world cup books and stories free download online pdf in Marathi

वल्डकप

आगामी वर्ल्डकप जिंकायचा आहे? शक्य होईल काय?

*वर्ल्डकप भारताची शान आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आपण १९८३ चा वर्ल्डकप जिंकला. तेव्हा कपिलदेवनं तो कप चक्कं डोक्यावर उचलून धरला होता आणि आताच्या आस्ट्रेलियन संघानं त्याला पायात ठेवून पायदळी तुडवीत असल्याचे सिद्ध केले आहे.*
पराभव.......पराभव होतच असतात आणि त्या पराभवातून हानीही होतच असते. पराभव हा काही सांगून होत नाही तर तो आकस्मीकपणे होत असतो. त्यानंतर सारंच नुकसान होतं.
पराभवानंतर जो जिंकतो. तो पराभवी व्यक्तीला चांगली वागणूक देईल हे काही सांगता येत नाही. काही राजे चक्कं पराभवी व्यक्तींना गुलामाचीच वागणूक देत असत. उदाहरण द्यायचं झाल्यास पृथ्वीराज चव्हाणचं देता येईल. पृथ्वीराज चव्हाणचा झालेला पराभव. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचा मोहम्मद घोरीनं पराभव केला. तेव्हा पृथ्वीराज चव्हाणला त्यानं आपल्या राज्यात नेलं. तिथं त्यानं पृथ्वीराजला चांगली वागणूक दिली नाही तर त्यांचे डोळेही फोडले होते.
विश्वकपातील एक प्रसंग असाच आहे. आस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्श मिशेल चक्कं जिंकलेल्या कपावरच पाय ठेवून बसला होता. त्यानंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत सांगतांना असं म्हणता येईल की तो आस्ट्रेलियन संघ जिंकला. त्यानंतर तो सहाव्यांदा जिंकल्याचं सिद्ध झालं. त्याचबरोबर सिद्ध झाली त्यांची महत्वाकांक्षा. ही त्यांची कृती म्हणजे त्यांनी भारतीयांना हरवलं. त्यानंतर तो जगजेत्ता असल्यानं व त्यांनी कप जिंकल्यानं त्या कपाचं ते काहीही करो. तुम्ही बोलणारे कोण? अशी आस्ट्रेलियन संघाची कृती. तो भारतीय संघाचाच नाही तर तो वर्ल्डकपचा अपमानच. तसाच अपमान आहे त्या क्रिकेट खेळाचा. खरं तर त्या कृतीबद्दल बी सी सी आयनं आस्ट्रेलियन संघावर खेळायची काही काळासाठी बंधनं घालायला हवीत. परंतु ते तसं करणार नाहीत.
ती कृती.....ती कृती हे दर्शवते व भारतीयांना वारंवार खुणावत आहे की तुम्ही आम्हाला जिंकूच शकत नाही. आम्ही जगजेते आहोत. तशीच ती कृती वारंवार सांगत आहे की जर तुमच्यात दम असेल तर आम्हाला पुढील हंगामात जिंकून दाखवाच. आस्ट्रेलियन संघाची ही कृती. त्यांना जिंकल्याचा उन्माद चढल्याचं सिद्ध करतेय व सर्व संघांना खुणावतेय की हे इतर तमाम देशांनो, तुमच्यात दम नाही की तुम्ही सहावेळा जिंकाल वा जिंकू शकाल.
वरील बाबीतून आस्ट्रेलियन संघांचा उन्माद जरी दिसत असला तरी आपण हे विसरु नये की आपण हारलो. आपण हारलो. परंतु आपण मैदानावर हारलो असलो तरी आपलं मनातून हारलेलो नाही. कोट्यवधी भारतीयांची मनं आपण जिंकलेली आहेत. थोड्याशा चुका झालेल्या आहेत. त्या सुधरवणं बाकी आहे आणि पुढील वर्षी आपण त्या चुकांमध्ये नक्कीच सुधारणा करुन वर्ल्डकपला गवसणी घालूच आणि जगजेत्या आस्ट्रेलियन संघाला आला असलेला उन्माद तोडून मगच दम घेवू.
भारतीय संघ.......भारतीय संघ मनातून हारला नसला तरी मैदानावर हारला. त्यांच्या काही चुका झाल्यात. त्या चुका सांगणं गरजेचं समजतो. त्यात पहिली चूक झाली ती सर्व खेळाडूंचा संयम. रोहीत शर्मा संयम न बाळगता खेळत होता. जशा दोन विकेटा गेल्या तरी तडाखेबाज खेळी खेळत तो खेळत होता. त्यातच त्यापुर्वी आस्ट्रेलियन संघाकडून दोन कॅचही सुटल्या होत्या. त्यावरुन कल्पना येत होती की आस्ट्रेलियन संघाची फिल्डींग तगडी आहे. आपण बाद होवू शकतो. तरीही कप्तान असून रोहीत शर्मा संयमी खेळी खेळला नाही व बाद झाला. तो जर थोडा संयम बाळगून खेळला असता तर तो बादही झाला नसता अन् संघ जिंकला असता. रोहीत शर्माचं वर्ल्डकप फायनलमध्ये फलंदाजी करतांना टिकणं अतिशय आवश्यक होतं. कारण गिल बाद झाला होता.
कप्ताननं काही केलंही नाही तरी चालेल. तो टिकून राहाणं गरजेचं असतं. तसा शुभम गील बाद झाला होता. तडाखेबाज खेळाची पाहिजे त्या प्रमाणात आवश्यकता नव्हती. काही वेळानंतरही तडाखेबाज खेळी खेळता आली असती. परंतु नाही, रोहीतनं ती जाणीव न ठेवता व संयम न राखता तडाखेबाज खेळी खेळली व त्याच खेळण्यातून तो बाद झाला. शेवटी तशी तडाखेबाज खेळी खेळून व कमी चेंडूत जास्त धावा काढून आपण काय मिळवलं? तर याचं उत्तर काहीच नाही असं आहे. मग तशी खेळी खेळून आपला काय उपयोग झाला? तर त्याचंही उत्तर काहीच नाही असे आहे. तसेच याच श्रेणीत शुभमन गील आणि श्रेयस अय्यरही गणले जातात. त्यांनीही आपली खेळी संयम न बाळगता खेळलेली आहे. तसं पाहता कधीही एक खेळाडू बाद झाल्यास दुसऱ्यानं काहीवेळ तरी संयम राखत डोकं शांत ठेवून खेळावं लागतं. तशी वर्ल्डकपची खेळी खेळली गेलेली नाही.
दुसरी चूक झाली जास्त संयमाची. लोकेश राहूलनं जरा जास्तच संयम राखला. त्यानंतर जेवढे चेंडू, त्यापेक्षा निम्म्या धाव केलेल्या फलकावर दिसत होत्या. यात महत्वपुर्ण गोष्ट ही की एवढाही संयम राखणं बरं नाही की धावा बनणार नाहीत व आपण पिछाडीवर येवू.
भारतीय संघ हारला. त्याचा काही अंशी दोष विराटवर लावला जावू शकतो. कारण विराट बाद झाला. परंतु तो अनावधानाने बाद झाला. त्यात त्याची चूक नव्हती. तो बाद होणं एक अपघातच होता. तसं पाहता त्यात तिसरी चूक झाली ती क्षेत्ररक्षणाची. आस्ट्रेलियन संघानं ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणावर भर दिला. तसा भर त्याप्रमाणात भारतीय संघानं दिला नाही. अगदी सुरुवातीलाच जो आस्ट्रेलियन संघातील हेडचा झेल विराट कोहलीनं सोडला होता व हेड बाद होता होता वाचला. तो चौकार गेला होता व त्यानंतर तोच हेड भारताची डोकेदुखी बनत त्यानंच भारतीय संघाविरुद्ध विराट विजय साकार केला व एकतर्फी आस्ट्रेलियन संघाला जिंकवले. अशी आपली फिल्डींग. या तीन महत्वपुर्ण आपल्या भारतीय संघाच्या चुका. त्यात चवथीही एक चूक झाली. ती म्हणजे विकेट न पडणं. बाकी इतर दहा खेळीत भारतीय गेंदबाजानं चांगली खेळी खेळली अन् त्यादिवशीच काय झालं होतं कुणास ठाऊक की एकही गेंदबाज चालला नाही. एव्हाना दरवेळेस चालणारा मोहम्मद शम्मीही त्या दिवशी चालला नाही. या चार जर चुका आपल्या त्या दिवशी झाल्या नसत्या तर आपण नक्कीच जिंकलो असतो यात काही चुकीचं नाही. आपण याच चुका जर आगामी काळात सुधरवल्या तर भारतीय संघ आस्ट्रेलियन संघापेक्षा बलाढ्य ठरु शकतो. तसेच या जर चुका भारतीय संघाकडून झाल्या नसत्या तर आपला भारतीय संघ खरंच वर्ल्डकप सामन्यात विजयी ठरला असता. परंतु आता गेली गोष्ट पार पडली. आता त्या चुका आठवून काय करायचं आहे. काहीच नाही. काही उपयोगही नाही. परंतु त्याच चुका आठवून येणाऱ्या चार वर्षात त्या चुकांवर वारंवार सराव करुन पाहायचा आहे. मग यश आपल्याच पाठीशी आहे. हे आपण विसरु नये. तसेच ज्या वल्डकपला आपण देव समजतो, त्याच कपला आस्ट्रेलियन संघानं पायाखाली तुडविल्याची किंमतही आपल्या वसूल करायची आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण येणारा २०२७ चा वर्ल्डकप जिंकू. तशी तयारी आपल्याला करायची आहे. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०