Bhetli tu Punha - 19 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

भेटली तू पुन्हा... - भाग 19 (अंतिम भाग)"अनु आय मिन मायरा तुझं खर नाव आहे" आदि अन्वीला सांगत होता.

"मायरा....?"

"हो बेटा तुझ्या आईने खुप प्रेमाने तुझं नाव ठेवले होते" जीवन बोलले.

"तुम्ही कसे माझे बाबा असू शकता? माझे आई बाबा तर..." तिच्या डोळ्यात पाणी तरळले.

तिला होणारा त्रास पाहून आदिला वाईट वाटत होते.

"हे बघ अनु मी सगळं सांगतो तू शांतपणे ऐकून घे"

"तू जीवन कुमार म्हणजेच यांची मुलगी आहेस" आदि जीवन यांच्याकडे हात करत बोलला.

अन्वी पुरती गोंधळली होती. तिला काहीच आठवत कस नाही म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत होती.

"तुझा चुलत भाऊ म्हणजे रुद्रने प्रॉपर्टीसाठी तुला व काकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. जीवन काका मिटिंगसाठी मुंबईमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा अपघात घडवून आणण्यात आला आणि तू जेव्हा कोकणात फिरायला गेली होती तेव्हा तुझ्या ही अपघात घडवून आणला होता"

इतकं बोलून तो शांत झाला.

"पुढे काय आदि...?" अन्वी

"एक दिवस जितचा अकॅसिडेंट झालेला म्हणून आम्ही त्याला पाहायला गेलो होतो तर राहुलला तिथे तू दिसली एका वॉर्डमध्ये आणि त्याने मला सांगितले. तेव्हा तुला भेटून डॉक्टरांशी बोललो तर समजलं की गेली पाच महिने तू कोमा मध्ये आहेस आणि तुझी चौकशी ही करण्यासाठी कोणी आले नाही. म्हणून मग अजून महिनभर पाहून ते तुला बेवारस म्हणून....."

त्याचे डोळे भरून आले होते. आईने त्याच्या खांद्यावर थोपटले व त्याला धीर दिला.

"मग काय राजे सर्व काम सोडून तिथेच थांबले. सतत तुझ्याशी बोलत, बुक्स वाचून दाखवत बसायचे आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले. तुला शुद्ध आली. पण तुझी मेमरी लॉस झाली होती आणि डॉक्टर बोलाले की स्वतःहून तिला आठवले तर ठीक नाहीतर जबरदस्तिने काही तिला आठवण्यास सांगू नका" साहिल बोलला.

"पण मग..."

"अजून पण आहेच का?" साहिल हसत बोलला.

"हो म्हणजे... जस आदी म्हणाले की राहुलने मला पाहिले म्हणजे तुम्ही मला आधी पासून ओळखत होता का?" तिने आपली शंका व्यक्त केली व आशेने आदित्य कडे पाहू लागली.

"म्हंटलं तर हो.... म्हंटलं तर नाही..." विशाल दारातून आत येत बोलला.

त्याच्या सोबत जित, राहुल आणि यश ही होता. त्या सर्वांना पाहून साहिल गडबडीने जाऊन मिठी मारली.

"आत तर येऊ दे साहिल त्यांना...कसा आहे जित ? आणि काय रे प्रेमापासून दूर राहून संन्यास घेणारा तू आणि लग्न करून रिकामा ही झालास" आजोबा हसत बोलले.

जीवन शांतपणे सगळं ऐकत बघत होते. आपली मुलगी किती नशीबवान आहे की अश्या घरात राहत होती या विचाराने ते रिलॅक्स झाले.

अन्वी मात्र पुन्हा गोंधळली. इतक्या सर्वांना पाहून आणि आई बाबांना त्यांच्याशी अस हसत बोलताना पाहून ती पुरती गोंधळली.

"प्लिझ मला कोणी सगळं सत्य सांगेल का? की मी अशीच इथे पुतळा बनून उभी पाहू?" ती थोडी घुष्यात बोलली.

आता अन्वीची चिडचिड होत होती.

"मी सांगतो तुला" अस म्हणत विशाल पुढे आला व तिला सर्व सत्य सांगू लागला.

"आदिने तुला अपघाता पूर्वी एक दिवस पाहिले होते, जेव्हा तू फिरायला आली होती तेव्हाच आम्ही ही ट्रेनिंग संपवून रिलॅक्स होण्यासाठी तिथे आलो होतो. एकाच रिसॉर्ट मध्ये लागूनच्या रूम मधेच आपण राहत होतो"

अस म्हणत त्याने तिला बिचवरचा किस्सा सांगितला नंतर लहान मुलीसोबत खेळत असताना, तिला कसा धडकला होता हे सर सांगितले.

"ट्रिप मधून परत आल्यापासून प्रेमपूजारी महिनाभर तरी पूर्णपणे कोम्यात होता. नंतर ही तुझे फोटोज् पाहून दिवस काढत होता, कुठे नाही शोधले तुला पण तू भेटली कुठे हॉस्पिटलमध्ये" राहुल ही हसत बोलला.

"कोकण से टपके हॉस्पिटल में अटके ऐसा हाल था बेचारे का" अस म्हणून जित यशला टाळी देऊन हसू लागला.

"पण मग मी इथे कशी काय?"

"जेव्हा जीवन काकांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा गावडे सर व मीच तिथे होतो. जीवन काकांची शुद्ध हरपत चालली होती. त्या आधी ते हळूच पुटपुटले, की माझ्या मुलीला वाचवा तिला थंडी व गर्दी सहन होत नाही आणि ते बेशुद्ध झाले. शोध घेतल्या नंतर समजले की तू मायरा कुमार आहे जीवन कुमार द बिंग अँड फेमस बिझनेसमन ऑफ गोवा अँड साऊथ इंडिया यांची एकुलती एक मुलगी आहे" आदि बोलला.

"त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ही तुला शोधण्यासाठी काही माणसं आली होती. तेव्हा डॉक्टरांना सगळं सांगून तू तिथे नाही अस सांगण्यात आलं" यश बोलला.

"म्हणजे हे माझे बाबा....मग हे दोघे कोण आहेत?" अन्वी आई बाबांना उद्देशून बोलली.

"ते माझे आजी आजोबा आहेत तुझ्या जीवाला धोका होता आणि थंडी तुला सहन होत नाही हे माहीत होतं त्यामुळे तुला इथे कोणीही शोधणार नाही अस वाटलं म्हणून तुला मी इथे घेऊन आलो" आदि नजर खाली ठेवून बोलला.

"ते सगळं ठीक आहे पण तू इथे का आलेला सीए म्हणून?" अन्वी चे प्रश्न संपत नव्हते.

"ते इथे जे गोखले सर होते ना तुझ्या स्कूलमध्ये ते ड्रग्ज सप्लाय करत होते, मुलींना बाहेरच्या देशात विकण्याचा कारभार ही त्यांचाच होता. इथे ड्रग्ज सप्लाय व मुलींना बेकायदेशीर पणे बाहेरच्या देशात विकण्याचे काम सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्याचाच तपास करण्यासाठी आम्ही इथे होतो"

"आणि तो शिपाई मोरे...?"

अन्वीचे प्रश्न ऐकून सगळ्यांनी डोक्याला हात मारून घेतला.

"तो ही आमच्या टीमचा मेम्बर आहे पण जेव्हा गरज असते तेव्हाच त्याला बोलवलं जात" आदि हसत बोलला.

ती निरागस पणे प्रश्न विचारत होती आणि आदि त्याची उत्तरं देत होता. बाकी सगळे फक्त हसत त्यांना बघत बसले होते.

"काही खर नाही या प्रेमपूजाऱ्याच, पुजारीन अशी भेटली आहे की फक्त प्रश्नोत्तरे करत बसायचं" यश हळूच बोलला.

"आदया, यश काय म्हणतो बघ तुला...तुझं अवघड झालं मास्तरनी भेटली आहे आता तुझं काही खर नाही जपून राहा म्हणे फक्त प्रश्नोत्तरे करत राहिला तर बाकीचे...." विशाल बोलत होताच की यशने त्याचे तोंड दाबले.

"ये मी अस काही नाही म्हणालो हा...हाच आपण हुन काही ही बोलत आहे."

पण अन्वीला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळाला तशी ती तिथून लाजून चहा आणते म्हणून निघून गेली. तिला अस लाजताना पाहून आदिला खूप छान वाटलं आणि त्याच्या ओठांवर ही गोड हसू आलं.

जीवन काका काय समजायचे ते समजून गेले.

*******

चार वर्ष्या नंतर....

"अनु माझी फाईल कुठे आहे?" आदि रूममधून ओरडत होता.

"तिथेच टेबलवर ठेवली आहे घ्या" ती ही किचन मधूनच ओरडली.

बाबांना व डॅड ना म्हणजेच जीवनकुमार यांना चहा देऊन ती आईला पूजेला फुल देऊन आली

तर पुन्हा आदिचा आवाज आला,"कुठे आहे यार आज मीटिंग आहे त्या केसची आणि तू...."

तो बोलता बोलता थांबला कारण अनु मागून येऊन त्याला मिठी मारून उभी होती.

"अनु आधीच उशीर झाला आहे, त्यात फाईल भेटत नाहीये आणि अशी तू जवळ आली तर मी कामावर जाऊ कसा सांग" आदी ही तिला मीठीत घेऊन सेडीकटिव्ह आवाजात बोलला.

इतक्यात कोणी तरी पान फडल्याचा आवाज त्यांना आला तसे दोघांचे ही डोळे मोठे झाले व दोघे ही पळत गॅलरीत गेले तर समोर एक तीन वर्ष्याची लहान मुलगी फाईल घेऊन त्यातील पेजस् फाडत होती.

अनु ने पटकन तिच्या हातून फाईल घेतली तर आदिने त्या मुलीला उचलून घेतले.

"पिल्लू , डॅडा ची ही कामाची फाईल आहे ना, अस नाही फाडायचं सोनू" आदि तिला किस् करत बोलला.

"हो! अर्यल आहे म्हणून.... याच ठिकाणी मी असते तर किती रागवले असते मला तुम्ही" अनु दोघांच प्रेम
बघून बोलली.

"तुला कधी रागावतो का मी?" आदि एक हाताने तिला आपल्याकडे खेचत बोलतो.

तशी ती लाजते. इतक्यात त्याचा फोन वाजतो. लगेच तिला बाजूला करून अर्यलला अनुच्या हातात देत त्याने मोबाईल घेतला.

"येस सर! ओके सर... आय विल बी देयर"

कॉल होताच त्याने दोघींना ही कपाळावर किस केलं व खाली जाऊन आई, बाबा व डॅड चा आशीर्वाद घेऊन तो निघाला.

फाईल घेऊन तो बाहेर निघून गेला पुढच्या कामगिरी साठी.

Share

NEW REALESED