Vastitatya Vatevarchi... Haweli - 3 books and stories free download online pdf in Marathi

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 3

कोण आहे काय? कोण आहे काय? अस करत करत ती आतमध्ये जात होती.
ती म्हणजेच सृष्टी...
ती आज हवेलीत आलेली. हवेली बाहेरून तर एका आकर्षक पेंटिंग ने नटलेली होती. पण इतकि जागा व्यापून उभी होती कि जर कोणीतरी एकटच आल तर मनात धडकि भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ती सुद्धा घाबरत घाबरत आतमध्ये चालली होती. पण ती जिच्या सोबत आलेली ती नेत्रा मात्र दिसत नव्हती. त्या एकत्रच बोलत बोलत आलेल्या. पण अचानकच मागच्या मागे ती गायब झालेली. याचच सृष्टीला दडपण आलेल. गाववाल्यांनी जर तिथे गेला तर एकमेकांना नावाने बोलवू नका अस सांगितलेल. म्हणून ती कोण आहे काय? कोण आहे काय? अशीच हाक मारत चाललेली.
ती पुढे पुढे चाललेली तिला जातानाच अंधारी खोली दिसली. तिला वाटल नेत्रा कदाचित आतमध्येच असेल म्हणून ती आतमध्ये जाऊ लागली. तस तर तो अंधार बघूनच तिच्या जिवाची धडधड होत होती. पण बॅटरीच्या प्रकाशात जेवढा उजेड दिसत होता त्या उजेडातून ती पुढे पुढे चालली होती.
तिच्या कानावर झोपाळा झुलत असल्याचा आवाज आला आणि तिला खूप आनंद झाला. त्यावरून तिला ये सृष्टी सृष्टी ये इकडे बघ हा झोपाळा किती मोठा आहे. अस म्हणत तिला नेत्रा हाक मारत होती. म्हणूनच ती तशीच बॅटरी हातात सावरत जोरात पळत पळत जाऊ लागली. खरतर नेत्रा दूर जाऊन थोडाच वेळ झालेला. पण तरीही ती इतकी घाबरलेली कि तिला कधी एकदा जाऊन मिठी मारते असच झालेल.
शेवटी तिला नेत्रा समोर दिसली तीने तिच्या दिशेने बॅटरी केली पण तिच्यावर प्रकाश पडण्याआधीच बॅटरी बंद पडली. ते पाहून सृष्टी खूपच घाबरली व नेत्राला आवाज देऊ लागली.
तशी नेत्रा म्हणाली."काय ग सृष्टी असली कसली तू घाबरट. चल लय नको घाबरू ये लवकर आपण झोका घेऊया."
‌ नेत्राचा आवाज ऐकून सृष्टी थोडी सावरली. ती झोपाळ्याचा आवाज ऐकत ऐकत नेत्राच्या दिशेने जाऊ लागली. जरास पुढे गेल्यावर नेत्राने तिला हात दिला मग ती तिच्या शेजारी जाऊन बसली.
पण सृष्टीला त्या अंधाराची खूपच भिती वाटत होती. तिच्या तोंडून शब्दच बाहेर येत नव्हते. पण नेत्रा तिला लहानपणीच्या झोपाळ्यावर खेळण्याच्या क्षणांची आठवण करून देत होती. मग मात्र सृष्टीला थोड हायस वाटू लागल. नेत्राच बोलण ऐकत ऐकत तिच्या मनातली भिती पूर्ण ओसरली व तिच लक्ष केवळ नेत्राच्या बोलण्याकडेच गुंतून गेल. थोड्या वेळात तिच बोलण ऐकत ऐकतच सृष्टीचा डोळा लागला.


हवेलीच्या बाहेर गवतच गवत वाढले होते. सायली ते सगळच निरखून पाहत होती. ती ने आधी आजुबाजूलाच काही धागादोरा मिळतो का? हे बघाव आणि नंतर आतल्या अंधाऱ्या खोलीत बघाव अस ठरवलेल. खरतर ती भटकंती करण्यासाठी येथे आलेली. पण त्या हवेलीने तिच्या मनात घर केलेल. तीला जून्या काळातल्या हवेली, वाडे, वस्तू बघण्याची भारी आवड होती. म्हणूनच ती ने इथे येण्याचा निर्णय घेतलेला.
आज तिला गावात येऊन आठवडा झालेला. आठवडाभर ती ही हवेली बघण्यासाठी तळमळत होती. पण तीचे मामा मामी तिला जाऊच देत नव्हते. ती आज त्यांचा डोळा चुकवून आलेली. तिथे जाताना गावातल्या बऱ्याच लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केलेला पण ती मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आलेली.

......

काही वेळानंतर सृष्टी जागी झाली. तस तिच्या पायाला प्रचंड वेदना होऊ लागल्या. ती ने बाजूला पाहिले तर नेत्रा तिथे नव्हती. ते पाहून ती खूपच घाबरली पण असेल इथेच कोठेतरी असा स्वतः ला दिलासा देत ती झोपाळ्यावरून खाली उतरू लागली. पण ती जोरात खाली पडली. तसा तिथे बाजूला एक दिवा होता तो पेटला. आणि त्या प्रकाशात ती ने खाली पाहिले तस तिच्या डोक्याला असंख्य मुंग्या चावत आहेत असच जाणवल. ती चे दोन्ही पाय तिला दिसत नव्हते. ते पाहून तिच्या डोळ्यात असंख्य अश्रू जमा झाले.
ती रडत रडतच नेत्राला आवाज देऊ लागली. पण नेत्रा तिच्या आवाजाला प्रतिसाद देईना तस तिला खूपच भिती वाटू लागली.
परत तिला जाणवू लागल कि कोणीतरी पायावर घाव घालत आहे. त्यामुळे तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. पाय तर दिसत नव्हते. पायाच्या ठिकाणातून रक्तच तेवढ येत होत. ती तशीच वेदनेने कळवळू लागली व नेत्राला पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागली. पण नेत्रा काही येत नव्हती.
थोड्या वेळात तिथे तिला वाऱ्याचा स्पर्श होऊ लागला. तस तीच्या पायाच्या ठिकाणी अजूनच वेदना होऊ लागल्या.
नंतर तिच्या कानावर हळूवार आवाज आला. कशी आहेस सृष्टी. तस ती ने मागे वळून पाहिले मागे नेत्रा उभी होती. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते पण डोळ्यात प्रचंड आग होती. ती लांबूनच तिच्या हाताकडे एकसारख पाहू लागली. तसा सृष्टीचा हात तसाच निखळून बाहेर आला. ती जोरात किंचाळली. मग नेत्रा पुढे पुढे चालत येऊ लागली. आता सृष्टीच सगळ लक्ष त्या प्रचंड जाणवणाऱ्या वेदनांवरच होत. नेत्राने मात्र जवळ येत. तिच्या कमरेत हात घातला व तस तिच्या पाठिवरून रक्ताचा स्राव गळू लागला. सृष्टी तर अर्धमेलीच झाली.
थोड्या वेळात नेत्रा तिच्या जवळ आली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली तस तिची शुद्ध हरपली व ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. मग मात्र नेत्रा म्हणून वावरणारी ती मुळ रूपात आली.
निळसर डोळे, पांढरेशुभ्र लांबसडक केस, जाडजूड पण तळवा नसलेला पाय, टोकेरी नखे, निखळलेला खांदा, रक्तात बरबटलेला चेहरा. तिने त्या रूपातच त्याला हाक मारली तो सुद्धा तिच्या जवळ आला. मग दोघ मिळून तिच मास खाण्यात गुंग होऊन गेले.

कथेचा हा भाग थोडा वेगळा वाटेल पण हळूहळू जशी कथा पुढे सरकेल तसा समजत जाईल

Share

NEW REALESED