता जी सध्या अमेरिकेत आय टी कंपनीत काम करत होती. आपल्या वयस्कर आईला घेऊन उत्कर्ष इथे रहायला आला होता. लवकरच तो हीअमेरिकेला जायची स्वप्ने तो बघत होता.काल मला झालेल्या त्रासाबद्दल पुन्हा पुन्हा माफी मागून तो निघाला.

एकंदरीत उत्कर्ष बडे बाप की बिगडी हुई आउलाद होती तर!

‘ठीक आहे त्याने माफी मागितली आहे, आपल्याला यापुढे त्रास झाला नाही म्हणजे झाले’ असा मी विचार करतच होतो पण जाता त्याने एक बाँब टाकलाच…

“ अंकल कल मेरा बर्थडे है, रातको मेरे फ्रेंड्स आनेवाले है, तो थोडा हंगामा हो सकता है, गाना बजाना भी होगा, आपको परेशानी होगी, मेरा बर्थडे है तो पार्टी तो होगी ही! “

बाप रे, उत्कर्ष आज रात्रीसुध्दा त्रास देणार तर!

“ आवाज कम रखो, दुसरे को परेशान मत करो…ये सोसायटी है..,”

मी त्यातल्या त्यात होणाऱ्या त्रासातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला..

मी माझे समाधान जरी करून घेत असलो तरी आज रात्री समोर काय वाढून ठेवले आहे या बाबतीत साशंक झालो होतो.

कुणाशीतरी या विषयावर बोलायला हवे म्हणून बिल्डिंग प्रतिनिधीला कॉल केला.

आयटी इंजिनीअर असलेल्या बिल्डिंग प्रतिनिधीने फोन घेतला नाही. तशी त्याची आणि माझी फारशी ओळखही नव्हती.

पोलिसात तक्रार करण्याचा मार्ग होता पण त्याशिवाय अजून काय करता येईल यावर विचार करत असतानाच माझा फोन वाजला.

“ काय म्हणताय काका?”

बिल्डिंग प्रतिनिधीचा कॉल होता.

उत्कर्षचे काय करायचे यावर आम्ही चर्चा केली.

रात्री त्रास झाला तर उत्कर्षला दम देऊन सोसायटीच्या बाहेर काढू असे आश्वासन त्याने दिले..

संध्याकाळ झाली, मी वरून त्याच्या बाल्कनीत नजर ठेऊन होतो. दिवसभरात चार पाच बियरच्या रिकाम्या बाटल्या बाहेर येऊनपडल्या होत्या! संध्याकाळी त्याच्याकडे कुणी मित्रमंडळी आल्याचे दिसत नव्हते तरीही मी झोपताना कानातघालण्यासाठी कापसाचे बोळे तयार ठेवले होते. अकरा वाजेपर्यंत तरी कोणताही आवाज नव्हता…थोडे हायसेवाटले. आम्ही झोपायला गेलो. मध्यरात्री अचानक फुल व्हॅल्यूमवर स्पीकर सुरु झाला. मी उठून खाली नजरमारली. उत्कर्ष हातात बाटली घेऊन एक एक घोट घशात ओतता ओतता आपल्याच धुंदीत नाचत होता! अख्खीबिल्डिंग हादरवणाऱ्या त्या आवाजाने माझ्यासारखेच इतर रहिवाशी जागे झाले होते.बिल्डिंग प्रतिनिधी आणिअजुन दोघा तिघांनी त्याचा दरवाजा वाजवला पण तो जाम दाद देईना! बिल्डिंग प्रतिनिधीने उत्कर्षच्याबहिणीला (जी अमेरिकेत होती) कॉल केला आणि दररोज होणाऱ्या या त्रासाबद्दल बरीच कानउघडणी केली. हा प्रकार बंद झाला नाही तर पोलीसात तक्रार करण्याची धमकी दिली. पंधरा वीस मिनिटे हा गोंधळ चालू होतानंतर मात्र स्पीकर बंद झाला. बहिणीला फोन केल्यामुळे उत्कर्ष चांगलाच पिसाळला होता, बाल्कनीत येऊन तोबिल्डिंग प्रतिनिधीला शिव्या देऊ लागला…

या मुर्खाच्या नादी लागण्यात अर्थ नाही.यावर काहीतरी ठोस उपाय शोधायला हवा अशी चर्चा करत रहिवाशीपांगले.

उत्कर्षचे शिव्या बरळने आरडाओरडा करणे चालूच होते…

मी पांघरून घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागलो…


प्रल्हाद दुधाळ 9423012020

(क्रमश:)